एग बिर्याणी

मितालि's picture
मितालि in पाककृती
13 Apr 2009 - 2:36 am

एग बिर्याणी
वरळी मुम्बईला कुठेतरी एका लहानश्या होटेल मधे ५५ रु. ला ही एग बिर्याणि उत्कृष्ट मिळते. तशी बनवण्याचा प्रयत्न केलाय. छान बनली म्हणुन पाककृती देतेय..

पाककृती:

२ उकडलेली अंडी चिरून दोन दोन तुकडे करून घ्या.

१ वाटी बासमती तान्दळाचा जीरे, शाहिजीरे, लवंग, मिरी, दालचीनी, मसाला वेलची, साधी वेलची, तमालपत्र, हळद, मीठ , तुप घालून मोकळा भात शिजवून घ्या.

१ मोठा कांदा बारीक़ चिरून तेलावर परतून घ्या. तेलाचा सढळ हस्ते वापर करा. त्यात आले लसून पेस्ट व १ वाटी टोमेटो घालून परता. नंतर त्यात मिर्ची पावडर,
बिर्याणी मसाला, धणेजिरे पुड आणि हळद घालून परता. पाणी घालून उकळी आणा. ही ग्रेवी थोडीशी तिखट व दाटसर बनवा. कोथिंबीर चिरून घाला.

आता या ग्रेवीवर चिरलेली अंडी घाला व हलकेच मिक्स करा. या ग्रेवी वर भाताचा थर द्या आणि कोथिंबीर पसरा. बिर्याणी ला थोडावेळ मंद आचेवर शिजू दया.

प्रतिक्रिया

चकली's picture

13 Apr 2009 - 4:40 am | चकली

४ स्टेप मध्ये सोप्या पद्धतीने लिहलेली पाकृ आवडली.
>>>"तेलाचा सढळ हस्ते वापर करा. त्यात आले लसून पेस्ट व १ वाटी टोमेटो घालून परता"
यामूळे नक्कीच छान लागत असणार!

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

13 Apr 2009 - 5:20 am | प्राजु

मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 9:44 am | स्मिता श्रीपाद

पाकृ खुप सोपी वाटते आहे...

फोटो खासच..... :-)
नक्की करुन पाहिन...

-स्मिता

वल्लरी's picture

13 Apr 2009 - 1:05 pm | वल्लरी

असेच म्हणते.. :)
---वल्लरी

दशानन's picture

13 Apr 2009 - 9:45 am | दशानन

सर्व भगिनीना विनंती येथे जरा ऑनलाईन कुकिंग क्लास चालू करा... वरील सोपी पाककृती पाहून परत एकदा किचन मध्ये लढाईला जावे असे वाटत आहे मला ;)

अनुप कोहळे's picture

13 Apr 2009 - 9:57 am | अनुप कोहळे

आहो राजे....थालीपिठ प्रसंग...अठवला...शाहारे आले..... #o

विसोबा खेचर's picture

13 Apr 2009 - 12:13 pm | विसोबा खेचर

ज ब रा...!

मितालिचा विजय असो.. :)

तात्या.

sukhada singh's picture

14 Apr 2009 - 1:47 pm | sukhada singh

दिल्लि दरबार
हि डिश मुम्बै ल नक्कि कुठल्या होटेलत मिळ्ते??? आता ३ वर्षानि मुम्बै ल जायचा योग आला आहे.त्या मुळे घरि ट्राय करण्या पे़क्षा होटेलातच जाउन खाउ.

स्वाती दिनेश's picture

13 Apr 2009 - 4:20 pm | स्वाती दिनेश

व्वा.. मस्तच दिसतेय ग बिर्याणी आणि पाकृ सोपी दिसते आहे, नक्की करणार..
स्वाती

अथांग सागर's picture

18 Apr 2009 - 11:47 pm | अथांग सागर

आजच करुन खाल्ली!!!

--अथांग सागर

मितालि's picture

19 Apr 2009 - 3:51 am | मितालि

मी केलेल्या बिर्याणी पेक्षा छान झाली आहे...

विसोबा खेचर's picture

14 May 2009 - 11:36 am | विसोबा खेचर

अथांगसागरा,

अंडा बिर्याणी जबरा रे!

तात्या.

मितालि's picture

19 Apr 2009 - 3:49 am | मितालि

ऍवरेस्ट चा शाही बिर्याणी मसाला...

लवंगी's picture

21 Apr 2009 - 5:35 pm | लवंगी

पर्वा बनवली ग! काय झकास झाली होती.. पोरांनी पण आवडीने खाल्ली.

सुप्रिया's picture

14 May 2009 - 11:09 am | सुप्रिया

परवा ही बिर्याणी केली होती. फक्त मी शाकाहारी असल्यामुळे अंडी घातली नव्हती
आणि नारळाच्या दुधात तांदूळ शिजवले होते. अगदी हॉटेलमधल्या बिर्याणीसारखी
लागत होती. नवर्र्याने पण नावाजली.

- सुप्रिया

देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

जागु's picture

14 May 2009 - 11:18 am | जागु

मस्त आहे. करुन बघेन.