राग मारवा - माहिती हवी आहे

अनुप कोहळे's picture
अनुप कोहळे in काथ्याकूट
11 Apr 2009 - 3:27 am
गाभा: 

मिपाकरांनो, नमस्कार!

काल रत्री पंडित जसराज ह्यांचा राग मारवा ऐकत होतो. फारच धिर गंभीर राग आहे. कुणाला ह्या रागा ची माहिती असल्यास मिळू शकेल काय?
मला आरोह अवरोह आणि ईतर माहिती हवी आहे. लिंक असली तरीही चालेल.

धन्यवाद!
अ. को.

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

11 Apr 2009 - 5:50 am | अजय भागवत
तिमा's picture

11 Apr 2009 - 9:33 pm | तिमा

तात्या आणि त्यांच्यासारखे अनेक रसिक व ज्ञानी लोक मिसळपाववर आहेत. त्यांना विचारा. नाहीतर वरील लिंक आहेच.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

हेरंब's picture

11 Apr 2009 - 9:38 pm | हेरंब

मारच्याची माहिती कुठेही मिळेल. पण मारव्याचे अंतरंग समजावून घ्यायचे असतील तर वसंतराव, भीमसेनजी वा किशोरीताईंचा मारवा ऐकावा.

आंबोळी's picture

11 Apr 2009 - 10:15 pm | आंबोळी

मारच्याची माहिती कुठेही मिळेल.
आयला.... आता हा मारच्या कोण?

आंबोळी

विसोबा खेचर's picture

12 Apr 2009 - 3:38 pm | विसोबा खेचर

पण मारव्याचे अंतरंग समजावून घ्यायचे असतील तर वसंतराव, भीमसेनजी वा किशोरीताईंचा मारवा ऐकावा.

मला उस्ताद आमिरखासाहेबांचा मारवा अधिक आवडतो..

तात्या.

घाटावरचे भट's picture

12 Apr 2009 - 4:21 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो. मॉन्युमेंटल मारवा आहे त्यांचा.

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:14 pm | मिसळभोक्ता

वसंतराव देशपांडे आणि मारवा, हे अतूट समीकरण आहे. ह्याचे कारण त्यांचा मारवा ऐकूनच कळेल. वसंतराव गेले, त्यावेळी भीमसेन मैफिलीत होते. वसंतराव गेल्याची बातमी ऐकून त्यांनी "आज महाराष्ट्रातला मारवा हरपला" हे उद्गार काढले. ह्यावरूनच आपल्याला कळेल. मारवा म्हणजे काय, हे वसंतरावांनीच एकदा सांगितले आहे. पिऊन, छानछौकी करून एखादा माणूस घरी जायला निघाला आहे, आणि आजूबाजूची सारखी सारखी घरे बघून, आपले घर कोणते म्हणून गोंधळला आहे. मारव्यात षड्ज हे आपले घर, हे माहिती असूनही, आजूबाजूच्या घरातली "मजा" चाखून, आपले घर सारखे टाळत राहणे, म्हणजे मारवा.

दुसरी मारव्याची व्याख्या म्हणजे, हा अनिकेत राग आहे. बेस (म्हणजे आधार) म्हणून जो सूर धरायचा, तो षड्ज, हाच ह्या रागातून वर्जित आहे. त्यामुळे, हा राग गायला मोठी ताकत लागते. सर्व गवई ज्या सुराच्या आधाराने इतर सूर लावतात, तोच षड्ज जर वर्जित असेल, तर तो फक्त मनात धरावा लागतो. मनात एकदा सूर धरला, तर ओठात यायला फारसा वेळ लागत नाही. तरी देखील तो ओठात येऊ द्यायचा नाही, ह्याला विलक्षण ताकद लागते. ती वसंतरावांखेरीज आजवर तरी मी कोणातही पाहिली नाही. अगदी आमिरखानसाहेबांमध्ये पण नाही. बाकी, मेघ म्हटले की आमिरखान साहेब आठवतातच. पण मारवा, म्हटले, की वसंतरावांखेरीज कुणीही आठवू नये.

(त्यामुळेच वाड्कर, बाळासाहेब मंगेशकर वगैरे तथाकथित मान्यवर हे जेव्हा "बेटा, तू जरा कम पट्टीमे गाया" असे सगळे उपदेश देतात, त्यावेळी त्यांना म्हणवेसे वाटते, की ***, त्या गायकाने एक पट्टी निवडली, बाकीचे सूर तर त्या पट्टितच लावले ना ? सुरांचे बघा पट्टीचे नको ! वसंतराव दीनानाथांची -हृदयनाथच्या वडिलांची- गाणी म्हणायचे त्यावेळी कमी पट्टीत गायचे. पुष्करसारखा उच्च गायक, ह्यांना "हरकती जास्त" म्हणून आवडत नाही. अरे, पण मूळ गाणे बघा, वसंतरावांनी, किंव कुमारजींनी किती हरकती घेतल्या आहेत त्या बघा. वसंतरावांनी "घेई छंद मकरंद" मध्ये शेक्डो जागा घेतल्या आहेत, आणि एकही रिपीट नाही. त्यांनी वाडकरांसमोर हे गाणे म्हटले असते, तर त्यांनाही "बेटा, हरकतींमुळे गाण्यातले भाव नष्ट होताहेत", असा "मान्यवरांकडून" शेरा मिळाला असता.)

असो, मूळ विषयाकडे दुर्लक्ष होते आहे. मारवा ह्या रागाची व्याख्या हवी असेल, तर वसंतरावांचा मारवा ऐकावा, हा अनाहूत सल्ला.

-- मिसळभोक्ता

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Apr 2009 - 7:09 am | llपुण्याचे पेशवेll

मारवा म्हटले की वसंतरावच येतात डोळ्यासमोर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मराठी_माणूस's picture

13 Apr 2009 - 12:28 pm | मराठी_माणूस

एखाद्याचे गुणगान करताना दुसर्‍याला नावे ठेवण्याची गरज नाही.

(संपादकाना विनंती , त्यांनि ही प्रतिक्रिया संपादीत करुन असभ्य शब्द उडवावेत)

मैत्र's picture

13 Apr 2009 - 3:39 pm | मैत्र

त्यामुळेच वाड्कर, बाळासाहेब मंगेशकर वगैरे तथाकथित मान्यवर हे जेव्हा "बेटा, तू जरा कम पट्टीमे गाया" असे सगळे उपदेश देतात, त्यावेळी त्यांना म्हणवेसे वाटते, की ***, त्या गायकाने एक पट्टी निवडली, बाकीचे सूर तर त्या पट्टितच लावले ना ?

पुष्कर लेले कदाचित पुढे मोठा गायक होईलही. पण पहिले तीन दिवस तो जे गायला ते आपल्याला स्वर्गीय वाटत असेल आणि अजिबात चुकीचे वाटत नसेल तर ते आपले वैयक्तिक मत आहे. सुगम संगीतात थोडा बदल, एखादी तान घेणे वेगळे. आणि सगळे गाणे विनाकारण गळ्यातली फिरत दाखवत ताना घेत, मूळ गाण्यापासून सरसकट फारकत घेत गाणे वेगळे. दोन्ही परीक्षकांनी बर्‍याच चांगल्या शब्दात, नेमकेपणाने काय चुकलं आहे ते सांगितलं आणि चौथ्या भागात कुमारांचं गाणं चांगलं झाल्यावर दिलखुलास पणे कौतुकही केलं.
(तेही अगदी शंभर टक्के जमलं नव्हतं. मी त्यानंतर मूळ गाणं / अभंग ऐकून पाहिला. पण कुमारांचं गाणं तयारीनं आणि चांगलं गाणं हेच मोठे धाडस आहे. पुष्कर पेक्षा राहुल देशपांडे कुमारांच्या जागा जास्त नेमकेपणाने घेतो असं वाटतं.)

या साठी या दोन दिग्गजांबद्दल इतक्या असभ्य पणे लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही! ही प्रतिक्रिया अजून इथे राहिली हेच आश्चर्य आहे!! तो कार्यक्रम हा सुगम संगीताशी संबंधित आहे. शास्त्रीय संगीताचा संबंध हा स्वर, ताल, तयारी याच दृष्टीने तिथे येतो.
तिथे वाडकरांच्या शास्त्रीय गायनाबद्दल काहीही विधान करण्याचा संबंधच येत नाही.

आणि हा वरचा लेख मारवा या रागाबद्दल आहे, त्याबद्दल किंवा वसंतरावांबद्दल अभिमानाने आणि आदराने लिहिताना याच्याशी संबंध नसलेला मुद्दा एक परिच्छेद भर लिहून दुसर्‍या कोणाबद्दल इतके हीन शेरे मारणे अत्यंत धक्कादायक आहे!!

संपादक - योग्य ते बदल केले आहेत.

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2009 - 10:11 pm | मिसळभोक्ता

पुष्कर पेक्षा राहुल देशपांडे कुमारांच्या जागा जास्त नेमकेपणाने घेतो असं वाटतं.

जरा धो धो हसून घेतो. नंतर तुमच्या प्रतिसादाविषयी मनसोक्त रडून घेता येईल.

आज "मान्यवर" म्हणून अवधूत गुप्ते आहेत. "मान्यवर" म्हणजे काय, हे आजवर हृदयनाथ आणि वाडकर ह्यांच्या उपस्थितीने कळले होते, ते आज अवधूत मान्यवर म्हणून आला, तेव्हा "मान्यवर" चा खरा अर्थ कळला.

-- मिसळभोक्ता

मैत्र's picture

14 Apr 2009 - 7:19 am | मैत्र

नुकतेच वसंतोत्सवात आणि त्या काळात काही निर्गुणी भजने / कुमारांच्या काही टिपिकल चीजा राहुलने गायल्या होत्या त्या ऐकल्या त्यामुळे तशी समजूत झाली. पुष्कर लेले यांचे गायन तितकेसे ऐकलेले नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर लहानपण देगा देवा चे मूळ ध्वनिमुद्रण ऐकून थोडे वेगळे वाटले.
आपण संगीत क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ दिसता. मला तेवढे ज्ञान नाही.नंतर त्यामुळे हसणे / रडणे हे आपल्या वैयक्तिक इच्छेप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे करावे.

अवांतरः मारवा आता तो न लागता षडज सोडून खूपच त्या पल्लवी जोशीच्या कार्यक्रमात घुसला आहे तेव्हा त्याचा एक वेगळा धागा असला तर मनसोक्त उपरोध आणि इतर चिखल फेक करता येईल.

हेरंब's picture

12 Apr 2009 - 5:54 am | हेरंब

मारव्याला मारच्या कोण म्हणेल, तपासून पाहिले नाही ही चुक झाली.

नितिन थत्ते's picture

13 Apr 2009 - 7:03 am | नितिन थत्ते

(स्वगतः ज्यातलं काय कळत नाय तिथं प्रतिसाद द्यायची काय गरज?)

(मारवा आणि पारवा यातला फरक न कळणारा) खराटा

JAGOMOHANPYARE's picture

13 Apr 2009 - 11:12 am | JAGOMOHANPYARE

हे असले मारवे ऐकण्याचे भाग्य मिळालेले नाही.... स्वर गन्गेच्या काठावरती वचन दिले तू मला , शब्द शब्द जपून ठेवा... . मावळत्या दिनकरा अर्ध्य तुज जोडूनी दोन्ही करा ... आमचा मारवा एवढ्यापुरताच... वचन द्ले तू मला मधील 'मला....' यातले नि रे_ सा हे मारव्याचे अन्ग... शुद्ध निशाद आणि कोमल रिशभ यान्च्यामध्ये षडजाचे सॅन्डविच घातले की मारवा होतो..... सन्ध्याकाळी सूर्य मावळताना चहाबरोबर हे सॅन्डविच खावे....

दिगम्भा's picture

13 Apr 2009 - 12:05 pm | दिगम्भा

मारवा व पूरिया यामधील रिषभ वेगळा असतो - मारव्यातला रिषभ चढा - असे अंधुक आठवते आहे.

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2009 - 10:07 pm | मिसळभोक्ता

दिगभ्भा,

मारव्यात षड्ज वर्ज्य असल्याने त्याच्या जवळचा रिषभ लावायचा, म्हणजे षड्ज न घेता, एका श्रुतीचा फरक घेऊन रिषभ लावायचा. (म्हणजे नेहमीच्या रिषभापेक्षा जरा खालचा, चढा नाही. जेथे गंधार वर्ज्य तेथे रिषभ चढा.) असे आमच्या गुरुजींनी "शास्त्रीय" स्पष्टीकरण दिले होते. पण पूरियात "नी रे नी म", ही फ्रेझ असल्याने, रिषभ एकतर कमी हवा, किंवा नेहमीचा. चढा नकोच, असे वाटते. बाय द वे, वसंतराव म्हणजे मारवा, असे मी वर लिहिले असले, तरी आमिरखान साहेबांचा मारवा, हा "जुन्या धर्तीच्या मारव्यांपैकी, म्हणजे क्लासिकल मारवा". वसंतरावांचा मारवा हा नवीन मारवा म्हणावा इतका वेगळा हे कुणालाही दोन्ही ऐकल्यानंतर कळेल.

-- मिसळभोक्ता

मैत्र's picture

14 Apr 2009 - 7:18 am | मैत्र

या बारीक तपशीला बद्दल धन्यवाद. याचा सोपा अर्थ - षडज वर्ज्य असल्याने जवळचा रिषभ घेऊन तो कण /आभास द्यायचा. बरोबर ?
स्पष्टीकरण छान आहे...

दिगम्भा's picture

14 Apr 2009 - 12:21 pm | दिगम्भा

पहा बुवा, मी काही तज्ञ नव्हे. त्यामुळे इतक्या ठामपणे बोलू धजत नाही.
पण एकदा तपासून पहावे असे सुचवतो, जुन्या लोकांकडून ऐकले होते तेव्हा त्यात काही बात असू शकेल.
एक सहज संदर्भ सापडला तो खाली देत आहे, जरा आडवळणाने पण "चढ्या" रिषभाला पुष्टी देणारा वाटतो आहे.
- दिगम्भा

Maru Kalyan (Amir Khan)
..........Ustad Amir Khan has discovered a gambhir raga that surely could become as indispensable to the musician as Shree, Malkauns or Darbari -- ................... The result is a raga of searching quality, that constantly contrasts Yaman's solidity with Maru's uncertainty. Khansahib develops it as a uttarang raga, staying mainly inthe mandra and madhya range, reinforcing its deep, introspective spirituality. ...................................
...........................
Khansahib's main purpose in creating Maru Kalyan seems to have been a desire to explore and enjoy the shrutis of rishabh. With the result, Maru Kalyan becomes to Yaman, what Marwa is to Pooriya. From time to time, the ear is teased into thinking: "Ah, this is Pooriya," then in the next phrase the rishabhs bring Maru and Kalyan back to the top. On a scale of 1 to 4 in which 1 is lowest, the Pooriya rishabh is 1, Marwa is 2, Yaman is 3, and Maru is 4.

मिसळभोक्ता's picture

15 Apr 2009 - 10:42 pm | मिसळभोक्ता

मी म्हटले:

पण पूरियात "नी रे नी म", ही फ्रेझ असल्याने, रिषभ एकतर कमी हवा, किंवा नेहमीचा. चढा नकोच, असे वाटते.

तुम्ही उद्धृत केल्याप्रमाणे तो कमी आहे, हे बरोबर.

मारव्यातला ऋषभही पूरियासारखाच हवा, असे वाटते.

तरी, तपासून बघतो.

-- मिसळभोक्ता

दिगम्भा's picture

16 Apr 2009 - 11:50 am | दिगम्भा

आणखी एक संदर्भ मिळाला - हे चित्र यूट्यूबवरील डॉ. प्रफुल्ल केळकर यांच्या श्रुती प्रात्यक्षिक क्र. ३ मधून घेतलेले आहे.

पण एकूण समाधानकारक निर्णय लागणे कठीण दिसते आहे, असो.

- दिगम्भा

टायबेरीअस's picture

13 Apr 2009 - 9:57 pm | टायबेरीअस

मारव्यातले धीरगंभीर सौंदर्य अनुभवायचे असेल तर 'कोतवाल साब' चित्रपटातले 'साथी रे, भूल न जाना मेरा प्यार' हे गाणे अभ्यासा.. रवींद्र जैन आणि आशा ताईनी 'अशक्य' गाणे दिले आहे.. आंतरजालावर गाणे नक्कीच सापडेल..

-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

संभाजी's picture

14 Apr 2009 - 1:20 pm | संभाजी

पु. ल. देशपांड्यांनी पूर्वरंगमधे मारव्याचे फार सुंदर वर्णन केले आहे,
"संध्याकाळच्या त्या वेळी बिस्मिल्लासारख्या जादुगार वादकाचा मारवा ऐकायला मिळायला हवा होता. निषादाची हुरहुर लावणारा, रिषभाचे आक्रंदन करणारा आणि षड्जाचा आसरा शोधणारा तो मारवा!"

शुभान्कर's picture

14 Apr 2009 - 6:46 pm | शुभान्कर

वर एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे मारव्यात षड्ज वर्ज्य नसतो. पण तो क्वचित लावण्यामध्येच रागाचं कारुण्य दडलेलं आहे.सुन्दर आलापीत ह्याचे कारुण्य विशेष जाणवते.उस्ताद अमीरखा साहेब ह्यांचे गाणेच आलाप प्रधान होते.त्यामुळे त्यांच्या आवाजात मारव्याचा उदास भाव विशेष दिसतो.

भारतीय संगीतात स्वर संवादाला विशेष महत्व आहे. तसेच प्रत्येक स्वराला स्वतःचे अस्तित्व आहे. स्वरावरील ठहरावाला खूप महत्व आहे. ते आलाप प्रधान आहे. ताना ह्या वैचित्र्य म्हणून येतात, अष्टांगप्रधानतेचा भाग म्हणून. म्हणूनच फक्त तानप्रधान गाण्याचा प्रभाव खोलवर पडत नाही.

तानपुर्‍यातील स्वयंभू गन्धार गळ्यातून प्रगटल्यावरच 'स्वरातुन ओम्कार भेटला गे' ची प्रचिती येते.

नंदा's picture

14 Apr 2009 - 10:56 pm | नंदा

किशोरी आमोणकरांचा मारवा आंतरजालावर कुठे उपलब्ध असेल तर कोणी त्याचा दुवा (लिंक) देउ शकेल काय? मला तो ऐकायची खूप इच्छा आहे. शास्त्रीय संगीताशी माझी आताशाच थोडी ओळख झाली, आणि मारव्याने वेडावून टाकले. किशोरीताईंच्या मारव्याच्या सीडीचा बराच शोध घेतला, पण मिळाली नाही. अजून चढा रिषभ की षड्जाच्याजवळचा रिषभ इतका श्रुतींमधला फरक कळण्याइतके कान तयार झालेले नाहीत, पण चुकून मारव्याची सीडी लागली आणि मावळतीच्या हुरहुरीने माझ्यासारख्या नवरसिकाच्या मनाचा ठाव घेतला नाही असे प्रसन्न सकाळी कामावर जातांनाच्या ड्राइव्हमधे सुद्धा होत नाही इतका या रागाचा मूड प्रभावशाली आहे. मारव्यातल्या काही सुगम गाण्यांचा उल्लेख वर आलाच आहे, पण लताबाईंनी गायलेले, महावीर काथक (के. महावीर) यांनी बरेचसे मारव्यात बांधलेले "सांज भई घर आजा रे पिया' हे गीत मला फार आवडते. यात मारव्यातल्या तीव्र मध्यमाच्या पाठोपाठ आलेल्या शुद्ध मध्यमाची एक जागा आहे, ती मला अतिशय आवडते. ही लिंक उघडली तर हे गाणे ऐकता येइलः http://ww.smashits.com/index.cfm?Page=Search&SubPage=Audio&SRC=16&Submit...

या शिवाय सॅन फ्रान्सिस्को बे एरियातले संगीत जाणकार राजन पर्रिकर यांचा मारवा आणि तत्सम रागांवरचा इंग्लिश लेख इथे पाहावा: http://www.sawf.org/newedit/edit02182002/musicarts.asp