आपणांस खालील पुस्तक माहीत आहे काय?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
7 Apr 2009 - 2:33 pm
गाभा: 

गेल्या मासाच्या अंतीम आठवड्यात कचेरीतील मार्च शेवटाच्या कामामुळे काही वेगळे करण्याचा विचारसुद्धा करवत नव्हता. त्या वेळी अचानक भाचीच्या बालभारती (शासकीय) पुस्तकातील सरस्वती देवी च्या चित्रावर आस्मादिकांची द्रुष्टी गेली. देवीच्या करातील पुस्तक एखाद्या ग्रंथासम आणि हातातील मोत्यांची माळ जणू काव्यमोती सम मज भासू लागले. ही काहीतरी नव उर्मी आहे की काय अशी अंतस्थ शंका मनी दाटुन आली. तसे मी काही लेखक किंवा कवी नव्हे. आपले कचेरीत मान मोडून लिहीत बसावे हाच काय तो लेखणीशी संबंध. तरीही काहीतरी लिखाण प्रसवले पाहीजे असे राहुनराहून वाटू लागले. परंतू नक्की काय करावे असा पेच पडला.

मासाच्या शेवटल्या दिशी तर कचेरीत माझ्या हातून बर्‍याच चुका घडल्या. त्या चुका स्वतः मामलतदार साहेबांनी दाखवल्यानंतर आम्ही ताळ्यावर आलो. त्यांची दुरस्ती करण्यासाठी आम्हास जादा तासाचे काम करणे भाग पडले. आता त्या जादा वेळेचे पैसे मिळतील हा भाग निराळा. पण माझ्यासारखा जबाबदारीने काम करणारा सुद्धा अशी चुक करतो हे बघून आमचे मुख्य कारकून सो. श्री. रानवेडे यांनीपण सखेद मह्दआश्च्रर्य व्यक्त केले. त्यादिवशी ते पण माझ्यासाठी जादा वेळ थांबले होते. केवढी हि आपल्या कर्मचार्‍याची काळजी. ते बघून माझे मन भरून आले. जास्तच वेळ होते आहे ते पाहून साहेबांनी शिपायास सांगुन स्वत: जेवण मागावले. जेवण घेउन आलेल्या पोर्‍यास जेवणाचे पैसे कचेरीच्या खात्यावर टाकण्यास पर्मावीले.

दुसर्‍या दिशी नवीन मास चालु झाला. पहिल्या आठवड्यात गुरूवारी आंतरजाळावर भटकत असता मिसळपाव या संकेतस्थळावर आमची स्वारी येवुन थडकली आणि आज आपण जेवणाचा डबा सखाराम शिपायास द्यावा आणि स्वत: भगवती हाटेलाची मिसळ चापण्यास जावे असा साक्षातकार मला व माझ्या टेबलाच्या पुढयात बसलेल्या व नदितील वाळू काढण्याचे टेंडर नेण्यासाठी आलेल्या श्री. गोमाडे- वाळू पुरवठा करणार्‍यांकडुन आलेल्या माणसास एकदम व्हावा यात आर्श्चय वैगेरे काही नव्हते हे आपणास एव्हाना ध्यानात आलेच असेल. अहो, मिसळपाव संकेतस्थळावर वावरायचे आणि मिसळपाव चापायची नाही म्हणजे घोर अपराधच. आणि आम्ही तो सहसा समोर कुणी कामासाठी आलेला माणुस असतांना करीत नाही. समोरचा आग्रहाने सांगत असतांना तो आग्रह मोडवत नाही हो.

त्यानंतर दुपारी निवांतपणे मिसळपाव धुंडाळतांना अचानक श्रीयूत. भडकमकर मास्तरांचा महान साहित्यिक जालिंदरजींविषयीचा लेख वाचण्यात आला. आजकाल साहित्यसंमेलनात जे काही घडते ते प्रत्यक्शात करणारे साहित्यिक श्री. जालिंदरजी आहेत हे पाहून मनास उभारी आली. त्यांची ग्रंथसंपदा पाहून अभीमान वाटला. मराठीविषयीचा आत्मविश्वास दुणावला. आपणही फुल ना फुलाची पाकळी लिहिले पाहिजे असे वाटू लागले.

सदरहू लेखात उल्लेख असणारे "लिहिते व्हा.." हे संदेशात्मक लिखाणाचे पुस्तकही नुकतेच बाजारात आले आहे हे ही समजले. आपण काही लेखक नाही पण हे पुस्तक आपणापाशी असले म्हणजे ते वाचून व त्या पासून काही स्फूर्ती घेउन आपणही काहीतरी लिहू शकू असे अंत:प्रेरणा सांगु लागली. यास्तव आम्ही कचेरीतुनच बर्‍याच पुस्तकालयांना दुरध्वनी केले. पण कोठेही काही माहीती मिळू शकली नाही.

हे पुस्तक नविन असल्याकारणाने असे व्हावे असे वाटते. नाहीतरी आपणाकडे वस्तू जुनी झाली की मोल कळते. पुस्तकाविषयीची नकारघंटा एकुन आपण लिहू शकत नाही ही कल्पना करवत नव्हती. मनाचा निर्णय घेतला आणि ठरवीले की या विषयी आपणालाच विचारावे. आपणापैकी कुणाला या पुस्तकाविषयी / त्याच्या उपलब्भतेविषयी जास्त माहीती असेल तर मला कळवावे. मी ते पुस्तक वाचू ईच्छीतो. पुस्तक मिळाल्यास मी ते वाचून परत करीन असे सांगू ईच्छीतो. पुस्तक वाचण्यास देण्याची इच्छा नसल्यास ते कोठे उपलब्भ होईल ते क्रुपया सांगावे. मराठी चा झेंडा आशियापार नेणार्‍या श्री. जालिंदर यांना सादर प्रणाम.

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

7 Apr 2009 - 3:01 pm | विसुनाना

'लिहिते व्हा...' बद्दल काही माहित नाही पण अतिश्री. अल्-खलास-अल-मसणवट यांचे 'वाहते ल्ह्या...' सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवरील प्रत्येक दुकानात फुकट मिळते.

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 7:20 pm | भडकमकर मास्तर

खूप उशीरा उत्तर लिहिल्याबद्दल क्षमस्व...
खरंतर मान्य करावं की न करावं या दोलायमान स्थितीत होतो...
हे http://www.misalpav.com/node/2356
सारे जे लिहिले आहे ते जालिंदरजींच्या पुस्तकातूनच कॉपी मारले आहे...

.....
प्रथम त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी वार्तालाप करून आधी त्यांची माफी मागितली...
मिसळपावावरील जनतेचीही माफी मागतो..
इथे चांगले लोक असतात ते नंतर माफ करतात , असा अनुभव आहे....

जय जालिंदर...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मिसळपावावरील जनतेचीही माफी मागतो
कशाबद्दल??

असा अनुभव आहे
स्वानुभव काय?

सुहास

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 7:26 pm | भडकमकर मास्तर

मिसळपावावरील जनतेचीही माफी मागतो
कशाबद्दल??

इते न सांगता कॉपी मारलेले साहित्य ल्ह्यायचे नस्ते.....
आम्ही ल्हिले आहे...
मनून माफी.

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Apr 2009 - 7:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर, हरकत नाही. तुम्ही कॉपी केल्याचं जाहीर केलं आहे, शिवाय श्री. जालिंदर जलालाबादी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची एक छोटीशी झलकही दाखवलीत, ज्यामुळे श्री. पाषाणभेद यांच्यासारख्या नवख्या लोकांना उपरोल्लेखित अचाट लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली, आणि सगळ्यांच्याच हातून साहित्याची सेवा घडली त्यामुळे तुमची माफी मान्य. खरंतर या लोकोत्तर सेवेमुळे तुम्हाला माफीची गरजच नाही.

स्वगत, इतर कोणीही वाचू नये: खरंतर माझ्या विडंबनावर जालिंदरजींची सही आणून देण्याचं तुम्ही मान्य केलंत म्हणून मी प्रश्न मिटला असं जाहीर करत आहे.

पुस्तकाबद्दल माहिती नाही, यावेळी ऍमेझॉनवर गेले की चौकशी करेन.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2009 - 10:49 am | परिकथेतील राजकुमार

पण मास्तरांबाबत वेगळा नियम का ? लवकरात लवकर त्यांचा कॉपी केलेला लेख इथुन अप्रकाशीत व्हायलाच हवा.
आजकाल मिपावर कंपुबाज संपादकांचा दरारा वाढला आहे आणी ते आपापल्या गटातील लोकांच्या चुकांवर पांघरुण घालतात. तात्या लक्ष घाला.

पोटात दुखोबा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रमोद देव's picture

7 Apr 2009 - 3:21 pm | प्रमोद देव

लिहिते व्हा ह्या पुस्तकाबद्दल आम्हासं काही कल्पना नाही पण आमचे "असेच लिहिते रहा" हे पुस्तक सद्या जगभर गाजते आहे. आजवर जवळ जवळ जगातल्या प्रत्येक भाषेत ह्याचे भाषांतर झालंय. ते पुस्तक आपल्याला कोणत्याही रद्दीवाल्याकडे मिळेल. ;)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

दशानन's picture

7 Apr 2009 - 3:23 pm | दशानन

=))

हुच्च कॅटेगरीचे लेखन ;)

लै भारी !

माझ्या कडे एक प्रत आहे पण मी स्वीस बँकेत ठेवली आहे, व सध्या निवडणूकीमुळे जाऊ शकत नाही, सरकार बणवण्याचे महान कार्य मला येथे दिल्लीत बसून करायचे आहे ना त्यामुळे... नंतर पाहू :D

परिकथेतील राजकुमार's picture

7 Apr 2009 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

दारुरामा विषयी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानांमुळे काहि बारकर्‍यांनी ह्या पुस्तकावर आक्षेप घेतला असुन हे पुस्तक सध्या मागे घेण्यात आले आहे असे ऐकतो.

पुस्तकातील आक्षेपार्ह मुद्दे :-
१) दारुरामाच्या मनात दारु सोडण्याचा विचार डोकावला.
२)दारुराम मदिरालयाचे खोटे कारण सांगुन मंदीरात जात असे.
३) दारुराम तमाशाच्या नावाखाली किर्तन ऐकायला जात असे.
४)दारुरामानी ३ लग्ने केली होती. (स्वतः पुस्तकाच्या लेखकाची ६ झाली आहे म्हणतात)

जाणकार अथवा बारकरी असलेला एखादा (एखादा? बहुतेक सर्वच) मिपाकरी खुलासा करेलच.

परा बारकरी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नरेश_'s picture

7 Apr 2009 - 5:03 pm | नरेश_

उलटपक्षी तुम्हालाच मिळाले, तर पाठवा माझ्यासाठी.
वाचून परत करेनच याची मात्र गॅरंटी नाही ;)

टीप : चायनामेड वस्तूंची कोणतीही वॉरंटी नाही.

रेवती's picture

7 Apr 2009 - 5:56 pm | रेवती

आपला भारी लेख वाचून आम्हासही लिहिण्याची उर्मी आलेली आहे.
श्री. जालिंदर यांच्यावर लिहिलेल्या लेखाने आपणही स्फूर्ती घेतली व हे सर्व घडण्यास
श्री. भडकमकरमास्तर कारणीभूत आहेत. त्यांचे आभार मानूयात.
आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे.
आमचा आणि साहित्याचा संबंध हा केवळ पाककृतीच्या साहित्यापर्यंत मर्यादीत असल्याचे
आता राहून राहून वाईट वाटते आहे. सदर पुस्तक कोठे दिसल्यास नक्की आपणापर्यंत
पोहोचवू. धन्यवाद!
(नवापूरच्या सुतारकामाबद्दल जाणून घ्यायला उत्सूक),
रेवती

वाहीदा's picture

7 Apr 2009 - 6:01 pm | वाहीदा

तुम्हालाच मिळाले, तर पाठवा आमच्या साठी.
वाचून परत करेनच याची मात्र गॅरंटी नाही ;-)

श्रीयूत. भडकमकर मास्तर पण महान अन साहित्यिक जालिंदरजीं तर त्याहून ही महान !
क्या गुरू और क्या चेले !
सब एकसे बढकर एक ! :-)

लिखाळ's picture

7 Apr 2009 - 6:11 pm | लिखाळ

'लिहिते व्हा' या पुस्तकाबद्दलची आपली चौकशी वाचून नवीन साहित्य निर्माण करण्यासाठी आपण किती उत्सुक आहात ते समजले. एका पुस्तकाच्या चौकशी साठी आपण अख्खा लेख लिहू शकता म्हणजे आपली लेखणी नक्कीच उन्मेषशालीनी आहे. नवसाहित्याचा शोध आणि त्याची बाजारातली पत या बाबत आपल्याला असलेली आस्था आणि कळकळ पाहता आमच्या डोळ्यांत आसवे तरळली. असो. आपल्याला ते पुस्तक लवकरात लवकर मिळो आणि त्यातून स्फूर्ती घेऊन आपल्या हातून काही भरीव साहित्यीक कामगीरी घडो अशी सरस्वतीचरणी नम्रभावे प्रार्थना.

आपण वर चौकशी केलेले पुस्तक आजवर कुणी स्कॅन करुन जालावर उपलब्ध केलेले पाहण्यात नाही. मी मराठी संकेतसस्थळांवरील लेखनच फक्त वाचतो आणि त्यावर मिळालेली माहितीचीच केवळ देवाणघेवाण करत असतो. मराठी जालाबाहेर कुठे ओरिजीनल माहितीचे झरे आहेत यावर माझा तरी विश्वास नाही.
त्यामुळे त्या पुस्तकाची बाजारातली उपलब्धता आणि ते कुणाकडे आहे या बद्दलची माहिती मला नक्कीच नाही.

'लिहिते व्हा' या पुस्तकाची चातकासारखी वाट पाहा. चातक जसा चोच उघडी ठेऊन पावसाच्या थेंबांची वाट पाहतो तसेच आपण डोळे उघडे ठेऊन मॉनिटरकडे पाहत राहा. पुस्तक स्कॅन होऊन आपल्या समोर येवो अश्या मी शुभेच्छा देतो.
-- लिखाळ.

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 12:30 pm | पाषाणभेद

श्री. लिखाळ रावसाहेबांस,
स. न. वी. वी.

आजकाल वाळूचे कंत्राटदार ठेक्याची टेंडरे / परवानगी घेण्यासाठी बहुत गर्दी करत आहेत. सबब आम्हास लिहीण्याची फुरसद मिळो हि शारदेचरणी प्रार्थना.

आपण जी मनापासुन स्तूती केलीत ते बघून आमचे अंतःकरण ह्रुद झाले. आपल्या नेत्रांतील आसवे पाहुन तर आम्हासही रडु कोसळते की काय असे वाटू लागले. आमच्या टेबलाच्या समोर एक नवकवीता ही बसते. तिच्यासमोर आसवे गाळली असती तर कचेरीत काहीतरी गैरसमज पसरला असता. आजकाल कचेरीत ईतर लोक आम्हा दोघांबद्द्ल काहीबाही बोलू लागले आहेत. (हे आपण कुणाकडे वदू नका.)

असो.

आपल्या निरोपात "स्कॅन " असा शब्द आला आहे. तो ईंग्रजीच आहे ना? आम्हास या परदेशी भाषेचे वावडे आहे. यास्तव आम्ही हा शब्द आम्ही कचेरीतील तर्खडकरांच्या ईंग्रजी -मराठी शब्दकोशात धुंडाळण्याचा विफल प्रयत्न केला. या शब्दाची शब्दरचना किंवा मराठीतील अर्थ आपण सांगीतला तर आम्ही आपले आभारी राहू.

तत्राप आम्ही 'लिहिते व्हा' या पुस्तकाची चातकासारखी वाट पाहतो आहोत. तसेच तुम्ही सुचवील्याप्रमाणे आम्ही चातक पक्षासारखी द्रुष्टी कचेरीतील एका - वर्गात मॉनिटर सारख्या वागणार्‍या -मुख्य कारकुन बाईंकडे लावुन आहोत. तेव्हांपासून त्या आमच्याकडे संशयाने पाहत आहेत.

असो.

आम्ही आपल्या "पुस्तक स्कॅन होऊन आपल्या समोर येवो अश्या मी शुभेच्छा देतो" ह्या शुभेच्छा घेतो आहोत. ('स्कॅन' या शब्दाची शब्दरचना किंवा मराठीतील अर्थ उलटटपाली जरुर पाठवणे. )

कळावे.
लोभ आहेच तो वाढावा ही सरस्वतीचरणी प्रार्थना.

आपला,
पाषाणभेद

ता.क. : वरील काही प्रतीसादांत आम्हास काहीतरी चेष्टेचा सुर दिसत आहे. आणि लोकही भडकमकर मास्तरांविरुद्ध भडकलेली शब्दरचना करतांना दिसत आहे. मास्तरांविरुद्ध असे करणे गैर आहे. पिंजरा चित्रपटात मास्तर किती छान काम करीत होते ना? मास्तरांना माफी मागावी लागू नये ही मागणी आम्ही सरस्वतीचरणी मागत आहोत.

लिखाळ's picture

8 Apr 2009 - 4:46 pm | लिखाळ

तुम्ही आम्हांस जोड पत्र पाठवले असते तर उलटटपाली उत्तर देणे सुकर झाले असते. असो.

तुम्हाला स्कॅन हा शब्द खटकला पण मॉनिटर हा शब्द खटकला नाही. या विरोधाभासामुळे तुम्ही मोठे लेखक होणार हे आम्ही त्वरित ताडले. (ताडले - याचा संकृत ताडन या क्रियापदाशी क्रियात्मक संबंध नाही :) )

पुस्तकातल्या विरोधाभासाला खूप मोठे प्रसिद्धीमुल्य असते असे आम्ही समजतो आणि अश्या प्रसिद्ध लेखनाचे साहित्यीकमुल्य प्रत्येक आवृत्ती नंतर द्विगुणीत होते हे आम्हाला मिळालेल्या पुरस्कारांवरुन स्पष्टच होते :)

नवकविता आपल्या समोर बसते हे ऐकून आनंद झाला. कधी चहा प्यायला तुमच्या कार्यालयात आलेच पाहिजे :)

तळटीप : पिंजर्‍यातल्या मास्तरांना प्रणाम :)
-- लिखाळ.

टायबेरीअस's picture

7 Apr 2009 - 7:10 pm | टायबेरीअस

लिहिते व्हा बाबत काही माहीत नाही, काही दिवसांपुर्वी श्री. साकी शराबी यांची 'हिलते व्हा' हाती पडले .. पडले म्हणजे काय, मला वाचायचे नव्हतेच, त्यांच्याच हातून पडले.. ते हिलते झाले होते.. :)

टिउ's picture

7 Apr 2009 - 8:08 pm | टिउ

उशीरा का होईना, पण जलालाबादींचं साहित्य अधिकाधिक लोकांपर्यन्त पोहोचतंय आणी पोहोचत नसलं तरी ते वाचण्याची इच्छा होतेय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे...त्यासाठी पाषाणभेद यांनी केलेला आटापिटा बघुन तर थक्क झालो!

आता 'लिहिते व्हा' बद्दल...अंटार्टिका मधल्या सुप्रसिद्ध पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात खपली असं परवाच वाचनात आलं. दुसरी आवृत्ती लवकरच बाजारात येत आहे तेव्हा त्वरा करावी. जलालाबादींच्या पुस्तकांवर बाजारात आल्या आल्या लोकांच्या पेंग्विनसारख्या उड्या पडतात हे आपणांस ठाउक असेलच. आत्ताच नोंदणी केलीत तर पुस्तक मिळण्याची शक्यता आहे...

रेवती's picture

7 Apr 2009 - 9:49 pm | रेवती

हा हा हा!
मस्त प्रतिसाद!

रेवती

अवलिया's picture

8 Apr 2009 - 1:23 pm | अवलिया

माझ्याकडे हे पुस्तक आहे.
पण मी स्कॅन करुन टाकणार नाही.
मिपावरील वाचकांसाठी का मी स्कॅन करु ? आँ !!
माझ्या पुढील 'लिटल बॉय आणि फॅट मॅन' या लेखमालेसाठी संदर्भ म्हणुन मी ते पुस्तक वापरणार आहे तेव्हा सगळ्यांना समजेलच त्यात काय काय आहे ते !!
तेव्हा वाट पहात रहा .... आगामी लेखमालेची !!

--अवलिया
जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

नितिन थत्ते's picture

8 Apr 2009 - 9:26 pm | नितिन थत्ते

माझ्याकडे हे पुस्तक आहे असा मला दाट संशय आहे. पण त्याची पहिली पाने नसल्याने ते तेच पुस्तक आहे की वेगळे हे कळायला मार्ग नाही.
कोणाला स्कॅन करून हवे असेल तर आपला स्कॅनर पाठवून द्यावा. माझ्याकडे स्कॅनर नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)