अहिराणी हिरा.

जिवाणू's picture
जिवाणू in विशेष
6 Apr 2009 - 11:21 am
छंदशास्त्र

आतापर्यंत मी ऐकलेल्या, वाचलेल्या आणि पाहीलेल्या (नव साहित्यिकांनी केलेले) अहीराणी साहित्यात मला फ़ार रस वाटत नव्हता. मी तसे फ़ारसे नविन साहित्य वाचलेलं नाही किंवा वेळ मिळाला नाही ही दोघेही कारणं १०० % खरी आहेत. पण २००७ च्या दिवाळीत मला अहिराणी भाषेतली जादू कळली. मी दिवाळीत पिंगळवाड्याला (अमळनेर जि. जळगाव.) गेलो होतो. तिथे मी जत्रा , तमाशा ह्या गोष्टी फ़ार जवळून पाहील्या, तसा जत्रेशी माझा परीचय लहानपणापासुनच आहे. पण काही गोष्टी मला तेव्हा वर्ज्य होत्या त्या म्हणजे तमाशा इ. पिंगळवाडे गाव तसे लहान पण दिवाळीत तेच गाव पाच पटीनी वाढलेलं वाटायचे, याचं कारण म्हणजे भवानी देवीची जत्रा. या छोट्याश्या गावात पाच तमाशे लागतात आणि रात्रभर गाव जागवतात. दु्सरया दिवशी माझे चर्चासत्र रंगले ते श्री. प्रकाश पाटील यांच्या सोबत.
परीचय : श्री. प्रकाश पाटील.
प्रकाश पाटील यांचा जन्म अमळनेर तालुक्यात खेडी या गावी झाला. वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. त्याचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. आजीने त्याना १०वी पर्यत शिक्षण घेवू दिले. त्यानंतर मात्र आजीने शेतीकडे लक्ष द्यायला सांगीतले. पुढे मात्र आजी स्वर्गवासी झाल्यावर प्रकाश यांनी पुन्हा एकदा शिक्षणाकडे धाव घेतली. त्यानी एरंडोल कोलेज मधुन BA पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच त्यांचा कल कलेकडेही होता या काळात त्यांनी बऱ्याचशा नाटकात भाग घेतला. पुढे नाटकातली आवड जोपासत त्यांनी कविता व कथा लिहीण्यास सुरुवात केली. आज ते एक कुशल शेतकरी तर आहेतच त्याबरोबर ते अहिराणी कथा लेखक आणि कवी देखील आहेत.
यापुढील पोस्टस मधे मी त्यांच्या काही कविता आणि अहिराणी चित्रपटातील काही गाणी त्यांच्या अनुमतीने लिहिणार आहे.

विषेश सुचना : या सर्व कविता आणि गाण्यांचे प्रकाशनाचे (कुठल्याही स्वरुपात)मालकी हक्क श्री प्रकाश पाटील. यानी राखुन ठेवलेले आहेत.
त्यांच्या खालील कवीतेची चाल "मिलती है जिन्दगीमे मोहब्बत कभी कभी ..." या हिंदी गाण्यावर आधारीत आहे.

थिजना डॊय़ा वाट देखामा, पपनी तानी तानी-२
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु ई जाय कानी कानी-२
(प्रियकर जिवन्त असताना तर ह्या समाजाने त्याच्या प्रेयसीला कधी भेटू दिले नाही, पण आज तो मेल्यावर देखिल तिला त्याच्या अन्तयात्रेला येवु दिले नाही. पण मेल्यावरही त्याच्या त्या पार्थिवाला अस वाटतय की माझ्या अन्तयात्रेला तिने यावे. तो तिच्या वाटेवर डोळे लावुन बसला आहे, इतक की त्याचे डोळे जणु थिजुन गेले आहेत.)
वैशाखवणवा मनी हयाती, तु चिचनी छाय़ा
तुनी सावली झाम्लामा, जमाना ग्या पुरा वाया
जिभ पडी गई कोल्ली ,जिव करस पानी पानी ....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु ई जाय कानी कानी-!!०!!...........................२
आखाड्ना आन्धारानी इन्ज, तु जशी दाये माले रस्ता-२
व ढगना बापन काय गये , तो गर्जे काभ नुस्ता
फोडात त्येनी कान मना, पर्दावर हानी हानी.....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु ई जाय कानी कानी-!!१!!............................२
थोडी काडीले तु वाट वाकडी , मन तुन नीट-२
हाई नीट रस्तानी ,वाकडी दुनियाना उना जीवले ईट
धगधगात इस्तू सान्गे, डोयामा आसु आनी आनी ....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु ई जाय कानी कानी-!!२!!.............................२
लाह्या जश्या तुन्या आठवणी, उडतीस तड्तड-२
तुनी यादमा जिव चितावर करी भड्भड
जिभा झडू दे शाहिरन्या तुले वानी वानी...
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु ई जाय कानी कानी-!!३!!............................२

येथे http://khandeshi.blogspot.com/ जरुर भेट द्या.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2009 - 11:45 am | llपुण्याचे पेशवेll

नमस्कार जिवाणूराव/ताई,
आपण लिहीलेला परिचयपर लेख चांगला वाटला. पण खाली उधृत केलेल्या अहिराणी बोलीतील कवितेचा अर्थ जर मराठीत केला असता तर कळायला अधिक सोपे गेले असते.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 12:53 pm | पाषाणभेद

तु ई जाय कानी कानी
- तु एकदा कुठल्यातरी कोपर्‍यातुन येवुन जा.

लाह्या जश्या तुन्या आठवणी, उडतीस तड्तड
- अंतीम यात्रेत प्रेतावर लाह्या उडवण्याची रीत आहे.

श्री. प्रकाश पाटील यासन्या आखू कवीता आठे येवू द्या तात्या.

- पाषाणभेद

मनसे's picture

11 Jun 2009 - 8:14 pm | मनसे

अजुन अहिरानि कविता येवु द्या येथे..

मराठमोळा's picture

12 Jun 2009 - 11:19 am | मराठमोळा

वा! मस्त!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

pareshsays's picture

11 Sep 2010 - 11:17 pm | pareshsays

अहीराणी भाशा मि पा वर पोहोचविल्या बद्दाल धन्यवाद!
शुभेछा!