खजुराचे सरबत

chikusi's picture
chikusi in पाककृती
5 Apr 2009 - 10:57 am

विभाग : पेय
किती जणांसाठी : १
एकुण लागणारा वेळ : खज़ुर भिजायला ३ तास, नंतर ५ मीनीटे.

साहित्य :
७/८ बीया खज़ुर, ८/१० मनुका.

कृती :
खज़ुर व मनुका स्वच्छ धुवुन घ्या. स्वच्छ पाण्य़ात भीजत घाला. ३ तास भीजल्यानंतर हाताने सोलून घ्या किंवा मीक्सरमधून फीरवून घ्या. गाळून प्यायला द्या.

टिप :
हे एक स्फुर्ती पेय आहे

दक्षता :
मीक्सरमधून फीरवतना प्रथम खज़ुरातील व मनुकांमधील बीया काढून टाका.

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

5 Apr 2009 - 11:26 am | नरेश_

आवडले. सफोटो असते तर आणखी मजा आली असती.

असो. डॉक्टर म्हणून एक फुकटचा सल्ला देतो . मनुकांमधील बिया मुळीच काढून टाकू नका.
विशेषत: काळ्या मनुकांमधील बियांमध्ये ऍन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयविकार , संधिवात,
पक्षाघात, कर्करोग व अनेक रोगांना अटकाव करतात / त्या रोगांची वाढ थोपवतात.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)