चारोळी पूर्ण करा

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
3 Apr 2009 - 12:04 am
गाभा: 

पूर्वीच्या कवींच्या कथांमध्ये "समस्यापूर्ती" प्रकाराच्या कथा खूप आहेत.

त्यात राजा, किंवा कोणी नवा पंडित, कवितेची एक ओळ सांगतो. तिचा अर्थ इतका विचित्र असतो, की श्लोक पूर्ण करायला कोणाला जमत नाही. पण आपल्या हिरो (कालिदास वगैरे, कोणीतरी) अशी काही दुसरी ओळ सुचवतो, की पहिली बेकार ओळही अर्थपूर्ण होते.

उदाहरणार्थ भोजराजा म्हणतो - "शेवटचा चरण आहे ठठं ठठंठं ठठठं ठठंठः, तर पहिले तीन चरण काय आहेत?"

मग कालिदास म्हणतो -
रामाभिषेके जलमाहरन्त्या:
हस्ताच्च्युतः हेमघटो युवत्या: ।
सोपानमार्गेण करोति शब्दं
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः

(रामाच्या अभिषेकाच्या वेळी, पाणी आणणार्‍या युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पडला. पायर्‍यांवरून घरंगळताना तो आवाज करतो ठठं ठठंठं ठठठं ठठंठः.)

टाळ्या. अशा कितीतरी गोष्टी.

तर मी तशी एक समस्यापूर्ती देतो आहे. इथे मी तीन ओळी देत आहे. त्यात चवथी ओळ जोडून अर्थ निर्माण करता येईल का?

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
... (लाला ललाल लाला) ... ॥

तर बोला मराठीच्या कालिदासांनो आणि कालींनो!

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Apr 2009 - 12:13 am | प्राजु

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
अल्लड करीत खोड्या..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

3 Apr 2009 - 1:47 am | अनामिक

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
तोडून आज बेड्या ||

-अनामिक

सँडी's picture

3 Apr 2009 - 5:51 am | सँडी

या कुंपणाच्या तारा,
हात पिळविणार्‍या या बेड्या!
का गाढवा काढल्या
पोरींच्या खोड्या!

ह.घ्या.

रामाच्या अभिषेकाच्या वेळी, पाणी आणणार्‍या युवतीच्या हातातून सोड्याचा? घडा
तुम्हाला सोन्याचा म्हणायचे आहे का?

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

वानरसैन्य समुद्रतटावर "पुढे कसे" म्हणून थांबले होते. तेव्हा त्यांना रुचकर सोड्याचे कालवण खायला घालायला कोळीण चालली होती. पण "अय्यो रामा रामा" म्हणता-म्हणता तिच्या हातातला सोड्याचा घडा पडून लाटांमध्ये घरंगळत गेला. उपडा तरंगू लागला. त्यावरून रामनामासंगं तरंगणार्‍या वस्तूंनी सेतू बांधायची मूळ कल्पना सुचली असे तिथल्या कोळिणी म्हणतात.

पण तो तमिळ "घटम्" घुडुक्कुगुळुकुम् असा वाळूवरून घरंगळला. ठठं ठठंठं करणारा उत्तरेकडचा कालिदासी घडा.

चित्रा's picture

3 Apr 2009 - 5:58 am | चित्रा

फुटकळ प्रयत्न केला आहे. नसेल योग्य वाटत तर कृपया एक वेळा माफ करा :)

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
रात्री प्रकाशलेल्या |

अजय भागवत's picture

3 Apr 2009 - 7:21 am | अजय भागवत

धनंजयराव,

मला काव्यातले काही कळत नाही. पण तुम्ही ज्याचे वर्णन करताय ते हेच तर नाही ना?-

विषयांतर केल्याबद्दल माफी असावी.

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
शृंगारताच साड्या

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

टिउ's picture

3 Apr 2009 - 7:53 am | टिउ

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
बुडल्या कितीक होड्या ... ॥

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
संगे दारु, बिड्या नि काड्या ... ॥

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
(अजुन) किती पकवशील घोड्या ... ॥

शेवटची ओळ स्वत:ला उद्देशुन आहे!

हरकाम्या's picture

3 Apr 2009 - 9:46 pm | हरकाम्या

झकास.............

नरेश_'s picture

3 Apr 2009 - 7:44 am | नरेश_

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
चमकाया आसुसलेल्या.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

चटोरी वैशू's picture

3 Apr 2009 - 7:48 am | चटोरी वैशू

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
कि कुणी आला, आणि ह्या लाजल्या !

आनंदयात्री's picture

3 Apr 2009 - 9:55 am | आनंदयात्री

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
लाजुन चुर वारा !!

(वसने कुठे हरवली
बेहोश ती पहुडली
तृप्ती सखे मुरवली
गात्रे सखे सुखवली )

शेखर's picture

3 Apr 2009 - 9:59 am | शेखर

अप्रतिम आंद्याशेठ...

शितल's picture

4 Apr 2009 - 7:57 pm | शितल

मस्स्त जमली आहे.

जागु's picture

3 Apr 2009 - 11:25 am | जागु

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
अवखळ त्या तानस्पर्शाला.

पद्मश्री चित्रे's picture

3 Apr 2009 - 11:40 am | पद्मश्री चित्रे

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
मैफील संपवाया....

दवबिन्दु's picture

3 Apr 2009 - 12:52 pm | दवबिन्दु

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
उगडताच सोडा वाटरच्या बाटल्ल्या !

सँडी's picture

3 Apr 2009 - 1:52 pm | सँडी

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
शृंगारताच साड्या

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
बुडल्या कितीक होड्या ... ॥

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
संगे दारु, बिड्या नि काड्या ... ॥

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
(अजुन) किती पकवशील घोड्या ... ॥

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
कि कुणी आला, आणि ह्या लाजल्या !

=)) =)) =)) =)) जबराट!!!

अवलिया's picture

3 Apr 2009 - 4:45 pm | अवलिया

(फारसे छंद वृत्त यमक यांची जाण नाही, पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करायचाच नाही... बघुया जमते आहे का असा विचार करुन काहीबाही लिहिले आहे. )

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
हाय ! या कोणत्या माड्या.. !!

या रमणीय ललना
चित्त भ्रमले कैसे गड्या
नकोस वेड्या गुंतु येथे
हाय ! या कोणत्या माड्या.. !!

येतील कितीक जातील
अरे अनामिक सवंगड्या
तुझी न राहिल ओळख
हाय ! या कोणत्या माड्या.. !!

नकोस उमटवु पदचिन्हे
जरी अंथरल्या पायघड्या
शोध तिथे पलिकडे जीवलग
हाय ! या कोणत्या माड्या.. !!

--अवलिया

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे
उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

सँडी's picture

3 Apr 2009 - 5:03 pm | सँडी

अवलिया भौ, तुम्हाला नक्की 'माड्या'च म्हणायचे आहे का? =))

नरेश_'s picture

3 Apr 2009 - 5:09 pm | नरेश_

का अनुस्वार विसरलात? ;)

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
रीचार्ज्ड एव्हरेड्या! ;)

सँडी's picture

3 Apr 2009 - 5:07 pm | सँडी

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
बस्स झाल्या आता काड्या ।

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
नको पिऊस इतक्या विड्या ।

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
अगं! कशाला इतक्या साड्या ।

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Apr 2009 - 5:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
देखीता सावळा तो वेडा

आणि आता टारगट प्रयत्न

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
ओढीता हत्ती छाप बीड्या

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
सोडीता पायजम्याच्या नाड्या

कीडया, जाड्या, गड्या, भाड्या, रेड्या आशी बरीच यमके शील्लक आहेत.

ज्ञानेश्वर माउली ज्ञानोबा माउली

नरेश_'s picture

3 Apr 2009 - 5:13 pm | नरेश_

धनंजय भाऊ, मानलं तुम्हाला
सर्वांना प्रतिसादाच्या भुलभूलैयात गुंतवून विडंबन टाळण्यात यशस्वी झालात ;)

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2009 - 8:49 pm | पिवळा डांबिस

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
स्पर्शू नकोस, रेड्या.... ॥

धनंजयराव, फक्त यमक जुळवलंय, खूप ह. घ्या.....
:)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2009 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
आन चंद्रासवे फिरकल्या||
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2009 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
लाजून चूर चंद्रबनातल्या सावल्या...

धनंजय, चांगले कामाला लावले भो ! :)

यशोधरा's picture

4 Apr 2009 - 6:37 pm | यशोधरा

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
अन् हलकेच मग निमाल्या....

धनंजय's picture

4 Apr 2009 - 8:59 pm | धनंजय

सर्वांच्या कल्पनाशक्तीला मुजरा!

नरेश यांच्या दुसर्‍या प्रतिसादाला फक्त ५०/१०० मार्क दिलेले आहेत.

(समस्यापूर्तीच्या प्रकाराचे लेखात विडंबन केले आहे. विडंबनाचे विडंबन करण्याचे हे आवाहन आहे. त्या हेतूच्या अगदी जवळ जाऊन [+५०/१००], "विडंबन टाळणे हा हेतू" या चुकीच्या फाट्याला [-५०/१००] त्यांची गाडी गेली.)

मनीषा's picture

4 Apr 2009 - 9:01 pm | मनीषा

या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
दिशा दिशांत सार्‍या !

येता रवी तो नभी
बावरती त्या जरा
सावरोनी तेज आपले
मग मेघांआड लपल्या !