ब्रेड पुडिंग

परीसा's picture
परीसा in पाककृती
2 Apr 2009 - 2:45 pm

प्रिय मिपाकर,
तशी मी स्वाती ताई, प्राजुताई, प्रभाकर काका, चकलीताई ह्यांसारखी जेवण करण्यात एवढी काही माहीर नाही. पण कधीतरी नवीन पदार्थ बनवण्याची ईच्छा ठेवते.
गेल्या रविवरी मी असाच प्रयोग करुन पाहिला आणि तो सफल झाला. आता हा प्रयोग कोणबरोबर तरी शेअर करावासा वाटत होता. आणि मिपा सारखी दुसरी जागा मला अजुन सुचली नाही. मी केलेल्या प्रयोगात तुम्हाला अजुन काही सुचवावयाचे वाटत असेल तर सांगा म्हणजे पुढच्या वेळी मी ते चेंजेस करेन. प्रयोग कृती अशी आहे,

साहित्यः
१/२ लिटर दुध,
४ ब्रेडचे स्लाईस,
३ अंडी,
२ छोट्या वाट्या साखर्,(आवडीनुसार कमी-जास्त करु शकता)
१टी. स्पु. वेलची पावडर.

कृती:

प्रथम दुधामधे ब्रेडचे स्लाईस तोडुन टाकावे. अंडी फोडुन टाकावी. साखर टाकावी. हे सर्व मिश्रण मिक्सर मधुन मिक्स करुन घ्यावे.
जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण काढावे. आणि बारीक गॅसवर ठेवावे. थोडे शिजत आले कि मग जाड लोखंडाचा तवा घेवुन तो गॅसवर ठेवावा आणि ते भांडे त्यावर ठेवावे.झाकण ठेवुन गॅस बारीक करुन २०-२५ मिनिटे शिजु द्यावे. मधे मधे झाकण उघडुन बघितलात तरी चालेल. कारण मी तरी तसेच करत होते. नवीन करण्यार्‍यानी तर असेच करावे. कारण कधी करपेल ते कळणार नाही ना! म्हणुन. ज्याच्याकडे ओवन असेल त्याने सरळ ओवेन मधे करावे. शिजल्यानन्तर फ्रिज मधे ठेवुन थंड झाल्यावर खावे. गरम पण छान लागते. थंड झाल्यावर मस्त सॉफ्ट आणि अजुन छान लागते.
वेजेटरीअन मिपाकरांकडुन माफी असावी.

नवीन शिकावू,
परीसा.

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

2 Apr 2009 - 3:35 pm | स्मिता श्रीपाद

फोटु पण दाखव ना :-)

पाकॄ छान,सोपी आहे...

करुन पाहीन ...

शिजवल्यामुळे अंड्याचा वास येत नाही का पदार्थाला?

चकली's picture

2 Apr 2009 - 5:09 pm | चकली

मी खाल्ले नाहीये. पण नक्कीच छान लागेल. आणि रेसिपी छान लिहली आहेस.

चकली
http://chakali.blogspot.com

पर्नल नेने मराठे's picture

2 Apr 2009 - 5:17 pm | पर्नल नेने मराठे

वेजेटरीअन मिपाकरांकडुन माफी असावी.

ठिक आहे...
चुचु

प्राजु's picture

2 Apr 2009 - 6:52 pm | प्राजु

तशी मी स्वाती ताई, प्राजुताई, प्रभाकर काका, चकलीताई ह्यांसारखी जेवण करण्यात एवढी काही माहीर नाही.

=)) =)) याला म्हणतात गाड्याबरोबर नळ्याची यात्रा..

असो.. रेसिपी छान वाटते आहे. नक्कीच करेन हा प्रयोग.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/