दि ड्रॉईंग्ज इन बोरिंग ट्रेणिंग !!

टारझन's picture
टारझन in कलादालन
27 Mar 2009 - 6:16 pm

णमस्कार्स लोक्स !! ,

णव्या जॉब ला जॉईन झालो .. गेले आठवडा झाले ट्रेणिंग णावाचा एक माहा बोरिंग कार्यक्रम चालू आहे ..
अस्मादिक जरा दिडशहाणे असल्याने त्यांना कसल्याही ट्रेणींगची गरज वाटत नाही ... हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अस्मादिक झोपा झोडणे , कमेंट पास करणे , विंडोज स्पायडर (पत्त्यांचा गेम) खेळणे .. इत्यादी कामे करून बाकी पेंगू लागलेल्या पब्लिक्स ला चैतण्य देण्याचं एक मोलाचं काम देखिल करतात !

अशाच एका बोरिंग सेशण मधे हि कलाकृती संगणकावर (एमेस पेंट) खरडण्यात आले !~~! अर्थात टाईमपास आहे ..

शशांक वडम : ह्या कलिगचं शेजारी बसून काढलेलं काल्पणिक चित्र !

एक लहानपणी आवडलेलं णिसर्ग चित्र !

(चित्रकार) टा.रू.हुसैन

कालावधी : दोन्ही चित्रे लगातार अंदाजे ४० मिनीटांच्या आत खरडली आहेत .. अजुन ईंप्रूव्ह करता आलि असती वेळे अभावी प्रपंच टाळण्यात आला आहे
अचिव्हमेंट: कंट्रोल्+झेड व खुडलब्बराचा (खोडरबर) वापर नेहमी प्रमाणे टाळला आहे !!

कला

प्रतिक्रिया

शितल's picture

27 Mar 2009 - 6:20 pm | शितल

टार्‍या,
तुझी कलाकृती छानच आहे, फक्त एक सुधारणा डाकू ससांक च्या ऐवजी डाकू प्रशांत जास्त शोभले असते. ;)

शाल्मली's picture

27 Mar 2009 - 6:22 pm | शाल्मली

वा वा!
दोन्ही चित्रे मस्तच!
निसर्गचित्र तर जबरा..

अजून एक काम कर.. ही चित्रे तुझ्या बॉसलाही पाठव.
खुश होईल हो अगदी तुझ्यावर.. ;)

--शाल्मली.

सहज's picture

27 Mar 2009 - 6:23 pm | सहज

नारळाच्या झाडाची पाने मस्त आहेत.

डाकु ससांक दाढी काढली तर भक्त ससांक वाटेल इतका सोज्वळ दिसतोय. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी रे टार्‍या !
नविन नविन आलो होतो तेंव्हा तुझी काहि अप्रतीम रेखाचित्रे बघण्याचा योग आला होता मिपावर, त्यानंतर आपल्या प्रतिभेचे आज हे पुन्हा दर्शन :)

'आमच्या सारख्या' प्रतिभावान मिपाकरांमध्ये तु ही आहेस ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो ;)

राजा परावर्मा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाटावरचे भट's picture

27 Mar 2009 - 6:45 pm | घाटावरचे भट

टार्‍या माफ....केवळ माफ!! नाही आवडली...सपष्ट मत...

टारझन's picture

27 Mar 2009 - 6:51 pm | टारझन

आभारी आहे मित्रा , ह्यावरून मी डिजिटल चित्रे (संदिप चित्रे ह्यांच्या शी काहीही संबंध णाही, नाय तर " उगाच खोचक" प्ररिक्रिया वाटेल कोणाला ) अधिकाधिक उत्तम बणवण्याचा प्रयत्न करेल ..

भटांना एक विणंती , चित्रा मधे काय कमी आहे ते जरा विस्कटून सांगावे , पुढील वेळेस सुधारणा करण्यात येईल ..
जसे उगाच अलंकारीक शब्द वापरलेत ? की स्कॅन करून लावलंय ? की बोर झालं चित्र वाचताना ?
(करमणून करणारी चित्र काढ , असं सुचवायचंय का ? ;)

- टारझन भट

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

आणी हो
दि ड्रॉईंग्ज इन बोरिंग ट्रेणिंग !!
च्या ऐवजी
टार्‍याच्या संगणकातील शेंगदाणे

हे नाव शोभले असते.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

27 Mar 2009 - 6:58 pm | लिखाळ

परा सुटलाय :))

भटोबा, टार्‍या आणि परा यांच्या मताशी सहमत (म्हणजे नक्की काय ते कोण जाणे !!)

टार्‍या चित्रे बाळबोध वाटली. सुधारणेला वाव आहे :)

आवडले नाही अशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर 'प्रतिक्रिया क्रमांक ४०अ' वगैरे अशी काही भानगड असते का/चालू करावी का? :)
-- लिखाळ.

निखिल देशपांडे's picture

27 Mar 2009 - 6:56 pm | निखिल देशपांडे

सहिच रे टार्‍या..........

निसर्ग चित्र मस्तच काढले आहे......

डाकु टारझन चा चित्र कधी येणार....

प्राजु's picture

27 Mar 2009 - 7:05 pm | प्राजु

उत्तम उद्योग चालू आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी काढले चित्र !

बाय द वे, आपल्या लेखनातील 'ण'ला काही उपाय नाही का ? :)

डाकू ससांक हा इतका गुटगुटीत आणि गोंडस वाटतो आहे की त्याच्याबरोबर लहान मुलं खेळायला जातील!
त्याच्या गालावर तीळ काढण्याचा तुझा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे (खरं तर ती तीट वाटते आहे नजर लागू नये म्हणून लावलेली ;) )!

(खुद के साथ बातां : हा माणूस टार्‍याशेजारी बसलाच कसा? बहुतेक त्याला शिक्षा दिली असावी!! ;) )

चतुरंग

प्रमोद देव's picture

27 Mar 2009 - 9:52 pm | प्रमोद देव

डाकू नाही वाटत. एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा धट्टाकट्टा सुरक्षारक्षक वाटतोय. :)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सोनम's picture

27 Mar 2009 - 9:44 pm | सोनम

टार्‍या चित्र छान आहे रे. :) :) :)

डाकु टारझन चे चित्र कधी येणार.... ;) ;) ;)

भाग्यश्री's picture

27 Mar 2009 - 10:14 pm | भाग्यश्री

ह्म्म्म... चित्रं बरी आहेत..
(बोरींग वाटली नाहीत, फक्त डाकू ससांक जाम क्युट आलाय आणि ते पाण्यात लाल काय तरंगतंय ते नाही कळले..
बाकी तू चांगला चित्रं काढू शकशील म्हणून हो इतकं सांगतीय!! ;) =)) )

एनीवेज मजा करतेय....
चित्रं आवडली!
दुसरं जास्त!

अंतु बर्वा's picture

27 Mar 2009 - 11:05 pm | अंतु बर्वा

>> पाण्यात लाल काय तरंगतंय ते नाही कळले..

मला वाट्तं ते सुर्याचं प्रतिबिंब असाव...

बाकी टारुशेठ... चित्रं आवडली...

जेन's picture

27 Mar 2009 - 11:21 pm | जेन

तुझे हे कार्य पाहूनतर मला तो ईशान अवस्थी आठ्वला .........
अगदी इनोसन्ट तुझ्या सारखा.........
असेच चित्र काढ्तजा.......

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 11:26 pm | अजय भागवत

ग्रेट!!!
MS Paint च्या टिमला पाठवला तर त्यांना कळेल की त्यांच्या सॉफ्ट्वेअरचा इतका चांगला वापरही होऊ शकतो.

स्वप्निल..'s picture

28 Mar 2009 - 12:30 am | स्वप्निल..

चला मला कंपनी मिळाली ... यावरुन मला काही सुचेल का काढायला ते बघतो..

आणि का रे..ससांक काय तुझ्या बॉस च नाव काय??

स्वप्निल

शैलेश देशमुख's picture

28 Mar 2009 - 12:37 am | शैलेश देशमुख

लयि भारि चित्र आहे

मृगनयनी's picture

28 Mar 2009 - 11:25 am | मृगनयनी

र्टार्‍या... ते नारळाच्या झाडाचं चित्र छाण आहे.

केशरी "सूर्य", निळा समुद्र, हिरवी झाडे ( बेटावरच्या की खाडीवरच्या टेकडीवरची....)... खरच सुपिरियरली पेन्टली आहेत.! ;)
:)

पण... तो डाकु-- मित्र --'ससांक' चा चेहरा असा "इमोसनल अत्याचार" झाल्यासारखा का वाटत आहे?

किन्वा "मगन खुजबळ"दाढी वाढवुन ... पुन्हा शिवसेनेत दाखल होऊन ...जुन्या आठवणींनी त्यांचे डोळे डबडबून गेलेत की काय... असा क्शणिक भास होतो...
:)

_______________

असो... बाकी तुझी "पेन्टिन्ग-कला" खरोखर वाखाणण्याजोगी आहे...

चालू द्या........

हळूहळू नव्या "बौस"ला आपलेसे करून... त्यालाही या नादाला लावा.......

:) :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दशानन's picture

28 Mar 2009 - 11:32 am | दशानन

=))

सही !

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 12:10 pm | विसोबा खेचर

टार्‍या,

दोन्ही चित्र मस्तच काढली आहेस! जियो..! :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2009 - 12:20 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला अशी सुंदर चित्र काढणार्‍या कलाकार लोकांबद्दल असुया युक्त आदर वाटतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कुंदन's picture

29 Mar 2009 - 2:14 pm | कुंदन

>>आम्हाला अशी सुंदर चित्र काढणार्‍या कलाकार लोकांबद्दल असुया युक्त आदर वाटतो.

घाटपांडे काकांशी सहमत....

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2009 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, दुसरं चित्र जास्त आवडलं. सुर्य आणि प्रतिबिंब झ्याक.

बिपिन कार्यकर्ते

सुशील's picture

28 Mar 2009 - 11:07 pm | सुशील

फाल्तू चित्रे आहेत. अर्धे प्रतिसाद स्वताच वेगवेगळे आयडि काढून टाकले आहेत.

विसोबा खेचर's picture

29 Mar 2009 - 12:57 am | विसोबा खेचर

अर्धे प्रतिसाद स्वताच वेगवेगळे आयडि काढून टाकले आहेत.

जवळ कुठलाही पुरावा नसतांना टारझन यांच्यावर आरोप करणार्‍या सुशीलचा आयडी त्वरीत ब्लॉक करण्यात आला आहे!

तात्या.

देवदत्त's picture

29 Mar 2009 - 1:48 pm | देवदत्त

मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये काढल्याच्या मानाने चांगली चित्रे आहेत.

कलिग काय म्हणाला ते नाही सांगितलेस? :)