महाजालासाठी नवीन कायदे

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
24 Mar 2009 - 3:29 pm
गाभा: 

महाजालासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत व त्यानूसार आता कायद्यात बदल केला गेला आहे.
नकली आयडी तयार करणे, दुस-याच्या नावाने प्रोफाईल / इ मेल आयडी तयार करणे, दुस-याच्या नेटवर्कचा गैरवापर करणे, संगणकामध्ये जाणून बुजून विषाणू पाठवणे, माहीती चोरी करणे व इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आता सूचना-प्रौद्योगिकी कानून (आईटी एक्ट) मध्ये संशोधन करुन तीन ते आजिवन कारावास पर्यंतची शिक्षा ठोठवण्याची तरतुद केली गेली आहे.

संशोधन केलेले कायदे खालील प्रमाणे :

ऍक्ट - 66 सी
अपराध - दुस-याचा पासर्वड चोरी करणे / त्याच्या परवानगी शिवाय वापर करणे, डीजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंन्टचा गैर वापर करणे.
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.

ऍक्ट - 66 डी
अपराध - दुस-याची डुप्लिकेट आयडी तयार करणे / मेल आयडी तयार करणे / प्रोफाईल तयार करणे / वेबपेज चोरी करणे / दुस-याच्या नावाने एसएमएस पाठवणे, फसवण्याच्या हेतुने मेल पाठवणे (फिशिंग)
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.

ऍक्ट - 66 ई
अपराध - चोरुन कुणाचे अश्लील फोटे / व्हिडिओ तयार करणे व महाजालावर टाकणे.
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.

ऍक्ट- 67 बी
अपराध - चाइल्ड पोर्नोग्राफी
सजा - पांच वर्ष जेल व 10 लाख रुपए दंड.

ऍक्ट- 67 सी
अपराध - महाजालाचा वापर करण्या-या / संगणक वापर करणा-या प्रत्येक युजर चे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक (सरकार / संबंधीत प्रणाली कसे करणार माहीत नाही.) जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल.

सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.

ऍक्ट - 69
अपराध - ब्लेकबेरी अथवा तस्म सेट / मोबाईल / सेवा सुविधा प्रदान करणा-या कंपन्यांनी मास्टर की सरकार ला देणे बंधन कारक केले आहे. नाही दिला तर गुन्हा
सजा - सात वर्ष जेल.

**********
सीआयडीचा दुवा व पुर्ण सायबर लॉ चे पिडीफ माहीती येथे उपलब्ध आहे.

**********
माहीती - न्युज चॅनेल (डी डी न्युज)

प्रतिक्रिया

सूहास's picture

24 Mar 2009 - 3:32 pm | सूहास (not verified)

सुहास..
(द गुड)

अवलिया's picture

24 Mar 2009 - 3:33 pm | अवलिया

लै भारी.

--अवलिया

दिपक's picture

24 Mar 2009 - 3:35 pm | दिपक

अजुन येउद्यात !

सहज's picture

24 Mar 2009 - 3:36 pm | सहज

नंतर जमल्यास शोधुन कायदा-न्याय मंत्रालय किंवा कोर्टाच्या संकेतस्थळाचा हे दाखवणारा दुवा असेल तर लेखात डकवा.

एकदम उपयुक्त लेख होउन जाईल

दशानन's picture

24 Mar 2009 - 3:43 pm | दशानन

हे घ्या दिल्ली कोर्ट च्या delhicourts.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीचा दुवा वरील लेखात ऍड केला आहे.

दशानन's picture

24 Mar 2009 - 3:48 pm | दशानन

ज्यांना सायबर लॉ २००० चे सर्व चॅप्टर वाचायचे आहेत त्यांनी येथे क्लिक करावे ह्याच सायबर लॉ मध्ये वरील बदल केले गेले आहेत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Mar 2009 - 3:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे कधी कुठे आणी कोणत्या ठिकाणी मुशाफिरि करतील याचा काहि नेम नाहि ...

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

निखिल देशपांडे's picture

24 Mar 2009 - 3:57 pm | निखिल देशपांडे

चांगली माहिति.......

राजे कधी कुठे आणी कोणत्या ठिकाणी मुशाफिरि करतील याचा काहि नेम नाहि ...
असेच म्हणतो.....

महेश हतोळकर's picture

24 Mar 2009 - 4:01 pm | महेश हतोळकर

धन्यवाद राजे!
तात्या/नीलकांत: एक विनंती आहे. कृपया हा धागा मिपा च्या मुखपृष्ठावर कायमचा राहील असे काहीतरी करा. जेणे करून सर्वांनाच पटकन मिळेल.

सँडी's picture

24 Mar 2009 - 4:14 pm | सँडी

बरीच नविन माहीती मिळाली.
धन्यवाद.

>>चाइल्ड पोर्नोग्राफी
हा आजच्या सायबर जगातला सगळ्यात मोठा किडा आहे. ह्या लोकांचे हिडिस प्रकार समजले की तळपायाची आग मस्तकात जाते.
हा कीडा ठेचुन काढण्यासाठी सध्या एका आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेबरोबर काम करतोय. चाइल्ड पोर्नोग्राफी विषयी भारतीय कायदे अभ्यासुन या क्षेत्रात काम करणार्‍या भारतीय संस्थांबरोबर काम करण्याची योजना आहे. हा कीडा भारतात घुसलाय याची सरकारला जाणीव झाल्याबद्दल आणि या विषयीचे कडक कायदे केल्याबद्दल कौतुक वाटते.

आणखी दुवे असल्यास कळवावे.

जेव्हा पासून मिपावर आहे तेव्हा पासून पहिल्यांदाच इग्रजी मध्ये लिहतो आहे क्षमा असावी पण अत्यंत उपयोगी माहीत आहे त्यामुळे आहे तशीच येथे देत आहे.

**********************
CYBER LAW:


Cyberlaw is a much newer phenomenon having emerged much after the onset of Internet. Internet grew in a completely unplanned and unregulated manner. Even the inventors of Internet could not have really anticipated the scope and far reaching consequences of cyberspace. The growth rate of cyberspace has been enormous. Internet is growing rapidly and with the population of Internet doubling roughly every 100 days, Cyberspace is becoming the new preferred environment of the world. With the spontaneous and almost phenomenal growth of cyberspace, new and ticklish issues relating to various legal aspects of cyberspace began cropping up.

In response to the absolutely complex and newly emerging legal issues relating to cyberspace, CYBERLAW or the law of Internet came into being. The growth of Cyberspace has resulted in the development of a new and highly specialised branch of law called CYBERLAWS- LAWS OF THE INTERNET AND THE WORLD WIDE WEB.

Cyberlaw is a generic term which refers to all the legal and regulatory aspects of Internet and the World Wide Web. Anything concerned with or related to or emanating from any legal aspects or issues concerning any activity of netizens in and concerning Cyberspace comes within the ambit of Cyberlaw.

Copyright: http://www/cyberlaws.net/introduction.htm

*****

Snapshot of Important Cyberlaw Provisions in India

Offence Section under IT Act
Tampering with Computer source documents
Sec.65

Hacking with Computer systems, Data alteration
Sec.66

Publishing obscene information
Sec.67

Un-authorized access to protected system
Sec.70

Breach of Confidentiality and Privacy
Sec.72

Publishing false digital signature certificates
Sec.73

NOTE: Sec.78 of I.T. Act empowers Deputy Superintendent Of Police to investigate cases falling under this Act.

Computer Related Crimes Covered under Indian Penal Code and Special Laws

Offence
Section

Sending threatening messages by email
Sec 503 IPC

Sending defamatory messages by email
Sec 499 IPC

Forgery of electronic records
Sec 463 IPC

Bogus websites, cyber frauds
Sec 420 IPC

Email spoofing
Sec 463 IPC

Web-Jacking
Sec 383 IPC

E-Mail Abuse
Sec 500 IPC

Online sale of Drugs
NDPS Act

Online sale of Arms
Arms Act

ELEMENTARY PROBLEMS ASSOCIATED WITH CYBER-CRIMES:

One of the greatest lacunae in the field of Cyber Crime is the absence of comprehensive law any where in the World. The problem is further aggravated due to disproportional growth ratio of Internet and cyber laws. Though a beginning has been made by the enactment of I.T. Act and amendments made to Indian Penal Code, problems associated with cyber crimes continue to persist.

Jurisdiction is the highly debatable issue as to the maintainability of any suits, which has been filed. Today with the growing arms of cyber space the territorial boundaries seem to vanish. Thus the concept of territorial jurisdiction as envisaged under S.16 of Cr.P.C. and S.2.of the I.P.C. will have to give way to alternative method of dispute resolution.

Loss of evidence is a very common & expected problem as all the data are routinely destroyed. Further, collection of data outside the territorial extent also paralyses the system of crime investigation.

Cyber Army: There is also an imperative need to build a high technology crime & investigation infrastructure, with highly technical staff at the other end.

A law regulating the cyber-space, which India has done.

Though S.75 provides for extra-territorial operations of this law, but they could be meaningful only when backed with provision recognizing orders and warrants for Information issued by competent authorities outside their jurisdiction and measure for cooperation for exchange of material and evidence of computer crimes between law enforcement agencies.

Cyber savvy judges are the need of the day. Judiciary plays a vital role in shaping the enactment according to the order of the day. One such case, which needs appreciation, is the P.I.L. (Public Interest Litigation), which the Kerala High Court has accepted through an email.

'Perfect' is a relative term. Nothing in this world is perfect. The persons who legislate the laws and by-laws also are not perfect. The laws therefore enacted by them cannot be perfect. The cyber law has emerged from the womb of globalization. It is at the threshold of development. In due course of exposure through varied and complicated issues it will grow to be a piece of its time legislation.

Copyright: http://www.cidap.gov.in/

सीआयडी च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहीती नूसार.

राहुल सरकार's picture

24 Mar 2009 - 4:31 pm | राहुल सरकार

माहीती खुप छान आहे

चिरोटा's picture

24 Mar 2009 - 5:01 pm | चिरोटा

उपयुक्त माहिती आहे.फसवणारा भारताच्या बाहेर आणि युजर भारतात अश्यावेळी आतरराष्ट्रिय मदत घ्यावी लागणार्.मदत पटकन पाहिजे तर दुसर्याला मदत पटकन केलीही पाहिजे.आन्तर्राश्ट्रिय पातळीवर भारताची प्रतिमा ह्या बाबतित चान्गली नाही.'पैसे खावुन वेळ्काढुपणा करणारे' ही प्रतिमा भारतिय पोलिस अधिकार्याना बदलावी लागेल.समजा एखादा राजकारणी पुत्र पकडला गेला तर तो नक्कि वर्षभर तरी जेलची हवा खाईल एवढा विश्वास लोकाना वाटला तरच ह्या सगळ्या कायद्याना अर्थ आहे.
शिवाय भारताला आपली आय्.टी. मुलभुत सेवा खुपच भक्कम करावी लागेल. बर्याच सरकारी वेब साईट्स धुम धडाक्यात चालु होतातं. नन्तर काही कालावधि नन्तर त्या तश्याच पडिक असतात.

ऍक्ट - 66 ई अपराध - चोरुन कुणाचे अश्लील फोटे / व्हिडिओ तयार करणे व महाजालावर टाकणे

असन्ख्य भारतिय pornographic चित्रपटान्चे चित्रण पोलिस आणि राजकारणी ह्यान्च्या आशीर्वादाने सुखेनैव चालु असते.(मुम्बै/चेन्नई/दिल्ली/हैदराबाद ही शहरे ह्यात आघाडीवर आहेत). हे कायदे मान्जराच्या गळ्यात घन्टा कशी बान्धणार हे बघावे लागेल्.असो.काहितरी पाउले उचलली हे त्यातल्या त्यात बरे.

दशानन's picture

24 Mar 2009 - 4:52 pm | दशानन

ज्यांना महाजाल गुन्ह्याबद्द्ल तक्रार करणे आहे अथवा गुन्हा दाखल करणे ह्याच्या त्याच्या माहीती साठी हा दुवा एकदम उपयुक्त आहे.

येथे पहा.

क्रान्ति's picture

24 Mar 2009 - 8:14 pm | क्रान्ति

अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अविनाशकुलकर्णी's picture

24 Mar 2009 - 10:54 pm | अविनाशकुलकर्णी

:S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S

नाटक्या's picture

24 Mar 2009 - 11:58 pm | नाटक्या

राजे,

माहिती चांगली आहे. परंतू याचा काही फायदा होईल का याची शंका वाटते. असे कायदे अमेरिकेत्/युरोपात आधीपासूनच आहेत पण संगणक हॅक करणे/विषाणू पसरवणे/पोर्नोग्राफी हे काही कमी झालं नाही. कारण हे जे लोक करतात (हॅकर्स) ते एक पायरी वरच असतात.

तसेच कायद्यातल्या खाचाखोचा (लूपहोल्स) वापरून बर्‍याचदा यातून सुटता येते. या बाबतीत पुरावा जमवण्याबाबतीत पोलीसही किती कार्यक्षम ठरतील हा चर्चेचा आणि वादाचा विषय होऊ शकेल. एलेक्ट्रॉनिक फोरेन्सीक या शास्त्राबद्दल भारतात कितपत माहिती आहे? ४ वर्षाची संगणक शास्त्राची पदवी घेतलेल्या सुद्धा ९०% लोकांना या बाबत काहीही माहीती नसते. सायबर क्राईम घडल्यानंतर ई-फोरेन्सीकनेच या गोष्टी सिद्ध करता येतात ज्या साठी आधी पोलीसदल त्या दृष्टीने सक्षम करणे फार आवश्यक आहे. नुसता कायदा केला पण गुन्हा घडल्यानंतर तो पुराव्याने शाबीत करण्यासाठी पुरावा कुठला आणि कसा गोळा करायचा याचे ज्ञान नसले तर कायदा करून न करून सारखाचं.

आणि भारतात तर राजकिय वरदहस्त असला तर एखाद्याचा खून पण सहज पचवता येतो. साक्षीदार फितवले/फोडले जातात, पुरावा नष्ट केला जातो. यातून खरोखर किती केसेस मध्ये खरोखर न्याय मिळतो. कधी कुठल्याही राजकिय पुढार्‍याला कोर्टात गुन्हा शाबीत होऊन शिक्षा झाल्याचे आणि ती त्याने भोगल्याचे ऐकीवात तरी आहे का? त्यामुळे हे सगळे कागदावरच छान, छान दिसणार आहे.

- नाटक्या

अरण्यसैनिक's picture

25 Mar 2009 - 1:38 pm | अरण्यसैनिक

अतिउत्तम माहीती दिलीत राजे त्याबद्दल तुमचे शतशः आभार..

दशानन's picture

2 Apr 2009 - 9:33 am | दशानन

अजून काही रोचक माहीती ह्या दुव्यावर.