Humans are nonsense. The problem with the humans is that they have a functional brain which thinks beyond eating, sleeping and mating unlike animals. And any thing that is functional will have its own dysfunction.
घरातील माणसाकडुन अत्याचारीत मुलीच्या त्रासाला बघुन खंतावलेल्या आणि उदास झालेल्या मला साहेबांनी धीर दीला होता. साल १९७८. माणुस हा मुळात एक प्राणीच. पण प्राण्यात कुठे बलात्कार होतात. तीथे तर उलट मादी ला आपला साथीदार निवडण्याचा हक्क असतो.
अपंग शाळेतील मुलींवर शिक्षकांच्या बलात्काराला काय म्हणावे?
आईच्या उपस्थितीत जन्मदात्याने वाढलेल्या मुलीवर गेले आठ वर्ष केलेला बलात्कार काय सांगतो? धंद्यात झालेल्या नुकसानी ला तांत्रिकाच्या सांगण्यावरुन केलेल्या ह्या अत्याचाराला काय शिक्षा असावी?
'अश्वत्थामा' ह्या माझ्या लेखामधे अशाच प्रकारच्या अत्याचारावर 'अपवादात्मक गोष्ट' अशी प्रतिक्रिया आलेली होती. त्यावर मी जास्त वाद घातला नव्हता. कारण अशा गोष्टी कीती प्रमाणात होतात ह्याचा विदा माझ्या कडे नव्हता.
ह्या क्षेत्रातील मान्यवराकडे चर्चा केल्यावर असे लक्षात आले की ५०% हुन अधीक मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराना सामोरे जावे लागतेच. अत्याचार म्हणजे नुसता बलात्कार नव्हे. ज्याला आपण अपरीचीत व्यक्ती कडुन 'फाँड्लींग' (' हाताळणी' म्हणुया हवे तर) हा अविभाज्य भाग झाला आहे मुलांकरता. अगदी शाळेच्या बसचे उदाहरण घेउ. बसचा क्लीनर अचानक एखाद्या मुलीला कमरेला धरुन बसमधे चढवतो. उतरताना एखाद्या मुलीला गालाला हात लाउन ' बाय बाय' करतो. ह्या झाल्या सुरुवातीच्या पायर्या. त्या निष्पाप जीवाला काहीच माहीत नसते. नंतर हे प्रकरण हळु हळु वेगवेगळ्या स्तरावर वाढत जाते. अंगाखांद्याने सुदृढ असलेल्या मुलींना तर हा त्रास जास्तच सहन करावा लागतो. आज काल शाळांमधुन 'समुपदेशक' असतात म्हणे. पण अशा विषयांची समर्पक माहीती पालकांना आणि मुलाना देण्याकरता लागणारी ताकद असलेले फारच विरळा. बरे हे फक्त मुलींनाच भोगावे लागते असे नाही.
मुलावर विकृत शिक्षिकेचा जास्त रेंगाळलेला हात पकडताच येत नाही.
माकड असो वा एप(प्रायमेट) ह्यात समागम हा फक्त 'बेसिक इंस्टींक्ट फॉर सरवायवल' ह्या प्रकारात मोडतो. कळप जीवंत राहण्याकरता.तीथे नाती वय ह्याचा संबंध नसतो. पण तीथे सुद्धा 'इन्ब्रीडींग' अगदी नाईलाज असेल तरच होते.
आणि आजही माणसात काही जाती जमाती मधे 'इन्ब्रीडींग' ला मान्यता आहे. त्यातले धोके माहीत असुनसुद्धा. पण इच्छेविरुद्ध आपणच जन्माला घातलेल्या मुलीबरोबर प्रजनन हे विचार शक्तीच्या बाहेरचे आहे.
गुप्त रोगा पासुन सुटका करण्याकरता 'कुमारी' वर अत्याचार, गुप्त धनासाठी 'कुमारी' वर बलात्कार आणि नंतर तीचा बळी हे फक्त भारतातच होते हा पण एक गैरसमज.
मग अशा प्रकारच्या अपराधात पकडलेल्याना फाशी देणे हा हे प्रकार थांबवण्याचा एकमेव उपाय आहे काय?
साहेबानी म्हटलेले कितपत खरे?
Hundreds of theories, thousands of researches,millions of books will not be able to define human dysfunctions.
माणुस का प्राणी
गाभा:
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 9:53 pm | प्रकाश घाटपांडे
मानवी लैंगिक वर्तन हा विषय मानसिकतेशी निगडित असल्याने त्याला अनेक पदर आहे . तरी साहेबाने म्हटलेले खरेच म्हणावे. लैंगिकता व नैतिकता यांचा परस्पर संबंध हा समाजातील रुढी ,परंपरा, धर्म, श्रद्धा अंधश्रद्धा यांच्याशी निगडीत आहे. त्यावर भाष्य करणे हे बर्याचदा कलहदायक असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Mar 2009 - 10:07 pm | मदनबाण
ह्या प्रकारांना ''रानटी ''म्हणावे नाहितर काय ?
पुर्वी चौरंगा करण्याची पद्धत होती,,तीच मला योग्य वाटते.
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
22 Mar 2009 - 3:36 am | शिवापा
तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरचं हे प्रमाण खुप जास्त आहे. ५०% महिला कुठल्या ना कुठल्या लैगिक अत्याचाराला आयुष्यात कधि ना कधी बळी पडतातच. यावर एक सुंदर एकांकिका "द वजायना मोनोलॉग" म्हणुन ब्रॉडवेवर दाखवली जाते. मुंबईत याचे सध्या याच नावाने इंग्लिशध्ये आणि हिंदित "किस्सा योनी का" ह्या नावाने प्रयोग पृथ्वी थियेटरला चालु आहेत. पुढच्या महिन्यात मराठित पण येतेय.
22 Mar 2009 - 4:18 am | मृदुला
हे खरे नाही. चिम्पान्झी व बोनाबोमध्ये इतर कारणानेही समागम घडतो. चिम्पान्झींमध्ये माजावर आलेल्या मादीशी सगळे नर रांगेत समागम करतात. एकाहून जास्त माद्या तयार असतील तर कोणत्या रांगेत पहिला कोण येतो यावरून त्या कळपाचे राजकारण ठरते! बोनाबोंमध्ये तर समागम ओळख, मैत्री, प्रेम अश्या भावना दर्शवण्यासाठी, तसेच चलन (करन्सी) म्हणूनही वापरला जातो. आणि बोनाबो हे मनुष्याचे सगळ्यात जवळचे एपबंधू. तरी तुम्ही म्हणता तसे हे सारे सहजप्रेरणेने (इन्स्टीन्क्टिव्ली) घडते.
माणसात समागमाची सहजप्रेरणा असली तरी प्रगत संस्कृतीतली माणसे वाटेल तेव्हा वाटेल तिथे या प्रेरणेने वागत नाहीत. म्हणजे समोरून येणार्या देखण्या पुरुषाशी रत व्हावे असे वाटले तरी कोणतीही स्त्री तिथल्या तिथे तसे करत नाही. म्हणजेच समागमाची सहजप्रेरणा सांस्कृतिक नीतीनियमांच्या आवरणात दडवली जाते. त्याचाच व्यत्यास म्हणजे सहजप्रेरणेच्या अभावात देखील समागम.
दुसरे म्हणजे बलात्काराला समागम या गटात घालण्यापेक्षा शारीरिक अत्याचार या गटात घालावे.
आणि तिसरे म्हणजे पूर्ण वाढ न झालेल्या बछड्यांना 'हाताळणे' हे देखील इतर प्राण्यांमध्ये आढळते. (म्हणून ते मनुष्यात स्वीकारार्ह आहे असे नव्हे.) मुलांना शक्य तितक्या लवकर लैंगिक शिक्षण देणे हेच महत्त्वाचे. व काही थोडे नकोसे घडल्यास दोषी/ विकृत व्यक्तींना लागलीच मुलांपासून दूर करण्याबरोबरच त्याचा मुलांसमोर बाऊ न करणे हेही..
22 Mar 2009 - 8:49 am | विसोबा खेचर
अल्पवयीन/शालेय मुलींशी चाळे करणार्यांचे लिंग कापून टाकण्याचा कार्यक्रम जाहीररित्या झाला पाहिजे..
तात्या.
22 Mar 2009 - 11:07 am | टारझन
तात्या .. अहो .. पण ते हिणकस दृष्य पहाताना बाकी लोकांना एक माणूस म्हणून शरम वाटेल त्याचं काय ?
ते लिंग बिंग कापण्याचं काम पोस्ट मॉर्टेम करणारे डॉक्टर्स नाही का करू शकत ? आतल्या रूम मधे ?
आणि फक्त अल्पवयिन मुलींशीच का ? वयात आलेल्या मुलींसोबत चाळे करणार्यास काहीच कसं नाही ?
असो , प्रभू मास्तर .. ह्या लेखांना "अजुन येऊन द्या" अशी प्रतिक्रिया आल्या तर काय अणुमाण काढावे हो ?
22 Mar 2009 - 11:28 am | विनायक प्रभू
तुझे अनुमान काय असेल रे टार्झना.?
22 Mar 2009 - 11:29 am | खरा डॉन
बोळा मास्तर! =))
22 Mar 2009 - 11:52 am | टारझन
च्यायला ... हल्ली वायूगळती व्हाव्या तशा प्रतिक्रिया उडत आहेत ... असो ...
माझी प्रतिक्रिया अशी विनाकारण उडावी ह्याची माझी मलाच शरम वाटली .. तरी पण असो ~~
22 Mar 2009 - 11:07 am | खरा डॉन
सहमत आहे
=))
23 Mar 2009 - 4:56 pm | हरकाम्या
तात्या तुमच्या मताशी मी पुर्ण सहमत आहे. अशा मंडळींना हीच शिक्षा योग्य आहे.
22 Mar 2009 - 9:51 am | सहज
अपराधाबद्दल कडक शिक्षा झालीच पाहीजे.
22 Mar 2009 - 10:11 am | अजय भागवत
हे सगळे घृणास्पद व निंदनीय आहे व अपराधी व्यक्तिंना कायद्यानुसार शिक्षा होणे हाच त्यावर तात्पुरता पर्याय आहे. अशा विषयांवर समाजामधे अधिक चर्चा होणेही खूप निकडीचे आहे कारण आकडेवारीवरुन भारतात हे प्रकार वाढीस लागले आहेत.
22 Mar 2009 - 1:47 pm | चित्रादेव
>>आणि एक जनावर यापलीकडे काही शिल्लक रहात नाही.<<
वस्तुनिष्ठ साहेब,
अहो जनावराला का नावे ठेवता? प्रभुंनी म्हटले आहे ना वर की ,जनावर्(प्राणी) असले काय करत नाही.. मग उगीच प्राण्यांचा का अपमान तरी?
22 Mar 2009 - 1:53 pm | प्रमोद देव
माणूस हा खरे तर एक प्राणीच आहे. तो नेहमी प्राण्यासारखाच वागतो...अगदी नियमबद्ध!
पण जेव्हा जेव्हा तो माणसासारखा वागतो तेव्हा तेव्हा हे असले अत्याचार करतो.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
22 Mar 2009 - 2:48 pm | रामदास
चर्चा प्रस्तावाचा जसा राग येतो तसाच राग आज तुमचा चर्चा प्रस्ताव वाचून आलेला आहे.मास्तर हे बरं नव्हं.तुम्ही एक साताठ ओळीत प्रस्ताव टाकून मोकळे झालात .तुमच्या कडून अपेक्षा आहे ती आणखी विस्तृत आणि मोठ्या चर्चेची.
माणसाला प्राणी -माकड -माकडाच्या जवळपासचा प्राणी असं म्हणून समस्येचे मूळ सापडले असे म्हणावे का.?
माणसाकडे माकडाकडून काही वारसा आला असेल परंतू माणसाची स्वतःची अशी पण खासीयत असेल ना ?
अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे की अत्याचाराला तोड फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. ?
याच लघु चर्चा प्रस्तावात प्राणीशास्त्र मानसशास्त्र कायदेशास्त्र विदाशास्त्र इत्यादीचा जाताजाता उल्लेख करून तुम्ही बाजूला होऊ नका.
अवांतरः बाकी स्पेअरपार्टचा उद्योग करणार्यांना बायका फार सुरेख हाताळतात असे मी नेहेमीच बघतो.
22 Mar 2009 - 7:05 pm | विनायक प्रभू
उद्योग म्हणजे काय?
22 Mar 2009 - 7:24 pm | विनायक प्रभू
सुरुवातीच्या दोन आणि शेवटची एक ओळ पुरेशी आहे. ती इंग्रजी मधे आहे ह्यातच सर्व आले रामदास भावजी.
हा लेख मराठी मधे सर्वसंपन्न करण्याइतके मराठी भाषेवर माझे प्रभुत्व नाही.
आपण ती त्रुटी पुर्ण केलीत तर आभारी राहीन आपला.
22 Mar 2009 - 4:07 pm | मस्त कलंदर
मटावरचा हॉट दुवा केवळ उत्सुक्तेपोटी उघडला... नी बातमी वाचून मन सून्न झाले.... आंतर्जालावर याबाबनची बरीच माहीती उपलब्ध आहे.. http://en.wikipedia.org/wiki/Fritzl_case
एका बापाने आप्ल्या १८ वर्षे वयच्या मुलिसोबत २४ वर्षे संबंध ठेवले.... तीला घराच्याच बेसमंट मध्ये एतकि वर्षे डांबले... तीच्यापासून त्याला ७ मुले ही झाली...त्यातले एक मेले तर त्यने तसेच त्या अर्भकास जाळून टाकले.... नि हे सारे त्याने बेमालूम पणे निभावुन नेले..
पहा... त्याच्या घाराचे फोटोhttp://www.telegraph.co.uk/news/newstopics/joseffritzl/2137385/Josef-Fri...
22 Mar 2009 - 5:02 pm | लिखाळ
वेगवेगळ्या तर्हेच्या विकृती माणसांच्यात असतात. त्यांना आवर कसा घालावा, त्यां पासून आपले आपल्या आप्तांचे रक्षण कसे करावे आणि समाजस्वास्थ्य कसे टिकवावे या बद्दल सुजाण नागरीक, कायदे जाणणारे विचार करत असतात, मार्ग शोधत असतात.
आपले लेख अश्या तर्हेच्या प्रश्नांना लोकांसमोर आणतात आणि त्यांना विचार करायला उद्युक्त करतात.
अश्या लेखांतील चर्चेत जर आपण काही प्रतिसांदांना उत्तरे म्हणून प्रतिसाद कर्त्यांचे कोणते उपाय आपल्याला योग्य-अयोग्य वाटले, समाजात या विषयी अजून काय काम-उपाययोजना होते, या प्रश्नांना सामान्यांनी कसे हाताळावे, असे काही सुबोध-सविस्तर लेखन केलेत तर वाचकांना त्याचा अजूनच फायदा होईल असे वाटते. (रामदासांच्या प्रतिसादावरुन बरेच दिवस जे म्हणायचे होते ते आज लिहावेसे वाटले.)
प्रत्येक वेळेला लहान मुलांना गोंजारणे हे विकृतीच्या कक्षेत येत नसावे. 'तो विकृत स्पर्श आहे' असा विचार सुद्धा समाजस्वास्थ्याला पोषक नाही असे वाटले. त्यामुळे यातल्या सीमारेषा, त्यांची जाण याबद्दलसुद्धा मुलांना-पालकांना-इतरांना मार्गदर्शन झाले पाहिजे. (ते तारतम्याने समजावून घ्यावे असे असेल तर मग अश्या अनेक गोष्टी चर्चा कक्षेच्या बाहेरच चुपचाप पडून राहतात.)
-- लिखाळ.
22 Mar 2009 - 10:15 pm | चित्रादेव
आतापर्यन्त पहाणीत असे आढळले की, लहान मुलींना(लहान मुलांना सुद्ध पण मुलींना सर्वात ज्यास्त) 'हाताळणारे' किंवा बलात्कार करणारे हे मूळात पुर्णपणे बाहेरचे नसून सख्खे जवळचे नातलग असतात. त्यात येतात काका, मामा,आजोबा, सांभाळायला ठेवलेली कामवाली बाई/गडीनोकर,चुलत भाऊ,मोठी जावु(ऊत्तरप्रदेशातील अशीच एक केस होती, आता आठवत नाही),किंडरगार्डेन मधील शिक्षक आणि मग शेजारी रहाणारा,लहान मुलीबरोबर/ मुलाबरोबर खेळायला येणारा/येणारी लोक्,शाळेच्या बसमधला ड्रायवर वगैरे ह्या अनुक्रमेने असे प्रकार होत असतात जो पर्यन्त मुलांना हे 'त्यांच्याबरोबर ' काय होतेय ह्याची अक्कल येत नसते. तर कधी अक्कल येवून सुद्धा भितीखाली सहन केले जाते ते ही स्वताच्याच लोकांच्या भितीखाली. हे आहे लहानपणी होणारे अत्याचार.
तर मोठेपणी 'उद्योगाच्या/व्यवसायाच्या नावाखाली' उघड उघड हाताळणी करणारे (वरती कुणीतरी हे म्हटलेच आहे) जसे टेलर्स्,डॉकटर्स्,नर्सेस,
23 Mar 2009 - 12:11 am | मस्त कलंदर
तस्लीमा नसरीन यांच्या " आमार मेयेबेला" (माझं बालपण) या पुस्तकात त्यानी स्वतःच्या एकत्र कुटुंबात त्यांच्यावर सख्या मामाने व चुलतभावांनी केलेल्या अत्याचाराबद्दल लिहिले आहे... विशेष म्हणजे अशा प्रकारात मुलीला गप्प राहून घराची ईज्जत राखायला सांगणारी तिची आईच असते...( तस्लिमा यांचा अनुभवही काही वेगळा नाही)
23 Mar 2009 - 2:04 pm | विटेकर
माणूस आणि प्राणि यांच्यात मूलभूत फरक हा त्यांच्या नैतिकतेतून आणि धर्मातून आलेला आहे.
इथे धर्माचा अर्थ रिलिजन असा नसून 'नैतिकता अथवा जीवन मूल्ये "असा घ्यावा. किंबहुना धर्म शब्दाचा तोच अर्थ आहे .. रिलिजन म्हणजे पंथ...( असो एका नवा वाद सुरु व्हायला नको.)
Eating (or things needed for survival), sleep, fear from somebody and sex life (for
reproduction), these habits are common between human beings and animals.
(in this respect we cant differentiate between man and animal).
it is "dharma" which is additional important quality of man, without which he is
same as an animal.
- विटेकर
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
23 Mar 2009 - 10:49 pm | चित्रादेव
http://idiva.com/bin/idiva/Relationships_Imemyself_topstory_Sexuallyabus...