शुद्ध मराठी, वापरण्याजोगे मराठी!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
29 Jan 2008 - 11:12 am
गाभा: 

राम राम मंडळी,

आमचे दोन मित्रवर्य अभय नातू आणि केदार सोमण यांची मराठी विकिपिडियाकरता मोलाची कामगिरी आहे. हे दोघेही मराठी विकिकरता खूप काम करत असतात. मराठी विकिशी निगडीत एक याहू समुहही आहे, जिथे मराठी विकिसंदर्भात रस असलेली माणसं एकत्र येऊन चर्चा करू शकतात, आपापले विचार एकमेकात वाटू शकतात.

नुकतीच अभय नातू आणि केदर बोडस या दोघांची, शुद्ध मराठी (प्युअर मराठी), व वापरण्याजोगी मराठी (युजेबल मराठी) या संदर्भातील विकिच्या याहू समुहावरीलएक चर्चा आमच्या वाचनात आली. आम्हाला ही चर्चा खूप मोलाची वाटली व दोघांचेही विचार महत्वाचे वाटले. या संदर्भात आपल्या मिपाकरांचेही काय विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही ती चर्चा सर्व मिपाकरांच्या महितीकरता येथे देत आहोत. इच्छुक मिपाकरांनीही यात साधकबाधक चर्चा करावी आणि आपापले विचार मांडावेत ही विनंती..

तात्या.

याहू समुहावर एकमेकांशी मराठीतून संवाद साधणे बरेचसे अडचणीचे असल्यामुळे अभय आणि केदार, दोघांचीही मूळ पत्रे विंग्रजी भाषेतच आहेत.

केदारचे पत्र -

My two cents about Marathi Wikipedia

Hello All,

I have read some articles and also read some discussions on Marathi wikipedia.

There is one important issue I want to discuss.

My question is "Do we need to coin new words or terms for commonly used English words?" Like Internet or web browser?

If we coin new terms, nobody will every use it for sure. In fact coining such new terms makes use of Marathi language impractical.

What we need to do is to allow the most common words in Marathi. Every three months or so, Oxford printing press prints new version of English dictionary and they allow more words in English. Marathi needs to be more open like that.

I have dealt with Japanese people and they have allowed all the technical English words in daily use. In fact a Japanese friend of mine was surprised when he used some word as Japanese and I told him that is actually English word.

That's why we see people using Japanese and softwares being released Japanese language. But we do not see any version of Marathi softwares, because the attempt to keep Marathi pure makes the it unusable.

So we are at crossroads and we have to choose one. Pure Marathi or usable Marathi. And we must go for usable Marathi. If we insist on purity, Marathi will die. Guaranteed.

Any comments?

Thanks,

अभयचे उत्तर -

Usable, but not at all costs.

Allow me to explain --

It is extremely important that we do not contribute to
Marathi being overly complicated (surely you must
remember
agnirathagamanaagam anasuchakataamra lohapaTTikaa for a
railway signal :-}). If the common man finds it
unusable, the language will start to die off soon. To
keep it usable, a language must be flexible and
adaptive.

However, the flexibility *must not* come at the price
of structural and fundamental changes. I would equally
hate to read 'aamhii four-thirty vaajataache plane
pakaDuun mid-night na.ntar Mumbailaa reach karato.'

It's a fine line we must walk. Keep the language
flexible enough to allow new terms in, yet rigid
enough that it is not overrun by external influence.

IMHO, English has managed it quite well. Although an
Englishman from 17th century will probably not
understand every word of English in use today, he will
definitely get the hang of it in no time.

A language must be flexible, not malleable. Therein
lies the difference, again IMHO.

To address (finally!) the question asked - It's worth
trying to come up with equivalent words, some will
stick, some will not. We must not try to hold on
desperately to those that do not. For example, (I
believe) the word 'saa.ngkaamyaa' was invented here
for robot. I think it's starting to stick. 'Janitra'
is commonly used for 'generator'. I do not see a use
for 'chhoTaa sa.ndesh' for SMS :)

AN

धन्यवाद! मिपाकरांनीही या चर्चेत भाग घ्यावा अशी पुन्हा एकदा विनंती...

एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभय आणि केदार, दोघांचेही मिपातर्फे अनेक धन्यवाद..
मिपा अभयचे आणि केदारचे ऋणी आहे...

आपला,
(युजेबल मराठीचा पुरस्कर्ता) तात्या.

प्रतिक्रिया

नेने's picture

29 Jan 2008 - 11:05 pm | नेने

याहू ग्रुपवरील चर्चा मीही वाचतो आहे. त्या लिंकवरूनच मी ह्या साईटवर आलो. (पण माझे तेथले नाव वेगळे आहे). मराठी विकिपीडिया ही चळवळ मराठीला संजीवनी देईल असे मला प्रामाणिकपणे वाटते. मराठी विश्वकोशाचा शासनाकडे अडकून पडलेला प्रकल्प मार्गी लागणे कठीण आहे. म्हणूनच मराठी विकिपीडिया हा एकमेव आशेचा किरण दिसतो. मराठी विकिपीडिया ह्या विषयावरील माझी ही नोंद पाहावी. (सध्या मला इतकेच जमलेले आहे).

आता ह्या थ्रेडसंबंधी : मराठीत रुळलेले परकीय शब्द वापरण्यास काहीही हरकत नाही. भाषा अशाच रीतीने समृद्ध होतात. पण व्याकरण आपल्या भाषेचे वापरायला हवे. 'टेबलवर' म्हणायचे नाही 'टेबलावर' असे म्हणा. सामान्यरूप करणे ही मराठीची खासियत आहे. ती सोडायची नाही. वगैरे. विषय मोठा आहे, सध्या एक विचार देऊन थांबतो.

वि.सू. ह्या साईटवर खाली दिसत असलेल्या टॅबमधील शब्द 'पूर्वपरीक्षण' असा हवा. री दीर्घ हवी.

विसोबा खेचर's picture

29 Jan 2008 - 11:17 pm | विसोबा खेचर

नेनेसाहेब,

याहू ग्रुपवरील चर्चा मीही वाचतो आहे. त्या लिंकवरूनच मी ह्या साईटवर आलो.

या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. इथे येऊन आपले मत नोंदवल्याबद्दल आभारी आहे.

मराठीत रुळलेले परकीय शब्द वापरण्यास काहीही हरकत नाही. भाषा अशाच रीतीने समृद्ध होतात. पण व्याकरण आपल्या भाषेचे वापरायला हवे. 'टेबलवर' म्हणायचे नाही 'टेबलावर' असे म्हणा. सामान्यरूप करणे ही मराठीची खासियत आहे. ती सोडायची नाही. वगैरे.

मी आपल्याशी सहमत आहे...

तात्या.

वेद's picture

30 Jan 2008 - 12:34 am | वेद

But we do not see any version of Marathi softwares, because the attempt to keep Marathi pure makes the it unusable.


मागणी आणी पुरवठा तत्वावर मराठी सॉफ्टवेअर किती तग धरू शकेल असे वाटते हे जाणून घेण्यास आवडेल. चीन मध्ये २ आणी जपानमध्ये १ भाषा सर्वत्र बोलली जाते. त्यानुसार मागणी वाढते. मराठी ही भारतातल्या एका राज्यात बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे मागणीलाही मर्यादा पडणारच. शिवाय, मराठी बोलणारया एका मोठ्या वर्गाला इंग्रजीही येते, आणी इंग्रजीमध्ये सॉफ्टवेअर वापरणे त्यांना बहुधा सोपे जाइल, कारण इंग्रजी सॉफ्टवेअर नेहेमीच ग्राहक संख्येमुळे सुधारणांमध्ये आघाडीवर असेल, स्वस्तही असू शकेल. मला असे अजिबात म्हणायचे नाही की मराठीमध्ये सॉफ्टवेअर लिहू नये. पण व्यावसायिक यशाची अपेक्षा फारशी ठेवता येणार नाही. आणी जर स्वतःचा खर्च स्वतः वाहू शकणार नसेल तर कुठलीही गोष्ट फार काळ तग धरू शकणार नाही हे सर्वांना ज्ञातच आहे.

बाकी दोघांचीही मते पटतात. फार क्लिष्टता न आणता मूळ भाषा जपणे महत्वाचे आहे.

धनंजय's picture

30 Jan 2008 - 2:48 am | धनंजय

गुंडोपंतांशी झालेल्या एका ई-संवादात (http://www.mr.upakram.org/node/678#comment-10547) मी माझे मत दिले आहे.

ते साधारण वर लिहिल्याप्रमाणेच आहे
"However, the flexibility *must not* come at the price of structural and fundamental changes."

केवळ जडणघडणीचे आणि मूलभूत नियम प्रत्यक्षात आपोआप ठरतात (म्हणजे मराठी बोलणारे तो शब्द स्वीकारतात, वापरतात; किंवा आव्हेरतात, हसण्यावारी नेतात) असे माझे मत आहे. ज्याला नवीन शब्द मराठी तोंडात रुळवायचा आहे, त्याने या बाबतीत अभ्यास करावा - कुठले शब्द स्वीकारले जातात, कुठल्या शब्दांची टिंगल होते? आणि मराठी जिभेचे वळण समजून योग्य तर्‍हेचे शब्द नवीन घडवावेत.

आता माझे मत :
१. वस्तूंची नावे इंग्रजी घेतल्यास मराठीची मूलभूत जडणघडण बिघडत नाही.
"होंडा कारच्या इंजिनसाठी अधिक ऑक्टेनचे पेट्रोल लागते." (मला हे चालते.)

२. मराठीतील शब्द-बदल (ज्याला "शब्द चालवणे" म्हणतात) शक्यतोवर तसेच ठेवावेत.
"इन टाटा कंपनी फॉर रिसर्च खूप सपोर्ट मिळतो" (नाही आवडत!)
"टाटा कंपनीमध्ये रिसर्चसाठी खूप सपोर्ट मिळतो. (हे त्यातल्या त्यात बरे.)
"टाटा कंपनीमध्ये संशोधनासाठी खूप आधार देतात. (हे आणखी बरे.)
"टाटा उद्योगसंस्थेत संशोधनासाठी खूप आधार देतात. (हे दुसर्‍या टोकाला जायला लागले.)

३. क्रियापदे वेगळ्या भाषेतली घेतली तर मराठी भाषक सहज सहन करून घेत नाहीत.
"ऑफिसला गो करताना मी वॉक करतो, रिटर्न करताना लिफ्ट टेक करतो." (नाही आवडत.)
"ऑफिसला जाताना मी चालत जातो, परत येताना मी लिफ्ट घेतो." (हे त्यातल्या त्यात बरे.)

४. शिवाय एखादा जुनाच सोपा मराठी शब्द असेल तर उगाच इंग्रजी शब्द वापरल्यास मराठीची मराठमोळी लय बिघडते. पण इंग्रजी ऐवजी अति-संस्कृत शब्द वापरले तरीही मराठमोळी लय बिघडते. त्यामुळे तारतम्य वापरावे.
"या सेंटेन्समध्ये काही वर्ड राँग असेल तर शब्दलेखनप्रणालीच्या शब्दचिकित्सायंत्राने तो करेक्ट करूया." (दोन्ही कडून नाही आवडत.)
"या वाक्यात कुठला शब्द चुकला असेल तर वर्ड प्रोसेसरच्या स्पेलचेकने तो दुरुस्त करूया/सुधारूया. (हे जरा बरे वाटते.)

विशाल सोनवणे's picture

7 Oct 2013 - 3:44 pm | विशाल सोनवणे

सहमत...

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2008 - 10:54 pm | llपुण्याचे पेशवेll

या विषयाम माझ्या मते एखाद्या प्रतिशब्दाची लोकप्रियता हा महत्वाचा घटक ठरतो.
उदा. बाळ पंडितांनी मराठीत live commentry ला धावते समालोचन हा शब्द वापरला. तो आकाशवाणीवरील नियमीत वापरामुळे लोकप्रिय झाला. तसेच catch ला झेल, stump ला यष्टी, pitch ला खेळपट्टी, batsman ला फलंदाज, bowler ला गोलंदाज असे अनेक शब्द मराठीत लोकप्रिय केले.
त्यामुळे अजूनही मराठी वृत्तपत्रे त्याचा वापर करतात आणि तो हास्यस्पद वाटत नाही. प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे.
(मराठीचा अभिमानी)
-डॅनी
पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

5 Feb 2008 - 8:48 am | भडकमकर मास्तर

प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे.....

अगदी बरोबर...
अवांतर : मी मेडिकल चा अभ्यास करत असताना काही इंग्रजी माध्यमात शिकलेले विद्यार्थी (मेडिकल टर्म्स ला मराठी प्रतिशब्द सांगितल्यावर्)त्या शब्दांच्या संस्क्रुतोद्भव मराठीला हसत असत...उदा. युस्टेशिअन ट्यूबला ग्रसनीमध्यकर्णनलिका...मग मी त्यांना सोदाहरण पटवून देत असे की इंग्रजीत्सुद्धा खरेतर असेच उगीच अवघड केलेले वैद्यकीय शब्द आहेत्...उदा.: ओरोफॅरिंजियल....आता याला तुम्ही माउथ आणि थ्रोट म्हटले तर सोपे होते पण उगीच लॅटिन (की काय ते शब्द )वापरल्याने शब्द अवघड भासतात सुरुवातीला पण भरपूर वापर केला की सगळे सवयीचे होते इतकेच...

अमित खोजे's picture

20 Sep 2013 - 9:32 pm | अमित खोजे

सध्या मिपा वर नविनच असल्याने हे जुने लेख वाचत आहे. आणि हा लेख वाचताना मला माझ्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. उगीचच संस्कृत (ज्याचे spelling "sanskrit" - "Krishna" आणि "skrishti" सारखे करतात) प्रतिशब्द शोधून काढून मराठी भाषा अवघड करायची कि सरळसोट english शब्द आत्मसात करून 'मराठी भाषेवर अन्याय तर करत नाही आहोत ना' या पश्चात्तापामध्ये जळत राहायचे हा माझ्या समोर असलेला मोठा प्रश्न होता.

बायको सहित सर्वजण "उगी जास्त मराठी वापरू नको बे" म्हणून हिणवतात त्याचे वाईट वाटते आणि या संभ्रमात पडतो. अजून छोटी पिल्ले यायची आहेत पण त्यांनी हि अशी इंग्रजाळलेली भाषा वापरू नये असे फार वाटते.

वर उल्लेखल्या प्रमाणे sanskit, Krishna, Shristi (Sanskrut, krushna आणि srushti) वरूनही खूप वाद झाले आहेत. बोलीभाषेत प्रचलित असल्याने हे सर्व शब्द सर्रास वापरले जातात पण हे चुकीचे आहेत असे मला वाटते.
बरोबर - कृष्ण, संस्कृत, सृष्टी ज्यामध्ये 'उ' वापरला जातो.
चुकीचे - क्रिष्ण, क्रिष्णा, स्रीष्टी, संस्क्रीत ज्यामध्ये 'इ' वापरला जातो.
- असे माझे मत आहे.

spelling चे थोडेसे अवांतर होते आहे मान्य आहे पण सुचले म्हणून विचारावेसे वाटले.

पुण्याच्या पेशव्यांनी (हा मिपा वरील संकेताक्षर म्हणून अर्थ घ्यावा) बाळ पंडितांचे उदाहरण देऊन मराठीमध्ये नविन शब्द रूढ करता येतात हे पटवून दिले. तसे नवीन सोपे शब्दांची भर टाकायला काहीच हरकत नसावी असे बहुतेकांचे मत वाचून आनंद झाला. आता नवीन शब्दांसाठी शोधायला सुरुवात केली पाहिजे.

मिपा वरच मला वापरता येण्याजोगे बरेच नवीन शब्द मिळत आहेत. त्याबद्दल धन्यवाद!!

सूचना - मराठी लिहिण्यासाठी मिपा च्या "इनपुट साधना" पेक्षा मला हे गुगल चे "हत्यार" अधिक आवडले. बरेच सोपे आहे वापरायला. मिपा वर हे अंतर्भूत करता येईल का?
http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

मिपा मालक (नीलकांत) किंवा संपादक मंडळ सदस्य यापैकी कोणालाही व्यनी करून आपण आपल्या सुचना/बदल सुचवू शकता.
मिपा वर प्रतिक्रिया नोंदवताना मी सुद्धा आपण दिलेले गुगलचे हत्यारच वापरतो.

योगेश कुळकर्णी's picture

4 Oct 2013 - 7:38 pm | योगेश कुळकर्णी

मिपा मालक (नीलकांत) किंवा संपादक मंडळ सदस्य यापैकी कोणालाही व्यनी करून आपण आपल्या सुचना/बदल सुचवू शकता. >>> इथे 'सूचना' असं हवं!
मिपा वर प्रतिक्रिया नोंदवताना मी सुद्धा आपण दिलेले गुगलचे हत्यारच वापरतो. >>> गूगलचे
:दिवा: घ्या!

प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे.....

सहमत

agnirathagamanaagam = या साठी आगगाडी हा साधा शब्द वापरता येईल.

कृष्ण शब्दात 'ऋ' हा स्वर आहे. तो एक स्वतंत्र स्वर आहे. त्याचा उच्चार 'रु'' सारखाही नाही आणि 'रि' सारखाही नाही. जेव्हा आपण क्रिष्ण किंवा क्रुष्ण असा उच्चार करतो तेव्हा 'ऋ' ह्या स्वराला आपण 'र' हे व्यंजन मानीत असतो आणि त्याच्यापुढे 'इ' किंवा 'उ' हे स्वर जोडत असतो. स्वरापुढे दुसरा कोणताही स्वर जोडण्याची आवश्यकता नसते. असे करणे हे चुकीचे आहे. र्र्र्र्र्राम किंवा र्रावण असा उच्चार करताना आपण जिभेचे टोक थोडेसे आतल्या बाजूला वळवून टाळ्याला चिकटवतो तसेच थोडेफार 'ऋ' या उच्चाराच्यावेळी करायचे असते.

अतुलनियगायत्रि's picture

24 Sep 2013 - 11:09 am | अतुलनियगायत्रि

@ अमित खोजे

इनपुट साधन खूपच मस्त आणि फारच सोपे आहे. मिपा वर मी सुद्धा नवीन आहे. Type करायला अवघड जाते म्हणुन बरयाच वेळा प्रतिसाद द्यायचा कंटाळा यायचा. पण हे फारच छान झाले. शतश: धन्यवाद.

अमित खोजे's picture

1 Oct 2013 - 1:36 am | अमित खोजे

"You are welcome!" ला प्रतिशब्द ? ;)

अतुलनियगायत्रि's picture

24 Sep 2013 - 11:54 am | अतुलनियगायत्रि

@ अमित खोजे

इनपुट साधन खूपच मस्त आणि फारच सोपे आहे. मिपा वर मी सुद्धा नवीन आहे. Type करायला अवघड जाते म्हणुन बरयाच वेळा प्रतिसाद द्यायचा कंटाळा यायचा. पण हे फारच छान झाले. शतश: धन्यवाद.