ताज महाल

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
19 Mar 2009 - 10:21 pm
गाभा: 

ताज महाल
ताज महाल बांधल्या नंतर परत तशी कलाक्रुति तयार करु नये म्हणुन सर्व कलाकारांचे हात तोडण्यात आले होते..हा ताज महाल चा रक्त रंजित ईतिहास आहे...अशि जि अख्यायिका आहे ति खरी आहे का???? कोणी यावर प्रकाश टाकु शकेल का???????

प्रतिक्रिया

आळश्यांचा राजा's picture

19 Mar 2009 - 11:49 pm | आळश्यांचा राजा

पु ना ओकांची पुस्तके वाचा. गरजेपेक्षा बरेच अधिक समजेल ताज महालाविषयी (अथवा 'तेजो महालया'विषयी). इतिहास ताज महालाच्या बांधणीबाबत शांत आहे. त्यामुळे कच्चे दुवे पकडून काही जणांनी असे मत मांडले आहे की मुळातच ताज महाल ही वास्तू बाबर यायच्या आधीपासून अस्तित्त्वात होती. शाहजहानने ही राजपूत वास्तू बळकावली, थोडी मोड तोड केली आणि त्याचे कबरीत रूपांतर केले. काही सांगता येणे अवघड आहे, कारण पु ना ओकांनी बरोबर मुद्दे उचलले असले तरी प्रचारकी थाटामुळे गांभीर्य कमी करून ठेवले आहे.

आळश्यांचा राजा

chipatakhdumdum's picture

20 Mar 2009 - 2:33 am | chipatakhdumdum

ताजमहालाच्या अनेक खोल्यापैकी बहुतेक खोल्या का बन्द करुन ठेवलेल्या आहेत ?
त्या बन्द खोल्यामध्ये अस काय आहे, की जे जगासमोर आल, तर काही अडचणी निर्माण होतील ?
ताजमहालाच्या कोणत्याही भागाची कार्बन चाचणी कधीही का घेण्यात आलेली नाही ?
ताजमहाल ज्या काळात बान्धण्यात आला, अस सान्गण्यात येत, त्याच काळात , त्याच शासनकर्त्यानी बान्धलेल्या सुमारे ८० मोठ्या, सध्या प्रसिध्द , अशा इमारती उत्तर भारतामध्ये आहेत. त्या इमारतीवरील कलाकुसर आणि ताजमहालावरील कलाकुसर या मध्ये फरक का ? एक उदाहरण.... या कोणत्याही इमारतीमध्ये कमळाची आक्रुती दिसत नाही, मात्र ताज मध्ये ती दिसते.
उलटपक्षी या सर्व इमारतीमध्ये जी वेलबुट्टी दिसते ती मात्र ताज मध्ये दिसत नाही..ताज मध्ये वेगळ्या प्रकारची आहे.

टैम विलेक्शण का है भाइ, सवाल पढ के भूल जाना, खालीफोकट लफडा नै मन्गता...

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 10:30 am | चिरोटा

ताज महाल बांधल्या नंतर परत तशी कलाक्रुति तयार करु नये म्हणुन सर्व कलाकारांचे हात तोडण्यात आले होते

ही अख्यायिकाच आहे.शहाजहान्(ज्याची प्रतिमा क्रुर नव्हती) असे करेल हे सम्भवत नाही.ताज्महालचे आर्किटेक्ट उस्ताद अहमद लहोरि होत.

विशाल कुलकर्णी's picture

20 Mar 2009 - 11:48 am | विशाल कुलकर्णी

चोखोबांना अनुमोदन. अमेरिकन वास्तुशास्त्रज्ञ प्रो. मार्विन मिलर यांनी ताजच्या नदीकडील दरवाजांचे काही नमुने घेवुन त्यांची कर्बन टेस्ट केली होती, तेव्हा ते नमुने शाहजहानच्या काळापेक्षा ३०० वर्षे जुने असल्याचे सिद्ध झाले.
श्री. पु. ना.ओक यांच्या पुस्तकाप्रमाणे मुळ इमारत जयपुरचे महाराजा राजा जयसिंग यांनी बांधलेली होती. शाहजहानच्या बादशाहनामा मध्ये त्याने राणा जयसिंगाकडुन आग्र्यामधील एक नितांतसुंदर इमारत घेतल्याची कबुली दिलेली आहे. (आग्र्यामध्ये ताजएवढं सुंदर काहीच नाही!) ताजमहालच्या वास्तुवर देखील बर्‍याच खुणा हिंदु धर्माची जाणीव करुन देणार्‍या आहेत.
बाकी खरे खोटे देवच जाणे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सूहास's picture

20 Mar 2009 - 4:51 pm | सूहास (not verified)

<<<कर्बन टेस्ट >>>
हे काय असत ब्वा !!

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 12:26 pm | चिरोटा

प्रो. मार्विन मिलर यांनी ताजच्या नदीकडील दरवाजांचे काही नमुने घेवुन त्यांची कर्बन टेस्ट केली होती, तेव्हा ते नमुने शाहजहानच्या काळापेक्षा ३०० वर्षे जुने असल्याचे सिद्ध झाले

ला़कुड जुने असु शकते.त्यावरुन ताजहाल कधी बान्धला याचा पुर्ण निश्कर्ष काढता येणार नाही. हे प्राध्यापक मार्विन मिल्ल्स(मिलर नाही) आहेत.
http://marvinmills.com/review1.htm

सँडी's picture

20 Mar 2009 - 4:05 pm | सँडी

असे ऐकीवात आहे! जास्त माहीत नाही!

अवांतरः
या कोणत्याही इमारतीमध्ये कमळाची आक्रुती दिसत नाही, मात्र ताज मध्ये ती दिसते.
नक्कीच भाजप वाल्यांचा 'हात' असणार यात!

"नक्कीच भाजप वाल्यांचा 'हात' असणार यात"

म्हणजे "प॑जा"तर नव्हता ....

विलेक्शन आल म्हणायच की

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

कवटी's picture

20 Mar 2009 - 5:32 pm | कवटी

इथे आणि इथे बघा. आणि इथेही.
यावर पुर्वी मिपावर चर्चा झाल्याचे अंधूकसे स्मरते.

कवटी

नितिन थत्ते's picture

20 Mar 2009 - 5:28 pm | नितिन थत्ते

चर्चेचा प्रस्ताव आणि प्रतिसाद दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे.
खराटा
(रंग माझा वेगळा)

राहुल सरकार's picture

20 Mar 2009 - 5:49 pm | राहुल सरकार

ही १ लिक आहे.
http://www.stephen-knapp.com/was_the_taj_mahal_a_vedic_temple.htm


या मधे सगळे लिहले आहे त्याने खुप रिसर्च केला आहे.
तसे माझे वय लहान आहे पण मी वाचलय कि इन्दिरा गाधीच्या कालखडात तिथे रिसर्च बद केले होते ते का हे अजुन समजले नाहि समजले कि लिहिनच.

पण एक गोष्ट नक्की की इतिहास कधीच बरोबर लिहला गेला नाही अणि तो इथून पुढे पण लिहला जाणार नाही

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 6:04 pm | चिरोटा

पण एक गोष्ट नक्की की इतिहास कधीच बरोबर लिहला गेला नाही अणि तो इथून पुढे पण लिहला जाणार नाही

सगळ्या भारतिय इतिहास्काराना(तेही बहुतान्शी हिन्दुच) मुघलान्बद्दल आत्मियता आणि प्राचिन हिन्दु सन्स्क्रुतिबद्दल नफरत होती असे म्हणायचे आहे का आपल्याला?आणि जर ते रिसर्च बन्द केले तर इतक्या वर्षात कोणिच चालु का केले नाही? शाही इमामाला घाबरुन?

चर्चेचा प्रस्ताव आणि प्रतिसाद दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे.

सहमत.(प्रतिसाद आधिच दिला आहे्. शहाजहान सगळ्या कारगिरान्चे हात तोडुन स्वत:ची बदनामी करुन घेण्याची शक्यता कमी.त्या कारागिराना बक्षिसे देवुन स्वतःची पाठ थोपटुन घ्यायची शक्यता जास्त).

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:57 pm | क्रान्ति

खूप पूर्वी पु. ना ओक यांची या विषयावरची व्याख्यानमाला ऐकली होती. त्यांनी बरेच फोटोही दाखवले होते. ते पटण्यासारख होत.
क्रान्ति{मी शतजन्मी मीरा!}

राहुल सरकार's picture

23 Mar 2009 - 11:02 am | राहुल सरकार

भारतिय इतिहास्काराना(तेही बहुतान्शी हिन्दुच) मुघलान्बद्दल आत्मियता आणि प्राचिन हिन्दु सन्स्क्रुतिबद्दल नफरत होती असे काहि म्हणायचे नाहीये पण एक गोष्ट नक्की की ते ज्या काळात लिहले गेले त्या वेलेच्या राजाचा प्रभाव त्या वर राहिला आहे.
अणि राहिली गोष्ट रिसर्च चालू का केला नाही हाच तर एक प्रश्न आहे माज्या समोर आणि कांग्रेस राजवटीत त्याकडे कोणी लक्ष देयेल असे वाटत नाही.
आणि मोगल सम्राट हात तोदान्या सारखे काम करू शकत होते कारन तीच त्यांची दहशत होती

केळ्या's picture

23 Mar 2009 - 4:09 pm | केळ्या

क्रान्ति शी सहमत.