शेवगाच्या शेंगा घालून वांगी आणि कोलंबी भाजी वीथ सुरमय फ्राय

चित्रादेव's picture
चित्रादेव in पाककृती
19 Mar 2009 - 12:52 am

स्टेप १: कांदा + सुखी लाल मिरची+ चिंच टाका चांगले ढवळा पाच एक मिनीटे
step-1
स्टेप २: कोलंबी टाकून लाल तिखट +गरम मसाला + हळद टाका आता.
step-2
स्टेप ३:आले लसूण पेस्ट आणि काजू टाका
step-4
स्टेप ४:भाजलेली खसखस टाका
step-5
स्टेप ५:बटाटा टाकून परता
step 6
स्टेप ६:शेवटी वांगी आणि शेंगा टाकून परतले की ओले खोबरे +भाजलेल्या कांदा+कोथिंबीर पेस्ट टाकून परता.
step 7
स्टेप ७:अजीबात पाणी न टाकता एक ताटली अशी ठेवा की त्यात वरून पाणी ओतून गॅस मंद करून २० मिनीटे बघून नका. फक्त पाणी ताटलीतले कमी झाले की ओतत रहा ताटलीत पण झाकण बंद असू द्या.
step 8
सुरमय १: कोळणी कडून चांगली ताजी सुरमय घेवून या. आमच्याकडे चिंकी हसून देतो.
sur-1
सुरमय २: सुरमयला आले+लसूण्+कोथिंबीर पेस्ट चोपडा. मग तिखट्+गरम मसाला+ चिंच रस लावा आणि खरपूस रवा वगैरे न लावता नॉनस्टीक वर तळा.
sur 2
स्टेप ८: घ्या आता. पानं वाढली आहेत. जेवा नी वामकुक्षी करा. :)
vaangee kolambee
कृती:
एक सुचना: चित्रकृती कायच्या काय मोठी आहे.
वांगी+कोलंबी+शेंगा+बटाटा भाजी कृती साहीत्यः
१ वाटी सोलून साफ केलेली कोलंबी,
१ मोठा चमचा आले+लसूण्+कोथींबीर चटणी,
तिखट ,हलद्,मिठ चवीप्रमाणे,
१ चमचा गरम मसाला,
१ चमचा भाजलेली खसखस,
पाहीजे तितके काजू,
१ मोठा कांदा लांब चिरलेला,
१ गोळी चिंच,
बारीक चिरलेली कोथींबीर,
१ लाल सालीचा बटाटा सालीसकट कपलेला,
चार कवळ्या शेवगाच्या शेंगा साफ करून बाहेरची टणक साल खरडून मध्यम तुकडे केलेल्या,
फोटोत दाखवलेल्या स्टेप्स प्रमाणे साहीत्य टाकावे. कोलंबी ज्यास्त शिजवू नये,चाबट होते. तसेच वांगे बुळबुळीत करु नये. पाणी अजाबात टाकू नये. झाकण ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवावे. गॅस मंद करून भाकर्‍या नाहीतर चपाती करून घ्यायच्या :)

सुरमय फ्राय विदाउट रवा :
ताजी सुरमय,
१ चमचा आले + कोथिंबीर+ लसूण पेस्ट,
१ चमचा चिंच रस,
तिखट्,गरम मसाला+कशमीरी मिर्च पूड मिक्स
हे सर्व साफ केलेल्या सुरमयीला चोपडून मस्त खरपूस तळून काढा.

सुरमय कालवण गोवन पद्धतीने बनवा. त्याची रेसीपी हवी असेल कोणाला तर लिहिन. :)
इतके जड जेवण जेवून आळस आलाय काय लिवायचा. :)

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

19 Mar 2009 - 1:19 am | संदीप चित्रे

फोटूसाठी धन्यवाद ... पण ....
वांगी आणि कोलंबी/सुरमई एकाच ताटात ... :?
सुरमई आणि कोलंबीला लै वाईट वाटेल हो !!!
ह. घ्या. :)

संदीप चित्रे's picture

19 Mar 2009 - 6:56 pm | संदीप चित्रे

आज स्टेप बाय स्टेप फोटो पाहिल्यावर लक्षात आलं.
आमची आजी सोडे, वांगी आणि बटाटा अशी भाजी करायची :)

विसोबा खेचर's picture

19 Mar 2009 - 1:36 am | विसोबा खेचर

चित्रा देव मॅडम,

पेठकरांनी केलेल्या करंज्या, आता तुम्ही टाकलेलं वरील सुरमईचं चित्र, ही अशीच जर का त्रासदायक चित्र रोज पाहायला लागणार असतील तर या पुढे मी मिपावर येणार नाही!

चालू द्या! :)

तात्या.

शेवगाच्या शेंगा घालून वांगी आणि कोलंबी भाजी आई अशी सह्हि बनवते. या भाजीत बटाटापण घालते. छान दाट रस्साभाजी होते. आहाहा!! तांदळाच्या पातळ भाकरीबरोबर अशी मस्त लागते. काय छान आठवण करुन दिलीस ग!

गणपा's picture

19 Mar 2009 - 3:01 pm | गणपा

खरच आईच्या हातच्या कालवणाची आठवण झाली.
आई कधी कधी कोलंबी ऐवजी सोडे पण घालायची. अशी जबरा टेस्टे की त्या समोर जगातली सगळ्या रेशिप्या झक मारतील.
कघी एकदा घरी परतेन अस झालय.
चित्राताई, फोटु नी रेशिपी लै झ्याक. =P~

-गण्या

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2009 - 8:36 am | प्रभाकर पेठकर

नांवावरून आणि छायाचित्र पाहून 'कृती' ची उत्सुकता वाढली आहे. (त्या शिवाय आम्ही खायची 'कृती' कशी करणार?)
छायाचित्रांचा आकार अजून जरा मोठा असेल तर बरे. (कोलंबी, सुरमई जरा जवळून 'पाहता' येईल.)
शेजारी कटोरीत 'सुरमईचे कालवण' आहे वाटतं.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

अवलिया's picture

19 Mar 2009 - 7:37 pm | अवलिया

पाककृती मस्त :)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

19 Mar 2009 - 9:13 pm | नितिन थत्ते

वांगे, शेवग्याच्या शेंगा आणि कोळंबी तिन्ही आवडत नाहीत. :(
खराटा
(रंग माझा वेगळा)

कपिल काळे's picture

19 Mar 2009 - 9:18 pm | कपिल काळे

कशातही काहीही घातलंय.

जाउ देत आम्हाला गुळाची चव नाही माहित.

चित्रादेव's picture

19 Mar 2009 - 11:27 pm | चित्रादेव

कपिल , असु द्या हो... नाही ना आवडत, हरकत नाही. तुम्हीच म्हटले ना.. *** *गुळाची चव तुम्हाला कळत नाही. :)

सालोमालो's picture

20 Mar 2009 - 2:11 pm | सालोमालो

वामकुक्षी कसली! चांगला संध्याकाळपत्तर आडवा हो! ;)

सालो

सहज's picture

20 Mar 2009 - 2:19 pm | सहज

पाकृ अद्ययावत झाली.

चित्रातै, कोळंबी जरा वेगळी परतुन शेवटी टाकीन कारण तुम्ही दिलेल्या पद्धतीने करायला गेलो तर बहुतेक कोळंबी जादा शिजुन जरा रबरी लागेल असे वाटते.

चित्रमय पाकॄची मजा काही वेगळीच ! धन्यवाद.