फ्लॉवर-मटार करंज्या.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
18 Mar 2009 - 3:07 pm

साहित्यः

१/४ किलो फ्लॉवर बारीक चिरुन.
१/४ किलो मटार
मोहरी
तेल
तिखट
हळद
मीठ
कोथिंबिर भरपूर
ओला नारळ अर्धी वाटी
कणीक ३ वाट्या
बेसन १ वाटी
जीरं १ टी स्पून

कृती:
कढईत २ टेबलस्पून तेल तापवून फोडणीला मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे. मग त्यावर भरपूर (आवडी नुसार) कोथिंबीर घालून, नीट मिसळून, भाजी खाली उतरवावी.

कणीक व बेसनात हळद, तिखट, मीठ, जीरे चवीनुसार घालून पाणी घालून पीठ भिजवावे. (पुर्‍यांसाठी भिजवतो तसे)

तळणीसाठी तेल तापत ठेवावे.

कणीक-बेसनाची एक पुरी लाटावी. (फार पातळ नको). त्यात २ टेबलस्पून फ्लॉवर मटारची भाजी भरून पुरीच्या दोन्ही कडा जुळवून घ्याव्यात. त्याची कडा नीट बोटाने चेपून सीलबंद करून कातण्याने कातावी.
आता ही करंजी मध्यम आंचेवर तळून घ्यावी.

शुभेच्छा....!

ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही. थोडा बदल हवा असेल तर सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घालता येईल.

माहिती स्रोत : ति. आई.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 Mar 2009 - 3:13 pm | श्रावण मोडक

ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही.
'इतर काही' असताना या करंज्या चालतात ना? मग झाले तर...
तिकडे चक्कर मारावीच लागेल आता. यज्ञकर्ममध्ये आहे ना?

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:17 pm | प्रभाकर पेठकर

यज्ञकर्मात सध्या तरी नाही. पुढे मागे मेन्यूत टाकू.

श्रावण मोडक's picture

18 Mar 2009 - 11:25 pm | श्रावण मोडक

जरूर. वाट पहात आहे.

सहज's picture

18 Mar 2009 - 3:14 pm | सहज

पाहताच क्षणी पहीली आठवण आईचीच आली.

तळलेला पदार्थ शक्यतो नको वाटतो पण आता ह्या करंज्या नक्की करणार. :-)

छायाचित्र अतिशय प्रभावी.

मि माझी's picture

18 Mar 2009 - 3:15 pm | मि माझी

मला फ्लॉवर नाही आवडत.. त्याऍवजी दुसर काही टाकल तर चालेल का?

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर

ब्रोकोली वापरून पाहा. (आणि मलाही सांगा करंज्या कशा लागतात ते)

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विंजिनेर's picture

18 Mar 2009 - 3:27 pm | विंजिनेर

चितळ्यांकडे ह्या उत्तम मिळतात(दुपारी १२ वाजेपर्यंतच!). फक्त फ्लॉवर नसतो त्यात (महाग असल्यामुळे असेल कदाचित ;))

---------------
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

स्मिता श्रीपाद's picture

18 Mar 2009 - 3:38 pm | स्मिता श्रीपाद

पेठकर काका,

बरेच दिवसानी पाकॄ दिलित आज ...वाट पाहात होते तुमच्या पाकॄ ची... :-)
मस्तच दिसत आहेत करंज्या....
येत्या विकांताला नक्की करुन पाहणार...

अवांतर प्रश्ण:...पाणी घालुन फ्लॉवर शिजवला की त्याला एक विशिष्ठ वास येतो तो मला आवडत नाही...
त्यापेक्शा बारीक चिरलेला फ्लॉवर लोण्यावर खरपुस परतुन घेतला आणि वाफेवर शिजवुन वापरला तर?....

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:20 pm | प्रभाकर पेठकर

हरकत नाही. चालेल नं! फ्लॉवर शिजण्याशी मतलब.

मि माझी's picture

18 Mar 2009 - 3:49 pm | मि माझी

मी पण नुसत्या मटारच्याच खाल्ल्या आहेत.. छान लागतात... या सुध्दा चविष्ट लागत असतील अस दिसतय फोटो वरुन.. मी करुन पाहीन नक्कि..

सुनील's picture

18 Mar 2009 - 3:53 pm | सुनील

खरंच आईच्या हातच्या करंज्याची आठवण झाली. बहुधा ती फ्लॉवरऐवजी बटाटा घालीत असे, मटर सोबत.

मस्त पाकृ आणि फोटो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

18 Mar 2009 - 4:18 pm | गणपा

काका ए-१ पाककृती.
फोटु जबहर्‍या... =P~
हा पदार्थ "टु डु" लिस्ट मध्ये टाकला आहे.

पक्या's picture

18 Mar 2009 - 4:24 pm | पक्या

वा , फोटू एकदम झकास.
माझी आई फ्लॉवर न घालता खोवलेला ओला नारळ वापरते. अशा पण छान लागतात (मटार + ओला नारळ+ आले-लसूण-मिरची चे वाटण ).
फ्लॉवर नसल्याने ओल्या नारळाचे प्रमाण जास्त असते.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2009 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या राजमाता पण अशाच बनवतात. आता ह्या नविन प्रकाराने बनवायचा हुकुम सोडला पाहिजे ;)
फोटु झकासच, वास ही मस्त येत आहे.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

18 Mar 2009 - 5:21 pm | लिखाळ

वा.. फोटो-पाकृ मस्त !
ओला नारळ+मटार अश्या करंजा खाल्या आहेत. आता प्लॉवर-मटार करुन पाहिल्या पाहिजेत :)
स्मीता श्रीपाद सुचवतात तसे प्लॉवर बारीक चिरुन लोण्यावर परतून सुद्धा मस्त लागेल ...
-- लिखाळ.

शाल्मली's picture

18 Mar 2009 - 5:44 pm | शाल्मली

वा.. फोटो-पाकृ मस्त !

असेच म्हणते.

आता प्लॉवर-मटार करुन पाहिल्या पाहिजेत

मला आयत्या मिळण्याची आशा असल्याने आता करून पाहीन असं काही म्हणत नाही. :)
खाऊन मात्र नक्की पाहीन.

--शाल्मली.

सहज's picture

18 Mar 2009 - 6:12 pm | सहज

>आयत्या मिळण्याची आशा असल्याने>..

हाहाहा! गुड वन

पण "समिक्षकांची " भाषा जराशी क्रिप्टीक असते बर का!

>करुन पाहिल्या पाहिजेत. असे जेव्हा तातडीने लिहतात याचा अर्थ चला मनावर घ्या संध्याकाळी घरी येईस्तोवर खायला तयार ठेवा असाही असु शकतो. :-)

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:29 pm | यन्ना _रास्कला

समजा भाजीवर झाकण ठेवुन त्यावर पाणी घातले तर? भाजी पाणचट
लागणार नाही. बघा पटतयं का?

शितल's picture

18 Mar 2009 - 6:48 pm | शितल

सहमत.
मी ही प्लॉवरच्या भाजीत पाणी न घालता ती नुसत्या वाफेवर शिजवते. :)

पेठकर काका,
मस्त पाककृती नक्की करून बघेन आणि तुम्हाला कळवेन. :)

स्वाती दिनेश's picture

18 Mar 2009 - 5:43 pm | स्वाती दिनेश

फोटो झक्कास दिसतो आहे, खूप दिवसांनी तुमची रेशिपी आली,:)
मी मटारच्या करंज्या करते पण फ्लॉवर+ मटार केलेल्या नाहीत आता नक्कीच करुन पाहिन आणि तुम्हाला कळवेन.
तसेच फक्त बेसन कधी वापरले नाही, कणिक+ बेसन एकत्र करते नेहमी, आता असे करुन पाहिन.
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:09 pm | प्रभाकर पेठकर

तसेच फक्त बेसन कधी वापरले नाही, कणिक+ बेसन एकत्र करते नेहमी

जरा चुक झाली आहे. ३ वाट्या कणीक आणि १ वाटी बेसन घ्यावे.
पाकृ टंकताना घाई झाली आणि अक्षम्य घोळ झाला.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसोबा खेचर's picture

18 Mar 2009 - 5:56 pm | विसोबा खेचर

निषेध! निषेध! निषेध!

प्रभाकरचा निषेध!

यापुढे प्रभाकर पेठकर हा इसम माझा सुहृद नाही, मित्र नाही, सखा नाही की कुणी नाही!

जे सुहृद असतात ते अशी नुसतीच जीवघेणी चित्र टाकून हाल करत नाहीत, जळवत नाहीत!

या प्रतिसादाद्वारे मी प्रभाकर पेठकर या माणसाशी माझे असलेले सर्व आंतरजालीय संबंध तोडत आहे असे जाहीर करतो! :)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:23 pm | प्रभाकर पेठकर

नको.. नको.. तात्या, ह्या तान्ह्या बाळाला असे उघड्यावर टाकून जाऊ नका.

रेवती's picture

18 Mar 2009 - 6:55 pm | रेवती

मस्त! मस्त!! फारच मस्त!!!
करून बघीनच करंज्या. आवडल्याप्रमाणे कळवीन.
सगळे म्हणतात तसेच मीही आधी मटारच्या करंज्या खाल्ल्या होत्या.
हा प्रकार नविन आहे.
धन्यवाद!

रेवती

प्राजु's picture

18 Mar 2009 - 7:23 pm | प्राजु

फोटो इतका जीवघेणा आहे.. ! जाऊदे..
काका, एक शंका आहे. बेसनाची कणकेसारखी पुरी लाटता येते का? म्हणजे कणकेला जसा चिकटपणा असतो तस बेसनाला नसतो म्हणून विचारलं.
आणि हे बेसन लाटताना पोळपाटाला तेलाचा हात लावूनच लाटायचं की पीठावर?
आवांतर : हा पदार्थ यदज्ञकर्म मध्ये आहे का मेनूच्या यादीत??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:14 pm | प्रभाकर पेठकर

जरा चुक झाली आहे. ३ वाट्या कणीक आणि १ वाटी बेसन घ्यावे.
पाकृ टंकताना घाई झाली आणि अक्षम्य घोळ झाला.

सुरेख तळलेल्या, खुसखुशीत करंज्यांचे ते चक्र डोळ्यांनी बघितले मात्र तोंडात आलेला महापूर कसाबसा आवरला!!
मस्तच! खुसखुशीत पाकृ!!

(खुद के साथ बातां : रंग्या, फारच त्रास व्हायला लागला तर संपादकीय अधिकारात तो जीवघेणा फोटू काढून टाकावा का? :W :? )

चतुरंग

क्रान्ति's picture

18 Mar 2009 - 10:03 pm | क्रान्ति

पाकृ आणि फोटो दोन्हीही खमंग!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चकली's picture

18 Mar 2009 - 10:50 pm | चकली

करंज्या काय मस्त दिस्ताहेत :) क्लास एकदम !

चकली
http://chakali.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2009 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करंजी आवडली !!!

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:34 pm | प्रभाकर पेठकर

श्रावण मोडक, सहज, मि माझी, विंजिनेर, स्मिता श्रीपाद, सुनिल, गणप्या, पक्या, परिकथेतील राजकुमार, लिखाळ, शाल्मली, यन्ना रास्कला, शितल, स्वाती दिनेश, विसोबा खेचर, रेवती, प्राजु, चतुरंग, क्रांती, चकली, डॉ. प्रा. दिलीप बिरुटे...

पाकृत ३ वाट्या बेसन दिले आहे ती माझी अक्षम्य चुक झाली आहे. तिथे ३ वाट्या कणीक आणि १ वाटी बेसन असे वाचावे.
प्रतिसादांबद्दल आपणा सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.

फ्लॉवर ऐवजी बटाटा किंवा नारळ, भरपूर कोथिंबीर आणि मटार असे ही सारण बनवितात असे अनेक प्रतिसादांवरून जाणवले. तशा करंज्याही मस्त लागतील.

पुन:श्च धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

18 Mar 2009 - 11:42 pm | श्रावण मोडक

लेखनातच होऊ शकते याची खात्री आहे. आणि एरवीही पेठकरकाकांची पाककृती ही वाचायची नसते, खायचीच असते. त्यातल्या चुका स्वातीताई आणि तुमच्यासारख्या सुगरणांनाच कळू शकतात.
आम्ही खाण्याची मतलब ठेवू. :)

भडकमकर मास्तर's picture

18 Mar 2009 - 11:44 pm | भडकमकर मास्तर

कस्ली भारी पाकृ आहे..
फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले.. आणि उद्या सक्काळीच करावी काय या विचारात पडलो....

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2009 - 11:51 pm | पिवळा डांबिस

पेठकरकाका,
करंज्यांचा फोटो झकास!!!
रेसेपीही झकास (असावी. आम्हाला काय कळतंय त्यातलं!!:))
आता थोडा बेसन आणि कणकेच्या प्रमाणाचा घोळ झाला पण मिपाकर घेतील समजून!
अहो,
कणकेने प्रश्न सुटत नाहीत, पण बेसनाने तरी कुठे सुटतात?
(ह. घ्या!:))

लिखाळ's picture

19 Mar 2009 - 2:35 am | लिखाळ

>>कणकेने प्रश्न सुटत नाहीत, पण बेसनाने तरी कुठे सुटतात?<<
जोरदार :)
-- लिखाळ.

बेसनलाडू's picture

19 Mar 2009 - 5:45 am | बेसनलाडू

कणकेने प्रश्न सुटत नाहीत, पण बेसनाने तरी कुठे सुटतात?
पिडांकाका, असे म्हणून तुम्ही माझे मिसळपाववरील सदस्यत्त्वाचे आयुष्यच प्रश्नांकित करून टाकत आहात :(
(प्रश्नांकित)बेसनलाडू
पेठकर काका,
करंज्या मस्तच! खायचा योग कधी येतो पाहू.
(खादाड)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2009 - 1:48 pm | प्रभाकर पेठकर

कणकेने प्रश्न सुटत नाहीत, पण बेसनाने तरी कुठे सुटतात?

काही प्रश्न कणीक-बेसन एकत्र करून सोडवावे लागतात.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 11:53 pm | भाग्यश्री

मलाही आवडली जाम!
करून पाहीन!

समिधा's picture

18 Mar 2009 - 11:58 pm | समिधा

मी पण नुसत्या मटारच्या खाल्या आहेत्.पण अशा नक्की करुन बघेन आणि कळवेन.
बहुतेक ह्या शनिवारीच बनतिल किंवा त्या आधी पण :?

आता करणे भाग आहे. नुसत्या बटाटा-मटारऐवजी फ्लावरमुळे पौष्टिक होतील.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2009 - 4:57 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद भाग्यश्री, समिधा आणि लवंगी. जरूर करून पाहा आणि कळवा.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

रेवती's picture

28 Mar 2009 - 6:28 am | रेवती

पेठकरकाका,
आजच करंज्या केल्या होत्या (अजूनही ३,४ आहेत).
अगदी चविष्ट होतात. एका छान पाकृबद्दल धन्यवाद!

रेवती

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2009 - 11:19 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद रेवती,
एव्हाना त्या ३-४ ही संपल्या असतील.
पुढील पाककृती लवकरच.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.