माझा मि. पा. वरिल पहिला प्रयत्न
कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः १८-७० (२८ मि.मि. ला सेट)
कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः १८-७० (७० मि.मि. ला सेट)
कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः ७५-३०० (७५ मि.मि. ला सेट)
कॅमेरा: कॅनन एस३ आय एस , लेन्सः १२मि.मि. ला सेट (७७मि.मि. - ३५ मि.मि. तुलनात्मक)
कॅमेरा: कॅनन एस३ आय एस , लेन्सः ४२.५ मि.मि. ला सेट (२८५ मि.मि. - ३५ मि.मि. तुलनात्मक)
कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः ७५-३०० (७५ मि.मि. ला सेट)
कॅमेरा: कॅनन एस३ आय एस , लेन्सः ६ मि.मि. ला सेट (३८ मि.मि. - ३५ मि.मि. तुलनात्मक)
- शारंगरव
प्रतिक्रिया
16 Mar 2009 - 2:22 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर!!! क्या बात है!!!
पहिले छायाचित्र खूपच छान वाटले. सगळ्यात जास्त तेच आवडले. दुसर्या छायाचित्रात पाण्यात पडलेल्या दिव्यांच्या दोन छाया जर का बरोबर मध्यभागी आल्या असत्या तर मजा आली असती. बाकीची छायाचित्रं जरा 'गजबजलेली' वाटली. पहिल्या छायाचित्रात नेमका याच्याउलट मोकळेपणा आणि त्या पार्श्वभूमीवरचा सोन्याच्या लगडींसारखा प्रकाश... मस्त....
बिपिन कार्यकर्ते
16 Mar 2009 - 8:45 pm | प्राजु
बिपिनदाशी १००% सहमत आहे.
सगळीच चित्रे सुंदर आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 5:14 am | एक
मुळात सिऍट्ल मला भयानक प्रिय. आमचं दुसरं माहेर आहे ते. (पुणं पहिलं) . जबरदस्त फोटू..
तिथेच कुठेतरी केनी जी सॅक्सोफोन वाजवत असेल असं वाटतं.
चौथा आणि शेवटचा स्पेस निडल वरून काढला का?
16 Mar 2009 - 7:29 am | सहज
पहीली दोन खूप आवडली.
16 Mar 2009 - 7:30 am | शारंगरव
चौथा आणि शेवटचा स्पेस निडल वरून काढला. आणि बाकीचे अलकी बिच वरुन काढले आहेत.
16 Mar 2009 - 7:32 am | मुक्ता २०
अप्रतिम..! :)
16 Mar 2009 - 7:35 am | अनिल हटेला
२ रा ३ रा ४था आणी सहावा फोटो जास्त आवडला !!
येउ द्यात अजुनही !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Mar 2009 - 7:51 am | सुक्या
क्या बात है शारंगरव. . एकदम झकास. पहीला फोटो तर एकदम जबरा.
काही स्पेशल लेन्स वगेरे वापरलाय का? वाईड एंगल लेन्स वापरुनही तसा फोटो येत नाही. थोडी माहीती दिली तर बरे होईल.
अजुन येउदेत अशी फोटोग्राफि.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
16 Mar 2009 - 8:52 am | विसोबा खेचर
लै भारी...!
16 Mar 2009 - 9:18 am | भडकमकर मास्तर
.. हे फोटो कसे काढले, कुठे काढले याची माहिती सुद्धा द्यावी... अजून मजा ये ईल
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Mar 2009 - 11:11 am | शारंगरव
फोटो विषयी अधिक माहिती फोटो खाली दिली आहे.
१, २, ३, आणि ६ हे फोटो अल्कि बिच वरुन काढले आहेत.
४,५, आणि ७ हे फोटो स्पेस निडल वरुन काढले आहेत.
हि दोन्हि ठिकाणे अमेरिकेतिल सिऍटल मधे आहेत.
- शारंगरव
16 Mar 2009 - 9:41 am | प्रभाकर पेठकर
३ आणि ४ विशेष आवडले. त्यातील तपशील टिपणे अधिक अवघड आहे असे वाटते. अभिनंदन.
खालील माहितीही पुरविली तर रसस्वादा बरोबर ज्ञानात भरही पडेलः
१)कॅमेरा
२)लेन्स
३) ISO (फिल्म स्पीड)
४) शटर स्पीड
५) ऍपरचर
धन्यवाद.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Mar 2009 - 11:13 am | शारंगरव
सर्व फोटोसाठि ISO हि १०० किंवा २०० होती व शटर स्पिड ५ से. ते १८ से. पर्यन्त होता.
17 Mar 2009 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
ऍपरचर ऑटो सेट की मॅन्युअली सेट केले होते. (किती होते?)
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
19 Mar 2009 - 12:51 am | शारंगरव
ऍपरचर मॅन्युअलला सेट होते, ते खालिल प्रमणे (क्रमाने)
4.5
8
10
3.5
3.2
5.6
2.7
19 Mar 2009 - 8:26 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद शारंगरव.
16 Mar 2009 - 11:20 am | शारंगरव
आजच अल्कि बिच ला गेलो होतो आणि तेथिल दुपारी काढलेला फोटो (वरिल पहिला फोटो आणि हा फोटो एकाच ठिकाणाहुन काढ्ले आहेत)
16 Mar 2009 - 11:33 am | एक
सिऍटल ला एवढं निरभ्र आकाश म्हणजे फारच चांगल्या मुहुर्तावर अल्कि बीच ला गेलात!
किती मिनिटं टिकलं हो हे निरभ्र आकाश? ;)
16 Mar 2009 - 11:39 am | शारंगरव
अगदि बरोबर, सिऍटलचे हवामान म्हणजे नशिबाचा खेळच. (सरड्यच्या प्रमाणे रंग बदलणारं )
आज नशिब जोरावर होते (जवळ जवळ २० मिनिटे म्हणजे भरपूर आहे ना? ;) ).
16 Mar 2009 - 1:22 pm | अमोल केळकर
या फोटोत दिसणारे इंद्रधनुष्य मस्तच
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
16 Mar 2009 - 1:27 pm | शारंगरव
त्या इंद्रधनुष्याचा क्लोझपः
16 Mar 2009 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास फोटो हो शारंगरव! मला पहिला, दुसरा आणि (गर्दीचा) चौथा फोटो आवडले. प्रतिसादातला फोटोही सुंदर आहे, निळा रंग खूपच मस्त.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
16 Mar 2009 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार
छान छान फोटु ! पण आपल्याला तर बॉ प्रतिसादा मधला फोटु सगळ्यात जास्ती आवडला.
परा माळी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
16 Mar 2009 - 8:18 pm | शितल
सहमत.
:)
16 Mar 2009 - 12:50 pm | मदनबाण
झकास... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
16 Mar 2009 - 1:18 pm | गणपा
फोटु क्रमांक ३,४, ६ आणि प्रतिसादातला आवडले. छान वॉलपेपर बनवता येतील यांचे.
16 Mar 2009 - 2:27 pm | भडकमकर मास्तर
हा नवीन इंद्रधनुष्याचा फोटोसुद्धा आवडला
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Mar 2009 - 6:40 pm | अजय भागवत
छान फोटो आहेत. सियाटलच्या आठवणी जाग्या झाल्या.
ज्याच्या दर्शनाशिवाय सियाटलची वारी पुरी होत नाही तो- हा माउंट रेनियर-
16 Mar 2009 - 7:42 pm | संदीप चित्रे
सिऍटलचे असे फोटो पाहिले की पुन्हा एकदा 'स्लीपलेस इन सिऍटल' पहावासा वाटतो :)
16 Mar 2009 - 8:48 pm | प्राजु
सुरेख...
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 11:43 pm | समिधा
खुपच मस्त आले आहेत फोटो. मला प्रतिक्रिये मधले जास्ती छान वाटले. आणि वरिल फोटोतील ३,४,५. आवडले.
=D>
17 Mar 2009 - 12:33 am | बेसनलाडू
हे आम्ही काढलेले सिऍटल् चे काही फोटो -
१. अल्की बीच वरून दिसणारे सिऍटल् -
२. अल्की बीच वरील संध्याकाळ -
३. सिऍटल् ची प्रसिद्ध स्पेस् नीडल् -
४. सर्वात वर दिसणार्या गोलाकार सज्ज्यात उभे राहून अख्ख्या सिऍटल् चे मनमोहक दर्शन घडते
(छायाचित्रकार)बेसनलाडू
17 Mar 2009 - 12:41 am | भाग्यश्री
दुसरा फोटो केवळ अशक्य आलाय!
आणि ही स्पेस निडल होय! मला तेच कळेना सिऍटल मधे स्ट्रॅटोस्फिअर कुठून आले?! :)
17 Mar 2009 - 4:33 am | सुक्या
याच स्पेस नीडल वर ३१ डिसेंबर ला अशी मनमोहक आतिशबाजी होते.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
19 Mar 2009 - 1:33 am | शारंगरव
पहिल्या फोटोतिल रंग अतिशय अप्रतिम.
19 Mar 2009 - 1:37 am | बेसनलाडू
तो रंग मावळत्या दिनकराच्या कृपेचा परिणाम आहे. इमारतींवर पसरलेला तो अबोली-पिवळा प्रकाश मागच्या निळ्याकरड्या आकाश व इमारतींच्या पार्श्वभूमीवर विशेष दिसत होता; म्हणून क्यामेर्यात टिपावासा वाटला. वास्तविक तुमचे रात्रीचे फोटो पाहून मीही माझ्या अल्बममध्ये 'रात्रीच्या सिऍटल्' चा फोटो आहे का पाहिले; पण नाहीयेत :(
(उगवता)बेसनलाडू
17 Mar 2009 - 1:43 am | धनंजय
माझीसुद्धा शहराच्या इमारतींची चित्रे अशीच शाई पसरल्यासारखी येतात. :-(
मासिकांतल्या छायाचित्रकारांची मात्र खिडकी अन् खिडकी रेखीव प्रकाशकेंद्रित (फोकस्ड) असते.
याबद्दल कोणी मला मार्गदर्शन केले तर हवे आहे.
17 Mar 2009 - 1:45 am | नंदन
लेखातली आणि प्रतिसादातली (शारंगरव, बेसनलाडू दोघांची) छायाचित्रे आवडली. सुरेख आहेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Mar 2009 - 4:42 pm | अजय भागवत
तुम्हाला जर आता सियाटल कसे दिसत आहे हे पहायचे असेल तर ह्या लाईव्ह वेब क्यामेरा वरुन पहा. हे क्यामेरे त्यांनी व्हेदर आणि ट्र्याफिक पहाण्यासाठी वापरतात.
19 Mar 2009 - 1:02 am | शारंगरव
आपणा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार. :)
प्रतिक्रियांमुळे हुरुप आला. पुढिल फोटो लवकरच टाकेन.
- शारंगरव