बालजगत

अनिल सोनुने's picture
अनिल सोनुने in काथ्याकूट
3 Mar 2009 - 7:28 pm
गाभा: 

नमस्कार मी अनिल
प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी संकेतस्थळ सुरु केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे नविन स्वरुपात बालजगत सुरु केले आहे.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 7:40 pm | लिखाळ

अनिलराव,
आपण तयार केलेले संकेतस्थळ छान आहे. लाहन मुलांना उपयोगी असतील अश्या गोष्टी त्यावर आहेत.

आपले अभिनंदन आणि ही साइट उत्तरोत्तर अधिक चांगली व्हावी यासाठी अनेक शुभेच्छा !

-- लिखाळ.

स्वाती२'s picture

3 Mar 2009 - 7:53 pm | स्वाती२

अनिलसर, संकेतस्थळ छान आहे. माझ्या पुतणीसाठी उपयोग होईल. हार्दीक शुभेच्छा!

योगी९००'s picture

3 Mar 2009 - 7:55 pm | योगी९००

अनिलसर, संकेतस्थळ छान आहे. माझ्या मुलीसाठी उपयोग होईल.

तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला हार्दीक शुभेच्छा!

खादाडमाऊ

रामदास's picture

3 Mar 2009 - 7:55 pm | रामदास

सुंदर संकेतस्थळ आहे.
मी ह्यात काही भर घालू शकतो का ?
तसे करायचे झाल्यास कसे करावे?

अनिल सोनुने's picture

4 Mar 2009 - 9:44 pm | अनिल सोनुने

धन्यवाद रामदास आपल्या मदतीबददल. कृपया आपण मला माझ्या इ मेलवर संपर्क करु शकता आपली मदत मला मदतीची ठरेल.

सूहास's picture

3 Mar 2009 - 7:58 pm | सूहास (not verified)

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

अजय भागवत's picture

3 Mar 2009 - 8:04 pm | अजय भागवत

फारच प्रामाणिक प्रयत्न. अनिल सर, अक्षर सुधारण्यासाठी तुम्ही केलेल्या तंत्रद्नानाचा उपयोग खूपच कल्पक आहे.
आणखी काय काय करायची इच्छा आहे त्या वेब साईट्वर?

अनिल सोनुने's picture

4 Mar 2009 - 9:47 pm | अनिल सोनुने

अजयभाऊ पुढे सर्व विषय वार व इयत्तावार प्रेझेंटेशन तयार करण्याची इच्छा आहे.तसेच स्कॉलरशीप परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा मुलांना सराव म्हणून देता यावी. असो आपल्या प्रतिक्रीयेबददल धन्यवाद.

अजय भागवत's picture

3 Mar 2009 - 8:05 pm | अजय भागवत

जालन्यात राहून तुम्ही हे सगळे कसे साध्य केलेत?

सुनील's picture

3 Mar 2009 - 8:18 pm | सुनील

अनिलराव, संस्थळ पाहिले. चांगले वाटले. भूगोलातील जिल्हे जागेवर नेऊन ठेवायचा खेळ अप्रतिम!

एक-दोन गोष्टी थोड्या खटकल्या - मूळाक्षरात औ = औषधी. आता माझ्या मते औषधी हा हिंदी शब्द आहे. मराठीत औषधे असा शब्द आहे. आणि दुसरे म्हणजे, जिल्ह्यांची नावे रोमन लिपीत आहेत, ती देवनागरीत असती तर चांगले झाले असते.

पुढील उपक्रमास शुभेच्छा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल सोनुने's picture

3 Mar 2009 - 8:53 pm | अनिल सोनुने

धन्यवाद सुनील चुकीबददल दिलगिरी व्यक्त करतो. औषधे हा शब्द योग्य आहे. जिल्हयांची नावे आज्ञावलीतून येत असल्याने रोमन लिपीत येतात. मराठीत करण्याचा प्रयत्न नक्कीच करील.

प्राजु's picture

3 Mar 2009 - 8:44 pm | प्राजु

माझ्या मुलाला मी मराठी मुळाक्षरे शिकवते आहे आता.. त्यासाठी खूप उपयोगी पडेल.
धन्यवाद अनिल. अभिनंदन!! संकेतस्थळाची भरपूर प्रगती होवो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल सोनुने's picture

3 Mar 2009 - 8:55 pm | अनिल सोनुने

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबददल धन्यवाद आपल्या सूचना मी अवश्य लक्षात घेईन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2009 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिलसर,
चांगले संकेतस्थळ बनवले आहे. लेकरांबरोबर महाराष्ट्रातले जिल्ह्यांचा खेळ खेळलो. :)
गणितंही सोडवली....असो, आपले मनपुर्वक अभिनंदन !!!

बाय द वे, सावरगावच्या शाळेत नेट जोडून... मुलांना शिकवले जाते का ?
गावा-गावात नेट पोहचले म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, नाही का !

औरंगाबादला आला तर भेटता येईल आपल्याला..:)

अनिल सोनुने's picture

4 Mar 2009 - 9:50 pm | अनिल सोनुने

नमस्कार बिरुटे सर
नेटबददल म्हणाल तर माझ्या शाळेवर फक्त १ संगणक आहे. माझ्याकडील माहिती इतरांना उपयोगी पडावी म्हणून हा प्रयत्न.मी स्वत: माझा लॅपटॉप वर्गात वापरतो.

अनिल सोनुने's picture

4 Mar 2009 - 9:51 pm | अनिल सोनुने

सर मला आपला पत्ता व संपर्काचा नंबर मेल करा नक्की आपल्याला भेटील.

हरकाम्या's picture

4 Mar 2009 - 1:08 am | हरकाम्या

अनिलसर ,
लई झ्याक.

अनुजा's picture

4 Mar 2009 - 1:36 am | अनुजा

खूपच छान संकेतस्थळ ! अतिशय छान उपक्रम आहे.
माझ्या मुलांना मराठी शिकवायला चांगला उपयोग होईल.

अनामिक's picture

4 Mar 2009 - 1:51 am | अनामिक

मस्तं आहे संकेतस्थळ!

-अनामिक

भाग्यश्री's picture

4 Mar 2009 - 2:18 am | भाग्यश्री

मस्तच आहे !!
सगळ्यांना कळवते आहे.. :)
अजुन भरभराट होऊदे संस्थळाची!

http://bhagyashreee.blogspot.com/

समिधा's picture

4 Mar 2009 - 2:23 am | समिधा

मी माझ्या मुलीला मराठी अक्षरे शिकवत आहे तुमच्या संकेतस्थळाचा उपयोग होईल.
धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2009 - 2:28 am | मुक्तसुनीत

अनिलराव
तुमची साईट आवडलीच. जालन्यासारख्या ठिकाणी एका प्राथमिक शिक्षकाने इतकी चांगली साईट काढावी याचे मनःपूर्वक कौतुक वाटते.

तुमच्या परिसरातल्या मुलांकरता या अशा साईट्स चा कसा उपयोग करून घेता येईल ? परिसरतल्या , शाळेतल्या मुलांकरता इतर काही योजना तुमच्याकडे आहेत का ? असल्यास त्याबद्दल इथे लिहा असे सुचवितो.

अनिल सोनुने's picture

4 Mar 2009 - 10:17 pm | अनिल सोनुने

नमस्कार सर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १०८५ ठिकाणी मंडळाने कॉम्प्यूटर प्रयोगशाळा उघडल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कमीत कमी ५ संगणक तरी आहेत. आता सध्या तरी या संगणकांचा वापर संगणक साक्षरतेसाठीच होत आहे. कारण शिकविण्यासाठीचे सॉफटवेअर माझ्या माहितीप्रमाणे तरी फार कमी उपलब्ध आहे. सध्या हे संगणक एका खोलीत व मुलांचे तास घेतले जातात.त्याऐवजी जर प्रत्येक वर्गात संगणक ठेवले आणि त्याचा शिकविताना उपयोग केला गेला तर ते जास्त प्रभावशाली ठरेल असे मला वाटते.त्याचबरोबर संस्थेने आपली स्वत:ची वेबसाईट सुरु करावी ज्यावरुन सर्वर क्लायंट सॉफटवेअरचा वापर करुन शिक्षकांना शिकविण्यासाठी हे प्रोग्राम्स उपलब्ध व्हावेत त्यासाठी या सर्व प्रयोगशाळा इंटरनेटशी जोडण्यात याव्यात. अर्थात हे काम सोपे नसले तरी अवघड नक्कीच नाही. आता जोडणीसाठी बी.एस.एन.एल. च्या तरंग सेवेचा २५० अनलिमीटेड प्लॅन घेने शाळांना नक्कीच अवघड नाही.
अर्थात या सर्व गोष्टींसाठी शिक्षकांची मानसिकता सकारात्मक असणे आवश्यक आहे अन्यथा कितीही पैसे खर्च करुन वा योजना राबवूनही काही उपयोग होणार नाही.

सहज's picture

5 Mar 2009 - 11:22 am | सहज

अभिनंदन अनिलसर.

मुलांसाठी एक उत्तम संस्थळ केल्याबद्दल धन्यवाद.

उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा!

ढ's picture

5 Mar 2009 - 11:37 am |

अनिलराव तुम्ही करीत असलेल्या कामाला माझा सलाम.
फारच छान आहे तुम्ही बनविलेले संस्थळ.
माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

अनिल सोनुने's picture

5 Mar 2009 - 6:26 pm | अनिल सोनुने

सर्वात अगोदर सर्व मिपाकरांना धन्यवाद आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादाबददल. माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद आपण दिलात. आपले असेच सहकार्य राहो. आपणा सर्वांना शुभेच्छा

नीधप's picture

5 Mar 2009 - 6:49 pm | नीधप

अभिनंदन आणि शुभेच्छा!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

उर्मिला००'s picture

5 Mar 2009 - 6:53 pm | उर्मिला००

खूपच चांगला उपक्रम आहे.मी माझ्या बी.एड्.आणि डी.एड्.च्या विद्यार्थ्यांना जरुर दाखवेन.