पुडाच्या वड्या

मृण्मयी's picture
मृण्मयी in पाककृती
18 Feb 2009 - 8:25 pm

पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील)
सारण:
४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर
१ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक )
१ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
१ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
(आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते).
१ tsp तीखट

पारी:
दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ)
अर्धी वाटी कणिक किंवा मैदा
१ tsp मीठ
१ tsp तीखट
चिमुटभर हळद
चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा
तळायला तेल.

कृती:
सारणाचे सगळे घटक एकत्र करावे.
पारीचं पीठ जमेल तितकं घट्ट भिजवून तेलाचा हात लावून मळावं आणि ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावं.
पीठाचे ३ भाग करून प्रत्येकाची पोळी लाटावी. (फार पातळ किंवा फार जाडही नको).
त्यावर चिंचेचा कोळ पातळ थर देण्याइतपत पसरावा.
सारणाचे ३ भाग करून एक भाग ह्या पोळीवर दाब देऊन पसरावा. ( 1 इंच कड सोडून)
आता ह्या पोळीची घट्ट वळकटी करावी.
वळकटीच्या २ बाजू दाबून त्रिकोणी करून घ्याव्या.
पाण्याचा हात लावून सगळ्या बाजुंनी नीट बंद करावी जेणेकरून तळताना बाकर बाहेर येणार नाही.
काही लोक ह्या वळकटीला कापून तळतात. पण सारण फ़ार बाहेर येतं. तेव्हा लोट किंवा वळकट्या करतानाच लहान पोळ्या लाटून सगळीकडून बंद कराव्या. अश्या छोट्या वड्या पण गरम तेलात व्यवस्थीत तळता येतात.

कुणाला काही variation माहीती असेल तर नक्की सुचवा.

प्रतिक्रिया

किट्टु's picture

18 Feb 2009 - 9:17 pm | किट्टु

मृण्मयी,

रेसिपी छान आहे... पण 'फोटो' नाही दिसत आहे...

रेवती's picture

18 Feb 2009 - 9:45 pm | रेवती

अगदी वेगळा पदार्थ आहे हा!
छानच असणार चवीला!
फोटू दिसत नसल्याने वड्या कश्या दिसत असतील हा अंदाज येत नाहीये.
रेवती

मृण्मयी's picture

18 Feb 2009 - 9:48 pm | मृण्मयी

थँक्यु!

फोटोबद्दल सरपंचांना विचारलय. कारण मला दिस्तोय फोटो.

समजते आहे.
तुम्हाला मूळ फोटू www.flickr.com किंवा picasa अशा ठिकाणी अपलोड करुन मग त्याचा दुवा वरच्या सूर्यास्ताच्या खिडकीवर टिचकून द्यावा लागेल.

चतुरंग

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:51 pm | प्राजु

फुटू????????? :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

18 Feb 2009 - 9:51 pm | चकली

सुंदर पाककृती!
लवकर फोटोही येऊ द्यात !!

चकली
http://chakali.blogspot.com

समिधा's picture

18 Feb 2009 - 10:15 pm | समिधा

करुन बघायला पाहीजे. रेसिपी वरुन तरी खुप मस्त लागेल अस वाटतय. :?

विसोबा खेचर's picture

18 Feb 2009 - 11:16 pm | विसोबा खेचर

फोटू दिसेल अशी आता व्यवस्था केली आहे. लिंक चुकीची दिली गेली होती..

असो..

जबरा पाकृ..

फोटू पाहून तात्याने राम म्हटला!

मृण्मयीबेन, येऊ द्यात अजूनही अश्याच पाकृ..

तात्या.

प्राजु's picture

18 Feb 2009 - 11:47 pm | प्राजु

आधी फोटो दावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृण्मयी's picture

19 Feb 2009 - 12:59 am | मृण्मयी

तात्या, धन्यवाद!
राम म्हणण्याआधी फ्लोरिडाला आलात तर सावजी मटण-वडे, तंदुरी टर्की, वाट्टेल त्या कडधान्याची बिरडी, रुमाली वड्या वगैरे वगैरे खाऊ घालेन.
फुटवा गायब हुई गवा!

विसोबा खेचर's picture

19 Feb 2009 - 5:46 am | विसोबा खेचर

राम म्हणण्याआधी फ्लोरिडाला आलात तर सावजी मटण-वडे, तंदुरी टर्की, वाट्टेल त्या कडधान्याची बिरडी, रुमाली वड्या वगैरे वगैरे खाऊ घालेन.

पुन्हा एकदा खल्लास झालो..!

मी येणारच आहे एकदा अमेरीकेत. सिंडी क्रॉफर्ड मला अमेरीका दाखवणार आहे तेव्हा आम्ही फ्लोरिडाला तुमच्याकडेही अगदी अवश्य येऊ! :)

फुटवा गायब हुई गवा!

कहा गायब हुई गवा? हमका तो दिख रहा है!

बाय द वे, मिपावर जो फोटू द्यायचा आहे तो आधी फ्लिकरवर चढवा म्हणजे मिपावर दिसायला काहीच अडचण येत नाही. पिकासा किंवा ब्लॉग आदी ठिकाणचा फोटू दिसायला नेहमीच प्रॉब्लेम येतो..

तात्या.

लवंगी's picture

19 Feb 2009 - 6:21 am | लवंगी

मला नाही दिसत फुटवा..

मृण्मयी's picture

19 Feb 2009 - 6:44 am | मृण्मयी

ह्यापुढे फ्लिकरचं लक्षात ठेवते.

सिंडी क्रॉफर्ड येत असते इकडे फर्निचरच्या दुकानांत, स्वतः डिझाइन केलेली टेबलं, खुर्च्या, पलंग आणि सोफे बघायला. तीच्यासाठी हवंतर वाटीभर कालवण काढून ठेवीन बाजुला! :)

मीनल's picture

19 Feb 2009 - 5:31 am | मीनल

तू नगपूरची आहेस का?
तिथे अश्या वड्या करतात.
मस्त लागतात. मला सारणापेक्षा कव्हरच आवडतं.
ते काय ग ,तिखट मिठाची पुरीच नाही का?

मीनल.

अश्विनि३३७९'s picture

19 Feb 2009 - 11:05 am | अश्विनि३३७९

माझा अन्दाज ....
ह्या काहीशा बाकरवडी सारख्या लागत असणार...

स्मिता श्रीपाद's picture

19 Feb 2009 - 12:18 pm | स्मिता श्रीपाद

मस्त वड्या...पण तेवढा फोटु दाखवा बाई :-)

रामची आई's picture

19 Feb 2009 - 10:06 pm | रामची आई

माझ्या सासरी नागपुरला पण सासुबाई करतात अश्या वड्या पण त्याला ते सांबार वडी म्हणतात. पण मस्त पाककृती :)

पान्डू हवालदार's picture

20 Feb 2009 - 4:44 am | पान्डू हवालदार

खुप छान ... आई करते... नागपूर चा पदार्त का ...?

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 6:42 am | विसोबा खेचर

अरे आता तरी दिसतोय का फोटू? आत तो आम्ही फ्लिकरवर चढवला आहे.

आपला,
(फ्लिकरप्रेमी) तात्या.

लवंगी's picture

20 Feb 2009 - 6:47 am | लवंगी

आता दिसतोय तात्या .. धन्स..

लवंगी's picture

20 Feb 2009 - 6:47 am | लवंगी

आता दिसतोय तात्या .. धन्स..

प्राजु's picture

20 Feb 2009 - 6:57 am | प्राजु

मस्त. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मसक्कली's picture

22 Jun 2009 - 12:59 pm | मसक्कली

आरे मला तर दिसला तुझ्या रेसिपिचा फोटो.........ही ही ह्नी.... :D :))

चान दिसत आहे....

आग मला ना १ विचरयचय तुला...विचरु का..??? :/

मला तुझ नाव खुप आवडत पन मला आर्थ नहि महिति सन्गु शकशिल का तुझ्या नवचा अर्थ..... :?

अनंत छंदी's picture

22 Jun 2009 - 1:11 pm | अनंत छंदी

नुसते वड्यांचे फोटू काय दाखवता? प्रत्येक प्रतिसादकर्त्याला "पुडाच्या वड्यांच्या पुड्या" वानगीदाखल पाठवा की! =))

जागु's picture

22 Jun 2009 - 1:53 pm | जागु

छान आहे रेसिपी.