कोलंबीचे हुमण

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
16 Feb 2009 - 4:40 pm

साहित्यः
सोललेली कोलंबी : १ वाटी
खवलेला नारळ : १ वाटी
काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग
हळद : १/२ चमचा
चिंच : लिंबाएवढी
तिरफळं :१०-१२
मीठ : चवीनुसार
खोबरेल तेल : ३ टेबलस्पून

कृती:

कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे.
काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात.
खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा.
पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे. त्यातच कोलंबी घालून पातेले गॅसवर ठेवावे आणि उकळी आणावी. कोलंबी शिजली की वरून ३ टेबलस्पून खोबरेल तेल घालावे.पुन्हा एक दणदणीत उकळी काढून गॅस बंद करावा.
किंचित मुरल्यावर भातावर वाढावे.

शुभेच्छा..!

टीपः कोलंबी लवकर शिजतात. जास्त शिजल्यास रबरासारख्या होतात. कमी शिजल्यास पचत नाहीत. त्यामुळे फक्त व्यवस्थित शिजवाव्यात.

थोडा वेगळेपणा आणण्यासाठी, (वरील प्रमाणास), २ टेबलस्पून खोबरेल तेलावर ८-१० काळे मिरे परतावेत. त्यावर २ बारीक चिरलेले कांदे लालसर रंगावर परतून घ्यावेत. कांदे परतले की ओला नारळ लालसर परतून घ्यावा. ह्याचे वाटण बनवावे बाकी कृती वरील प्रमाणेच करावी. अशा पद्धतीनेही 'हुमण' बनवितात.

कोलबी प्रमाणेच सुरमई, बांगडे, तारली ह्याचे 'हुमण'ही असेच करतात.

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

16 Feb 2009 - 4:59 pm | स्मिता श्रीपाद

काय रंग आला आहे पाकॄ ला... :-)
झकासच :-)
धन्यु.

-स्मिता

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:23 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.
काश्मीरी मिरच्या जेवढ्या बारीक दळाव्यात तेवढा पदार्थाला रंग 'चढतो'.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विंजिनेर's picture

16 Feb 2009 - 5:01 pm | विंजिनेर

ह्यात खडा मसाला नाही का वापरत? आणि तेल खोबरेलच असणे गरजेचे आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:21 pm | प्रभाकर पेठकर

नाही. ह्यात कुठलाही गरम मसाला नाही. पण 'वेगळेपणासाठी' दिलेल्या पद्धतीत काळीमिरी आहे ती सुद्धा वाटणात वाटली जाते. आख्खी राहात नाही.
खोबरेल तेलाने चव चांगली येते.
खोबरेल तेल घेताना 'एडीबल' तेल शोधावे.
दुसरे तेल वापरल्यास चालेल पण चव बदलेल.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसोबा खेचर's picture

16 Feb 2009 - 5:06 pm | विसोबा खेचर

हारलो, मातीस मिळालो, गर्दीस मिळालो, वारलो, संपलो, निवर्तलो, खुदाला प्यारा झालो, देवाघरी गेलो...!

जबरा पाकृ, जबरा फोटू....!

अरे प्रभाकरा, का असा सूड घेतलास? का असा पाठीत खंजीर खुपसलास?? :)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:26 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यात येता आणि फोनही करत नाही नं? भोगा आपल्या कर्माची फळं.

पुढच्या वेळी यायच्या आधी कळवा. मस्त पार्टी करू.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्रकाश घाटपांडे's picture

16 Feb 2009 - 5:07 pm | प्रकाश घाटपांडे

कमी शिजल्यास पचत नाहीत.

तरीच त्रास झाला होता. पण लईच लाल दिस्तय हो हे !
प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

16 Feb 2009 - 5:28 pm | सुनील

पण लईच लाल दिस्तय हो हे

हा लालपणा काश्मिरी मिरच्यांचा. नुसत्याच लालभडक पण तिखटपणा फारसा नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर

इतर गरम मसाला नसल्यामुळे काश्मीरी मिरच्या जरा जास्त आहेत. पण 'त्रास' होत नाही.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2009 - 5:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो झकास, पोळी चुरुन खाईन रश्श्यात ! :)
आणि पीस नंतर...!!!

विसोबा खेचर's picture

16 Feb 2009 - 5:26 pm | विसोबा खेचर

पोळी चुरुन खाईन रश्श्यात !
आणि पीस नंतर...!!!

अत्यंत रसिकतेने दिलेला बोलका प्रतिसाद! जियो..! :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर, इंदौर.

विंजिनेर's picture

16 Feb 2009 - 5:27 pm | विंजिनेर

माझ्या मते हा प्रकार भाता-बरोबर ("गुरगुट्या" !) खाण्यालायक आहे. पोळी बरोबर चालेल पण "मझा" येणार नाही. :)

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:32 pm | प्रभाकर पेठकर

हा रस्सा भातावर आणि डोळे बंद करून तल्लीनतेने 'ओरपण्यासाठी' मस्तच आहे.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

लवंगी's picture

17 Feb 2009 - 8:28 pm | लवंगी

फार छान लागेल हा रस्सा.. काका तोंडाला पाणी सुटलय.. अहो अश्या पाकक्रुती दिल्या तर वजन कमी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिल की हो!!

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 10:19 pm | प्रभाकर पेठकर

रंगावर जाऊ नका. पावाबरोबर मजा येईल असे वाटत नाही. त्या साठी मिसळीचा झणझणीत कटच पाहिजे. हा रस्सा चविष्ट होतो पण तितका झणझणीत होत नाही. असो.

अश्या पाकक्रुती दिल्या तर वजन कमी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिल की हो!!
तेवढे बाकी खरे. माझ्या फसलेल्या अनेक संकल्पांपैकी 'ह्या वर्षी वजन कमी करायचेच' हा मुख्य संकल्प, ह्या अशा रेशिप्यांनीच, पार ढेपाळला आहे.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:31 pm | प्रभाकर पेठकर

रस्साच अर्धी लढाई जिंकतो. पाकृ करून पाहा आणि कळवा मला.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

दशानन's picture

16 Feb 2009 - 5:33 pm | दशानन

पाककृती सोपी आहे... व मी नक्की करुन बघेन.

* तळटिप : जर वाचलो तर सांगेन नक्की ... कशी तयार झाली होती ती :D

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:43 pm | प्रभाकर पेठकर

नाही वाचलात तरी मृत्यूपत्रात माझ्यासाठी चाबूकाचे ४ फटके लिहून ठेवण्याइतका अवधी नक्कीच लाभेल.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

दशानन's picture

16 Feb 2009 - 5:44 pm | दशानन

=))

नाय ओ मी नाय मरणार... पण माझे मित्रांचा विचार करतो आहे बिचारे !

रेवती's picture

16 Feb 2009 - 5:53 pm | रेवती

आपण जर अश्या प्रकारच्या पाकृ देत राहिलात तर शाकाहारींना (माझ्यासारख्या) मत्स्याहारी व्हावच लागेल.
फोटू फारच छान आलाय. पाकृबद्दल धन्यवाद!
रेवती

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:55 pm | प्रभाकर पेठकर

झालात तर उत्तम.
माझे तरी पहिले प्रेम 'मासे' हेच आहे.
पण काळजी नसावी. काही शाकाहारी पाकृही देईनच. जन्माने मीही शाकाहारीच आहे. पण 'कर्माने' त्या व्रतापासून दूर नेले. असो.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

सहज's picture

16 Feb 2009 - 5:50 pm | सहज

त्या रश्श्यासाठी केला पाहीजे. अफलातुन दिसतो आहे रस्सा!

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 5:56 pm | प्रभाकर पेठकर

त्याचे गुपित आहे, वस्त्रगाळ काश्मीरी तिखट. काही जास्त कौशल्य लागत नाही.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

शाल्मली's picture

16 Feb 2009 - 6:26 pm | शाल्मली

पेठकर काका,
हे काही बरोबर नाही.. आमच्या सारख्या शाकाहारींनी काय करायचं?
आता लवकरात लवकर एखादी शाकाहारी पाकृ. टाका. :)
फोटो एकदम मस्त आलाय.

--शाल्मली.

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 10:07 pm | प्रभाकर पेठकर

जरूर प्रयत्न करीन. धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्राजु's picture

16 Feb 2009 - 7:54 pm | प्राजु

आता दिवसभर नुस्ती या हुमणाचीच आठवण येणार.
मस्त रंग.. खत्तरनाक!
कोलंबी च्या ऐवजी चिकन घालता येते का?
(सध्या मी तेवढेच करू शकते .... बर्‍या पैकी) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 10:10 pm | प्रभाकर पेठकर

कोलंबी च्या ऐवजी चिकन घालता येते का?

अजिबात नाही. चिकनला जरा चरचरीत मसाले लागतात. ह्या पाकृत कोंबडी बसत नाही. कोंबडीसाठी एखादी वेगळी पाकृ देईन यथावकाश.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसुनाना's picture

17 Feb 2009 - 12:36 pm | विसुनाना

तुमच्या हातचे कोळमीचे नायतर सुरमईचे हुमण खायला नक्की येईन. :)

मालवणी सुरमईची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. तिथेच असतो तर कायमची संध्याकाळची मेस लावली असती.

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद विसूनाना.

एक दिवस आधी फोन करून या. इच्छा भोजनाने तुमची फुल्ल सरबराई करू.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नाटक्या's picture

17 Feb 2009 - 12:48 pm | नाटक्या

आज करून पाहीली. झकासच झाली. क्या बात है काका. आता पुण्याला येवू तेव्हा आणखी काही काही शिकून जावू..

जाणिजे 'यज्ञकर्म'...

- नाटक्या

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 2:21 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. नाटक्या.

अशी खवय्ये मंडळी भेटली की नवनविन पाकृंसाठी हुरूप येतो.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 10:31 pm | नाटक्या

या जन्मावर या खाण्यावर शतदा: प्रेम करावे ;-)

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 10:58 pm | प्रभाकर पेठकर

पण त्या साल्या डॉक्टरांना बघवत नाही नं!!! जे आवडतं तेच खाऊ नका सांगताहेत .....

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 11:20 pm | नाटक्या

माझी आजी ९४ वर्षांची आहे. अगदी ठणठणीत आहे (३२ दातांसकट). नियमित योगासनं/फिरणे हे चालू असते. खाण्यापिण्या बाबत कसलीही पथ्य पाळत नाही.
तिला जर कधी काही कारणाने डॉक्टरकडे जावे लागले तर बर्‍याचदा डॉक्टर सांगायचे की हे खावू नका, अमकेच खा, अमुक गोळ्या घ्या, तमुक व्हिट्यामिन्स घ्या म्हणून. एकदा तिने एका डॉक्टरला न राहवून सुनावले 'हे पहा डॉक्टर मला आता पर्यंत जितक्या डॉ़क्टरांनी ह्या गोळ्या-फिळ्या घ्यायला सांगीतल्यात आणि ही पथ्य पाळायला सांगीतलीत ना त्या सगंळ्यांच्या अंत्यदर्शनाला मी गेले आहे'. तो डॉक्टर आडवा व्हायचा बाकी होता.

लिखाळ's picture

20 Feb 2009 - 8:54 pm | लिखाळ

>>'हे पहा डॉक्टर मला आता पर्यंत जितक्या डॉ़क्टरांनी ह्या गोळ्या-फिळ्या घ्यायला सांगीतल्यात आणि ही पथ्य पाळायला सांगीतलीत ना त्या सगंळ्यांच्या अंत्यदर्शनाला मी गेले आहे'. <<
टाळ्या टाळ्या .. फार मस्त उत्तर ! :)

पेठकरकाकांनी सुचवलेले उत्तमोत्तम पदार्थ खाउन आपण सुद्धा सगळे असेच आरोग्य संपन्न होवुया :)
-- लिखाळ.

वल्लरी's picture

17 Feb 2009 - 1:06 pm | वल्लरी

तो रस्सा बघुनच तोंडाला पाणि सुट्ले आहे काका... :)
नक्की करुन बघेन नी कळवेन तुम्हाला...
---वल्लरी

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 2:23 pm | प्रभाकर पेठकर

येस्स वल्लरी. तो रंग, ती चव आणि ते मासे.
तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे....

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

मनिष's picture

17 Feb 2009 - 2:11 pm | मनिष

तिरफळं म्हणजे काय?

सहज's picture

17 Feb 2009 - 2:13 pm | सहज

पेठकर काकांनी आधी सांगीतले आहे.

इथे

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद सहजराव.

मनिषराव कळले का तिरफळे म्हणजे काय?

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

काय रंग, काय दिमाख!! खल्लास!!! (मला तर स्क्रीनमधून सुद्धा रश्याचा वास आला! ;) )
हे मांसाहारी आहे म्हणून मी तुम्हाला अजिबात सोडाणार नाहीये पेठकर काका!!
पुण्याच्या पुढच्या ट्रिपचे दिवस नक्की झाले की तुमच्या कॅलेंडरमधे आमच्यासाठी दिवस राखून ठेवायला लावणार आहे.
तुमच्या शाकाहारी पदार्थांनी भारतवारी संस्मरणीय करणार आहे!! :) =P~ =P~

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 6:24 pm | प्रभाकर पेठकर

काळजी नको चतुरंग राव. मजा करू. अदमासे कधी आहे पुण्याचीवारी?

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

मितालि's picture

18 Feb 2009 - 8:47 am | मितालि

कालच बनवली .. खुप छान बनली होती..

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 10:18 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मिताली.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

चित्रा's picture

18 Feb 2009 - 6:29 pm | चित्रा

फोटो पाहूनच आज जेवणात काय करायचे, हा प्रश्न सुटला. मस्त.

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 10:19 pm | प्रभाकर पेठकर

'हुमण' केलं की कळवा.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

शिवापा's picture

20 Feb 2009 - 7:11 pm | शिवापा

शुक्रवार आहे. लवकर निघतो. जाता जाता कोलंबी उचलतो. सोबतीला बीअर (त्याला मराठित काय म्हणतात?)

छोटिशि वॅकेशनच होइल म्हणा ना.

संदीप चित्रे's picture

21 Feb 2009 - 1:11 am | संदीप चित्रे

पेठकरकाका,
गेले कित्येक दिवस हा फोटू बघतोय पण प्रतिक्रिया द्यायची राहून जातीय.
कळेना हे पाप कसे घडले ? !!!

पाकृ वापरून पाहिली की कळवीनच.

(मागच्या वर्षीच्या पुणे दौर्‍यात 'यज्ञकर्म'ला भेट न दिल्याची टोचणी जास्तच तीव्र झालीय आता !!)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com