संकेतस्थळांचे मोबाईल व्हर्जन

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
14 Feb 2009 - 3:03 pm
गाभा: 

मोबाईल फोन्सची स्मार्ट व्हर्जन्स उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल जीपीआरएस ही सहजगत्या उपलब्ध होतयं. अशी स्थिती असताना मोबाईलवर आपले आवडते संकेतस्थळ पहायला मिळाले तर किती बरं होईल. एकतर सतत संगणक उघडून बसायला नको. शिवाय प्रवासात असतानाही आपला छोटासा मोबाईल उघडून आपण ही संकेतस्थळे पाहू शकतो.
पण यात एक अडचण अशी आहे की , आपल्याला हव्या असलेले संकेतस्थळ मोबाईलमध्ये कसे काय दिसेल ? कारण सहाजिकच मोबाईलचा स्क्रिन आणि संगणकाचा स्क्रिन यांत बराच फरक असतो. त्यामुळे मोबाईलवर पहाण्याकरता संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन उघडावे लागते. आता आपल्याला हव्या असणार्‍या संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन कसे मिळवायचे ?
एक सेवा सुरू झाली आहे. जिथे आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही संकेतस्थळाचा पत्ता दिल्यावर, ती सेवा आपल्याला त्या संकेतस्थळाच्या मोबाईल व्हर्जनचा पत्ता असलेला दुवा देते. तो दुवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर टाईप करून पाहिलात तर तुम्ही तुम्हाला हवं असलेलं संकेतस्थळ मोबाईलवर पाहू शकता.
या सेवेचा उपयोग करून 'माझी मराठी' चं मोबाईल व्हर्जन तुम्ही इथे पाहू शकता.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

14 Feb 2009 - 3:06 pm | अवलिया

संकतस्थळांचे मोबाईल व्हर्जन

हे

संकटस्थळांचे मोबाईल व्हर्जन

असे वाचले. बाकी चालु द्या

--अवलिया

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 3:10 pm | विनायक प्रभू

शेम टु शेम हियर.

माझी दुनिया's picture

14 Feb 2009 - 3:14 pm | माझी दुनिया

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.

____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

दशानन's picture

14 Feb 2009 - 3:20 pm | दशानन

मस्तच !
उपयोगी आहे संकेतस्थळ !

धन्यवाद.
दुवा दिलात दुवा घेऊन जा !

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

देवदत्त's picture

14 Feb 2009 - 3:23 pm | देवदत्त

ह्या संकेतस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
माझ्या अनुभवाप्रमाणे गूगल वर शोध घेतला असता जमेल त्या संकेतस्थळांचे ते मोबाईल आवृत्ती देत असतात. तसेच युनिकोड फाँट वापरलेला असेल तर बहुतेक मोबाईलवर संकेतस्थळे नीट दिसतात.
गेले जवळपास दीड वर्ष मी माझ्या नोकिया फोनवरसुद्धा आवडती संकेतस्थळे पाहत आहे. नोकिया फोनच्या स्वत:च्या न्याहाळकापेक्षा ऑपेरा वर सगळी संकेतस्थळे चांगली दिसतात हा माझा अनुभव.

(आत्ताच पाहिले तेव्हा कळले की तुम्ही सांगितलेले संकेतस्थळ गूगलचाच वापर करत आहे ;) )
असो, पण ह्या प्रकारे एखादे संकेतस्थळाचा लहान केलेला पत्ता ही उपयोगात पडू शकतो. :)