मराठी शब्द

मराठी शब्द's picture
मराठी शब्द in काथ्याकूट
12 Feb 2009 - 3:17 pm
गाभा: 

मिपाकरांनो नमस्कार,

मिपा वरील लेख व इतर विचार वाचतांना नेहमीच चांगला अनुभव येतो. तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे. www.marathishabda.com

कृपया Firefox, Safari, Google Chrome browser वापरा. IE CSS चा घोटाळा अजुन निस्तरायचा आहे.

हे संकेतस्थळ मिपाला स्पर्धा नाही.

मिपाकरांना हे एक थोडेसे गंभीर संकेतस्थळ वाटेल पण त्याचा उद्देशच जरा वेगळा असल्याने तसे ते असावे असे वाटते.
आपला सहभाग मराठीची चळवळ पुढे नेण्यास मला मदत करेल व त्यासाठी तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण!

मराठी शब्द

प्रतिक्रिया

केवळ_विशेष's picture

12 Feb 2009 - 3:41 pm | केवळ_विशेष

भयंकर गिचमिड दिसतेय अक्षरांची... त्यामुळे कळत नाहीये...

नितिन थत्ते's picture

12 Feb 2009 - 4:19 pm | नितिन थत्ते

सहमत
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 4:23 pm | मराठी शब्द

माफी असावी. कृपया Firefox, Safari, Google Chrome मधे पहा. मलाही अजुन आय ई मधे ते चांगलेज्का दिसत नाही त्यचा उलगडा झालेला नाही.

दशानन's picture

12 Feb 2009 - 4:27 pm | दशानन

style.css

फॉन्ट साईज पहा.. !

ड्रुपल वापरले आहे तर आई वर व्यवस्थीत दिसायलाच पाहीजे... तुमच्या थिम मध्ये गडबड आहे ती ठीक करा.

दुसरी गोष्ट म्हणजे संकेतस्थळाचे प्रथम पानं एक तर http://marathishabda.com/?q=node हे ठेवा अथवा ट्रकर ठेवा त्यामुळे नवीन लेखन वर दिसते !

शुभेच्छा !!!!!

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 4:40 pm | मराठी शब्द

धन्यवाद. हो css चाच घोटाळा आहे. ड्रुपलच्या हेल्पवर जाउन पाहातो आहे काय करता येइल ते.

ढ's picture

12 Feb 2009 - 4:41 pm |

कोजळ माझ्या कुवतीपलिकडचे आहे.

शुभेच्छा!!!!

आनंदयात्री's picture

12 Feb 2009 - 4:42 pm | आनंदयात्री

आपल्याला अनेक शुभेच्छा !!

केवळ_विशेष's picture

12 Feb 2009 - 5:49 pm | केवळ_विशेष

मी फक्त सुचवलं... राग मानू नये... आम्हालाही संकेतस्थळ बघायला आवडेल...
तुमच्या उपक्रमास शुभेच्छा!

(सॉफ्टवेअर मधलं शाट काहीही न कळणारा) केवळ_विशेष

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2009 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी शब्द आपल्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा !
संकेतस्थळाची बांधणी अजूनही पूर्ण झालेली दिसत नाही.
मात्र आपल्याही संकेतस्थळाला भेट देत राहीन. :)

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 6:41 pm | मराठी शब्द

नमस्कार सर. तुमच्या कडुन खूप अपेक्षा बाळगून आहे. मार्गदर्शन करावे.
ड्रूपलचे विस्तारण जरा कटकटीचे आहे. मी एकटाच लढतोय. जरा वेळ लागेल पण आय ई सोडून इतर जाकुरांवर चांगले दिसते.

दशानन's picture

12 Feb 2009 - 6:49 pm | दशानन

काही मदत लागली तर कळवा !
खव मध्ये बोला !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 7:15 pm | मराठी शब्द

सध्या आयई मधे संकेतस्थळ दिसत नाही हाच मोठा अडचणीचा मार्ग आहे. माहीती असल्यास कळवावी.

दशानन's picture

13 Feb 2009 - 7:47 am | दशानन

http://drupal.org/ वर तुम्हाला काही थीम भेटतील त्यातील एक निवडा व थोडं फार जर बेसीक माहीत असेल तर थोडा कोड चेंज करुन तुम्ही स्वत:ची थीम तयार करा.. बाकी तुम्ही सध्या जी थीम वापरली आहे ती बेसीक थीम आहे पण त्या पेक्षा सुंदर थीम तेथे आहेत शक्यतो पृष्ठभुमी पांढ-या रंगाची असलेलीच थिम निवडा, लोकांना वाचायला सोपं जातं.

भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !

पण आता बाय-बाय =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2009 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या कडुन खूप अपेक्षा बाळगून आहे. मार्गदर्शन करावे.
अर्रर्र ! काही तरी गडबड होत आहे. ते डुपल, त्याचा विस्तार,वगैरे त्या विषयात आम्ही 'ढ' आहोत.
डुपलचे विस्तार..वगैरेसाठी नीलकांत, राज जैन, शशांक,चित्तर आणि तात्या, ही एक्सपर्ट मंडळी आहेत. त्यांचा वेळ आणि अंदाज घेऊन त्यांना विचारा..कदाचित ते मदत करतील.

बाकी आपल्या उपक्रमाच्या विषय चांगला आहे, त्याबाबत पूर्वीही आपण चर्चा केलीच आहे.तेव्हा आम्ही आपल्या सोबत आहोतच.

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 7:30 pm | मराठी शब्द

मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की बी. ए. मराठीला शब्द व्युत्पत्तीशास्त्र शिकवातात. त्यासंबंधी लिहून पाठवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2009 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाकेन-टाकेन..पण कार्यबाहुल्यामुळे सध्या जरा लिहिण्याचे जमत नाही. पण शब्दाच्या व्युतपत्तीबद्दल एखादे माहितीपूर्ण लेखन पाठवेन. असेच म्हणायचे आहे ना ?

-दिलीप बिरुटे

कलंत्री's picture

12 Feb 2009 - 6:41 pm | कलंत्री

कोणत्याही भाषेच्या स्वरक्षणासाठी शब्द हे सैनिकासारखे असतात. मराठी भाषेत अनेक परकिय शब्द रुढ होत जातात आणि नंतर ते त्या भाषेच्या मूळ शब्दांना हद्दपार करतात. या विचाराच्या पार्श्वभूमीवर मराठीशब्द हे संकेतस्थळ भरीव काम करेल असा आशावाद व्यक्त करु या.

संकेतस्थळ निर्माण करणे आणि ते चालविणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आपण पहिली बाब / परिक्षा उत्तीर्ण झाला आहात आणि कालांतराने दुसरीही परिक्षा पार पाडाल असा आशावाद ठेवुया.

शुभेच्छा,

मिपाकर

नितिन थत्ते's picture

12 Feb 2009 - 6:54 pm | नितिन थत्ते

नंतर ते त्या भाषेच्या मूळ शब्दांना हद्दपार करतात.
जर मराठी भाषेत मूळ शब्द असतील तर परभाषिक शब्दांनी त्यांना हद्दपार करू नये हे मान्य. पण केवळ एखादा शब्द परभाषेतील आहे अशा कारणाने/संशयावरून नवीन शब्द प्रसवणे हे तितकेसे मान्य नाही. म्हणजे इंटरनेटला आंतरजाल म्हणणे तितकेसे मान्य नाही. आणि पोलाद हा शब्द 'विशिष्ट' संस्कृतीतील आहे असा संशय घेऊन पोलादी पुरुष असा प्रचलित असलेला शब्द नाकारून 'लोहपुरुष' असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न करणे हे अमान्य.
हिंदीतही फौलाद हा रूढ शब्द टाळून इस्पात असा शब्द तयार करण्यात आणि रूढ करण्यात आला आहे.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 7:14 pm | मराठी शब्द

खरे म्हणजे ह्या अशाच मतांतरांना शक्य तेव्ह्ढा एकसुत्रीपणा आणण्यासाठीच हा प्रयत्न आहे.
एकाच शब्दाला अनेक अर्थी शब्द असावेत अशाही मताचा मी आहे व त्यातील ज्याला जसा हवा तसा अन/औपचारीक संभाषणात प्रयोग करावा.

[परंतू, जाता जाता, लोह (खनिज लोखंड) हे पोलादापेक्षा मउ असते. पोलाद हे लोहाचे संयुग; त्यामुळे पोलादीपुरुष हेच योग्य विषेशण आहे असे वाटते] पण असो; ह्या चर्चेने विषयांतर होते आहे.

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 6:47 pm | मराठी शब्द

"संकेतस्थळ निर्माण करणे आणि ते चालविणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आपण पहिली बाब / परिक्षा उत्तीर्ण झाला आहात आणि कालांतराने दुसरीही परिक्षा पार पाडाल असा आशावाद ठेवुया."

I am reading between the lines. अवघड आहे ते पण बघुया कसे होतेय. आभार!
सर्व मिपाकरांना: तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!!

नितिन थत्ते's picture

12 Feb 2009 - 7:17 pm | नितिन थत्ते

ओळीच्या मध्ये वाचू नका.
आमच्या शुभेच्छा.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

प्राजु's picture

12 Feb 2009 - 7:37 pm | प्राजु

आम्ही तिथेही घेऊच सभासदत्व. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

12 Feb 2009 - 8:20 pm | छोटा डॉन

आम्हीही नक्की सदस्यत्व घेऊ व जमेल तसे मराठी शब्दांसाठी योगदान देऊ...
आपल्याला शुभेच्छा ..!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात काही जण देवाला "स्वेटर" चढवतात. हे तर अजुन "मजेशीर" प्रकरण ;)

शंकरराव's picture

12 Feb 2009 - 8:46 pm | शंकरराव

डान्या चा ईनोद आवडला
ईनोदी शुभेच्छा !!

देवाच्या चुका काढायला आपण देवेंद्र आहात का ?..
एखाद्याला देव म्हटल्याने देव नाही तयार होत,
भक्तांना येते किव बिभक्तांच्या प्रयत्नांची.. अन
विभक्तांना त्रास देवांचा .. जन्माला पुरे ..असो..

(शकील्,ताड्पत्री,छोटा छत्री बोले तो कितने भी डॉन बनेंग... ) ;-)

शंकरराव

शंकरराव's picture

12 Feb 2009 - 7:51 pm | शंकरराव

अनेक शुभेच्छा ..
मात्रूभाषा मराठी आम्हाला वंदनीय आहे.

आवांतर : सध्या डोके ठिकाणावर नाही आहे... मध्येच उर्दूचे भूत मनात घुसतेय..
माका कोकणी माणूस असा वेंगुर्ले आमचा गाव, माका खराटा विकत असा.. हा उर्दू चा झाडू बाधाला ..
मराठीचा उतारा पाहीजे असा....

शंकरराव देसाई (५,सावेंची वाडी, वेंगुर्ले)

मराठी शब्द's picture

12 Feb 2009 - 7:59 pm | मराठी शब्द

"मध्येच उर्दूचे भूत मनात घुसतेय.."

तेही चांगलेच. उर्दूतुन किती शब्द मराठीत आले आहेत; किंवा उर्दूत ते शब्द जाण्याआधी कुठून आले होते, त्याची माहिती देउ शकाल तरीही चालेल.

शंकरराव's picture

12 Feb 2009 - 8:12 pm | शंकरराव

'जरुर' प्रयत्न करु
धन्यवाद!!

अल्फाजी नवाज़ शंकरराव

नितिन थत्ते's picture

12 Feb 2009 - 8:40 pm | नितिन थत्ते

जरूर
आवडलं.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

लिखाळ's picture

12 Feb 2009 - 8:55 pm | लिखाळ

संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !

कोजळ हा संकेतस्थळासाठी प्रतिशब्द योजला आहे का?

http://marathishabda.com/?q=node राजेंनी दिलेल्या या दुव्यावरुन आय इ मधून मला संकेतस्थळावर फेरफटका मारता आला. संकेतस्थळ छान आहे.

शुभेच्छा !
-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 10:42 pm | विसोबा खेचर

मराठी शब्दला आमच्या संपूर्ण मिपा परिवाराच्या अनेकानेक शुभेच्छा!

हे संकेतस्थळ मिपाला स्पर्धा नाही.

मिपाचीही कुणाशी स्पर्धा नाही, ना मिपा कधी कुठल्या स्पर्धेत असेल.

जिथे सर्व स्पर्धा संपतात तिथे मिपा सुरू होतं! :)

तात्या.

दशानन's picture

13 Feb 2009 - 7:12 am | दशानन

>>जिथे सर्व स्पर्धा संपतात तिथे मिपा सुरू होतं!

क्या बात है !

लाख रुपये की बात.. जियो तात्या.

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मराठी शब्द's picture

13 Feb 2009 - 7:44 am | मराठी शब्द

धन्यवाद.

"जिथे सर्व स्पर्धा संपतात तिथे मिपा सुरू होतं!"

मिपाची घौडदौड प्रचंड वेगाने चालू राहो.