संगणन समस्या : तांत्रिक मदत हवी

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
10 Feb 2009 - 7:35 pm
गाभा: 

सध्या संगणन करताना एक समस्या आहे. उपाय माहिती नाही. मार्ग शोधतोय.

माझ्या एका प्रोजेक्ट् मधे , एका जे एस् पी मधे काही डॉक्युमेंट्स् चे दुवे आहेत. ही सर्व डॉक्युमेन्ट्स् माझे ऍप्लिकेशन्स् "अटॅचमेंट्स्" म्हणून ऑरकल विदागारात साठवते. एकेका दुव्यावर क्लिक् केले असता , ते ते डॉक्युमेन्ट् उघडायचे का क्लायंटवर जतन करायचे याचा डायलॉग् येतो. अशा प्रकारे या अटॅचमेन्ट्स् जतन करता येतात / उघडून पहाता येतात.

आता , आमच्या ग्राहकाने अशी मागणी केली आहे की : मला अशी सुविधा हवी , जेणेकरून , सर्व /किंवा ठराविक डॉक्युमेन्ट्स् मला उपरोक्त डायलॉगशिवाय आणि ती डॉक्युमेन्ट्स् क्लायन्ट् बॉक्स् वर जतन केल्याशिवाय मुद्रणास (प्रिन्ट् करण्यास) धाडता यायला हवीत. प्रिन्ट्-डायलॉग सुद्धा येता कामा नये.

मला जावामधले कळते, पण मायक्रोसॉफ्ट् मधले काही कळत नाही. त्यातूनसुद्धा , माझ्या सहकार्‍याच्या मदतीने एक सीप्ल्सप्लस प्रोग्राम लिहून , त्याची एक .exe बनवून "shell execute" मधे ते कॉल करून , एकाहून अधिक डॉक्युमेन्ट्स् "प्रिन्ट् डायलॉग" शिवाय प्रिन्ट् करण्याइतपत मजल मारली आहे. पण दुव्यामधली डॉक्युमेन्ट्स् जतन न करता / टेम्प् लोकेशनवरून न उघडता एकदम प्रिन्ट्ला कशी पाठवायची ? दुसरे म्हणजे , ही .exe फाईल प्रत्येक क्लायंटवर जतन करायला हवी ! हे कसे होणार ?

मदतीबद्दल आगाऊ धन्यवाद.

प्रतिक्रिया

लंबूटांग's picture

10 Feb 2009 - 9:10 pm | लंबूटांग

इथे किंवा
इथे दिलेल्या माहितीचा काही उपयोग होऊ शकतो का, पहा.