"मानवनिर्मित" समस्या

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
29 Jan 2009 - 8:22 am
गाभा: 

गेल्या काही दिवसांपासून मिपावर एक समस्या भेडसावते आहे (निदान मला तरी). कधीकधी अचानक लॉगआऊट होणे तर कधी "गमन"वर टिचकी मारूनही गमन न होणे.

ही समस्या नक्कीच "मानवनिर्मित" आहे. कृपया लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा, ही विनंती.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 8:36 am | विसोबा खेचर

आँकारराव आणि नीलकांतराव यांनी या संदर्भात काही खुलासा केल्यास बरे होईल. मीदेखील पब्लिकच्या खरडींना आणि व्यनिंना उत्तरं देऊन देऊन हैराण झालो आहे. साला, एक तर तेवढा टाईमपण नाय भेटत आजकाल!

सुनीलकाका, आपण हा विषय येथे आणल्याबद्दल आभारी आहे..

लोकहो,

आता कुणाला काय कंप्लेन्टी करायच्या असतील त्या हिथ्थच करा, त्याचा नीलकांतरावांनी हिथ्थच खुलासा करावा ही विनंती..साला, मला खरडी पाठवून हैराण करू नका. एकतर आपल्याला त्या तांत्रिक गोष्टीतलं शाटमारी काय पण कळत नाय! :)

काहीच उत्तर नसलं की मी खरडींना उत्तर देत नाही पण त्यामुळे पब्लिक म्हणत असेल "काय साला माजोरी आहे!" :)

असो..

आपला,
(हैरांण) तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2009 - 4:39 pm | ब्रिटिश टिंग्या

मी सुद्धा तुम्हाला २ खरडी पाठवल्या होत्या......उत्तर अजुन मिळाले नाही! ;)

परंतु मी "काय साला माजोरी आहे!" असे शब्द अजिबात उद्गारले नाहीत!

आणि माझा आयपी ब्लॉक होईल या भितीने मी उद्गारलेले शब्द येथे लिहु इच्छित नाही ;)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jan 2009 - 8:41 am | llपुण्याचे पेशवेll

आमच्या प्रतिसादाच्या सहीतले रंग कसे काय उडले? :(

पुण्याचे पेशवे
Since 1984

सहज's picture

29 Jan 2009 - 8:46 am | सहज

पुर्वपरिक्षण व प्रतिक्रिया प्रकाशित करा या बटणांच्यावर एक इन्पुट फॉर्मॅट दुवा आहे त्यातला फुल एचटिएमएल निवडून पहा बरे. मला ते काल दिसले.

Input format
Filtered HTML
Allowed HTML tags:
Lines and paragraphs break automatically.
Textual smileys will be replaced with graphical ones.
Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
Full HTML
Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
Lines and paragraphs break automatically.
Textual smileys will be replaced with graphical ones.
More information about formatting options

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jan 2009 - 8:57 am | llपुण्याचे पेशवेll

टेस्ट.. वावा सहजराव. थ्यांकू. थ्यांकू.
पुण्याचे पेशवे
Since 1984

रामदास's picture

29 Jan 2009 - 8:52 am | रामदास

गमन केल्यावर एकदा गमन होते.
(मला वाटलं लिंबू टिंबूना दोनदा आउट म्हंजे एकदा आउट असं असावं .)
समस्या याप्रमाणे आहे.
१ गमनची कळ दाबल्यावर प्रवेश निषीध्द असे पान उघडते.
२ नंतर स्वगृहची कळ दाबल्यावर परत आगमन होते.
३ परत गमन. यानंतर गमन होते.
४ हे नेहेमीच होते असे नाही.
धन्यवाद.

विनायक प्रभू's picture

29 Jan 2009 - 11:40 am | विनायक प्रभू

१,२,३,४ लय भारी

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2009 - 9:11 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, माझी समस्याही दूर झाली.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आनंद घारे's picture

29 Jan 2009 - 9:21 am | आनंद घारे

'ड्रुपल प्रवर्गतील मराठी संकेतस्थळे आणि सुरक्षितता' या विषयावर क्लिक केल्यावर "तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही." असे उत्तर आले. उगाच जाहीर चर्चा नको म्हणून तात्यांना खरडवहीत विरोप लिहून ताप दिला. त्यांनी "सुरक्षिततेच्या कारणास्तव तो लेख अप्रकाशित केला आहे." असे उत्तर पाठवले आहे.

असा अप्रकाशित केलेला लेख यादीमधून उडवून टाकता आला असता किंवा तात्यांनी दिलेले स्पष्टीकरण क्लिक करणार्र्‍यांना देता आले असते. "तुम्हाला मुभा नाही." असे म्हंटल्याने मिसळपावमध्ये कांही राखीव जागा असल्यासारखे वाटते.

अवलिया's picture

29 Jan 2009 - 9:33 am | अवलिया

नीलकांत काम करत आहेच. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटेल अशी खात्री आहे.
आपण सर्वांनी त्याकरता संयम बाळगुन सहकार्य करणे गरजेचे आहे.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन's picture

29 Jan 2009 - 10:03 am | दशानन

सहमत.

धीर धरा.

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 9:58 am | नितिन थत्ते

ओंकार व लांडग्याने मिळून रविवारी बलात्कार केला होता. आ़ज दिवस राहिले की काय?
(तात्यांना सूचना: प्रतिसाद अश्लील वाटला तर काढून टाकावा)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 11:17 am | विसोबा खेचर

आ़ज दिवस राहिले की काय?

राहिले असतील तर हा तात्या बाळंतपण करयला समर्थ आहे..

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर,
अभ्यंकर आंतरजालीय मॅटर्निटी होम.

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 11:31 am | सखाराम_गटणे™

>>राहिले असतील तर हा तात्या बाळंतपण करयला समर्थ आहे..
मग बांळत पणवॄत्तात येयील

मदनबाण's picture

29 Jan 2009 - 11:41 am | मदनबाण

प्रॉक्सी वापरताना सदस्यनाम आणि संकेताक्षर मराठीत टंकता येत नाही..काही उपाय करता येईल का ?

http://mandogproxy.com/
या Surf and browse the web anonymously सेवा देणार्‍या स्थळाचा वापरकेल्यास मिपा वर मराठी टंकन जमत नाही परंतु दुसरे संकेत स्थळ (लगबगपुरी)इ.संकेतस्थळावर मात्र या प्रॉक्सी द्वारे मराठी टंकन करता येते.

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 11:46 am | मधु मलुष्टे ज्य...

एकदा ’गमन’वर क्लिक केल्यावर गमन होत नाही.
दुसर्‍यांदा ’गमन’वर क्लिक केल्यावर "तुम्हाला पानाशी पोहचण्याची मुभा नाही" असा संदेश येतो.
त्यावेळी ’स्वगृह’ वर क्लिक केल्यावर ’गमन’ झालेले दिसत नाही. आपली व्यक्तिरेखा दिसते
नंतर एखाद्या लेखावर क्लिक केली की ’येण्याची नोंद करा’ असे येते. म्हणजेच ’गमन’ झालेले दिसते.

५-१० मिनीटाने मिपा उघडल्यावर व्यवस्थित चालते. ’गमन’वर क्लिक करेपर्यंत.

मिपाला आम्ही जाऊच नये असे वाटत असेल. आम्हालाही तेच वाटते म्हणा.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 12:26 pm | नितिन थत्ते

:)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 12:01 pm | सखाराम_गटणे™

मला काहीच अडचण नाही आहे.
तुमची कॅश उडवा

सुनील's picture

29 Jan 2009 - 12:05 pm | सुनील

तुमची कॅश उडवा
डान्सबार बंद झाले. कॅश कशी उडवायची?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 12:08 pm | सखाराम_गटणे™

>> डान्सबार बंद झाले. कॅश कशी उडवायची?

मर्जिनाचा फोन नं आहे ना???
मग

रामदास's picture

29 Jan 2009 - 12:55 pm | रामदास

पिना सोणा लेकीन हार नही पैणाना.

सुनील's picture

29 Jan 2009 - 2:04 pm | सुनील

हेच म्हणतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 12:07 pm | मधु मलुष्टे ज्य...

तुमची कॅश उडवा
डान्सबार बंद झाले. कॅश कशी उडवायची?

आणि कोणावर?

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

महेंद्र's picture

29 Jan 2009 - 2:29 pm | महेंद्र

डान्स बार सुरु आहेत अजुन...
आमचा अवधुत सांगत होता पनवेलला व्यवस्थीत सुरु आहे म्हणे हे बार्स..

(आम्हाला ह्या क्षेत्रातिल अनुभव नाही, त्यामुळे माहीती खोटी निघाल्यास मुंबई ते पनवेल पेट्रोल चा खर्च नुकसान भरपाई , देण्यात येणार नाही)

नीलकांत's picture

29 Jan 2009 - 4:07 pm | नीलकांत

असं म्हणतात की एकदा मनाला एखाद्या नव्या कल्पनेने स्पर्ष केला की मन पुन्हा पुर्वीसारखं होणं शक्य नाही. :(

हा जो एकंदरीत प्रकार झाला त्यात मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांना कुठलाच धोका पोहोचवण्याचा हेतू नव्हता याची खात्री आहे. कारण ओंकारमुळेच आंतरजालावरचा मराठीचा प्रवास सुखकर झाला यात शंका नाही. मी आणि इतर लोक हे पालखीचे भोई आहोत मात्र या पालखीत मायमराठी मोकळेपणाने बसावी यासाठी खरे प्रयत्न केले ते ओंकारने. मराठी संकेतस्थळं सुरक्षीत असावं असंच त्याचं मत. मात्र त्याच्या या प्रकाराणे अनेकांना 'हे असंही होतं' ची चालना मिळाली.
दुसर्‍या दिवशी झालेला 'लांडग्याचा' प्रकार हाच. यात मिसळपाव आणि ओंकार ह्या दोघांनाही त्रास देण्यासाठी हे केल्या गेलं. कारण ओंकारने चित्तच्या संकेतस्थळावर 'लांडगा' नावाने हा प्रकार केला होता. येथे मात्र ओंकार ह्या नावाने केला. दुसर्‍या दिवशी 'लांडगा' ह्या नावाने असा प्रयत्न झाल्यावर राजेंच्या ते ताबडतोब लक्षात आले. शेवटी ओंकारने स्पष्टीकरण दिले की त्याचा ह्या लांडग्याशी काहीही संबंध नाही.
दुसर्‍या दिवशी ओंकार दिवसभर माझ्यासोबत ऑनलाईन होता. मिसळपावर हा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी दिवसभर खटपट करून एक कोड तयार करून टाकला आहे. ओंकार नेहमीच मिसळपावला मदत करीत आलेला आहे. असाच उल्लेख उपक्रमकार शशांकचा सुध्दा करता येईल.

आता थोडं आता होत असलेल्या अडचणींविषयी...
मिसळपाव वर वाढता ओघामुळे संकेतस्थळाचा वेग चांगला असावा यासाठी सर्व्हरसाईड कॅशचे प्रमाण वाढवले आहे. आणि थोडे बदल केलेले आहेत. ह्यांचा कसा परिणाम पडतो आहे ते बघुया. यामुळे फायदा झाला नाही तर मग पुर्वीच्या स्थितीत परत जाता येईल.
यापेक्षा अधीक माहिती जाहिर देण्याची खरं तर गरज नाही. कुणाला अधीक माहिती हवी असेल, काही अडचण असेल किंवा या प्रकारात मदत करायची असेल तर कृपया येथे न लिहीता मला व्य. नि. पाठवावा.

आता येणार्‍या अडचणींना दूर करण्यासाठी ब्राऊजर ची कॅश मोकळी करा. तुम्ही इन्टरनेट एक्स्पोलर वापरत असाल तर तेथे tool>>Internet Option वर टिचकी मारा त्यानंतर उघडलेल्या पानावर मधात टेम्पररी इन्टरनेट फाईल्स मध्ये >> डिलीट कुकीज आणि डिलीट फाईल्स अशी बटन्स आहेत. त्यावर टिचकी मारून ती मोकळी करावीत.
फायरफॉक्स मध्ये हा पर्याय टुल्स>> क्लिअर प्रायवेट टाडा>> मध्ये सापडेल.

ओंकारने प्रकाशित केलेला ड्रुपल प्रवर्गातील संकेतस्थळे हा लेख ओंकारने दिलेले स्पष्टीकरण होता तसेच ड्रुपलबाबत काही सावधगिरीच्या सुचना सुध्दा. मिसळपाव असलेल्या अनेक तंत्रज्ञांनी त्यावर मत दिले. पुढे मात्र त्यावर काही सावधगीरीच्या सुचना अश्या होत्या की त्याचा उपयोग पुन्हा कुणी नवा लांडगा करू शकतो. म्हणून केवळ तो धागा अप्रकाशित केलेला आहे. अन्य काही कारण नाही.

मिसळपाव हे हौशी संकेतस्थळ आहे. लोकांनी येथे यावे , गप्पा टप्पा कराव्यात अशी अपेक्षा आहे. अनेक दिवस सोबत राहील्याने येथे सुध्दा कुरबुरी असतीलच. मात्र आता पर्यंत या कुरबुरीचं स्वरूप लेख लिहून निषेध व्यक्त करणे, विडंबन करणे, चर्चेतून एकमेकांची खेचने एवढ्यावर सिमीत होतं.
खरं तर हे आयोग्यपुर्ण होतं असं मी म्हणेन. मात्र ह्यापेक्षा खालच्या पातळीवर उतरून मूळ संकेतस्थळालाच धक्का लावण्याचा प्रयत्न लावण्याचे प्रयत्न म्हणजे जरा अतीच होतंय.

एखादे संकेतस्थळ निर्माण करून ते चालवावे यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात. तशातच ते संकेतस्थळ प्रसिध्द करणे आणि त्याचा वाढता खर्च पेलने हे करायला सुध्दा खुप कष्ट लागतात. मात्र येथे येऊन घाण करण्यासाठी खुप काही लागत नाही. मात्र यात कुठल्याच प्रकाराचे सृजन नाही. अश्या प्रकाराने कदाचित काही काळ मिपाला त्रास होईल. मात्र याने मिपा बंद पडणार नाही की मिपावर लोकांचे प्रेम कमी होणार नाही. उलट मिपाची काळजी घेणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे असं दिसतंय. रोज येणारे व्य.नि. आणि त्यातील विषय बघीतल्यास हे स्पष्ट होते की आता वाचनमात्र किंवा लेखनमात्र असे न राहता लोक मिसळपावसंकेतस्थळावर योगदान देऊ इच्छीतात. हे बघितल्यावर उत्साह वाढतोच.

मिसळपाव आणि अश्या अनेक संकेतस्थळांमुळे आंतरजालावर मराठीचा वापर वाढतोय यात शंका नाही. अश्या वेळी जेवढ्या मोठ्या संख्येत संकेतस्थळे निर्माण होतील तेवढी आवश्यकता आहेच. मिसळपाव किंवा इतरत्र मराठीत वावरणारा मराठी टक्का हा एकून इन्टरनेट वापरकरणार्‍या मराठी टक्क्याच्या खुप म्हणजे खुप कमी आहे. मराठीत लिहीणे एवढे सोपे आहे किंवा मी मराठी सहजपणे लिहू शकतो याची मराठी लोकांनाच खात्री नाही यासारखे दुर्दैव नाही. हा एवढा मोठा कॅनव्हस आज आंतरजालावर मराठीसाठी उपलब्ध असतांना आपली सृजनशिलता एका मिसळपाव किंवा तात्यांना शिव्या घालण्यात वाया घालने याला काय अर्थ आहे? मिसळपाव वर येऊन तुम्ही आनंदीत होत असाल तरच मिसळपाव वर या. येथे आल्याने व्यथित होत असाल तर येऊ नका. हे एवढं सोप्पं आहे. बघा करून.

( हा सर्व प्रकार खालच्या स्तरावर जातोय हे बघुन व्यथित. :( ) नीलकांत

सुनील's picture

29 Jan 2009 - 4:21 pm | सुनील

सविस्तर स्पष्टीकरण दिल्याबद्दल आभार!

केलेल्या बदलाचा चांगला परिणाम लवकरच दिसू लागेल, अशी अपेक्षा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 4:25 pm | विसोबा खेचर

उत्तम प्रतिसाद रे नीलकांता..! जियो..

तुझी साथ अशीच राहू दे, ओंकारची साथ अशीच राहू दे, हा तात्या तुझ्या, ओंकारच्या आणि इतर सर्व मिपाकरांच्या संगतीने मिपाला खूप दूर घेऊन जाईल, आभाळाइतकं मोठं करेल याची खात्री बाळग..!

हा एवढा मोठा कॅनव्हस आज आंतरजालावर मराठीसाठी उपलब्ध असतांना आपली सृजनशिलता एका मिसळपाव किंवा तात्यांना शिव्या घालण्यात वाया घालने याला काय अर्थ आहे?

चलता है! आपण साला फाट्यावर मारतो. साला दोन पेग मारून बसलो की सगळी घाण धडाध्धड डिलिट करून टाकतो आणि आयपी ब्लॉक करतो! हाय काय नी नाय काय! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2009 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत,
आम्ही आहोत रे पाठीशी काही व्यथीत होऊ नको !
नसतील काही सुविधा सध्या, तरी आम्हाला कोणताच त्रास नाही.
वेळात वेळ काढून कोण इतकी मराठी माणसाची हौस पुरवतो.....!!!

ओंकार, शशांक, अन् आमच्या तात्याचेही आभार ! आपल्यामुळेच आमच्या आयुष्यातील काही क्षण सुखाचे जातात !!!

-दिलीप बिरुटे

आनंद घारे's picture

29 Jan 2009 - 4:42 pm | आनंद घारे

प्रत्येक भेटीनंतर गमन करणे आवश्यक आहे का? आपण उघडलेले खाते दुसर्‍या कोणी पाहू नये किंवा त्यात आपल्या नावाने कारभार करू नये यासाठी गमन (एक्झिट) करतात अशी माझी समजूत आहे. पण संगणकाचा उपयोग एकहाती होत असल्यास वेगवेगळ्या खात्यांवर पुन्हा पुन्हा आगमन आणि गमन करण्याची गरज नाही, शिवाय मिसळपाववर दर वेळी आगमन करावे लागतेच, त्याअर्थी आपोआप गमन होत असेल असेही मला वाटते . याबद्दल मार्गदर्शन करावे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

नीलकांत's picture

29 Jan 2009 - 4:58 pm | नीलकांत

संगणक एकाहाती असेल तर वारंवार गमन करण्याची आवश्यकता नाही.

मिसळपाव वर वारंवार येण्याची नोंद करण्याची गरज नाही.

-नीलकांत

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 5:13 pm | मधु मलुष्टे ज्य...

मिसळपावच्या कुकी कधी एक्स्पायर होतात..?

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 4:56 pm | सखाराम_गटणे™

>>प्रत्येक भेटीनंतर गमन करणे आवश्यक आहे का?
नाही,
पण जर तुम्ही पब्लिक कोम्पुटर वापरत असाल तर मात्र आवश्यक आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2009 - 5:00 pm | ब्रिटिश टिंग्या

कोम्पुटर हा शब्द कॉम्पुटर असा लिहीतात!
अवघड वाटत असेल तर सार्वजनिक संगणक असाही शब्दप्रयोग करु शकता! :)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 5:01 pm | सखाराम_गटणे™

>>कोम्पुटर हा शब्द कॉम्पुटर असा लिहीतात!
शुदधलेखनाचे ज्ञान देउ नये.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2009 - 5:07 pm | ब्रिटिश टिंग्या

>>शुदधलेखनाचे ज्ञान देउ नये.

:)

१. शुदधलेखनाचे हा शब्द "शुद्धलेखनाचे" असा लिहीतात!
२. जाणीवपुर्वक अशुद्धलेखन करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 5:12 pm | सखाराम_गटणे™

>>२. जाणीवपुर्वक अशुद्धलेखन करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो!
आम्हाला काय देणे घेणे नाही.[

आनंदयात्री's picture

29 Jan 2009 - 5:25 pm | आनंदयात्री

>>आम्हाला काय देणे घेणे नाही.[

कंस चालु केल्यावर बंद केलेला नाही, सर्वसाधारणपणे कंसात एखादे वाक्य किंवा शब्दसमुह टाकुन तो कंस बंद करण्याच्या खुणेने (म्हणजे ] ) बंद केला जातो. हा लेखनप्रपंच फक्त आपल्या माहितीस्तव, आपणास शुद्धलेखन शिकवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2009 - 5:33 pm | ब्रिटिश टिंग्या

साजुक तुपात फाट्यावर मारणे ह्यालाच म्हणतात का हो ;)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 5:54 pm | सखाराम_गटणे™

],
अद्रुश्य वापरला आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jan 2009 - 12:05 am | llपुण्याचे पेशवेll

अदॄश्य रुपाने काही केलेत तर तुम्हाला 'लांडगा' म्हणतील. त्यामुळे संकेतस्थळावरची हालचाल शक्यतो दृष्य स्वरूपात करा.
(तुमचा मित्र आणि फुकटचा सल्लागार)
पुण्याचे पेशवे
Since 1984

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 5:35 pm | शंकरराव

कंसाला बंद कर
रन टाईम एरर येतील ना भौ
अन हे रे काय {ह्या कंसात काय वाईट आहे}
बग फ्री
शंकरप्रोग्रामर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jan 2009 - 5:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो क्यांपूट्रवाले, तुम्हाला ते व्हेक्टर्स लिहिण्याची दुसरी पद्धत माहीत आहे का <| आणि/किंवा |> अशी?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 6:17 pm | शंकरराव

हा हा हा :-)
अहो ते तर विसरलोच की ... आता बायनेरी पासून सुरवात करावी म्हणतो ;-)

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 5:12 pm | शंकरराव

गटण्या
अशुद्ध लेखनाचे कॉपीराईट घेणे घातकच रे
कोणीही ते शुद्धलेखन करून वापरू शकतो

आपला अभिजित's picture

29 Jan 2009 - 11:17 pm | आपला अभिजित

कोम्पुटर हा शब्द कॉम्पुटर असा लिहीतात!

नाही रे!
`काँप्युटर' असा लिहितात!
किंवा `कॉम्प्युटर' असा.

भास्कर केन्डे's picture

29 Jan 2009 - 11:36 pm | भास्कर केन्डे

तात्या, निलकांत व ओ़ंकार... आम्हा मिपाकरांचा दिन मिपाचा अस्वाद घेत घेत अधिकाधिक आनंदाचा व्हावा यासाठी ज्या नेटाने तुम्ही श्रम घेत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना साष्टांग दंडवत!

मी मिपावरून कधीच गमण करत नाही. जर माझा संगणक वा मिपाचे सर्वर चालू-बंद केले गेले नसेल तर मिपावर येताच माझे खाते उघडते. अजून एक खिडकी उघडून त्यात नव्याने मिपा उघडले तरी मी आपोआप स्वतःच्या खात्यात जातो. मात्र जर एखाद्या लेखात मिपावरील दुसर्‍या एखाद्या लेखाचा दुवा दिला असेल तर मी तो राईट्-क्लिक करुन नवीन खिडकीत उघडतो (कारण मला मूळ पानापासून दूर न जाण्यासाठी असे करण्याची सवय आहे व तेच आवडते). मात्र अशा पद्धतीने नवीन खिडकीत उघडलेल्या मिपाच्या खिडकीत माझे खाते उघडलेले नसते. असे का? अशा प्रकारे उघडणारी नवी खिडकी कुकीज/टेम्प फाईल्स वापरु शकत नाही का?

आपला,
(ऋणी) भास्कर