गाभा:
1) कृपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते.
2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा.....
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा... वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..
अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा....
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
8) येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल...
९)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल
प्रतिक्रिया
15 Jan 2008 - 4:47 pm | बहुरंगी
छत्रपति,
लई काथ्याकुट झालेला आहे या वाक्यांचा. पण दर वेळेला वाचताना हसु येतं.
आपला,
बहुरंगी मिसळे
15 Jan 2008 - 5:26 pm | ब्रिटिश टिंग्या
येथे सर्व भाषांमध्ये 'झेरॉक्स' काढून मिळेल. ;)
15 Jan 2008 - 6:02 pm | डॉ.प्रसाद दाढे
काही वर्षा॑पूर्वी नारायण पेठेमधील 'अनामिका भेळ' ह्या दुकानामध्ये एक पाटी होती ज्यावर बर्याच (पण कॉमन) सूचना होत्या. त्यात सर्वात शेवटची सूचना एकदम डेडली होती. निदान भेळीच्या दुकानात विस॑गत वाटली.
'शब्द हे शस्त्र आहेत, जपून वापरावे'
15 Jan 2008 - 6:40 pm | सुनील
पुणेरी पाट्या हा एक स्वतंत्र विनोद विषय आहे, हे खरे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Jan 2008 - 10:08 pm | दिनेश५७
येथे न वाजलेल्या फटाक्यांना वाती लावून मिळतील....((((((
16 Jan 2008 - 11:54 pm | प्राजु
बँकेत काऊंटरवर : इथे तबल्याचा ठेका धरू नये..
- प्राजु.
17 Jan 2008 - 2:25 pm | प्रशांतकवळे
पुण्यातल्या एका चान्गल्या टेलर कडे शर्ट शिवायला गेलो होतो, तेव्हा त्याने एक पावती दिली, त्यावर लिहीले होते "ठरलेल्या तारखेला कपडे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतो, पण उशीर झाल्यास तक्रार चालणार नाही..."
प्रशान्त
17 Jan 2008 - 2:40 pm | भडकमकर मास्तर
येथील वाढप्यांशी सलगी करून त्यांना चिरीमिरी देऊ नये... त्यांना वेळच्या वेळी पगार दिला जातो.
17 Jan 2008 - 9:42 pm | चतुरंग
"काउंटरवर चौकशी करण्यापूर्वी बोर्डावरील सूचना वाचाव्यात."
अवांतर - मी बादशाही बोर्डिंगचा दोनेक वर्षे (१९९०-९१) सभासद होतो . त्यावेळी तिथे एक व्यवस्थापक होते; काळी टोपी घातलेले, गोरे-गुलाबी, तुकतुकीत गृहस्थ; ते अत्यंत शिस्तीचे होते. पक्के पुणेकर. (आता ते आहेत की नाहीत कल्पना नाही.) एकदम आत येऊन कोणी त्यांच्याकडे चौकशी करायला लागला की ते काहीही न बोलता, चेहरा मख्ख ठेवून वरील पाटीकडे बोट करीत, आलेला माणूस वरमून जाई आणि तिथे जेवणासाठीच्या नंबरची वाट बघणार्यांमधे खसखस पिके!
चतुरंग
17 Jan 2008 - 11:55 pm | झकासराव
पायथ्याला एका घरासमोर एक पाटी आहे.
सुज्ञ व सुजाण नागरीकाना विनंती आहे की त्यानी गेट समोर वाहने लावु नयेत.
बालगंधर्व येथे
बर्याच पाट्या आहेत. एकदम पुणेरी आहेत त्या.
पर्वतीवर एक कार्यालय आहे तिथे पाहिलेली पाटी.
"हे कार्यालय आहे आत पाहण्यासारखे काही नाही" :)
http://www.busybeescorp.com/puneripatya/
इथे बर्याचशा पुणेरी पाट्या पहायला मिळतील.
अगदी साइटच्या सुरवाती पासुनच पाट्या आहेत :)
तुम्हीही तिथे फोटो देवुन सहभागी होउ शकता.
18 Jan 2008 - 12:53 am | चतुरंग
झकासराव, जबरी दुवा दिलात. सॉलिड पाट्या आहेत!
साईटवर वरच्या बाजूला येणारे मेसेजेस सुध्दा नामी आहेत.
चतुरंग
26 Jan 2008 - 9:21 am | सुधीर कांदळकर
आली. धन्यवाद.
18 Jan 2008 - 10:18 am | भडकमकर मास्तर
@चतुरंग,
मी सुद्धा दोन वर्षे बादशाहीचं जेवण घेतलंय....१९९१ते ९३....त्या मालकांचं नाव बहुधा सहस्रबुद्धे असावं.....
27 Jan 2008 - 11:31 pm | केशवसुमार
नाही.. बापट..बापट..... ते पाटिवर नावे लिहून घ्यायचे , पांढरी विजार आणि गुरू शर्ट.. आणि ते गल्ल्यावर बसायचे त्या ८० वर्षाच्या अजोबांच नाव विसरलो.. साने का काणे अस दोन आक्षरी एकारांत होते..
27 Jan 2008 - 3:14 pm | धोंडोपंत
ही पाटी पहा
आपला,
(खल्लास) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
28 Jan 2008 - 12:14 pm | केशवराव
मी. धोंडोपंत,
आपण पुण्याचे काय?
27 Jan 2008 - 8:17 pm | सुधारक
नविन विशेषण बघा
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, महापौर पुणे
29 Jan 2008 - 2:00 pm | धोंडोपंत
लोकहो,
पुण्याच्या बादशाही बोर्डिंगच्या प्रवेशद्वारावर असलेली पाटी अशी आहे:-
आपला,
(अचंबित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 Jan 2008 - 2:07 pm | धोंडोपंत
पुणेरी जोश्यांच्या संकेतस्थळावरील पाटी अशी:-
आपला,
(अवाक्) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 Jan 2008 - 2:15 pm | धोंडोपंत
पुणेरी लोकांना "आजचा विचार" या सदराखाली रोज काहीतरी लिहायची सवय असते. विचारवंतच ते. अशाच एका बुद्धीमान विचारवंतांने लिहिलेल्या विचारांची ही पाटी.
आपला,
(आश्चर्यचकित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 Jan 2008 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते
ह.ह.पु.वा.
धन्य ते पुणे... काही पाट्या तर केवळ छायाचित्रे आहेत म्हणून त्या आहेत असे वाटले... नाही तर कोणी तोंडी सांगितले असते तर विश्वास बसला नसता...
बिपिन.
29 Jan 2008 - 11:36 pm | नेने
बादशाहीमध्ये मीही नंबर लागायची वाट पहात होतो आणि पाट्या वाचीत होतो. वाचलेली शेवटची पाटी होती "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" !!!
30 Jan 2008 - 1:26 am | केशवसुमार
पुणेरी पाट्या
30 Jan 2008 - 1:20 am | केशवसुमार