मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलात घडलेल्या काही घटनांविषयी खरी माहिती हवी आहे.
असे कळले की..
१) संभाजी राजांचे मोगलांना जाऊन मिळणे आणि परत स्वराज्यात येणे हा महाराज आणि संभा़जीराजांचा डाव होता. त्यांनी तसे मुद्दाम आखले होते. नाहीतर फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी रा़जांना फक्त तुरूंगवास नाही ठोठावणार. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबचा संभाव्य हल्ला) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. त्यावेळी आपल्या बेलगामी वागण्यामुळे संभाजीराजे थोडे बदनाम होतेच. तसेच त्यांचे आणि सोयराबाईंचे पटत नव्हतेच. याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी महाराजांनी आणि काही विश्वासू सहकार्यांनी संभाजीरा़जांचे मन वळवून या गोष्टीस तयार केले होते. संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. (नंतर या गोष्टीचा संभाजीराजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला असावा. माझ्या आठवणीनुसार औरंगजेबाचा एक अकबर नावाचा पुत्र आपल्या बापाशी फितूरी करून संभाजीराजांना मिळाला होता. आणि हा औरंगजेबाचा डाव नसावा. कारण नंतर संभाजीराजांनीच त्याला पर्शियात पळून जाण्यास मदत केली. ) कदाचित मुघल छावणीत राहून संभाजीराज्यांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर संभाजीराजांना मदत केली. ही घटना कितपत खरी?
२) महाराजांचा म्रुत्यू कसा झाला? त्यांना सोयराबाईने विषप्रयोग केला होता काय? असे कोठेतरी ऐकले की जेव्हा महाराजांनी संभाजी राजांना आपला उत्तराधिकारी नेमायचे ठरवले तेव्हा सोयराबाईंनी हा कट रचला. त्यावेळी महारा़जांनी मुद्दाम संभाजी राजांना तुरूंगात ठेवले होते (त्यांच्या मोगलांना जावून मिळण्याच्या डावानुसार). पण हे जेव्हा सोयराबाईला समजले, तेव्हा तिने संभाजीराजे तुरूंगात आहेत हे बघून महाराजांना विषप्रयोग केला. तिला असे वाटले की शिवाजी महाराजांनंतर बदनाम संभाजी राजांना डावलून सर्वजण राजाराम महाराजांना पाठिंबा देतील. महाराजांचा आणि संभाजीराजांचा हा डाव फारसा कोणास ठावूक नसावा. म्हणूनच संभाजीराजांना नंतर सत्ता मिळवताना त्रास भोगावा लागला आणि आपल्याच काही माणसांना (हिरोजी फर्जद वगैरे) मारावे लागले.
३) प्रत्यक्ष भवानीमातेने महाराजांना आपली भवानी तलवार दिली. हे कितपत खरे? कदाचित राजावर देवाची क्रुपा आहे असे भासवून प्रजेचा विश्वास मिळवावा हा उद्देश असावा.
४) अर्थात हा मुद्दा पुर्णपणे महाराजांविषयी नसला तरी त्या काळाशी संदर्भित आहे. संत तुकाराम महाराज सदेह वैकुठी गेले हे कितपत खरे? कोठेतरी ऐकले की त्यांची हत्या त्यांच्या विरोधकांनी केली आणि नंतर त्यांच्या म्रुतदेह नाहीसा केला आणि नंतर सर्वांना सांगितले की संत तुकाराम महाराज स्वर्गात गेले. तसेच जेव्हा संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, तेव्हा काही मोघल सरदारांनी महाराजांना पकडण्यासाठी त्या भेटीच्या ठिकाणी सैन्य पाठवले. पण तुकाराम महाराजांनी काही चमत्कार करुन अनेक शिवाजी महाराजांचे भास निर्माण केले आणि मोघल सैन्याला गोंधळात टाकले. यात तथ्यता किती?
जर देवबाप्पा महाराजांना अशी उठसूट मदत करत होता तर तो नंतर बाजीराव, माधवराव पेशवे, पानिपत, इंग्रज वगैरे वगैरे काळात कोठे गायब झाला?
कोणाकडे वरील मुद्यांसंदर्भी अधिक माहिती असल्यास पुरवावी.
(शिवभक्त) खादाडमाऊ
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 5:32 am | सर्किट (not verified)
चारही गोष्टींत काहीही तथ्य नाही. अधिक माहितीसाठी भाईसंमंच्या निनाद बेडेकरांना भेटा.
-- सर्किट
24 Jan 2009 - 1:47 pm | योगी९००
बेडेकरांनी येथे येऊन उत्तरे दिली तर सर्व मि.पा.कर त्याचा आस्वाद घेतील.
खादाडमाऊ
30 Jan 2009 - 11:33 am | कवटी
चारही गोष्टींत काहीही तथ्य नाही. अधिक माहितीसाठी भाईसंमंच्या निनाद बेडेकरांना भेटा.
-- सर्किट
साक्षात इतिहासाचार्यानी जबाबदारी दुसर्यावर ढकलावी हे पटत नाही.
प्रतापगड शौचकुप प्रकरणानतंर आपण इतिहाससन्यास घेतला असल्यास बात वेगळी. आणि तसे आसेल तर आमची बिनशर्त माफी.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
24 Jan 2009 - 7:23 am | केदार
१) संभाजी राजांचे मोगलांना जाऊन मिळणे >>
हे मिळने खरे होते, ठरविलेले नाही. तूम्ही ज्या शहाजाद्या बद्दल बोलत आहात तो शहाजादा मुअज्जम. महाराजांनी स्वतः त्याच्याशी पत्रव्यवहार केला आहे. संभाजीने मोगलांना मिळताना स्वतंत्र पत्रव्यवहार केला होता तसेच लगेच भुपाळगडवर स्वारी केली. फिरंगोजी नरसाळ्याने बिनशर्त शरनागती स्विकारल्यावर पण ७०० मराठ्यांचे एकेक हात कलम केले होते. . तसेच पळून येताना त्यांचा एक पुत्र मदनसिंग व बायको दिपा बाई ही मोगलांच्याच ताब्यात राहीली. त्यांचे असे मिळने हे स्वराज्य विरोधीच होते. पण काही लोक उगीच आता त्यांचा चुकावर पांघरुन घालन्यासाठी असे विचीत्र शोध लावत आहेत. स्वतः महाराजांनी लिहीलेले अनेक पत्र आहेत
२) महाराजांचा म्रुत्यू कसा झाला? त्यांना सोयराबाईने विषप्रयोग केला होता काय? >> महाराजांनी विषदिप आणला व तो फुटला हे खरे पण त्यांचा मृत्यू कसा झाला हे अजुनही उलगडलेले नाही.
३) प्रत्यक्ष भवानीमातेने महाराजांना आपली भवानी तलवार दिली. हे कितपत खरे? >> डचांनी महाराजांना एक दुधारी तलवार दिली त्याचे नाव महाराजांनी भवानी ठेवले. भवानी मातेने दिले वैगरे झुट आहे.
४ देखील खोटेच आहे. आपले लोक कशालाही काहीही संबोधतात व त्यातून गुढ गोष्टी निर्मान करतात. पोथ्या तरल्या व सदेह वैकुंठ खोटे आहे. ( जर ते खरे असेल तर मग मुसलमांनानी हिंदुंवर अत्याचार करावेत ही देवाचीच इच्छा आहे असे समजावे लागेल.
चारही प्रश्नांबद्दल अजुन लिहीता येईल पण थांबतो.:)
24 Jan 2009 - 10:13 am | नितिन थत्ते
सध्या भवानी तलवार म्हणून जी समजली जाते तिच्यावर पोर्तुगीज मार्किंग आहेत असे वाचले आहे.
अजून एक शंका
शिवाजी महाराजांना आग्र्याहून पळून जायला औरंगजेबानेच मदत केली होती का?
24 Jan 2009 - 7:21 pm | योगी९००
शिवाजी महाराजांना आग्र्याहून पळून जायला औरंगजेबानेच मदत केली होती का?
ही मला पण शंका होती ... हा सगळा औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न.... ना.स.इनामदार यांच्या औरंगजेबाच्या पुस्तकाही त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले आहे...
आणि काही गोष्टी..महाराज नक्की कशाप्रकारे कैदेतून पळाले? कोणी म्हणते पेटार्यातून तर कोणी म्हणते शिपायाच्या वेशात ..तर ही गोष्टम्हणते ब्राह्मणाच्या वेषात..
आणि पेटारा पलायन सुद्धा बघा..
खरा इतिहास काय हे फक्त महाराजांनाच ठावूक.
खादाडमाऊ
24 Jan 2009 - 7:54 pm | नितिन थत्ते
मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलात घडलेल्या काही घटनांविषयी खरी माहिती हवी आहे.
खादाडमाऊ( शनी, 01/24/2009 - 05:19)
आणि
खरा इतिहास काय हे फक्त महाराजांनाच ठावूक
खादाडमाऊ शनी, 01/24/2009 - 19:21
ह. घ्या.
24 Jan 2009 - 11:43 pm | योगी९००
तुम्ही नक्की कोठली गोष्ट ह.घ्या. ला सांगितली? कळले नाही.
खादाडमाऊ
25 Jan 2009 - 10:56 am | नितिन थत्ते
आधी सकाळी तुम्ही जी 'खरी माहिती' मागवली आहे ती कोणत्याच मर्त्य मानवाकडे नाही हे तुम्हाला संध्याकाळ्पर्यंत कळलेले दिसले. ते सर्वांना कळवले (माहिती शोधण्याचा प्रयत्न थांबवावा म्हणून). ते कळवलेले ह. घ्या सांगितले.
25 Jan 2009 - 1:16 pm | योगी९००
खरी माहिती कोणाकडेच नसावी हे आपण कसे काय म्हणता? मी खरे काय ते महाराजांनाच ठावूक हे सहज लिहिले होते.
तुमचा प्रतिसाद मी हलकाच घेतोय. पण दडवलेला इतिहास नक्कीच ह.घ्या. नाही.
माहिती शोधण्याचा माझा प्रयत्न चालूच राहील.
ताजमहाल हे तेजोमहालय आहे असे पु. ना. ओक सांगून गेलेत. सर्व लोकांनी ते हलकेच घेतलेय. म्हणूनच आपल्याला खरे काय ते ठावूक नाही.
उद्या २६/११ हे पाकिस्तान ने केलेले नसून भारतानेच हा बनाव रचला. असा ही इतिहास लिहिला जाईल. तो ही तुम्ही ह.घ्या. सांगणार का?
खादाडमाऊ
25 Jan 2009 - 1:40 pm | नितिन थत्ते
पु ना ओक जे लिहितात ती एक गंमतच आहे.
त्यांच्या पुस्तकात
"युरोप मधील कृस्ती (ख्रिस्ती नव्हे) आक्रमणांनी तेथील लोकांना जुना सारा इतिहास माहिती नाही. त्यामुळे त्यांना जीवसृष्टी उत्क्रांतीमधून निर्माण झाली आणि विश्वाची उत्पत्ती बिग बँग मधून झाली असले सिद्धांत मांडावे लागतात. खरा इतिहास ....पहिली पिढी ऋषीतुल्य पूर्वजांची होती.... वगैरे" असे लिहिले आहे. शब्द एक्झॅक्ट नसतील पण अर्थ असाच आहे.
म्हणून आम्ही पु ना ओकांना ह. घेतो.
25 Jan 2009 - 3:51 pm | योगी९००
तुमचे म्हणणे मला काही प्रमाणात पटते.
पु. ना. जे लिहितात ते सर्वच बरोबर किंवा मला पटते असे नाही. पण ती एक निश्चित गंमत नव्हती. कोणीही नंतर त्यांचा ताजमहालावरील लिखाणावर संशोधन करायला गेले नाही.
अर्थात आपल्या दोघांचेही त्यावर विचार वेगळे असू शकतात. पण मी लपवलेला इतिहास कधीच हलका घेणार नाही. जे काय चुक/बरोबर ते येऊ द्या ना जगासमोर..
खादाडमाऊ
25 Jan 2009 - 9:29 pm | नितिन थत्ते
पु ना ओकांनी डोळ्यावर जो चष्मा लावला आहे त्यामुळे त्यांना काही बाबतीत अंधत्व आले आहे. त्यामूळे ते बिग बँग वगैरे (आपल्या नसलेल्या) भलत्या प्रांतात ठासून विधाने करतात. ते वाचल्यावर मग सगळेच ह. घ्यावेसे वाटते.
मी त्यांचे भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका हे पुस्तक वाचले आहे.
सर्व पुस्तक भरून फक्त सोयिस्कर पुरावे उधृत केले आहेत. सर्व काही चांगले आहे ते हिंदूचेच (वैदिकांचे) आहे व जे वाईट आहे ते मुसलमानांचे / ख्रिश्चनांचे आहे असा आविर्भाव आहे. येथे सोयिस्कर पुरावे म्हणजे एका ठिकाणी एखाद्या माणसाचे म्हणणे ग्राह्य धरायचे, दुसर्या ठिकाणी त्याच माणसाचे म्हणणे अग्राह्य धरायचे (कारण जे म्हणायचे आहे त्याला सोयीचे नाही).
26 Jan 2009 - 3:24 am | योगी९००
सर्व काही चांगले आहे ते हिंदूचेच (वैदिकांचे) आहे व जे वाईट आहे ते मुसलमानांचे / ख्रिश्चनांचे आहे असा आविर्भाव आहे.
असे म्हणणे चुकच आहे. पु. ना ओक जरा वाहवतच गेले होते. मी त्यांचे "हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास" हे पुस्तक वाचले होते. त्यात सुद्धा ते बरचसे वाहवतच गेले होते. या पुस्तकात त्यांनी रामायण कसे झाले असावे ते मात्र छान सांगितले होते.
पण ताजमहालवरील बरेचसे मला पटत होते.
खादाडमाऊ
24 Jan 2009 - 8:35 pm | विजुभाऊ
१)शिवाजी महाराज हयात असताना त्यानी स्वतःच सम्भाजी राजेना पाच वेळा औरन्गजेबाच्या चाकरीत ठेवले होते.
पुरन्दराच्या तहातले ते एक कलम होते.
२)दुसर्या वेळेस त्यानी जेंव्हा बन्डखोरी केली तेंव्हा सम्भाजीराजे मिर्झाराजेंकडे होते.त्यावेळेस औरन्जेबाने त्याने दिलेरखानाच्या सोबत ठेवले होते.
३)तुकाराम महाराजांचा जमीनीच्या वादातून खून झाला. तो मम्बाजी या इसमाने केला. त्या घटने नन्तर तुकारामांचा भाऊ कुटुम्बासमवेत परागांदा झाला होता. या घटने नन्तर तुकारामांच्या अखत्यारीतली जमीन मम्बाजीच्या नावावर झाली होती.
( संदर्भःविद्रोही तुकाराम- ले. आ. ह. साळुंखे)
हिरोजी फर्जन्द हा शिवाजीमहारांजांचा सावत्र भाऊ होता.
सम्भाजीराजांना हिरोजी फर्जन्द स्वराज्याचे काही धन चोरुन नेताना सापडला त्यासाठी सम्भाजीमहाराजांनी हिरोजी फर्जन्दाना हत्तीच्या पायी दिले. हिरोजी फर्जन्दांची ताराबाईना साथ होती. सम्भाजी राजानी हिरोजी फर्जन्दाना शेवटपर्यन्त संधी दिली होती.
अनाजी दत्तो हे अष्टप्रधानांधले एक प्रधान हे संभाजीराजांच्या विरोधात होते.त्या काळात संभाजी राजांवर विषप्रयोगाचा कट केला गेला होता.
( सम्दर्भः सम्भाजी -विष्वास पाटील)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
25 Jan 2009 - 1:07 pm | योगी९००
विजुभाऊ,
आपल्या उत्तराबद्दल आभार..
खादाडमाऊ
26 Jan 2009 - 6:06 am | केदार
तो तह नंतर संपुष्टात आला होता. त्यांचा कडे नौकरी करायाला नंतर नेताजी पालकरांनापण पाठविले होते. ( हिंदुकरना नंतर) पण ते वेगळे आणी बापाचा व स्वराज्याच्या विश्वासघात करुन पळून जाने वेगळे. नंतर वापस आल्यावर पन्हाळ्यावर संभाजी महाराज नजरकैदेत होते.
आपण जो रेफ. देताय तो कामाचा नाही. इतिहासात कांदबंरीचा रेफ देऊन फायदा नसतो. "मराठा इतिहासास " अभ्यासन्यासाठी काही पुस्तके http://maiphil.blogspot.com/2008/11/blog-post.html इथे मिळतील.
इतिहास अभ्यासक :) केदार
30 Jan 2009 - 3:20 am | योगी९००
केदार,
आपल्या रेफबद्दल आभार.. यातील काही पुस्तके मी अगोदरच वाचली आहेत. बाकीची जशी मिळतील तशी वाचतो.
खादाडमाऊ
खादाडमाऊ
25 Jan 2009 - 9:55 pm | llपुण्याचे पेशवेll
बाकी आ. ह. साळुंखे यांचे लिखाण बरेचसे ह. घ्या. याच सदरात मोडणारे असते.
बाकी चालूदे.
(खुद के साथ बातां : सर्वत्रच चष्म्यांचा आणि चष्मेवाल्यांचा सुळसुळाट आहे. आणि प्रत्येक चष्मेवाला दुसर्याला आधी चष्मा उतरवायला सांगतो.
ते लोक विज्ञानात नवनवीन शोध लावतात आणि आम्ही इतिहासात)
पुण्याचे पेशवे
Since 1984
25 Jan 2009 - 10:10 pm | नितिन थत्ते
सर्वत्रच चष्म्यांचा आणि चष्मेवाल्यांचा सुळसुळाट आहे. आणि प्रत्येक चष्मेवाला दुसर्याला आधी चष्मा उतरवायला सांगतो.
सहमत