भुते

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
22 Jan 2009 - 11:06 am
गाभा: 

भुते
**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
**भुताचे पाय उलटे असतात का?
**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का????????
** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का????
**भुतान या राज्यात भुते असल्याने त्याला भुतान असे नाव पडल्याचि अख्ख्यायिका आपल्य ऐकिवात आलि आहे का???????

अविनाश

प्रतिक्रिया

दशानन's picture

22 Jan 2009 - 11:09 am | दशानन

मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने खवीस पाहिला आहे १००% खरं सांगतो आहे.... परवाच्या ठाणे कट्टाला ;)

कुबड्या खवीस !

=))

************

बाकी लोकं अजून भुत खेतावर विश्वास ठेवतात तसेच त्या बद्दल मिपावर चर्चा देखील सुरु केली जाउ शकते हे वाचुन अमंळ गमंत वाटली ;)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2009 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
= भुत होण्यासाठी आधी माणुस मरणे हे फार आवश्यक असते.

**भुताचे पाय उलटे असतात का?
== नाही. सचिन भुते ह्या माझ्या मित्रचे पाय सरळ आहेत. चांदोबा मधल्या भुतांना फक्त शेपट्या असतात

**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
== त्याल्या जेव्हडे वजन उचलता येणे शक्य आहे त्यावर अवलंबुन. परंतु असे भुताचे नाव असते हे आजच कळाले.

**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
== खरे आहे. माझ्याकडे सुद्धा २/३ आहेत. मी भुत पाहुनच त्याचा फोटो काढला आहे.

**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
== हो मल्लिका शेरावत, शबाना आझमी इ.इ.

**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध,
चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
== ३०००+ जास्त माहित आहेत. मिपाची सदस्य नावे वाचावीत.

**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का????????
== कल्पना नाही !

** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का????
== असत्य ! राम गोपाल वर्मानी हे कधिच सिद्ध केले आहे.

**भुतान या राज्यात भुते असल्याने त्याला भुतान असे नाव पडल्याचि अख्ख्यायिका आपल्य ऐकिवात आलि आहे का???????
== नाही परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी ह्यावरुन अविनाश हे नाव पडल्याचे ऐकले आहे. (ह.घ्या.)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

22 Jan 2009 - 11:21 am | नितिन थत्ते

समजुती वाचून मजा वाटली.

भुते कोणत्या पायात आधी मोजा घालतात?? किंवा
भुते कोणता पाय आधी मोज्यात घालतात???

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार

म स्त च
=)) =))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सुचेल तसं's picture

22 Jan 2009 - 11:51 am | सुचेल तसं

:D

आणि भुतांचे पाय उलटे असल्यास त्यांच्यासाठीचे मोजे पण उलटे शिवलेले असतात का?

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 12:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः हा विनोदच होता ना? मग मी हसते . =))

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सुचेल तसं's picture

22 Jan 2009 - 12:23 pm | सुचेल तसं

अर्थात!!!! :-)

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मिंटी's picture

22 Jan 2009 - 12:30 pm | मिंटी

हा विनोद होता ना ठिक आहे मग मी पण हसते

=)) =))

अनिल हटेला's picture

22 Jan 2009 - 12:16 pm | अनिल हटेला

भूत दाखवा ,दोन उलटे मोजे फ्र्री !!!! ;-) ( ह. घेणे.)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jan 2009 - 8:05 pm | llपुण्याचे पेशवेll

पण त्याचा आम्हाला काय फायदा ?उलटे मोजे तर फक्त भुतानाच उपयोगी पडतील ना!
वरती जोक केला आहे त्यामुळे इच्छुकांनी हसायला हरकत नाही.
पुण्याचे पेशवे
Since 1984

फ्रॅक्चर बंड्या's picture

22 Jan 2009 - 12:20 pm | फ्रॅक्चर बंड्या

आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????

लावसाटीन ( केस मोकळे सोडुन फिरते )...

ढ's picture

22 Jan 2009 - 12:35 pm |

भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का?

हो तर! येथे पहा !!!!!

छोटा डॉन's picture

22 Jan 2009 - 12:59 pm | छोटा डॉन

**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
म्हणजे काय ? आहेच मुळी, अहो "मी" की तो ....
ओळखलं नाहीत का मला ?
आमचे मास्तर कित्येक वेळा म्हणायचे "लेका डॉन्या माणुस आहेस की भुत ..! ". असो.
शिवाय आम्ही रात्री-अपरात्री हिंडतो, विचीत्र कपडे घालतो, केस वाढवतो, देवळात चुकुन जात नाही, अक्राळ विक्राळ आवाजात ओरडतो / गाणी म्हणतो ...
सबब आम्हाला "भुत" म्हणुन जाहीर करण्यास प्रत्यवाय नसावा ...!

**भुताचे पाय उलटे असतात का?
सापेक्ष आहे हो सगळे.
आमच्या जमातीत एक "अल्बर्ट आईस्टाईन" नावाचे भुत होते, त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
काय कल्पना नाय बॉ ..!
चौकशी केली पाहिजे, जर आमच्या राज्यात असे हलकट प्रकार घडत असतील तर त्यांच्या आम्ही कडकडुन निषेध करतो.
आत्मक्लेष म्हणुन २ रात्री "रक्त पिणार नाही" असे जाहीर करतो.

**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
बरेच ऽऽऽऽ
माझ्या ओर्कुट अल्बम / पिकासा वर अक्षरशः ढीगाने फोटो आहेत, बरेच फोटो मिपावरही प्रसिद्ध झाले आहेत.
मग बोला आता कोन म्हणतो फोटो निघत नाय ते ????

**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
हे पहा असे आमच्या "मैत्रिणींबद्दल" प्रश्न विचारणे फारच वैयक्तीक होते.
आम्हाला माहित आहे व अनुभवही आहे, पण आमच्या वैयक्तीय आयुष्याबद्दल कुनालाही कसलेही स्पष्तीकरण देण्यास आम्ही बांधील नाही ...
आमच्या भुत समाजात अजुन "माहितीचा अधिकार" आलेला नाही ....!

**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
बरेच , ह्यातले बरेच प्रकार आपणास मिपाकरातच पहायला मिळतील ...
आमचे डांबिसकाका येऊ द्यात, ते देतील उत्तरे ...!

**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का????????
जरी भरपुर मैत्रिणी असल्या तरीही आम्ही अजुन "अविवाहीत" आहोत व अजुनपर्यंत तरी आमच्यामुळे कुठल्याही स्त्रीला "बाळंतपण" करायची पाळी आली नाही त्यामुले आम्हाला ह्या विषयाचे "ठार अज्ञान" आहे.
क्षमस्व ..!
त्याआधीचे काही विचारल्यास व आमचा मुड असल्यास आम्ही सांगु पण शकेन ..!

** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का????
कुणाला म्हणायचे आहे?
माणसाला दिसत नाही का भुताला ?
आम्ही तर रोज आरश्यात पाहुन तेल्-पावडर्-भांग करतो बाबा, मग दिसत नाही असे कसे म्हणाता येईल ...
आता फुडच्या आमुश्येला एक माणुस पकडुन आणतो, त्याला उलटा टांगतो व विचारतो " बोल, माझे आरशात प्रतिबिंब दिसते का ? "

**भुतान या राज्यात भुते असल्याने त्याला भुतान असे नाव पडल्याचि अख्ख्यायिका आपल्य ऐकिवात आलि आहे का???????
फक्त भुतानच का ?
अजुन बरेच देश आहेत साहेब, आपल्यापर्यंत माहिती पोहचलेली दिसत नाही असे वाटते आहे. असो.
हे घ्या "भुतिस्थान, भुतला देश, भुराण, भुराक, भु-लंका, भुमेरिका, भुंग्लंड , भुर्मनी, भुटली, भुनडा , भुतस्ट्रेलिया , भुपान .....इ.इ. " , ही यादी न संपणारी आहे.
आम्ही नवे ग्रह शुद्धा शोधुन काढले आहेत जसे की "भुतचंद्र , भुंगळ, भ्युपिटर, भ्युपच्युन, भुरु, भुनी .... "
आता बोला ???

------
छोटा भुत-डॉन

नितिन थत्ते's picture

22 Jan 2009 - 5:06 pm | नितिन थत्ते

आत्मक्लेष म्हणुन २ रात्री "रक्त पिणार नाही" असे जाहीर करतो.

तुम्ही कोणत्या प्रकारचे भूत?
ड्राकुला की डास ?

छोटा डॉन's picture

22 Jan 2009 - 5:22 pm | छोटा डॉन

>>तुम्ही कोणत्या प्रकारचे भूत? ड्राकुला की डास ?
अहो साहेब, "नावात काय आहे? " असे आमच्याच जमातीतील एक हुशार भुत ज्यांचे नाव "भुतेस्पियर" आहे त्यांचे सुप्रसिद्ध वाक्य आहे.
तर काय फरक पडतो त्याने ...
असो.
सोईसाठी तुम्ही आम्हाला "ड्रॅक्युला" म्हणु शकता ...!
------
छोटा डॉन

डॉन्या
=)) =)) =))
प्रतिक्रीया की काय म्हणायची . तु स्वतःवर अधिक छान प्रकारे लिहु शकतोस हे सर्वमान्य झाले ;) (ह.घे.)

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 1:05 pm | विनायक प्रभू

च्या मारी भुतांवर पी.एच्.डी करा की लेको.सपश्टीकरणासाठी मला भेटा.
बारा पिंपळावरचा मुंजा

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 1:19 pm | विनायक प्रभू

भुतांची लग्न होतात का? अवेळी केमिस्ट ची गरज लागली तर ते काय करतात.

दिपक's picture

22 Jan 2009 - 1:21 pm | दिपक

मोजे वापरत असतिल. :)

झेल्या's picture

22 Jan 2009 - 1:22 pm | झेल्या

अहो, केमिस्ट लोकांची पण भुते होत असतीलच की... ;)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

अवलिया's picture

22 Jan 2009 - 2:47 pm | अवलिया

वा!!!
माझीच चर्चा चालु पाहुन अंमळ आनंद वाटला.
चालु द्या :)

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

मॅन्ड्रेक's picture

22 Jan 2009 - 4:44 pm | मॅन्ड्रेक

- भुत असतातच. नहितर आपण माणूस असुन जिवन्त आहोत हे कस बर कळेल.

अभुतपुर्व

आगाऊ कार्टा's picture

22 Jan 2009 - 4:49 pm | आगाऊ कार्टा

**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
माझ्या माहितीप्रमाणे उदमांजर हे एका प्राण्याचे नाव आहे आणि ते मुंग्या खाते.
**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
हो. हडळ, अळवट, जीन, देवचार, ब्रम्हराक्षस, आग्या वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jan 2009 - 8:11 pm | llपुण्याचे पेशवेll

उदमांजराचा फोटो काढता येतो कामोडते.'सस्तन प्राणी' या वर्गात मोडते.
येथे वाचा. यात वर्णिलेल्या परिसरात उदमांजर सापडते.
पुण्याचे पेशवे
Since 1984

सुहास..सदेव हसनार्..'s picture

22 Jan 2009 - 8:25 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

आमच्या लहानपणी एक कतारिण होती..

लाल आणी मोठे डोळे.विरळ काळे पा॑ढरे केस्,बघताक्षणी भिती वाटायची...लोक म्हणायचे ती रात्री घरावर निशाणी लावायची..आणी त्या घरातील कोणीतरी ....खल्लास..

एक दिवस तिच खपली.....पण अजुन तिचा अवतार आठवला की रामरक्षा म्हणावीशी वाटते.....

सुहास

भुत न पाहीलेला...पण नावाने घाबरणारा

विकास's picture

22 Jan 2009 - 9:22 pm | विकास

भुतांना बघायचे असलेच तर सोपा उपाय म्हणजे - शिते दिसतील अशी) ठेवावीत. (शितं भाताची पण असू शकतात, पण पैशाच्या शितांना जास्त यश येऊ शकते..) थोरामोठ्यांनी सांगून ठेवले आहेच की, "असतील शिते तर जमतील भुते". मग जे कोणी आपल्याला त्याच्या जवळपास दिसेल त्याला भुत समजावे. (तुम्ही सोडून, कारण तुम्ही चाचणी करता आहात!) :-) फक्त ज्याला कोणाला पहाल त्याल "भुत" असे संबोधून एकदम ओरडू नका. कारण प्रकरण चिघळू शकते आणि तुमचंपण भुत करण्याच्या मागे अशी भुते लागू शकतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) लय भारी विकासराव.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

धनंजय's picture

22 Jan 2009 - 10:01 pm | धनंजय

लय भारी!

शिवाय जाम भीती वाटली की मागे बघायचे. पाठीमागे ब्रह्मराक्षस हमखास दिसतो!

अवलिया's picture

22 Jan 2009 - 11:17 pm | अवलिया

लय भारी

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विकास's picture

22 Jan 2009 - 11:19 pm | विकास

शिवाय जाम भीती वाटली की मागे बघायचे. पाठीमागे ब्रह्मराक्षस हमखास दिसतो!

एकदम बरोब्बर!

बाकरवडी's picture

23 Jan 2009 - 10:41 pm | बाकरवडी

गूढ व्यक्ती या भुतं असू शकतात का ?