गाभा:
मंडळी
मला माझा सध्याचा Laptop बदलायचा आहे. Mackbook की Dell ( Studio /XPS) अश्या द्विधा मनस्थितीत आहे. मुख्य कारण Mackbook करता ३०/४०% जास्त किंमत द्यावी का? ऊगाच तर ब्रांड्च्या मागे जावून जास्त पैसे देत नाही ना हा मुद्दा आहे. आता मुंबईत Appleची विक्री पश्चात सेवा आहे त्यामुळे तो प्रश्न नाही.
तज्ञ मिपाकर काही मदत करु शकतील का ?
मोहन
प्रतिक्रिया
21 Jan 2009 - 11:47 am | नीलकांत
मॅकबुक सोबत तुलना आहे त्यामुळे कुणी मॅकचा जाणकार तुम्हाला सांगेल. कदाचीत सर्कीट माहिती देऊ शकतील. बाकी डेल झकास आहे.
डेलचा एक्सपीएस तर बोलायलाच नको.
नीलकांत
21 Jan 2009 - 2:41 pm | सर्किट (not verified)
मॅकसाठी शंभर टक्के जरी जास्त किंमत द्यावी लागली, तरी "इट्स वर्थ इट!" (उगाच नॉर्टन वगैरे लागत नाही. मॅकसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस अत्यंत स्वस्तात मिळते. आणि ओपन-ऑफिस, किंवा नियो-ऑफिस फुकट मिळते. जीपीएल बर्यच गोष्टी चालतात. दर दोन दिवसांनी नवीन व्हायरस ची भीती नसते.)
-- सर्किट
21 Jan 2009 - 2:44 pm | दशानन
१००%
सहमत.
तसेह्च मॅक घेऊन चाललात / वापरलात तर जनमनवर एक वेगळिच छाप पडेल... हा एक्र्ट्रा फायदा ;)
21 Jan 2009 - 2:51 pm | सर्किट (not verified)
तसेह्च मॅक घेऊन चाललात / वापरलात तर जनमनवर एक वेगळिच छाप पडेल... हा एक्र्ट्रा फायदा
च्यायला, माझा म्याक घेऊन पुण्यात दोनएक आठवडे फिरलो, वैशाली, रूपाली, कॅफे कॉफी डे, सगळीकडे नेटकनेक्ट कार्ड लावून ब्रावझिंग केले. खटाखटा कळा दाबल्या. पण कुणावरच काहीही छाप पडली नाही. छाप कशी पाडावी, हे हार्डवेअरवर अवलंबून नसते, जैन साहेब. सॉफ्टवेअर इज द किंग !!!
-- सर्किट
21 Jan 2009 - 2:54 pm | दशानन
ते खऱ वो !
पण कोणाच्या हाती मॅक असला की आम्ही तर नक्कीच मागे फिरुन त्याचे थोबाड पाहतोच ;)
पण खरं सांगु का. गुडगावच्या जी. डी. गोयंका स्कुल ने तर मॅकची पार बेज्जती करुन टाकली आहे येथे.. च्या मायला पाचवीच्या पोरांपासून मॅक कंप्लसरी केला आहे त्यांनी.... छोटि छोटी मुलं मॅक घेऊन फिरतात... त्याचा पण हेवा वाटतो कधी कधी !
21 Jan 2009 - 3:03 pm | सर्किट (not verified)
राजे,
बघा त्या शाळेत ऍडमिशन मिळते का, ते. ईट्स वर्थ ईट, आय टेल यू !
-- (१ इन्फाइनाईट लूप वरचा) सर्किट
21 Jan 2009 - 3:05 pm | दशानन
नाय ओ, लई मोठा जॅक पाहीजे... जिंदलच्या पोरासाठी भाजपा मंत्र्याचा जॅक नेला हुता मी ते आठवतं अजून ;)
21 Jan 2009 - 12:09 pm | दशानन
मॅक व डेल अथवा इतर विंडोज वाल्या लॅपटॉपची तुलना होऊच शकत नाही !
डेल घ्यावा XPS सिरिज मध्ये मस्त आहे !
21 Jan 2009 - 12:10 pm | मनिष
Macbook ची विक्री पश्चात सेवा मिळाली तरी मेमरी, हार्ड डिस्क हे खूप महाग आहेत. Mackbook दिसायला खूपच चांगले आहे पण किंमत जास्त आणि विक्री पश्चात सेवा महाग आहे. शिवाय तुम्ही Mac OS सोबत किती comfortable ते महत्वाचे. विंडोज साठी जास्त सॉफ्ट्वेअर स्वस्तात उपलब्ध आहे, Mac चे तसे नाही. तो विचार नक्की करा.
XPS फारच चांगला आहे.
21 Jan 2009 - 12:32 pm | केवळ_विशेष
मॅक बद्दल असं ऐकण्यात आलंय की सिस्टिम अपग्रेड करण्यात अडचणी येतात...
उदा. काही सॉफ्टवेअर चे ड्रायव्हर्स किंवा हार्ड डिस्क कपॅसिटी वाढवणे तत्सम गोष्टी करणं अवघड आहे असं ऐकलंय ते खरं आहे का?
21 Jan 2009 - 12:32 pm | दशानन
http://www.techtree.com/India/Reviews/Dell_XPS_M1530/551-97208-616.html
21 Jan 2009 - 2:32 pm | मृदुला
मला एक चिमुकला संगणक घ्यायचा आहे. इंटेल ऍटम वाला. १०.२ स्क्रीन असलेले ३ संगणक सापडले, लेनोवो, एचपी आणि सॅमसंग.
एचपी देखणा आहे, पण सॅमसंगचे कॉन्फिगरेशन जास्त चांगले आहे.
कोणाचा काही अनुभव?
21 Jan 2009 - 2:43 pm | सर्किट (not verified)
एसरचा चिमुकला संगणक सध्या येथे ३०० डॉलर्स ला उपलब्ध आहे, म्हणजे साधारणत: १४००० रुपयांना. (पण मी ऍपलच्या स्वस्त संगणकाची वाट पाहतोय. बेसिकली, आयफोन विथ अ बिग स्क्रीन !)
-- सर्किट
21 Jan 2009 - 2:53 pm | मृदुला
एसरचा ईपीसी बघितला. पण त्याची बांधणी तितकी मजबूत वाटली नाही. एचपी बांधणीच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम वाटला, पण रॅम अपग्रेडेबल नाही, २च युसबी पोर्ट म्हणून त्याला जरा कमी गुण मिळाले.
सध्या मी मॅकबुक वापरते आहे, पण देवनागरी लिहायला फारच त्रासदायक आहे. म्हणून मोठे लेखन करण्याच्या दृष्टीने एक टिल्लू विन्डोज यंत्र घ्यावे असा विचार केला.
21 Jan 2009 - 3:10 pm | सर्किट (not verified)
सध्या मी मॅकबुक वापरते आहे, पण देवनागरी लिहायला फारच त्रासदायक आहे.
चूक चूक चूक....
देवनागरीसाठी सर्वोत्कृष्ट सोय म्हणजे म्याक !!!!
अत्यंत सोपी अक्षरप्रणाली म्याक्ची. (गमभन पेक्षाही.)
निषेध !!!
(संपादकः असले वाईट प्रतिसाद काढून टाकत जा, आधीच.)
-- सर्किट
21 Jan 2009 - 5:49 pm | मोहन
निलकांत, सर्किट, जैन,मृदुला,मनिष, के-वि आणि ई. मिपाकर- प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
मोहन
21 Jan 2009 - 6:36 pm | ब्रिटिश
ऍप्लीकेशन कमर्शीयल असेल तर डेल एक्स्पीएस बेस्ट
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
21 Jan 2009 - 6:44 pm | विजुभाऊ
मला वाटले की गटण्याने हा लेख ल्हिलाय म्हणून
( असेल सुद्धा त्याचा वेगळा आयडी)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
21 Jan 2009 - 8:27 pm | शंकरराव
मला वाटले की गटण्याने हा लेख ल्हिलाय म्हणून
( असेल सुद्धा त्याचा वेगळा आयडी)
मला बी असेच वाटले
=)) =)) =))
21 Jan 2009 - 7:48 pm | अवलिया
लॅप टॉप म्हणजे काय ? की यासाठी वेगळा धागा काढावा लागेल?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी