आता कुठे ...... ?
आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा तू द्यायला निघालीस
पण आता तर तुझ्या खर्या परीक्षांना सुरवात होणार
अशा अजून खूप सुखदु:खाच्या परीक्षा तू देणार आहेस
आकाशाच्या सरोवरात फुलणारे जीवन तुला उजळायचे आहे
त्यासाठी तुला स्वत:लाच दीप व्हायचे आहे
आणि इतरांना ज्ञानाचा प्रकाश द्यायचा आहे..
जीवनातल्या ह्या खडतर प्रवासात
तुला रक्ताळलेल्या पायांनी चालायचंय
आणि सुखाला मागे सारून , दु:खाला कवटाळायचंय
शिक्षणाने शिकवलं, तुला दुसर्यासाठी झिजणं
पण त्यासाठी विसरू नको स्वत:साठी फुलणं
दुनियेच्या शाळेत, व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यावर्
गुंफत रहा मायेची वीण..
जीवनाच्या सप्तपदीतून अनुभवाचे गीत तुला गायचे आहे
अन धरतीच्या कागदावर, समुद्राच्या शाईने
आभाळाएवढ्या मनाने भारताचे नाव लिहायचे आहे
शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब तुला उजळायचा आहे
त्यासाठी प्रत्येक फुलाला फुलण्याचा अधिकार तुला द्यायचा आहे
आजच्या स्पर्धेच्या युगात आयुष्याचे गीत मधुरतेने होण्यास
अभ्यासाच्या सुरात , ज्ञानाच्या तलत अनुभवाच्या बोलात
मधुर शब्दांत जीवनाचे गीत तुला गायचे आहे..
पूर्वी अंधाराला तुझे छोटे डोळे घाबरत होते
पण याच डोळ्यांनी तुला सार्यांना प्रकाश दाखवायचा आहे
चिमणीसारख्या चिवचिवलेल्या धरतीच्या प्रांगणात कधी काळी
इवलिशी पावलं टाकत तू आली होतीस
पण याच धरतीच्या प्रांगणात उद्या तुला ताठ मानेने
आदर्श पावले टाकीत यायचे आहे..
लक्षात ठेव -
अंधाराला घाबरणे सोपे असते
पण दिवा लावणे खूप अवघड असते
म्हणून सांगतो , फूल म्हणून जगताना
माती बनून दुसऱ्यांना सुगंध द्यायला विसरू नको
स्पर्धेच्या ह्या युगात प्रवेश करण्याआधी ,
जाता-जाता पित्यासारख्या शिक्षकाचे एवढे लक्षात ठेव
विद्यादानासारखे पवित्र दान आम्ही केले,
त्याचे चीज तुला करून दाखवायचे आहे
अन् सार्या संकटाना तोंड देऊन ,
यशाचे शिखर तुला गाठायचे आहे
आणि सुखदु:खाच्या या विशाल जीवनात
यशस्वी तुला व्हायचं आहे
शाळेत नववीत असताना ही कविता केली होती.
-- क्षितीजा
शब्द मनीचे फुललेल्या कळीचे
प्रतिक्रिया
7 Jan 2009 - 4:43 pm | सखाराम_गटणे™
>>शिक्षकांचे विद्यार्थिनीस पत्र . . . . . . .
>>शाळेत नववीत असताना ही कविता केली होती.
दोन्ही कसे काय शक्य आहे?????
बाकी कवीता आवड्ली
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
7 Jan 2009 - 5:28 pm | क्षितीजा
तेव्हाच केली होती.. त्यावर्षीच्या शाळेच्या वार्षिक अंकात छापली होती..
धन्यवाद :)
7 Jan 2009 - 4:47 pm | आपला अभिजित
आता कुठे ...... ?
आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा तू द्यायला निघालीस
पण आता तर तुझ्या खर्या परीक्षांना सुरवात होणार
अशा अजून खूप सुखदु:खाच्या परीक्षा तू देणार आहेस
आकाशाच्या सरोवरात फुलणारे जीवन तुला उजळायचे आहे
त्यासाठी तुला स्वत:लाच दीप व्हायचे आहे
आणि इतरांना ज्ञानाचा प्रकाश द्यायचा आहे..
जीवनातल्या ह्या खडतर प्रवासात
तुला रक्ताळलेल्या पायांनी चालायचंय
आणि सुखाला मागे सारून , दु:खाला कवटाळायचंय
शिक्षणाने शिकवलं, तुला दुसर्यासाठी झिजणं
पण त्यासाठी विसरू नको स्वत:साठी फुलणं दुनियेच्या शाळेत ,
व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यावर्
गुंफत रहा मायेची वीण..
जीवनाच्या सप्तपदीतून अनुभवाचे गीत तुला गायचे आहे
अन धरतीच्या कागदावर, समुद्राच्या शाईने
आभाळाएवढ्या मनाने भारताचे नाव लिहायचे आहे
शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब तुला उजळायचा आहे
त्यासाठी प्रत्येक फुलाला फुलण्याचा अधिकार तुला द्यायचा आहे
आजच्या स्पर्धेच्या युगात आयुष्याचे गीत मधुरतेने होण्यास
अभ्यासाच्या सुरात , ज्ञानाच्या तालात (?), अनुभवाच्या बोलात
मधुर शब्दांत जीवनाचे गीत तुला गायचे आहे..
पूर्वी अंधाराला तुझे छोटे डोळे घाबरत होते
पण याच डोळ्यांनी तुला सार्यांना प्रकाश दाखवायचा आहे
चिमणीसारख्या चिवचिवलेल्या धरतीच्या प्रांगणात कधी काळी
इवलिशी पावलं टाकत तू आली होतीस
पण याच धरतीच्या प्रांगणात उद्या तुला ताठ मानेने
आदर्श पावले टाकीत यायचे आहे..
लक्षात ठेव -
अंधाराला घाबरणे सोपे असते
पण दिवा लावणे खूप अवघड असते
म्हणून सांगतो , फूल म्हणून जगताना
माती बनून दुसऱ्यांना सुगंध द्यायला विसरू नको
स्पर्धेच्या ह्या युगात प्रवेश करण्याआधी ,
जाता-जाता पित्यासारख्या शिक्षकाचे एवढे लक्षात ठेव
विद्यादानासारखे पवित्र दान आम्ही केले,
त्याचे चीज तुला करून दाखवायचे आहे
अन् सार्या संकटाना तोंड देऊन ,
यशाचे शिखर तुला गाठायचे आहे
आणि सुखदु:खाच्या या विशाल जीवनात
यशस्वी तुला व्हायचं आहे.
टीप : कवितेतील विचार उत्तम आहे. विशेषतः नववीत केलेली असेल, तर अप्रतिमच. चुका दाखवण्याचा उद्देश नाही. पण एवढ्या ढोबळ चुका राहिल्या, तर कवितेतल्या भावनेची मजा जाते.
7 Jan 2009 - 5:34 pm | विसोबा खेचर
पण एवढ्या ढोबळ चुका राहिल्या, तर कवितेतल्या भावनेची मजा जाते.
असहमत आहे. कविता वाचताना मला तसे वाटले नाही!
तात्या.
7 Jan 2009 - 5:41 pm | प्रभाकर पेठकर
पण एवढ्या ढोबळ चुका राहिल्या, तर कवितेतल्या भावनेची मजा जाते.
सहमत आहे.
7 Jan 2009 - 5:26 pm | क्षितीजा
चुका दाखवल्याबद्दल धन्यवाद :)
तिथे ज्ञानाच्या तलत अनुभवाच्या बोलात आहे
7 Jan 2009 - 5:32 pm | विसोबा खेचर
सुंदर कविता..!
शुद्धलेखनाचे आणि भाषाशुद्धीचे फॅड मिपावर नाही. अजूनही येऊ द्यात उत्तमोत्तम कविता. इथे त्या रसिकतेने वाचल्या जातील व त्यांना दादही दिली जाईल..
तात्या.
8 Jan 2009 - 10:20 am | क्षितीजा
तात्यासाहेब,
आपण प्रतीसाद धीर देणारा
खुप खुप धन्यवाद :)
9 Jan 2009 - 2:14 am | झुमाक्ष (not verified)
...मिपावर नाही ते ठीक आहे. पण निदान शिक्षक तरी आणि ते सुद्धा विद्यार्थिनीला पत्र लिहिताना शुद्धलेखनाच्या चुका करणार नाहीत असे वाटते. (विद्यार्थ्यांसमोर चुकीचा आदर्श निर्माण होतो वगैरे वगैरे.)
अर्थात हल्ली काही सांगता येत नाही म्हणा!
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
9 Jan 2009 - 2:18 am | आजानुकर्ण
हेच म्हणतो. आजकाल काही सांगता येत नाही.
आपला
(शुद्धलेखनाला फॅड न मानता मराठीचे सौंदर्य मानणारा व विद्रूप मराठी न आवडणारा) आजानुकर्ण
7 Jan 2009 - 5:50 pm | आपला अभिजित
चुकांचा उल्लेख करण्यामागच्या भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद क्षितीजा!
8 Jan 2009 - 10:19 am | क्षितीजा
आपण सांगितल्याप्रमाणे सुधारणा केल्या आहेत.
परत एकदा धन्यवाद :)
7 Jan 2009 - 5:43 pm | मदनबाण
कविता खुप सुंदर आहे... :)
अवांतरः---
आयुष्यातली महत्वाची परिक्षा तू द्यायला निघालीस
(च्यामारी इतक्या केट्यांच्या परिक्षा दिल्यात की आता परिक्षा म्हंणल तरी साला घाम फुटतो..इशेशत: गणित....:) )
(विध्यार्थी)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
7 Jan 2009 - 6:35 pm | अनिल हटेला
वादच नाही..आणी ती नववीत असताना केलेली म्हणुन पैकीच्या पैकी मार्क्स..
पूलेशु..... :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
8 Jan 2009 - 10:38 am | क्षितीजा
अनिलजी आणि मदणबाण
धन्यवाद :)