इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
प्रतिक्रिया
11 Mar 2026 - 9:08 pm | चंद्रसूर्यकुमार
१. ओमानच्या सलाला बंदरामधील तेल साठवायच्या टाक्यांवर इराणी ड्रोनने हल्ला केला आहे.
२. बाहरेन सरकारची विमान कंपनी गल्फ एअरने आपली विमाने बाहरेनबाहेर हलवली आहेत आणि आपली सेवा स्थगित केली आहे. बाहरेन सिंगापूरसारखाच छोटा देश आहे त्यामुळे त्या देशात एकच विमानतळ आहे. तिकडच्या भारतीयांना बाहेर पडायचे असेल तर सौदीतील अल खोबारमार्गेच यावे लागेल. https://gulfnews.com/business/aviation/gulf-air-all-inbound-outbound-and...
एकंदरीतच या युध्दाची मोठी किंमत बाहरेन आणि कतारला मोजावी लागत आहे असे दिसते.
11 Mar 2026 - 9:20 pm | श्रीगुरुजी
विनाकारण संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटून प्रचंड वित्तहानी, जीवितहानी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ट्रंप, नेतनयाहू, इस्राएल व अमेरिकेला मोठा तडाखा बसून ते युद्धात पराभूत व्हावे अशी इच्छा आहे.
11 Mar 2026 - 9:59 pm | चंद्रसूर्यकुमार
तात्याने जी-सात देशांबरोबर कॉलमध्ये सांगितले आहे की आमच्या हल्लाचा जोरदार प्रभाव (tremendous impact) दिसत आहे.
व्हिएटनाम युध्दात सुरवातीला जॉन्सनची भाषा आणि इराक युध्दात सुरवातीला धाकल्या बुशची भाषाही अगदी अशीच होती :(
11 Mar 2026 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली
अमेरिकेला आपल्या भूमीवर थारा देणाऱ्या इराणच्या आजूबाजूच्या गल्फ देशांना इराणने आजीबात सोडू नये, त्यांचे कंबरडे मोडावे! इस्राईल विरुद्ध बोंबलणारे मिडल इस्टचे दुटप्पी देश इराणने इघडे पाडावेत!
11 Mar 2026 - 11:59 pm | आग्या१९९०
ट्रम्प म्हणतोय इराणवर हल्ला करण्यासाठी काही उरलेच नाही. ह्याचा अर्थ इराणची सगळी अण्वस्त्रे नष्ट केली असावीत.
खाडी देशातील अमेरिकाधार्जिणे देशांची भविष्यात परिस्थिती खूपच खराब होणार. ह्या देशांनी अमेरिकन कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची युद्धादरम्यान जितकी काळजी घेतली तितकी पूर्वेकडील देशातून आलेल्या कर्मचाऱ्यांची घेतली नाही. सध्या त्यांना कामावर रुजू होण्यासाठी दबाव आणला जातोय.