गाभा:
The German philosopher Arthur Schopenhauer said: “Man does at all times only what he wills, and yet he does this necessarily. But this is because he already is what he wills.” — Chapter 5, On the Freedom of the Will
Albert Einstein paraphrased Schopenhauer in his essay My View of the World (1931): “A man can do as he will, but not will as he will.”
जास्त काही लिहिण्याच्या फंदात पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे. आता वरील कोट जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्याला थोतांड म्हणणे वगैरे चुकीचे आहे. आणि तसेच असेल तर मग खरंच आपल्या मनात ज्या इच्छा निर्माण होतात त्यांवर नियंत्रण कोणाचं असतं? कोण ह्या इच्छा आपल्या मनात आणतो? कारण याच इच्छांच्या मागे आपलं शरीर काम करण्यासाठी झटत राहत.
प्रतिक्रिया
28 Nov 2025 - 12:17 pm | शाम भागवत
संक्षींची गैरहजेरी जाणवतेय. ;)
28 Nov 2025 - 1:03 pm | गवि
He is the you in you & I is the me in you.
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? ;-)
28 Nov 2025 - 8:12 pm | गवि
हा प्रतिसाद पुलंची लेगसी वापरून विनोदी अशा अर्थाने लिहीला आहे हे खरेच. पण तो अगदीच बाष्कळ नाही. किंवा निरर्थक नाही.
किंबहुना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक निरर्थक नाही.
इच्छा आणि ती मिळवण्यासाठीचे प्रयत्न हे अनेक अद्वैतांपैकी एक आहे. या दोन्ही गोष्टी एकाच क्षणी जन्मतात. त्यामुळे अ ही गोष्ट मनुष्याच्या स्वतःच्या इच्छेने झाली आणि ब ही इतर कोणाच्या इच्छेने झाली असे वेगवेगळे काढण्यात अर्थ दिसत नाही.
मुळात मनुष्य किंवा जीवन अस्तित्वात असणे हीच एक अनावश्यक उचापत आहे. ती इच्छा तरी मुळात कोणी केली?
इच्छा आणि ईषणा.. इच्छा ही मानव करू शकतो. ईषणा मात्र ईश्वर करू शकतो असे मानले जाते.
wish, volition.. असा फरक. आता त्यासाठी ईश्वर मानावा की नाही हा पुढचा मुद्दा. ज्याची त्याची "इच्छा".. :-)
28 Nov 2025 - 2:54 pm | Bhakti
"आपण स्वतः "
इच्छा या अनेक प्रकारच्या असतात.त्यातल्या ,जसे अन्न,पाणी, वस्त्र,निवारा मिळवण्याची 'इच्छा' नसेल तरीही ती मिळाल्याशिवाय तुम्ही जगूच शकणार नाही.
जर कायम निष्क्रियच राहायचं ठरविल्यास,समोर अनेक भौतिक गोष्टी असूनही तिचा 'इच्छा' नसल्याने उपयोग करूच शकत नाही.
इच्छा आहे पण कृतीचं करणार नसाल तर 'आनंदी' राहायची 'इच्छा' कशी पूर्ण करणार??
आपल्या काही कुतूहालांचे रूपांतर इच्छेत होतं आणि कृतीचे इच्छापूर्तीत.
29 Nov 2025 - 10:30 am | उपयोजक
एक उदाहरण देतो लता मंगेशकर यांचा गाण्याकडे ओढा होता. तर त्यांचा गाण्याकडेच का ओढा होता ?जगात इतकी कौशल्य , कला , विद्या आहेत त्या सगळ्यातून गाण्याकडेच ओढा असण्याचे म्हणजेच गायनाची इच्छा असण्याची कारण काय? हे कोणी नियंत्रित केले? त्या नृत्यांगना , शिक्षिका , शास्त्रज्ञ का झाल्या नाहीत ? गायिकाच का झाल्या?
29 Nov 2025 - 10:43 am | युयुत्सु
तर त्यांचा गाण्याकडेच का ओढा होता ?
संधीची उपलब्धता, अंगभूत कौशल्ये, पोषक वातावरण या नुसार व्यक्ती घडत जाते.
हे कोणी नियंत्रित केले?
याचे उत्तर खाली दिले आहेच
29 Nov 2025 - 11:38 am | Bhakti
ओढा होता.. त्यांना जी आवड होती त्यातच त्यांनी खुप मेहनत प्रयत्न केले आणि त्या गायिका झाल्या.त्यांनी सुरूवातीला अभिनयदेखील केला पण गायनात अधिक मेहनत घेत राहिल्या.
मला शास्त्रज्ञ व्हायचे होते पण मी त्यादृष्टीने मेहनतच केली नाही त्यामुळे नाही झाले.
29 Nov 2025 - 11:54 am | युयुत्सु
मला शास्त्रज्ञ व्हायचे होते पण मी त्यादृष्टीने मेहनतच केली नाही त्यामुळे नाही झाले.
तुमच्याकडे शास्त्रज्ञ होण्यासाठी अंगभूत कोशल्ये - उदा० जिज्ञासा, प्रयोग, चिकित्सा इ० ची आवड, प्रॉब्लेम सॉल्व्हींग स्किल्स या पैकी काय काय होते/आहे?
29 Nov 2025 - 12:32 pm | Bhakti
मी आठवीलाच बाबांना मायक्रोस्कोप घ्यायचा हट्ट केला.सायन्सचे शिक्षण घेतांना ATC,PTC खुप प्रयोग केले.पुढे PTC तर खुप नाविन्यपूर्ण प्रयोग केले.पण मी पूर्ण झोकून,अनेक त्याग ,मेहनत केली नाही.I just bounded my knowledge as normal bread earner,not learner.
28 Nov 2025 - 6:15 pm | कॉमी
जगात नॉन फिजिकल किंवा नॉन नॅचरल असे काही नाही, किंवा, तसे काही असले तरी त्याची माहिती मिळवणे शक्य दिसत नाही.
त्यामुळे, आपले विचार, इच्छा इत्यादी सर्व गोष्टी भौतिक प्रक्रियेचा भाग आहेत.
डोंगरावरून पडणाऱ्या धोंड्याला दिशा निवडण्याचे किती स्वातंत्र्य असते ?
28 Nov 2025 - 7:17 pm | युयुत्सु
मानवी मेंदूतील उपाग्र खंड भाग इच्छांवर नियंत्रण ठेवायचं काम करतो पण ते एका मर्यादेपर्यंतच. संप्रेरकांच्या उद्रेकामुळे भाग निष्प्रभ होऊ शकतो.
29 Nov 2025 - 8:22 am | युयुत्सु
आणखी एक वेगळा दृष्टीकोन
वैयक्तिक पातळीवर इच्छांचा नियंत्रक माणसाचा उपाग्रखण्ड असला तरी आपण ज्या समाजात राहतो तो देखिल आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असतो. कमकुवत उपाग्रख्ण्ड असलेल्या व्यक्तींना इच्छांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अनाहूत सल्ले देण्यापासून, प्रयत्नात अडथळे निर्माण करणे हे एकप्रकारचे आपल्या इच्छांचे नियंत्रण किंवा दमनच असते. माध्यमे आणि सांस्कृतिक प्रवाह इच्छांवर प्रभाव पडतात.
30 Nov 2025 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली
13 Dec 2025 - 11:17 am | Bhakti
अशीच एक चर्चा सुफियान आलम चॅनेलवर झाली.गोष्टी आपणच सुंदरपणे करू शकते ,हेच प्रॅक्टिकल आहे.
https://youtu.be/a4AZ6rzVNlM?si=GE70Qsjv5j-P9vfg
या गहन आणि विचारप्रवर्तक संवादात, डॉ. विकास दिव्यकीर्ती Sufitramp सोबत सामील होतात, मानवजातीच्या सर्वात प्राचीन आणि गहन प्रश्नांचा शोध घेण्यासाठी: आपल्या कृती खरोखरच आपल्या स्वतःच्या आहेत का, की त्या कारण, परिणाम आणि विश्वीय रचनेच्या अपरिहार्य परिणामी आहेत?
निर्धारवाद (डिटर्मिनिझम) आणि अस्तित्ववादाच्या तत्त्वज्ञानापासून ते आइनस्टाइनच्या ब्लॉक थिअरी ऑफ टाइमपर्यंत, हा चर्चा विज्ञान, अध्यात्म आणि आत्मचिंतन यांना जोडतो. आइनस्टाइनचा विश्वास होता की भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकाच वेळी सहअस्तित्वात आहेत — याचा अर्थ वेळ ही एक स्थिर आयाम आहे, वाहणाऱ्या नदीसारखी नाही. जर हे खरे असेल, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आधीच "निश्चित" असू शकतो, आणि मुक्त इच्छा ही केवळ चेतनेने निर्माण केलेली भ्रम असू शकते.
डॉ. दिव्यकीर्ती खोलवर चर्चा करतात: •
निर्धारित विश्वात स्वातंत्र्य आणि निवडीचा अर्थ • आइनस्टाइनच्या ब्लॉक युनिव्हर्स थिअरी आणि वेळ व नशिबावर त्याचे परिणाम •मानवी चेतना वेळ, स्मृती आणि निर्णयप्रक्रिया कशी समजते • आपल्या निवडी पूर्वनिर्धारित असतील तर जबाबदारीचा तत्त्वज्ञानात्मक विरोधाभास • कर्म, नशिब आणि वैयक्तिकता यांच्यातील संतुलन भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीत • जागरूकता स्वतःच विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील पूल बनू शकते का?
हा भाग तर्क आणि विश्वासाच्या सीमांना आव्हान देतो — शोधक, संशयवादी आणि विचारवंतांसाठी एक शोधयात्रा.
“जर वेळ आधीच लिहिलेली असेल, तर निवडीला तरीही अर्थ आहे का — की आपली जागरूकता हेच एकमेव खरोखर मुक्त आहे?”
14 Dec 2025 - 8:26 am | मारवा
मानवी इच्छा अनेक प्रकारच्या अगणित आहेत. तुम्ही विचारले इच्छांचा नियंत्रक कोण ? तुम्हाला मानवी इच्छा अपेक्षित आहे असा माझा समज आहे.
इतर इच्छा विषयी सांगू शकत नाही मात्र गोड पदार्थ किंवा साखर खाण्याची इच्छा जी आहे त्याचा नियंत्रक आपल्या आतड्यातील bad bacteria असतो. कारण साखर हे त्याचे अन्न आहे त्यावर तो वाढतो मोठा होतो .
तर हा जो bad bacteria आहे हा gut brain axis चा वापर करतो. आणि मेंदूकडे vagas nerve आदी च्या माध्यमातून अधिकाधिक साखरेची मागणी करतो. त्यासाठी आनंदी रसायने स्त्रावतो ज्यामुळे माणसाची साखर खाण्याची इच्छा निर्माण आणि नियंत्रित होत असते.
किमान या इच्छे चा मनुष्य बाह्य हा एक सजीवनियंत्रक आहे.
इतर इच्छा असेच कोणी कोणी असतील
2 Jan 2026 - 12:14 am | राघव
प्रश्न जटिल आहे.. शंकाच नाही!
प्रथम हे सांगणे गरजेचे आहे की, मी जे मांडतो आहे ते पुस्तकी ज्ञान आणि तर्क यांचा मिलाफ आहे.. अनुभवाचे नाही.
सर्व इच्छांचे मूळ हे अविद्येत सांगीतले आहे. इग्नोरन्स. आत्मस्वरूपाबद्दलचे अज्ञान ही अविद्या. याच अविद्येमुळे जीव जीवनचक्रात गुंततो, कारण जेथे इच्छा आली तेथे भोग भोगण्याची लालसा आली.. अस्तित्व आले.
ही इच्छा स्वभावाशी निगडीत असते. हा स्वभाव त्रिगुणांच्या प्रभावाखाली लालसा उत्पन्न करतो. सात्विक, राजसिक आणि तामसिक इच्छा या स्वभावानुसार ठरतात.
स्वभाव कसा बनतो? सूक्ष्म आणि स्थूल शरीरांच्या माध्यमातून जीव वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्रिगुणांपैकी जो गुण प्रबळ त्याप्रमाणे जीव त्या अनुभवांतून संस्कार घेत जातो. या संस्कारांनुसार स्वभाव बनतो. हेच कारण शरीर.
स्थूल, सुक्ष्म आणि कारण, ही तिन्ही शरीरे शुद्ध झाल्यावर जीव त्रिगुणातीत संस्कार घेण्यास पात्र होतो आणि आत्मज्ञानाचा मार्ग मो़कळा होतो.