ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
12 Aug 2025 - 5:24 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.

अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-... वर

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2025 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिहारमधील कथित मतदार यादी घोटाळ्यातून वगळलेल्या मतदार मसूदा यादीची देशभर चर्चा सुरु आहेच. लोकसभेतही 'वोट चोर गद्दी छोड' अशा घोषणा विरोधी पक्षाकडून देण्यात आल्या. लोकसभेतील आता विरोधी पक्ष अधिक मजबूत असल्याने, सद्य सरकारला आता मनात येईल तसे बोलता येत नाही आणि करताही येत नाही, असे अवघड दुखणे सद्य सरकारच्या मागे लागले आहे.

बिहारमधील सखोल पडताळणी मोहीमेतंर्गत मसुदा यादीतून वगळलेल्या मतदारांना शेवटी सर्वोच्च दिलासा मिळाला. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधारकार्ड देण्याची मुभा द्यावी ही मागणी मान्य करण्यात आली. निवड्णूक आयोगाने मसूदा यादीतून ६५ लाक्ष मतदारांची नावे वगळण्यात आली यावर मतदारांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष पुढे येत नाही याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. नावे वगळली म्हणून मतदार आक्षेप नोंदवत आहेत. बूथस्तरावर काम करणारे काय करीत आहेत असाही प्रश्न मा. न्यायालयाने विचारला. राजकीय पक्षांनीही पुढील सुनावणीत स्थितीदर्शक अहवाल सादर करावा असे आदेशही मा.न्यायालयाने दिले.

एकंदरीत निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली कसे काम करतेय ते आता लक्षात येत आहे. आपल्या माता भगीनींचे व्हीडीयो कसे देता येतील असा गमतीदार प्रश्न निवडणूक आयोग विचारत होता. मतदार केंद्रावर येणा-या जाणा-या मतदारांचेच चित्रण असते. मतदार चित्रणात आक्षेपार्ह असे काहीही नसते हे सर्वांना माहिती आहे, असे असूनही निवडणूक आयोग अधिकाधिक हास्यास्पद विधाने करते अशा विधानांमुळे आयोगावरील विश्वास कमी होत जातो दुर्दैवाने हे त्यांच्या लक्षात येत नाही. अर्थात सत्तेच्या ओंजळीने पाणी पिले की असं चालायचंच.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2025 - 5:28 pm | अमरेंद्र बाहुबली

मतचोरी विरोधात ठाकरेबंधू मैदानात उतरले आहेत! भाजपेयींचे धाबे दणाणले असतील!

अभ्या..'s picture

24 Aug 2025 - 6:18 pm | अभ्या..

भाजपेयींचे धाबे दणाणले असतील!
काहीही काय बाहुबली? कीती म्हणजे किती फेकायचे?
भाजपेयांचे काय धाबे दणाणत असतात कधी? ते धाब्याच्या घरात राहात नाहीच्चेत मुळी.
आणि प्रत्येकाची नाडी त्यांच्याच हातात आहे.
ठाकरे किस झाड की मूळी. सगळी विरोधी आघाडी एकत्र झाली तरी काहीही फरक पडणार नाही भाजपाला.
सुप्रीम कोर्टाने जरी काही म्हणले तरी फरक पडणार नाही. निवडणुका लागल्या तरी फरक पडणार नाही.
निवडणुकीत पडले तरी फरक पडणार नाही. किंबहुना कुणी आले गेले तरी फरक पडणार नाही.
जनतेने काही म्हणले तरी फरक पडणार नाहीये कारण अंतिम सत्य त्यांच्याच हातात आहे. कारण तेच सत्य आहेत.
ते अंतिम सत्य साध्य करा तुम्ही.
.
चला....उचला......

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2025 - 8:42 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क!

तुकाराम महाराजांनतर प्रथमच एक संपूर्ण बॅच सदेह वैकुंठास जाणार आहे. ही बातमी