दारू आणि गरीबी

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
30 Jul 2025 - 8:56 am
गाभा: 

दारू आणि गरीबी
=========

आत्ता सकाळी माझ्या प्रात:कालीन बाजाराच्या अभ्यासात एका समभागाने माझे लक्ष वेधले. तो समभाग म्ह० युनायटेड स्पिरीट. जूनपासून हा समभाग बराच गडगडला आहे आणि सध्या त्याची घसरगुंडी थांबली आहे, असे वाटत आहे.

मग ग्रोकच्या मदतीने घसरगुंडीची कारणे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा महा० सरकारने मद्यावरील कर वाढविल्याचे कळले. मग मनात पुढचा प्रश्न चमकला - समजा एक दारूची बाटली १००० रु० ला आहे. तेव्हा यातील एकूण किती भाग सरकारला कर म्हणून जातो? हा पण प्रश्न मी ग्रोकलाच विचारला, तेव्हा आश्चर्यकारक आकडेवारी मिळाली.

१०००रु किमतीचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य असेल तर ~७६५ रु सरकारला कर म्हणून जातात. थोडक्यात निष्ठेने दारू पिणारे स्वत:च्या स्वास्थ्याची आहूती देऊन देशाची किती महान सेवा करतात हे आता लक्षात येईल.

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

30 Jul 2025 - 9:25 am | विवेकपटाईत

दारू पिणाऱ्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान ओळखून ईमानदार मुख्यमंत्रीने ६०० रु पेक्षा कमी दारूवर कर राज्यसरकारचा कर २ रु पेक्षा कमी केला. दुकानदारांनी एकावर एक फ्री बाटली दारू पिणाऱ्यांना देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड केली. पण चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळत नाही. Ga इतिहास आहे.

विवेकपटाईत's picture

30 Jul 2025 - 9:26 am | विवेकपटाईत

दारू पिणाऱ्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान ओळखून ईमानदार मुख्यमंत्रीने ६०० रु पेक्षा कमी दारूवर कर राज्यसरकारचा कर २ रु पेक्षा कमी केला. दुकानदारांनी एकावर एक फ्री बाटली दारू पिणाऱ्यांना देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड केली. पण चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळत नाही. हा इतिहास आहे.

सुबोध खरे's picture

30 Jul 2025 - 10:09 am | सुबोध खरे

उगाच बेवड्यांचा उदो उदो करण्याची गरज नाही.

पेट्रोलची मूळ किंमत ३४ रुपये आहे त्यावर ५८ रुपये केंद्र आणि राज्य सरकारचे कर आहेत आणि डिलरचे कमिशन मिळून तुम्हाला पेट्रोल १०० रुपया च्या आसपास आहे.

तेंव्हा उगाच मी दारू पिऊन करतो तशी पेट्रोल जाळून राष्ट्र सेवा करतो म्हणण्याची गरज नाही

प्रसाद गोडबोले's picture

30 Jul 2025 - 3:16 pm | प्रसाद गोडबोले

म्हणूनच

दारू पिऊन विनाकारण गाडी पळवणे ही सर्वात मोठ्ठी देशसेवा आहे.

युयुत्सु's picture

30 Jul 2025 - 3:30 pm | युयुत्सु

ROFL

युयुत्सु's picture

31 Jul 2025 - 8:59 am | युयुत्सु

प्रामाणिकपणे कर भरणे ही देशसेवाच आहे -

तो कर मग उत्पन्नावरचा असो, पेट्रोलवरील असो किंवा दारू वरील असो...

सुबोध खरे's picture

31 Jul 2025 - 11:59 am | सुबोध खरे

पेट्रोलवरील असो किंवा दारू वरील कर

हा कर आपल्याला टाळता येतो का?

त्यामुळे प्रामाणिकपणे हा कर भरणे यात देशसेवा आहे हे म्हणणे हा भंपकपणा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2025 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

कर बुडवणे हा गुन्हा असेल , देशद्रोह असेल तर
देशाने ठरवलेला कर भरणे ही देशसेवाच आहे.

#पी_तू

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Jul 2025 - 2:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे त्यातून सरकारला किती महसूल मिळतो वगैरे विदा असेल तर तीही देशसेवाच म्हणावी काय?

युयुत्सु's picture

31 Jul 2025 - 3:22 pm | युयुत्सु

श्री० राजेंद्र मेहेंदळे

इथे काही जणांना "उपहास" कळत नाही असे दिसते (जो माझ्या मूळ पोस्ट्मध्ये आहे). लॉजिक तर त्याहून कळत नाही. पण तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे-

प्रामाणिकपणे कर भरणे ही देशसेवा आहे!

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Jul 2025 - 7:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला उपहास आणि लॉजिक कळत नसेलही, पण म्हणण्याचा उद्देश ईतकाच होता की प्रत्येक गोष्ट महसूलाच्या चष्यातून बघुन चालणार नाही.

सुबोध खरे's picture

1 Aug 2025 - 11:13 am | सुबोध खरे

इथे काही जणांना "उपहास" कळत नाही असे दिसते (जो माझ्या मूळ पोस्ट्मध्ये आहे). लॉजिक तर त्याहून कळत नाही.

मिपा वरील लोकांना काहीच कळत नाही कारण ते सर्वज्ञ नाहीत

दूधा पर्यंत पोचता येत नसलं कि प्रत्येक मांजर हे संत असतं .

तद्वत बहुसंख्य लोक हे कर चुकवता येत नाही म्हणून भरतात.

पुण्यात सिग्नल तोडून पुढे जाणारे दुचाकीवर नाक्यावर पोलीस उभा असेल तर सिग्नल सुटेपर्यंत गपचूप का थांबतात हे पाहून घ्या.

तेंव्हा उत्पन्नावरील कर आणि पेट्रोल किंवा दारू वरील कर यातील मूलभूत फरक समजून घ्या

विजुभाऊ's picture

1 Aug 2025 - 11:34 am | विजुभाऊ

पुण्यात पोलीस सिग्नलच्या सुरवातीला थाम्बत नाहीत. ते नेहमी अगोदर लोकाना चूक करायची संधी देतात आणि मगच पकडतात

युयुत्सु's picture

1 Aug 2025 - 12:07 pm | युयुत्सु

समजा ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही.

या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते. मानसिक विकृती निदानाची सहावी आवृत्ती जेव्हा निघेल तेव्हा माझ्यातर्फे ही भर घातली जाईल, यासाठी मी आता जोरदार प्रयत्न करत आहे. एका नॉन-मेडीको भारतीयाचे तेव्हढेच वैद्यक शास्त्रात योगदान...

स्वगत - उपहास न कळणे हे **"Polymathic Aversion Syndrome"** चे महत्वाचे लक्षण आहे

सोत्रि's picture

1 Aug 2025 - 12:13 pm | सोत्रि

Polymathic Aversion Syndrome

ह्याबद्दल सिंड्रोम च्या माहितीबद्दल धन्यवाद! नोंद घेतली आहे!

- (आभारी) सोकाजी

सुबोध खरे's picture

2 Aug 2025 - 10:11 am | सुबोध खरे

वा वा

सर्वज्ञ आता जनुकशास्त्र सोडून मनोविकार तज्ज्ञ सुद्धा होताहेत.

मानसिक विकृती निदानाची सहावी आवृत्ती जेव्हा निघेल तेव्हा माझ्यातर्फे ही भर घातली जाईल, यासाठी मी आता जोरदार प्रयत्न करत आहे. एका नॉन-मेडीको भारतीयाचे तेव्हढेच वैद्यक शास्त्रात योगदान...

The DSM-6 (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, 6th edition)

The DSM is a comprehensive guide used by mental health professionals to diagnose and classify mental disorders. While the exact release date is not yet known, it is anticipated to be released sometime between 2023 and 2028.

स्वलाल आत्ममग्नता.

चालू द्या