जुलै ११, २००६ चे शेवटी दोषी कोण?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Jul 2025 - 1:57 pm
गाभा: 

जुलै ११, २००६ केवळ 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, या स्फोटांच्या मालिकेत 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. हा मुंबईच्या इतिहासातील काळा अध्याय ठरला होता. प्रेतांची रास रचली गेली, संदर्भ एबीपी माझा वृत्त

१९ वर्षे खटला चालवून ११/१२ आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. एक निर्दोषला शिक्षा होऊ नये म्हणून १०० अपराधी सुटले तरी चालतील या भुमीकेतून सुटलेले सर्वार्थाने निर्दोष असतात का? आमच्या मेणबत्ती वाल्या पुरोगामींना ११/१२ आरोपींच्या मानवाधिकाराची त्यांची वर्षे कशी वाया गेली याची पडली असेल.

मुंबई 7/11 बॉम्बस्फोट : हे निर्दोष असतील, तर खरे गुन्हेगार कोण? ते कुठे आहेत आणि त्यांना शिक्षा कधी होणार? पीडित कुटुंबांचा संतप्त सवाल

"सरकारनं आमची चेष्टा चालवून, न्यायाचा खेळ मांडलाय का?", 7/11 साखळी बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांचा आर्त सवाल

या प्रश्नांचे उत्तर कोण देणार? २००६ पासूनच्या बदललेल्या सर्वच सरकारांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकीलांचे जनतेच्या वतीने पैसे तर मोजले होते तसे न्यायाधिशांचे पगारही जनतेच्याच खिशातून गेले. जनतेला न्याय मिळाला का?

आम्हा सामान्य जनतेत तपास यंत्रणा आणि वकीलांच्या कामाचे ऑडीट करण्याची पात्रता नसते. पण तपास यंत्रणा वकील तसेच न्यायाधिशांच्याही कामाचे दुसर्‍या राज्यातील समकक्ष व्यक्तींकडून वेळीच ऑडीट आणि सुधारणा प्रक्रीया का उपलब्ध नसावी असा भाबडा प्रश्न पडला.

* हा एक सात्विकतेने संतप्त संवेदनशील धागा आहे, कृपया कोणत्याही बाजुने राजकीय रतीब घालु नये आणि पुरोगामी मेणबत्तीकारांनी या धाग्याला फाट्यावर मारून वेगळा धागा काढावा.

* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्या साठी प्रतिसादांसाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jul 2025 - 8:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तपास घाईघाईत न करता चोखपणे,प्रामाणिकपणे केला असता तर ही वेळ आली नसती. कोर्टाने काय ताशेरे मारले आहेत ते बघा-
“Punishing the actual perpetrator of a crime is essential for public trust and safety. But creating a false appearance of resolution by prosecuting the wrong individuals deceives the public and undermines justice.”

The verdict noted glaring lapses in the investigation, observing that while the public was made to believe the case had been solved, the true threat remains at large.

https://www.theweek.in/news/india/2025/07/24/why-did-sc-stay-2006-mumbai...

आमच्या मेणबत्ती वाल्या पुरोगामींना ११/१२ आरोपींच्या मानवाधिकाराची त्यांची वर्षे कशी वाया गेली याची पडली असेल.
संबंध नसलेल्या व्यक्तीला केसमध्ये गोवले असेल तर वर्षे वाया गेली ह्याची चिंता पडणारच ना?

माहितगार's picture

25 Jul 2025 - 8:36 am | माहितगार

... आणि पुरोगामी मेणबत्तीकारांनी या धाग्याला फाट्यावर मारून वेगळा धागा काढावा.

चौथा कोनाडा's picture

25 Jul 2025 - 11:01 am | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

25 Jul 2025 - 11:03 am | चौथा कोनाडा

काल, २००६ मध्ये झालेल्या ७/११ मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील सर्व दोषींना निर्दोष सोडण्यात आले. अगदी बरोबर. कारण त्यापैकी कोणीही स्फोटाची योजना आखली नव्हती किंवा घडवून आणली नव्हती.

मग तो कोणी केला?

ही पाच नावे आहेत -

१. आझमगडमधील संजरपूर येथील आतिफ अमीन - १९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये तो मारला गेला.

२ आणि ३. आझमगडमधील संजरपूर येथील बडा साजिद आणि अबू रशीद - हे दोघे नंतर इंडियन मुजाहिदीनच्या अनेक स्फोटांमध्ये सहभागी होते आणि २००८ नंतर ते नेपाळ मार्गे शारजाह आणि नंतर पाकिस्तानला गेले. आणि पुढे, ते रहस्यमयपणे पाकिस्तान सोडून सीरियामध्ये आयसिसमध्ये सामील झाले जिथे त्यांना अमेरिकन सैन्याच्या हातून त्यांचे भवितव्य घडले.

४. सादिक शेख उर्फ यासिर, संजरपूर, आझमगड येथील, जो नंतर मुंबईतील चेंबूर येथील चिता कॅम्प येथे स्थलांतरित झाला - दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भात बाटला हाऊस एन्काउंटरनंतर त्याला अटक करण्यात आली आणि चौकशीदरम्यान त्याने २००६ मध्ये ७/११ मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट केल्याची कबुलीही दिली. खरं तर, प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन ज्युनियर सीपी, क्राइम मुंबई राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की इंडियन मुजाहिदीनच्या या गटाने मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट घडवले होते, या प्रकरणात अटक केलेल्या जुन्या गटांनी नाही.

५. डॉ. शाहनवाज, संजरपूर, आझमगड येथील युनानी डॉक्टर - बरं, तो जिवंत असू शकतो. त्याचे शेवटचे ज्ञात ठिकाण मलेशिया होते, जिथे तो आतापर्यंत स्थायिक झाला असावा.
७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटांचा खरा कट पुढीलप्रमाणे रचला जाऊ शकतो -

अ. आतिफ अमीन आणि त्याच्या टीमने मुंबईतील सिवरी येथे एक अपार्टमेंट भाड्याने घेतले होते जिथे बॉम्ब तयार केले गेले होते (पोलिसांच्या बनावट चार्जशीटनुसार, बॉम्ब गोवंडी झोपडपट्टीत तयार केले गेले होते)

ब. बडा साजिद आणि आतिफ अमीन कर्नाटकातील उडुपी येथे स्फोटक दर्जाचे अमोनियम नायट्रेट आणि डेटोनेटर खरेदी करण्यासाठी गेले होते. नंतर दोषी ठरलेल्या इंडियन मुजाहिदीनचा आणखी एक दहशतवादी शहजाद अहमदच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी उडुपीहून मुंबईत २५ किलो अमोनियम नायट्रेट नेले होते. एका सिद्धांतानुसार, ज्या व्यक्तीने ही स्फोटके तयार केली ती दुसरी कोणी नसून रियाज मोहम्मद इस्माईल शाहबंद्री उर्फ रियाज भटकळ होती.
क. प्रेशर कुकरमध्ये हे बॉम्ब तयार केले गेले होते. त्यांची रचना श्रमजीवी एक्सप्रेस बॉम्बस्फोटांमध्ये वापरल्या गेलेल्या बॉम्बसारखीच होती, जे आतिफ अमीनने देखील केले होते. त्यात कोणताही आरडीएक्स वापरला गेला नव्हता. (पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता

डी. सादिक शेखने गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवण्याचे नेतृत्व केले. नंतर सादिक शेखने मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील त्याच्या गुन्ह्याबद्दल न्यायालयासमोर कबुली देण्याची तयारी दर्शविली. त्याने घटनास्थळी पंचनाम्यात हे देखील दाखवले की त्याने वेगवेगळ्या गाड्यांमध्ये त्यांच्या मूळ स्थानकावर पाचपैकी तीन प्रेशर कुकर कसे ठेवले होते. मिशनसाठी जाण्यापूर्वी त्याने चहा पिणारा चहाचा स्टॉल देखील दाखवला... परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांनी त्याला बदनाम केले आणि आरोप केला की सादिक फक्त त्यांच्याकडून अटक केलेल्या खऱ्या गुन्हेगारांची कबुली देत होता.

कथेचा नैतिक अर्थ - सत्य कल्पनेपेक्षा विचित्र असू शकते!

(पी.एस - मी विश्वासार्ह संशोधनाशिवाय विधान करत नाही)
- एक निवृत्त आयपीएस पोलिस अधिकारी

(सोशल मिडिया वरून मुळ इंग्लिश वरून मराठी अनुवाद : श्री गुगल ट्रान्सलेटकर

माहितगार's picture

25 Jul 2025 - 7:22 pm | माहितगार

- एक निवृत्त आयपीएस पोलिस अधिकारी

हे काय असते? खरा निवृत्त आयपीएस असेल तर त्याने सर्वोच्च न्यायालयासमोर उघडपणे बाजू मांडून योग्य इन्व्हेस्टीगेशन करून घ्यावयास हवे. आणि नसेल तर असे मेसेज तयार करण्याचा उद्देश संभ्रम तयार करण्याचा नाही ना हे तपासून त्या विरुद्ध पोलीस कारवाई व्हावयास हवी.