गाभा:
आताच आलेला अमिरखानचा 'गझिनि' (किंवा घजिनी) हा चित्रपट पाहण्यात आला. या चित्रपटाने येण्यापूर्वी फार हवा केली होती. त्यासाठी आमिरने कमावलेली देहयष्टी आणि या चित्रपटाचे प्रोमोज् लक्षवेधी ठरले. मूळ संकल्पना 'मोमेंटो' या इंग्रजी चित्रपटावर बेतलेली आहे. परंतु खरे सांगायचे तर या हिंदी मोमेंटो ने मूळात मनावर पकडच घेतली नाही. बर्याच न पटणार्या घटना यात दाखवल्या आहेत. कदाचित आमिरच्या आधीच्या चित्रपटांमुळे अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्यामुळे गझिनी नाही आवडला असेही झाले असेल. मिपाकरांचे काय मत आहे यावर?
माझे मत आहे की ' नाही आवडला'.
बघूया मिपाकरांची काय मते आहेत यावर.
डीस्क्लेमरः उगाच या विषयावर निरुपयोगी कौल लावण्यापेक्षा यावर काथ्या कुटणे मला अधिक बरे वाटले.
प्रतिक्रिया
30 Dec 2008 - 9:51 pm | बट्टू
पिच्चर पाहीला नाही पण मत आहे.
आमिर श्रिमंत झाला, ती नवी मुलगी प्रसिद्ध झाली - तिला पैसा मिळेल, दिग्दर्शकाला पैसा मिळेल, निर्माता पैसा काढेल भारतात नाही चालला तर एनारायकडुन. तुमचे पैसे वाया गेले. मला पैसे वाया घालवु नये हे कळले.
30 Dec 2008 - 9:53 pm | लिखाळ
ठाकठीक मसाला चित्रपट.
इतर हिंदी चित्रपट पाहून डोके न चालवता चित्रपट पाहण्याची सवय लाऊन घेतली आहे तिचा उपयोग झाला.
भडक मारामारी वैतागवाणी आहे.
त्याच्या गोंदवण्याबद्दल इतके ऐकले होते पण चित्रपटामध्ये त्यावर विशेष भरच नाही. या चित्रपटाचा हा ऍनिमेटेड अवतार फार मस्त आहे. नक्की पाहा :).
एखादा मनुष्य १५ मिनिटानी विसरतो म्हणजे काय याचे निटसे आकलन झाले नाही. १५ मिनिटापूर्वीचे विसरतो हे ठीक. पण तो मारामारी करत करताना चालू असलेली घटना १५ मिनिटे झाली की एकदम विसरणे हे मजेदार वाटले.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
30 Dec 2008 - 10:08 pm | शाल्मली
कालच बघितला हा चित्रपट. अती दाखवलेला हिंसकपणा सोडल्यास एकदा पहायला हरकत नाही.
अर्थात चित्रपटगृहात पैसे वगैरे टाकून बघावाच असा काही नाही.
अवांतर :- एअरव्हॉईस कंपनीचा मालक संजय सिंघानिया मात्र खूपच गोजिरवाणा दिसतो. आमिर खानचे वय ४०+ असेल असं वाटतच नाही.
--(आमिर खानची जब्बर फॅन) शाल्मली.
31 Dec 2008 - 5:20 pm | सरकार
बर का शालु ताई,त्याचे मुळ रूप बघायचे तर ते लहान पडद्यावर प्रमोशनल प्रोग्राम्स मधे !!
तेव्हा कळते आमिर खानची जब्बर चाळीशी
मूव्ही मधे तर ती मेकअप ची लेयर सर्व झाकून टाकते....काय म्हणता ?
30 Dec 2008 - 10:15 pm | अनामिक
- त्याच्या टॅटू बद्दल लै हवा केली होती... त्यावर जास्तं काही दाखवलच नाही चित्रपटात.
- १५ मिनिटात विसरण्याची प्रक्रिया आणि आमिर वर त्याचा होणारा परिणाम निटसा दाखवला/कळला नाही.
- गर्ल्स होस्टेल मधे त्या डॉक्टर स्टूडंट वर हल्ला करताना १५ मिनिटापेक्षा जास्त लिफ्टमधे बंद असूनही बाहेर आल्यावर आपण लिफ्टमधे कसे अडकलो हा प्रश्न पडन्या ऐवजी तो सरळ तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो हे पटले नाही.
- एकंदर त्याची प्रेमकहानी लांबवली आहे असे वाटले
- शेवटच्या सीन मधे गजिनीचा पाठलाग करताना नक्कीच १५ मिनिटा पेक्षा जास्त वेळ जातो तरी त्याला आपण काय करतोय ते लक्षात राहते (फक्तं शेवटची एक वेळ सोडता).
एकंदरीत मसाला चित्रपट आहे... डोकं बाजूला ठेउन पाहिला तर बरा वाटतो. पण आमिर खानचा असल्याने अजून अपेक्षा होत्या. आमिर खानचा अभिनय मात्र नेहमी प्रमाणे लै भारी.
(आमिरचा पंखा) अनामिक
30 Dec 2008 - 10:23 pm | गोगोल
मला मेमेंटो हा चित्रपट खूप आवडल्याने गजिनी बद्दल एक उत्सुकता होती. पण गजिनी ची कथा आणि एकंदर वेग हा अत्यंत बकवास असल्याचे सर्व मित्रान्कडून कळाळे. मी स्वतः विकिपेडिया वरती त्याची जी कथा वाचली ती काही फारशी रुचणरि नहिये.
मुळातला चित्रपट हा नॉन लिनियर आहे. म्हणजे नायकाच्या जीवनातील काळ एकाच सीक्वेन्स मध्ये न दाखवता वेगवेगळ्या तुकड्यात जोडला आहे. एकायला जरी हे खूप क्लिष्ट वाटल तरी दिग्दर्शकानि या तंत्रचा खूप प्रभावी उपयोग करुन घेतला आहे. शिवाय कथानकाला एक वेगळाच टर्न देउन, हीरो हाच कदाचित व्हीलन असण्याचि शक्यता ध्वनित करुन ठेवलि आहे. म्हणजे चित्रपटाचे पूर्ण इंटर्प्रिटेशन प्रेक्षकानवर आहे. याउलट गजिनी हा बॉलीवुड पट असल्याने आमिर ख़ान हा टीपीकाल नायक असल्याचे दाखवायला लागले आहे. मला असे म्हणावेसे वाटते की आँतरोग्रेड आमनेशिया हिच दोघान्मधलि समान कल्पना आहे. उरलेला कथेला भारतीय रंग मारण्यात आलेला आहे.
मी या विकांताला स्लमडॉग मिलिनेर पहिला. अत्यंत सुरेख चित्रपट आहे. उत्तम दिगदर्शन, सुंदर अभिनय आणि ए आर रहमान चे बॅकग्राउंड स्कोर...आहाहा .. सारे गोरे लोके हाउसफुल करुन बसले होते :)
30 Dec 2008 - 10:30 pm | llपुण्याचे पेशवेll
>>मी या विकांताला स्लमडॉग मिलिनेर पहिला. अत्यंत सुरेख चित्रपट आहे. उत्तम दिगदर्शन, सुंदर अभिनय
मलाही आवडला हा चित्रपट.
पुण्याचे पेशवे
Since 1984
31 Dec 2008 - 10:26 am | नाशिककर
मुर्गदास ने तमिळ गजिनी मोमेन्टो वरुन प्रेरित होउन केला होता. पण तसे करताना मुळ संकल्पनेत बदल करुन दक्शिण भारतीय प्रेक्शकांसाठी बरेच बदल केले. आणि टीपिकल साउथ मुवि बनवली... परंतु हिन्दी सिनेमा करताना तेहि आमिर बरोबर त्यात केवळ हिंसा, मारामारी यावर भर न देता फिल्म च्या कोन्सेप्ट वर लक्श देणे अपेक्शित होते.... तसे नाही झाले!
या चित्रपटात आमिर च्या सिनेमात असणारं पेर्फेक्शनहि मिस्सिन्ग होतं.
तसा रेहमान टच सुधा हरवल्यासारखाच वाटत होता..!!
एकुणच डिरेक्शिन फारसं प्रभावी नव्हतं !!
पण तरिही सिनेमा फार वाईट नव्हता... फक्त आमिर असल्याने अपेक्शा फार जास्त होत्या!
30 Dec 2008 - 10:34 pm | टारझन
कोणी फुकटात गझिनीचा टॉरंट मिळाला तर लिंकवा रे इथे ............. च्यायला आपण फुकटात कै च्या कै शिनेमे पाहिलेत .. .आणि मारामारी पहायचा आपल्याला कंटाळा णाही ... आम्ही सन्नी देऑलची "के व ळ अ प्र ति म " मारामारी पण पहातो तर अमिरनं थोडं रियल काम केलं असावं .........
- टारझन फुकटे
आम्ही दिग्दर्शकाच्या विना पुर्व लेखी परवाणगी त्याची मुव्ही डाऊनलोड करून फुकट पहातो, आणि दिग्दर्शकाला फाट्यावर मारतो.
30 Dec 2008 - 10:37 pm | गोगोल
http://www.bhejafry.net/
30 Dec 2008 - 10:40 pm | गोगोल
त्यान्नी ती लिंक काढुन टाकली आहे. बहुतेक कारवाई झालेली दीसतिये.
30 Dec 2008 - 10:46 pm | llपुण्याचे पेशवेll
Moviefun.org वर पण हा चित्रपट बघता येईल.
पुण्याचे पेशवे
Since 1984
31 Dec 2008 - 12:42 pm | वेदनयन
http://www.apnicommunity.com/watch-online/90594-ghajini-2008-watch-online-download.html
टारु, रिश्ते मे हम तुम्हारे भाई लगते है. ह्या बाबतीत आमचा एक विरंगुळा हा
2 Jan 2009 - 1:12 pm | मृगनयनी
- टारझन फुकटे
आम्ही दिग्दर्शकाच्या विना पुर्व लेखी परवाणगी त्याची मुव्ही डाऊनलोड करून फुकट पहातो, आणि दिग्दर्शकाला फाट्यावर मारतो.
»
=)) =)) =))
चोच्या.... पार चोथाच करून टाकलास की रे तु.....
काय मारलायेस!!!!
30 Dec 2008 - 10:46 pm | रेवती
आमिर तसा बर्याचजणांना आवडतो (मलाही), त्याच्यासाठी पाहीला तर ठीक आहे.
नवी नटी स्मार्ट आहे. फारच मारामारी आहे पण. मधेमधे तर चित्रपट फारच ताणलाय असं वाटतं.
गाणी छान आहेत असं ऐकलं होतं, पण मला नाही आवडली गाणी.
रेवती
31 Dec 2008 - 1:03 am | रविराज
रहमानच संगीत पहिल्यांदा ऐकताना नाही आवडत नाही.. २-३ वेळा गाणी ऐकून पहा आवडायला लागतील.
3 Jan 2009 - 8:24 pm | पुष्कर
ते रेहमानच्या संगीताबाबत नेहमीचंच आहे. पण इथे 'रेहमानगिरी' हरवल्यासारखी वाटली. पुन्हा पुन्हा ऐकल्यावर एक-दोनच गाणी चांगली वाटली; ती पण रेहमानच्या नेहमीच्या लिमिटपेक्षा कमीच..
30 Dec 2008 - 10:48 pm | यशोधरा
मलाही फारसा आवडला नाही गजिनी... खूप विस्कळीत वाटला.
31 Dec 2008 - 12:38 am | विसोबा खेचर
त्यातली 'असीन' नावाची नटी लै भारी आयटम आहे. साऊथची आहे..!
आपला,
आमिर अभ्यंकर.
31 Dec 2008 - 12:41 am | सखाराम_गटणे™
गांधी घराण्यात जश्या सगळ्या परदेशी लागतात्, तश्या तुम्हाला सगळ्या साउअथ वाल्याच आवडतात हो.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 7:59 am | रेवती
फार आवडली मला ती. डोळे बोलके आहेत.
आयटम वगैरे काय म्हणता तीला.
रेवती
31 Dec 2008 - 8:09 am | विसोबा खेचर
आयटम वगैरे काय म्हणता तीला.
अहो 'आयटम गर्ल' हा शब्द हल्ली कानावर वारंवार पडतो म्हणून मीही तो शब्द वापरला. असो..
तात्या.
31 Dec 2008 - 12:42 am | शितल
मला गझनी आवडला नाही,
बा़की अमिर खानने बॉडी छान बनविली आहे.. :)
नटी ही बरी आहे. :)
31 Dec 2008 - 1:28 am | घाटावरचे भट
बटबटीत फ्रेम्स, खोटा खोटा वाटणारा व्हिलन आणि आमिर खानला न दाखवता आलेला अँटरोग्रेड अम्नेशियाचा पेशंट आणि मनोरुग्ण यातला फरक....काय काय आणि किती किती सांगू? (शिवाय दर दुसर्या रोमँटिक शीनमध्ये भर मुंबईत पडणारी वाळलेली मेपल लीव्ह्ज....) आपल्या तर डॉस्क्याला मुंग्या आल्या बघा....रीमेक करताना चित्रपटावरचा दाक्षिणात्य प्रभाव आमिर काढून टाकेल असं वाटत होतं. जमलेलं नाही. काही चांगल्या गोष्टी.... गाणी, रेहमानला तोड नाही. सगळ्या गाण्यांचं चित्रीकरण तितकंच चांगलं. आणि असिन.....तिच्याबद्दल काय बोलणे....आपण तर फिदा झालो बॉ. उत्तम दिसणे आणि चांगला अभिनय यांचं काँबिनेशन आजकाल दुर्मिळ झालंय. ते पाहायला मिळालं. बास, सध्या इतकंच....
31 Dec 2008 - 1:31 am | टारझन
आवरा .....
अवांतर : दर दुसर्या हिरविन वर फिदा व्हायची सवं सोड मित्रा .. आपल्या कत्रिणा आणि आयेशा टाकियाशी प्रामाणिक रहा.
- घाटावरचा बाटा
31 Dec 2008 - 1:35 am | स्वप्निल..
मध्ये जास्ती चांगला आहे..अमिर खान पेक्षा सुर्या ( तमिल नायक) ने जास्ती चांगला अभिनय केलेला आहे..
स्वप्निल
31 Dec 2008 - 3:59 am | चतुरंग
बटबटीत, तद्दन मसालापट झालाय, अतिरेकी मारामारी आणि रक्तबंबाळ हिंसाचार. अमीरचा असूनही त्यावरचा दाक्षिणात्य प्रभाव उबग येईल असा वाटतो.
आवडलेले - अमीरचे कमावलेले शरीरसौष्ठव, बाडी एकदम जबराट बनवली आहे, काही स्टंट्ससुद्धा थरारक आहेत. 'असीन' एकदम कमसीन! ;) ही नटी देखणी नसली तरी अतिशय आकर्षक, आणि तल्लख वाटते. एकच गाणे लक्षात रहाणारे बाकी एआर चे म्यूझिक ठीकठाक.
(खुद के साथ बातां : बास रंगा, फार कौतुक नको त्या असीनचे! [( )
चतुरंग
31 Dec 2008 - 8:12 am | सहज
खालील कारणांकरता आमीरने हा सिनेमा केला असावा
१) सलमानला दाखवायला की मी देखील "बिन्डोक" + "मठ्ठ" होउन सिनेमा हाणु शकतो
२) शाहरुक ला दाखवायला की मी देखील बॉडी बनवु शकतो
३) आमिताभला दाखवायला की मी देखील कै च्या कै मार खाउन जीवंत रहाणारे सिनेमे आजच्या काळात करु शकतो
४) पब्लीकला दाखवायला मी तुम्हाला इतकी भुरळ पाडली आहे की तुम्ही हाही सिनेमा हीट करालच.
:-)
3 Jan 2009 - 7:22 am | भास्कर केन्डे
हा हा हा ... काय अचूक हेरलेत बॉ...!
31 Dec 2008 - 9:28 am | अनिल हटेला
१) सलमानला दाखवायला की मी देखील "बिन्डोक" + "मठ्ठ" होउन सिनेमा हाणु शकतो
२) शाहरुक ला दाखवायला की मी देखील बॉडी बनवु शकतो
३) आमिताभला दाखवायला की मी देखील कै च्या कै मार खाउन जीवंत रहाणारे सिनेमे आजच्या काळात करु शकतो
४) पब्लीकला दाखवायला मी तुम्हाला इतकी भुरळ पाडली आहे की तुम्ही हाही सिनेमा हीट करालच.
वरील सर्व कारणे पटली .तरीही आम्हाला षिणेमा एकदा पहायला आवडला.कारण मुळात आमीर चा आपण पंखा आहोत.आणी असिन :-) हे ही एक कारण असावं..
गाणी ऐकायला ठीक ठाक आहेत..
तु नळीवर चित्रपट उपलब्ध आहे ..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
31 Dec 2008 - 9:46 am | सुचेल तसं
अनिल साहेबांशी एकदम सहमत!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
31 Dec 2008 - 10:56 am | आपला अभिजित
http://www.esakal.com/esakal/12302008/Nava_ChitrapatA996D9C502.htm
31 Dec 2008 - 11:55 am | कोलबेर
इथे प्रतिसाद लिहिता लिहिता त्याचा लेखच झाला.. :)
31 Dec 2008 - 4:17 pm | घाशीराम कोतवाल १.२
आमिर चा टुकार सिनेमा
पण च्यायला हिरोईन मस्त आहे
काय तात्या
(बाईल वेडा) कोतवाल
31 Dec 2008 - 4:47 pm | नि३
जबरदस्त चित्रपट .....
जर ईथे सिंह ईज किंग चालु शकतो तर गजीनी १००० पट चांगला आहे त्यापेक्षा
---नि३.
3 Jan 2009 - 4:13 am | रामपुरी
सिंग इज किंग शी तुलना करण्याइतपत जबरदस्त आहे?? वा वा मग खुपच जबरदस्त आहे राव. आमिर खान आणि अक्षयकुमार यांच्यात कोण जबरदस्त आहे ते पण सांगून टाका.
2 Jan 2009 - 8:55 pm | शुभान्गी
जबरदस्त चित्रपट .....
जर ईथे सिंह ईज किंग चालु शकतो तर गजीनी १००० पट चांगला आहे त्यापेक्षा.......
या प्रतिक्रियेला मे १०००% सहमत आहे.
3 Jan 2009 - 2:18 am | कुशंका
हींदी गझिनि झेरॉक्सची झेरॉक्स काढल्या सारखा आहे
मुळात मेमेंटो वेगळ्याच धाटणीचा आहे, अगदी हॉलिवूडच्या चित्रपटंअच्या मानानेही. त्याची आणि मसालापट गझिनिचि तुलना न केलेलिच बरी.( तसा मेमेंटो खूप इंटेलिजंट वगैरे असल्याचं मान्ञ असलं तरि त्यात 'मनोरंजन" हा घटक मला तरी कमीच वाटला. बहूधा फक्त इंटलिजंट लोकांसाठीच बनवला असावा)
दक्षिणि गझिनि हिंदीसारखाच अति मसालापट होता.त्याचा शेवट तर अतिच. हिंदीत शेवट बदलला आहे (बहुधा आमिर खानच्या पटकथेत लुडबूड करण्याच्या स्वयीचा परिणांम) त्यामुळे जास्त अपेक्षा न करता गेलात तर हिंदी गझिनि चांगला मनोरंजनपट आहे.
पण तरिही दोघांमधे मि दक्षिणि घजिनिलाच मत देईन कारण ह्या चित्रपटाची मजा मुळात(फारशी डोकेबाज नसलेल्या) कथेमूळे नाही तर नेहेमीच्या मसालापटांपेक्षा वेगळा आणि थरारक ऍक्षनपट पाहत असल्याचा 'फील" येतो त्यामूळे आहे. आणि ही सगळी किमया सूर्याच्या अभिनयाची होति. संपूण चित्रपटभर सूर्या खिळ्वून ठेवतो आणी चित्रपटात थरार आणतो त्यामूळे कथा किती बकवास होती हे फार उषीरा लक्सात येतं.
हिंदीत आमिरखानने कितिही प्रयत्न केला असला तरी तो थोडासा मिळमिळीत वाटला आणि त्याच्याहून कितितरी लहान सूर्याची बरोबरी करू शकला नाही असं मलातरि वाटलं
3 Jan 2009 - 2:28 am | कुशंका
हिरविण दक्षिणि चित्रपटांतली असली तरि मुळची मूंबईची आहे म्हणे.
दोन्हि घजिनींमधे आणखी एक तुलना. दोघां मधे पहिलि नटी आसिनच आहे पण दुसरि नटी बदललि आहे. हिंदितल्या दुसर्या नटीपेक्षा दक्षिणी घजिनीतल्या नटीचं वजन किमान चारपट असावं असा माझा प्राथमिक अंदाज आहे
3 Jan 2009 - 4:17 am | रामपुरी
एकंदर प्रतिक्रिया बघता फक्त नटीच बघण्यासारखी आहे असे दिसते आणि टाळण्यायोग्य आणखी एक हिन्दी चित्रपट...
3 Jan 2009 - 2:20 pm | बकासुर
आयला, बरं झालं इथली मतं वाचली सिनेमा पाहण्याआधी.
४०० रु. वाचले माझे.
(वाचाल तर वाचाल!) बकासुर.
3 Jan 2009 - 3:00 pm | नि३
सिंग इज किंग शी तुलना करण्याइतपत जबरदस्त आहे??वा वा मग खुपच जबरदस्त आहे राव.
रामपुरी(का कानपुरी?) दादा....
सिंग इज किंग शी तुलना का केली कारण सिंग इज किंग हा २००८ चा सर्वात यशस्वी चित्रपट होता (in terms of money fetched on box office)
आमिर खान आणि अक्षयकुमार यांच्यात कोण जबरदस्त आहे ते पण सांगून टाका.
अक्षयकुमार काय आणि आणखी कोणी आपण कोणाला भाव देत नाही.
There is only one ACTOR in the bollywood and that is offcourse AAMIR KHAN.other are stars
i presume that you know the diffarance between actor and star
---नि३.
3 Jan 2009 - 11:57 pm | रामपुरी
गजनी हा खरंच भिकार चित्रपट आहे आणि आपले पैसे वाया गेले हे आपल्या रागाचं खरं कारण आहे असं दिसतंय. =)) :D असू दे होतं असं कधी कधी.
सिंग इज किंग हा २००८ चा सर्वात यशस्वी चित्रपट होता (in terms of money fetched on box office) तसाच गजनी हा सुद्धा २००९ चा यशस्वी चित्रपट असेल.
अमीर खान चा आपल्याला आवडलेला एकमेव चित्रपट म्हणजे "तारे....". तो सुद्धा कथानकामुळे आवडला होता कारण साधारण तसाच चित्रपट 'श्वास' मधे अरुण नलावडेचा अभिनय हा अमीर खानपेक्षा कितीतरी सरस होता. अरुण नलावडेला आपण ACTOR म्हणू शकता. पण मला वाटत नाही तुम्ही तसं म्हणाल. Because I presume that you DO NOT KNOW the diffarance between actor and star. There are very few really good actors/actresses in Bollywood and I certainly DO NOT count AAMIR KHAN in that list.
तेव्हां ३, ४, ५ कितीही 'नि' आले तरी गजनी हा चित्रपट चांगला होऊ शकत नाही आणि अश्या कितीही 'नि' च्या मतांना आपण भाव देत नाही.
(चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा)
परखड रामपुरी
3 Jan 2009 - 3:06 pm | नि३
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार गजनी ने फक्त १ आठ्वड्यातच ११० करोड रुपये कमावले आहे...आणी हा आतापर्यंतचा
रेकार्ड आहे...हो आणि तुम्ही करीत रहा परीक्षण(वांझोट्या चर्चा) कि गजनी कीती वाईट आहे ते.... प्रेक्षकांनी आपला कौल (११० करोड) दीला आहे..
---नि३.
3 Jan 2009 - 4:57 pm | नीधप
गझनी ला वाईट म्हणल्याबद्दल तुम्हाला का इतकं वाईट वाटतंय. त्यांना नसेल आवडला तर तुमचा आग्रह का की चांगलंच म्हणलं पाहिजे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
3 Jan 2009 - 5:51 pm | नि३
गझनी ला वाईट म्हणल्याबद्दल तुम्हाला का इतकं वाईट वाटतंय. त्यांना नसेल आवडला तर तुमचा आग्रह का की चांगलंच म्हणलं पाहिजे?
आणी तुम्हाला का वाईट वाट्तेय मला गजनी आवड्ला तर.........
---नि३.
4 Jan 2009 - 12:24 am | नीधप
>>आणी तुम्हाला का वाईट वाट्तेय मला गजनी आवड्ला तर.<<
मी कधी म्हणाले हो मला वाईट वाटतंय? उगाच काही काय?
एकाचा सिनेमा दुसर्याला आवडला तिसर्याला नाही आवडला. मेरा क्या जाता है!!
ज्यांना आवडला नाहीये त्यांच्यावर हल्ले करताना दिसलात म्हणून विचारलं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
3 Jan 2009 - 6:38 pm | वेताळ
सदर चित्रपट आमिरने बुध्दीमान वर्गातील लोकांसाठी बनवला नसुन तो सुमार बुध्दी असणार्या लोकांच्या मनोरंजनासाठी बनवला आहे. त्यामुळेच हा चित्रपट इतके व्यावसायिक यश मिळवु शकला.मी अजुन हा चित्रपट बघितला नाही पण बघण्यास हरकत नाही असे वाटते. मुळात सिनेमाचे मनोरंजन मुल्य काय आहे ते महत्वाचे. तीन तासासाठी जर आपण आपले डो़के घरात ठेवुन फक्त मनोरंजन म्हणुन चित्रपट बघण्यास काय हरकत आहे? एरव्ही आपण बॉण्ड्पट पण किती कौतुकाने बघत असतो. एकटा हिरो सगळ्या जगाला भारी पडतो . व त्याचे आपण कौतुक करतो. आपल्या मताप्रमाणेहाचित्रपट भिकार असेल तर इतके उत्पन्न कसे मिळवु शकतो? .लोकाना इतका हा चित्रपट का आवडला?
वेताळ
आपल्याला राहुल बोस आवडतो अन तो देखिल कधी कधी फालतु पिक्चर मध्ये काम करतो
4 Jan 2009 - 12:10 am | रामपुरी
आपल्या मताप्रमाणेहाचित्रपट भिकार असेल तर इतके उत्पन्न कसे मिळवु शकतो?
पैसा हाच निकष असेल तर सिंग इज किंग हा सुद्धा उत्तम चित्रपट म्हणावा लागेल.
अर्थात गजनी आणि सिंग इज किंग एकाच लायकीचे आहेत ही गोष्ट वेगळी.
लोकाना इतका हा चित्रपट का आवडला?
लोकाना चित्रपट आवडला म्हणण्यापेक्षा आधीच केलेल्या जाहिरातबाजीमुळे लोक अपेक्षा ठेऊन गेले आणि त्यांचा अपेक्षाभंग झाला असे म्हणता येईल.
चित्रपट फालतू असेल तर जाहिरातबाजीवरच अवलंबून राहावे लागते.
असो... असे चित्रपट आवडणारे सुद्धा लोक आहेत एवढेच या धाग्यावरून कळले.
4 Jan 2009 - 12:27 am | नीधप
>>सदर चित्रपट आमिरने बुध्दीमान वर्गातील लोकांसाठी बनवला नसुन तो सुमार बुध्दी असणार्या लोकांच्या मनोरंजनासाठी बनवला आहे. त्यामुळेच हा चित्रपट इतके व्यावसायिक यश मिळवु शकला.<<
चुकीचे गृहितक.
व्यावसायिक यश = उत्तम चित्रपट नाही तसेच व्यावसायिक यश = बेक्कार वा निर्बुद्ध चित्रपट असेही नाही हो.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
3 Jan 2009 - 7:02 pm | नि३
एरव्ही आपण बॉण्ड्पट पण किती कौतुकाने बघत असतो. एकटा हिरो सगळ्या जगाला भारी पडतो . व त्याचे आपण कौतुक करतो.
घर कि मुर्गी दाल बराबर साहेब अजुन काय..
आपल्या मताप्रमाणेहाचित्रपट भिकार असेल तर इतके उत्पन्न कसे मिळवु शकतो? .लोकाना इतका हा चित्रपट का आवडला?
Now that's exactly what i want to say.
पण काय असते की काही लोकांना सवय असते की एखादी गोष्ट जर ईतर सर्व लोकांना खुप आवडली तर त्याला जाणुन वाईट म्हणायचे त्यामुळे होते काय की , आम्ही कीती शहाणे , आमचे विचार कीती महान......
---नि३.
---नि३.