निळ्या जळाच्या पृथ्वीवरती
सागर ते पाच
जमीन आपली करू लागते
मधोमध नाच
भारतभूमीचे पद धुणारा
हिंदी तो सागर
दक्षिणेला जाऊन भेटतो
दक्षिण सागरास
दोन खंडांच्या मध्येच रुळतो
अटलांटिक सागर
सगळ्या खंडांना मिळून उरतो
प्रशांत महासागर
पृथ्वीच्या त्या शीरकमलावर
व्रतस्थ तो आर्टिक्ट
सतत ध्यानस्थ बसुनी राहतो
सर्वात छोटा सागर
प्रतिक्रिया
3 Jul 2025 - 3:14 am | nutanm
अन्टार्कि्टीक्ट चा काहीच ऊल्लेख नाही. चारच सागर झाले.
10 Jul 2025 - 9:31 am | लाल गेंडा
तो पाचवा ...