राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न
कोणत्याही चांगल्या उपायांचा सर्वात मोठा शत्रू म्ह० राजकारण! त्यामुळे अनेक प्रश्न रेंगाळतात आणि उपाययोजना केराच्या टोपलीत जातात.
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवर जसा सर्वपक्षीय पाठींबा गृहित धरला जातो, त्याप्रमाणे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय सहभाग आणि सहमती आवश्यक आहे. याचा मोठा फायदा त्या प्रश्नांचे केले जाणारे राजकारण थांबविण्यात होईल.
महनगरांच्या वाढीचे प्रश्न हे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न मानले गेले, आणि ते अशा सर्वपक्षीय सहमती परिषदेकडून सोडवले गेले तर अनेक चांगल्या सूचनांचा चुत्थडा होणे थांबेल. अशा परिषदे पुढे आलेल्या प्रश्नांचे राजकारण केले जाणार नाही, अशी हमी परिषदेतील सदस्यांकडून घेता येईल. केल्यास त्या पक्षाला मोठा दंड करायचा. तसेच सूचवलेल्या उपायांचे श्रेय त्या त्या पक्षाला देणे केव्हाही चांगलेच...
आपल्या देशात अनेक आर्कीटेक्चर महाविद्यालये आणि डीझाई्नस्कूल्स मध्ये असे प्रश्न कल्पकतेने सॊडविण्याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते. बथ्थड डोक्याचे राजकारणी त्यांचे ऐकत नाहीत, कारण त्यांची बुद्धी अतिशय छोटी असते आणि नवे स्वीकारायची क्षमता नसते. बाहेरच्या देशात अशा त्रयस्थ अभ्यासगटांच्या शिफारशी गांभीर्याने घेतल्या जातात.
मुंबईत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी सोपी नाही. पण मुंबईतीवर ताण आणणार्या उद्योगांची वाढ थांबवणे शक्य आहे, त्यासाठी सर्वपक्षीय सहमती-परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
प्रतिक्रिया
10 Jun 2025 - 7:42 pm | सुबोध खरे
आपल्या देशात अनेक आर्कीटेक्चर महाविद्यालये आणि डीझाई्नस्कूल्स मध्ये असे प्रश्न कल्पकतेने सॊडविण्याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते.
बथ्थड डोक्याचे राजकारणी त्यांचे ऐकत नाहीत, कारण त्यांची बुद्धी अतिशय छोटी असते आणि नवे स्वीकारायची क्षमता नसते
हायला
राजकारणात असलेले आय आय टि यन पण असलेच आहेत वाटतं. उदा अजित सिंह, केजरीवाल, जयराम रमेश ( हे तर आय आय टी बॉम्बे चे आहेत)
More than 50 IIT alumni have formed a political party to work for the Dalit cause. Without any grassroots experience and support of a mainstream political outfit, how far can they go?
https://www.hindustantimes.com/india-news/meet-the-iitians-who-have-just...
गेल्या सात वर्षात यांनी पण काही केलेलं दिसलं नाही
11 Jun 2025 - 4:19 pm | विवेकपटाईत
500 पुस्तके पाठ करून आयआयटीयन कुणीही बनू शकतो. पण ज्ञानाची खात्री नसते. काहींचे डोके एका वर एक बाटली कशी फ्री देता येईल यातच चालले.
10 Jun 2025 - 11:17 pm | सौन्दर्य
युयुत्सु जी,
तुमच्या लेखात माझ्या मते मूळ मुद्दा 'महानगरांची होणारी वाढ' हा आहे व त्यावरच चर्चा अपेक्षीत आहे. ही वाढ देखील काहीशी नकारात्मक आहे असे तुमच्या लेखावरून जाणवते. ह्यात राजकारणी आणले नसते तर चालले असते. माझे मुद्दे बरोबर असल्यास कृपया कळवा.
मी जन्माने व आयुष्यातील चाळीस वर्षांनी मुंबईकर. माझ्या प्रमाणेच अनेक मिपाकरांनी मुंबईची होणारी वाढ 'याची देही याची डोळा' पाहिली आहेच व पुढेही पाहणार आहोत. मी मुंबईत बैलगाड्या, व्हिक्टोरिया, टांगे पाहिले आहेत. ट्राम्स माझ्या जन्माच्या अगोदरच लोप पावल्या होत्या त्यामुळे त्यांना पाहण्याचे भाग्य लाभले नाही. नाही म्हणायला 'बेस्ट'ची डबल डेकर व ट्रॉली बसेस पाहण्याचे, त्यांच्यात बसून फिरण्याचे भाग्य नक्कीच लाभले. मुंबईतील एका प्रकारच्या लोकल ट्रेनला चढण्या - उतरण्यासाठी अजून एक पायरी असायची, अश्या ट्रेन्स देखील पाहिल्या आहेत. मुंबई बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडयांना कोळशाने इंजिन होते, अश्या गाड्यातून देखील प्रवास केला आहे.
मुंबईत अनेक बदल घडले, घडताहेत व घडत राहतील, पण त्यातील मला भेडसावणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो 'री-डेव्हलपिंग'चा आहे. कारणे अनेक आहेत व त्यावर नीट विचार केला तर तो किती भेडसावणारा आहे हे देखील कळू शकेल. लवकरच मी त्यावर लिहीन, सध्या कार्यबाहुल्यामुळे येथेच आटोपते घेतो .
11 Jun 2025 - 12:19 pm | युयुत्सु
<ह्यात राजकारणी आणले नसते तर चालले असते.>
राजकारणामुळे अनेक चांगल्या कल्पनांची माती होते. अलिकडच्या काळात वाढलेले दिसते. मोदी आवडत नाही म्हणून मोदींनी काहीही केलं तरी ते वाईट, ही मानसिकता खुप वाढली आहे. मी सरसकट मोदीद्वेष करत नाही, मला संघाची आणि वि० संघाच्या तळागळातल्या (मंदबुद्धी) कार्यकर्त्यांची डोक्यात तिडीक बसली आहे.
बाकी मुंबईतले आणि मुंबईबाहेरचे त्या शहराच्या प्रश्नांकडे वेगवेगळ्या नजरेने बघणार, हे स्वीकारूनच चर्चा करता येईल.
11 Jun 2025 - 4:23 pm | विवेकपटाईत
संघाचे लोक मंद बुद्धी आहेत म्हणून देशांत 25000 हून जास्त शाळा आणि 35 एकल विद्यालय चालवितात. 34 लक्ष हून जास्त विद्यार्थी त्यांच्या शाळांत जातात. ते मंदबुद्धि मग बुद्धीमान कोण?
11 Jun 2025 - 4:29 pm | युयुत्सु
< देशांत 25000 हून जास्त शाळा आणि 35 एकल विद्यालय चालवितात.>
त्यांनी पुढे काय दिवे लावले?
14 Jun 2025 - 10:53 am | विवेकपटाईत
त्यांनी पुढे काय दिवे लावले?
समाजसेवा हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना मिळतो. आज देशात सर्वात जास्त रक्तदान करणारे असो की आपदाच्या वेळी लोकांची मदत करणारे असो, किंवा करोंना काळांत शेकडो ठिकाणी अन्नाची व्यवस्था करणे असो. संघाचे लोक सर्वात पुढे असतात. एवढेच काय संघाच्या लोकांनी केलेल्या मदतीचे आभार नेहरूजींनी 1963 गणतंत्र परेड मध्ये आमंत्रित करून केले होते.
आज ते देश चालवत आहे. गेल्या दाहणवर्षातील देशाच्या प्र्गतीचे आंकडे पहा दिवे नव्हे सूर्य प्रकाश दिसेल. बाकी तुम्ही 2004 ते 2014 आणि 2014 नंतरच्या दहा वर्षांचे आंकडे गूगल वरून टाकून स्वत खात्री करू शकतात. बाकी महा बुद्धिमान लोकांना सत्य दिसत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही.
14 Jun 2025 - 11:02 am | युयुत्सु
श्री० पटाईत
काय आहे, २०१४ पूर्वीचा संघ आणि आताचा संघ यात जमी-अस्मानाचा फरक आहे. आताचे संघाचे लोक मदत करतात आणि दामदूपटीने वसूल करतात, त्याशिवाय मदत केल्यावर नको ती अक्कल शिकवत राहतात, किंवा आयुष्याचा ताबा घ्यायचा प्रय्त्न करतात, सतत चूकीचे दिशाभूल करणारे सल्ले द्यायचे किंवा धमक्या द्यायच्या. असे प्रकार तर विचारायला नकोत. जास्त लिहीत नाही.
14 Jun 2025 - 1:44 pm | अभ्या..
हा माणूस धादांत खोटारडेपणा करत प्रत्येक वेळी सत्याचा अपलाप करत आहे. खोटारडेपणा उघड झाल्यावरही तिकडे दुर्लक्ष करुन नवीन खोट्यांची पेरणी अव्याहत चालू असते. असल्या प्रचारकी थाटाला वेळीच आळा घालावा ही नम्र विनंती.
समाजसेवा हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना मिळतो.
त्यात सर्वच विद्यार्थी येतात. समाजसेवा ही संघाची मक्तेदारी नाहीये.
आज देशात सर्वात जास्त रक्तदान करणारे असो
रक्तदानाचे मग वैयक्तिक असो, शिबिरात्मक असो की संस्थात्मक, सर्वात जास्त ह्या रेकॉर्ड मध्ये संघ नाहीये कुठेच. कुठल्याही नगरसेवकाप्रमाणे संघाचे लोक शिबिरे घेत असतातच पण सर्वात जास्त हा तोरा मिरवू नये प्लीजच.
आपदाच्या वेळी लोकांची मदत करणारे असो, किंवा करोंना काळांत शेकडो ठिकाणी अन्नाची व्यवस्था करणे असो. संघाचे लोक सर्वात पुढे असतात
करोनाच्या अन्नदानात सर्वात जास्त योगदान एनजीओ ज चे आहे, संघ एनजीओ नाही. नंतर नंबर लागतो राज्य सरकारांचा मग केंद्र सरकारचा. तंव्हा पुन्हा प्लीजच....
संघाचे लोक सर्वात पुढे असतात. एवढेच काय संघाच्या लोकांनी केलेल्या मदतीचे आभार नेहरूजींनी 1963 गणतंत्र परेड मध्ये आमंत्रित करून केले होते.
" The much-hyped claim that India’s first prime minister, Jawaharlal Nehru, invited the Rashtriya Swayamsevak Sangh to take part in the Republic Day parade of 1963 is nothing but an outright attempt to insert a lie in Indian history. Archival records refute this assertion. Instead, they suggest a completely different scenario: some members of the RSS, in their full uniform, entered that year’s Republic Day event, which was more of a citizens’ march than a military parade due to the national emergency caused by the Sino-Indian War of 1962."
.
आज ते देश चालवत आहे. गेल्या दाहणवर्षातील देशाच्या प्र्गतीचे आंकडे पहा दिवे नव्हे सूर्य प्रकाश दिसेल. बाकी तुम्ही 2004 ते 2014 आणि 2014 नंतरच्या दहा वर्षांचे आंकडे गूगल वरून टाकून स्वत खात्री करू शकतात. बाकी महा बुद्धिमान लोकांना सत्य दिसत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही.
आता वरच्या सगळ्या अफवा पाहता आपण कुठले आकडे कुठे टाकले ते प्लीजच लिहा. एवढे कराच.
11 Jun 2025 - 12:45 pm | आग्या१९९०
ठाणे खाडीतील कांदळवन नष्ट करून गडचिरोलीला वृक्ष लावून पर्यावरणाची हानी भरून काढणारे राजकारणी. अशा बिनडोक राजकारण्यांची अक्कल का काढू नये?
14 Jun 2025 - 2:08 pm | चौथा कोनाडा
फक्त राजकारणीच ?
असं श्रेय एकालाच देऊन कसं चालेल ?
उद्योगपती, गुंड, बांधकाम व्यावसायि़क , नोकरशहा या सर्वांचा वाटा असतो ना आग्याभाऊ !
जरा समजावून घ्यायचा प्रयत्न करा की !
14 Jun 2025 - 4:28 pm | आग्या१९९०
राजकारणी जोपर्यंत शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत बाकीचे लाभ घेऊ शकत नाही. हे चुकीचे वाटत असेल तर द्या समजावून मला.
14 Jun 2025 - 5:40 pm | विवेकपटाईत
वाढते महानगर ही संपूर्ण जगाची समस्या आहे. हा आधुनिक उद्योगीकरणाचा परिणाम आहे. जापान सारख्या देशात ग्रामीण भागात 90 टक्के घरे रिकामी आहे आणि लोकांना टोकियोत एक खोलीचे अपार्टमेंट घेणे ही शक्य होत नाही. पुणे मुंबई दिल्ली इत्यादि महानगरांची परिस्थिति वेगळी नाही. भारतात ही ग्रामीण भागात आणि छोट्या शहरात जवळपास हीच परिस्थिति आहे, घरे रिकामी आहेत किंवा मुले महानगरांत काम करतात आणि म्हातारे गावी राहतात. हीच परिस्थिति संपूर्ण जगात आहे. भारतात उत्तम रस्ते, रेल्वे आणि वीज उपलब्धता वाढली की महानगरातून उद्योग हळू हळू बाहेर जाऊ लागतील ही आशा करू शकतो. पुढील काही वर्षांत महानगरांवरील दबाव कमी होईल.
महाराष्ट्रचे म्हणाल तर मुंबई हे सुरक्षित बंदर असल्याने इथे उद्योग आणि व्यापार वाढला आणि जनसंख्या ही वाढली. पुणे मुंबईचा जवळ असल्याने इथे ही उद्योग आणि व्यापार वाढला आणि जनसंख्या ही वाढली. दिल्लीला केंद्र मानले तर 100 किमी दूर पर्यन्त पसरलेल्या एनसीआरची जनसंख्या मुंबई पेक्षा ही दुप्पट असेल. हजारो छोटे आणि मध्यम उद्योग असल्याने इथे प्रदूषण ही भयंकर आहे. बाकी इथले स्थानीय गावकरी जे बहुतेक गुर्जर आणि जाट आहेत कधीही परप्रांतीय विरुद्ध शंख फुंकला नाही. किंवा राजनीति केली नाही. सत्य स्वीकार करून ते शेती सोडून उद्योग आणि व्यवसायात उतरले. मुंबई असो की पुणे स्थानीय मराठी लोक या बाबतीत कमी पडले. महाराष्ट्रातील नेत्यांनी परप्रांतीय नावाने फक्त राजनीति केली. आज ही तेच सुरू आहे.
14 Jun 2025 - 7:12 pm | युयुत्सु
वाढते महानगर ही संपूर्ण जगाची समस्या आहे. हा आधुनिक उद्योगीकरणाचा परिणाम आहे.
सगळ्या जगात ही समस्या असली तरी प्रश्न हाताळण्याची एफिशियन्सी सगळीकडे समान नाही.
14 Jun 2025 - 7:43 pm | रात्रीचे चांदणे
सगळ्या जगात ही समस्या असली तरी प्रश्न हाताळण्याची एफिशियन्सी सगळीकडे समान नाही.
सहमत आहे. आपल्या जनतेमध्ये शिस्तीचा अभाव आहे आणि प्रशासनही लोक नाराज होतील म्हणून कठोर पावलं उचलायला टाळाटाळ करतं. उदाहरणार्थ, सिग्नल न पाळणे किंवा बॉटलनेक ठिकाणी उलट दिशेने वाहन चालवणे यामुळे ट्राफिक जाम होतो, हे सगळ्यांना माहित आहे. पण केवळ ५-१०% लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे संपूर्ण समाजाला त्रास सहन करावा लागतो. दुर्दैवाने प्रशासनही अशा लोकांवर कडक कारवाई करत नाही. जिथे एका पोलिसाने काम होऊ शकलं असतं, तिथे चार पोलिस उभे राहतात, पण मूळ समस्येवर 'जालीम उपाय नाहीत.