गाभा:
ढिसक्लेमर-कथेतील पात्राचे नाव काल्पनिक आहे याचा वास्तवातील जीवंत,मृत व्यक्तीशी अथवा कलाकृतीशी अन्य कुणाशीही संबध नाही.
अतिशय सजवलेला दिवाणखाना,उच्चभ्रू परिवारातील सर्वजण एकत्र आलेली आहेत.
सर्वजण चिंताक्रांत.जमेल तेव्हढ्या कपाळावर आठ्या पाडण्याचा प्रयत्न करत एकमेकाशी बोलत आहेत.
आजोबा-सिद्धू कुठयं?
वडील-सिद्धू अजून कसा आला नाही?
आई-आता कसे होणार, सिद्धूबाळ कुठे आडकलायं?
भाऊ-हायला,हा शिद्धया कुठं तडफडलायं?
ताई-हे काय बाई! सिद्धू नेहमी असेच करतो.
सिद्धूची बायको-.....
सिद्धूची काकू-तू काही बोलू नकोस. तुच मेल्या शिद्ध्याला डोक्यावर चढवून ठेवलाय.
.....
........
.....................
आवांतर.....
"सिद्धू वेळेवर येणार का? त्याचा अपघात तर नाही झाला? हे जाणून घेण्यासाठी सोमवारी नऊ वाजता अमुक तमूक वाहीनीवर पुढील भाग जरूर बघा......
प्रतिक्रिया
4 Jun 2025 - 6:55 pm | कर्नलतपस्वी
परंतू आजकाल मराठी,हिन्दी धारावाहीक बघताना आपण किती फालतू कार्यक्रम बघत आहे व वेळेचा अपव्यय करतो आहे याची जाणीव होते. असे धारावाहीक बघण्यापेक्षा मी शून्यात बघणे पसंत करतो.
आपले भत काय? हे जाणून घ्यायला आवडेल.