ताज्या घडामोडी - जून २०२५

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jun 2025 - 10:35 am
गाभा: 

ताज्या घडामोडी नेहमी राजकीय किंवा गंभीर प्रसंगच असणे आवश्य्क आहे का? तसे नसेल तर नॉईडातील हे टाईम्स ऑफ इंडीया वृत्त रोचक आहे.

भटक्याकुत्र्यांवर जीव लावणारे त्यांच जेवण खाण शुश्रुशा बघणारे आणि मांजरी कुत्र्यांचा मुक्या जनावरांचा सवईचा हॅबीटाट आहे त्यांना तेथून हकलू नका असे म्हणणारे जसे कुत्रा प्रेमी असतात तसे त्या भटक्या कुत्र्यांच्या उप्द्रवाला वैतागलेले जीवही असतात. तर कायदा आणि प्रशासन आपली बाजू घेऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर नॉईडातील वैतागलेल्या जीवांनी पाळीव संबोधन लागणार्‍या इतर मुक्या जीवांना गाई म्हशी शेळ्यांना सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर हॅबीटाट उपलब्ध करुन देणे केवळ गप्पा नव्हे तसे चालू केल्याची बातमी आहे.

या मानवी कोलाहलात पोट भरले तरी मुक्या जीवांचे हाल होतात हे खरयं पण तुर्तास तरी बातमी वाचून गंमत वाटते आहे. :)

* ताज्या घडामोडी धागे अनुषंगिकाला अनुसरून नसलेले लेखनाची स्पेस आहे असे मला वाटते :) मिपा धोरणाच्या अखत्यारीत उपलब्ध आहे तेवढीच सूट वापरण्यासाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
* नेहमी प्रमाणे उत्तरदायीत्वास नकार.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2025 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१. व्यावसायिक लष्करी दलांवर अपयश किंवा नुकसानीमुळे परिणाम होत नाही. ऑपरेशन सिंदुरमधे झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्वाची आहे. त्यामुळे नुकसानीबद्दल बोलणे योग्य नाही. - सीडीएस जनरल अनिल चौहान.

३. पंजाब आणि आरसीबी आयपीएलमधील अंतिम सामन्यात विराट कोलीच्या संघाचा विजय. पंजाबने दिली कडवी झुंज. पंजाबचा पराभव झाला म्हणून मुंबैकर खुश.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

5 Jun 2025 - 7:36 am | शाम भागवत

दोन नंबरचा मुद्दा का गाळला? ;)

माहितगार's picture

5 Jun 2025 - 11:13 am | माहितगार

१. व्यावसायिक लष्करी दलांवर अपयश किंवा नुकसानीमुळे परिणाम होत नाही. ऑपरेशन सिंदुरमधे झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्वाची आहे. त्यामुळे नुकसानीबद्दल बोलणे योग्य नाही. - सीडीएस जनरल अनिल चौहान.

शत्रुसैन्य हरले आहे किंवा हरते आहे या अपप्रचाराच्या बळावर शत्रुसैन्याला आणि शत्रुंच्या समर्थकाना बिथरवता येते ही युद्धशास्त्राली सर्वसामान्य टॅक्टीक आहे. म्हणून काहीही झाले तरी शत्रुराष्ट्राच्या हातात अपप्रचाराचे कोलीत द्यायचे नसते.

याचा अर्थ डॉळस आत्मपरिक्षण टाळायचे असे नाही. सीडीएस जनरल अनिल चौहानची विधाने मी अभ्यासली ती डोळस आत्मपरिक्षणासाठी लागेल तेवढी ट्रांसपरंट आहेत. सर्वच ट्रांसपरंसीचा लगेच आग्रह धरणेही योग्य नव्हे सैन्यदलांना त्यांचा स्पेस द्यावयास हवा.

प्रत्येक शत्रुपक्ष तुमच्या नुक्सानीकडे लक्ष्य वेधणार हे सहाजिक आहे पण आपण त्या जाळ्यात अडकायचे की सीडीएस जनरल अनिल चौहान यांची साथ देऊन "ऑपरेशन सिंदुरमधे झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्वाची आहे." या भारतीय सैन्यदलाचे मनोबल उंच ठेवणार्‍या मताची सोबत कतायची?

त्यामुळे बातमीदारांनी अनुवादकांनी आणि विश्लेषकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच सैन्यदलांचे खच्चीकरण होईल अशा विपर्यस्त पद्धतीने मथळेबाजी आणि बातमी प्रस्तुती करणे अश्रेयस्कर ठरू शकते किंवा कसे? अगदी प्रत्येक सैन्यप्रमुखही संवादकौशल्यात उत्तम असावेत पण सर्वोत्तम असेल असेही नव्हे. संवादात उत्तम नसलेली एखादी व्यक्ती स्ट्रॅटेजीत उत्तम असू शकते. त्यामुळे सैन्य प्रमुखांची होता होईतो साथ द्यावी हकनाक खीस पाडू नये असे खीस पाडण्यातला एक्सपर्ट असूनही वाटते.

सुबोध खरे's picture

4 Jun 2025 - 6:14 pm | सुबोध खरे

बंगलोर जिंकलं काय कि पंजाब

मुंबईकरांना फरक पडत नाही.

मुंबई इंडियन स्पर्धेतून बाहेर पडले कि स्पर्धा संपली.

एकदा थिएटर मधून बाहेर पडलं कि कुठली सीट रिकामी आहे कि कोणता खेळ चालू आहे काय फरक पडतो?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2025 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आंतरजालीय पाच पन्नास वर्षाच्या काळात पहिल्यांदा आपल्या मताशी २३. १७ टक्के सहमत आहे.

आमचंही आयपीएलमधे पहिलं प्रेम मुंबई. सलग पहिले चार सामने हरल्यानंतर लाखोली
वाहिल्या. नंतर ते सुधारले. उपांत्य फेरीत अजून वीसेक धावा पाहिजे होत्या आणि
अय्यरला लवकर घराची वाट दाखवायला पाहिजे होती. अय्यरने धुवाधार फलंदाजी केली.
मुंबैच्या गोलंदाजीचे वाभाडे निघाले. उपांत्या फेरीपर्यंत मुंबैचा प्रवास झाला हेच पुरेसं झालं.

-दिलीप बिरुटे

असा विचार केला तर आम्हाला IPL बघायलाच नको. आमची टीम खालीच राहिली

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Jun 2025 - 10:08 am | चंद्रसूर्यकुमार

काल मुंबई विमानतळावर टॅक्सीचालक आणि सुरक्षारक्षक यांच्यात हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत वेळ गेली. पोलिसांचेही कोणी ऐकत नव्हते.

https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/cab-driver-and-security-...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2025 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना.

आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं. आणि अशी दुर्दैवी घटना घडते.

-दिलीप बिरुटे

नशिबाने शेठचं सरकार कर्नाटकात नाही.

आग्या१९९०'s picture

5 Jun 2025 - 12:41 pm | आग्या१९९०

शेठचे सरकार असते तर मृतांचा आकडा निम्म्यापेक्षा कमी असता आणि जो काही आकडा दिला असता ते हर्षवायूने दगावल्याचे आयटी सेलने घोषणा केली असती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2025 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

5 Jun 2025 - 2:35 pm | माहितगार

:) पॉलीटीकल कंपल्शनस सर्वत्र सारखीच असतात पण कॉमेंट डिझर्वज मनमोकळी स्मायली :)

सुबोध खरे's picture

5 Jun 2025 - 7:53 pm | सुबोध खरे

शेठचे सरकार असते तर मृतांचा आकडा निम्म्यापेक्षा कमी असता आणि जो काही आकडा दिला असता ते हर्षवायूने दगावल्याचे आयटी सेलने घोषणा केली असती.

काय सांगताय?

४० कोटी लोक एका शहरात एकत्र येतात एक दोन नव्हे तर ४५ दिवस

कोणतीही दंगल नाही चेंगरा चेंगरी नाही.

आणि

शेठजी भटजींच्या पक्षाचं सरकार होतं.

हो

प्रयागराज कुंभ मेळ्याची हि कथा आहे.

तिथे जरा काही झालं असतं तर मोरू (मोदिरुग्ण) लोक धाय मोकलून रडले असते.

आग्या१९९०'s picture

5 Jun 2025 - 10:44 pm | आग्या१९९०

हो प्रयागराज कुंभमेळा दरम्यान भाविकांनी चेंगराचेंगरीचे मॉक ड्रील केले होते. ३० जणांनी मोक्षप्राप्ती घेतली.

चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत ११ लोक मेल्याची बातमी आहे. बहुतेक १८ ते ३० मधले तरूण आहेत. हा त्यांच्या कुटुंबांवर प्रचंड आघात आहे.
आपआपली कामं सोडून, एवढी तोशीस व जोखीम घेऊन चाहते लोक एवढं काय बघायला स्टेडीअममधे जात होते, हेच कळत नाही. ज्या देशाचा खेळ क्रिकेट मानला जातो त्या देशातही लोक इतके वेडे नाहीत. चाहत्यांची मानसिकता समजत नाही. बहुधा टोकाची व्यक्तीपूजा हा आपल्या भारतीय समाजातील सर्वात मोठा दोष असावा.

माहितगार's picture

5 Jun 2025 - 4:03 pm | माहितगार

टोकाची व्यक्तीपुजा आहेच, पण बेशीस्त गर्दीच आकर्षण कुठेही असू शकते. गावी परत जायचे आहे एवढे कारण बस्स्थानक आणि रेल्वेस्थानकावर बेशीस्त वाढून चेंगरा चेंगरी आणि मृत्यूसही कारणीभूत होताना दिसते, त्यात तर धार्मिक इंटरेस्ट किंवा व्यक्ती पुजाही नसेल.

इंग्रजांचे एवढी शतके वर्षे राज्य झाल्यावर नको ते घेतले पण त्यांची बेसिक शिस्तीची संकल्पना अंगिकारण्यास विसरलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2025 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गर्दीत अशी कोणती धोकादायक मानसिक स्थिती निर्माण होते की धावपळ आणि इतर गोष्टींचा परिणाम होऊन चेंगरा चेंगरी होते, यावर काही विदा असल्यास सविस्तर चर्चा करत येईल. शिक्षण घेतांना अशा सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचे शिक्षण दिले जाते काय ? उदा. म्हणून खालील काही मुद्दे घ्यावेत आणि गेल्या काही वर्षातील विदा जमा करुन एक शास्त्रीय पद्धती वापरुन अशा धोकादायक गर्दींच्या वळणांवर काही उपाय सुचवता येतील काय ?

१. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था.
२. राजकीय आणि तत्सम व्यक्तीगणिक होणारी गर्दी.
३. मंदिरं, मशीदी, यात्रा उत्सव इत्यादी.
४. बाबा-बुवा आणि तत्सम.

उत्तरदायित्वास नकार लागू.

-दिलीप बिरुटे

रामचंद्र's picture

5 Jun 2025 - 5:33 pm | रामचंद्र

'मला/आम्हाला आधी' किंवा 'मला एकट्यालाच/फक्त आम्हालाच' ही भावना प्रबळ असणे हेच मुख्य कारण असावेसे वाटते. अर्थात गर्दीत गुदमरल्याने जिवाच्या आकांताने रेटारेटी करणे हेही स्वाभाविकपणे होत असणार.

प्रा डॉ सर आपला प्रश्न चांगला आहे आणि त्याबाबत अगदी सुयोग्य मार्गदर्शन जेमिनी मुनींकडून जसे प्राप्त झाले ते आम्ही पुढील मिपा लेखातून उपलब्ध केले.
गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Jun 2025 - 3:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मिळालेले यश भारतात मनासारखे 'एन्जॉय' करता येत नाही म्हणून आपण लंडनला स्थायिक होत आहोत असे कोहली आणी अनुष्काने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. त्याप्रमाणे आता ते तिकडे स्थायिक होतील.
बी सी सी आय वर आयकर शून्य. आय पी एल च्या माध्यमातून बी सी सी आयला २०२३ साली १६,००० कोटी मिळाले.
टाळ्या वाजवणारे फॅन्स भरगच्च बसमधुन घाम पुसत स्टेडियममध्ये आनंदोत्सव साजरा करायला गेले. आता ११ घरांमध्ये रडारड चालु असेल आणि विराट-अनुष्का लंडनला निघुनही गेले.
Virat Kohli & Anushka Sharma Leave For London
https://www.filmibeat.com/bollywood/viral/2025/chinnaswamy-stadium-stamp...

क्रिकेट्,देशभक्तीची सुंदर मिसळण केली जाते. मग देशासाठी खेळतो वगैरे बोगस विधाने.

स्वधर्म's picture

5 Jun 2025 - 3:41 pm | स्वधर्म

एका संसद सदस्याने आर सी बी संघाला जे ४०० कोटी रु. मिळाले, त्यातून जे मृत झाले त्या ११ लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ कोटी रु, जे विकलांग झाले त्यांच्यासाठी १ कोटी व जखमी झालेल्यांचा संपूर्ण खर्च आर सी बी संघाने करावा अशी मागणी केली आहे. ४०० कोटीतून २५ कोटी म्हणजे काहीच नाहीत असे त्यांचे मत आहे, जे पटण्यासारखे आहे.

मला वाटते पैसे मिळवणार संघाचा मालक आणि खेळाडू, बेशिस्तपणा करणार वेडे चाहते आणि भरपाई मात्र सरकारने द्यावी हे योग्य नाही.

रात्रीचे चांदणे's picture

5 Jun 2025 - 4:41 pm | रात्रीचे चांदणे

कार्यक्रम जर सरकारने आयोजित केला असेल तर भरपाई संघाने का द्यावी? आणि त्यातही जर लोकांनीच हुल्लडबाजी केली असेल तर भरपाई नकोच द्यायला पाहिजे.
खरं तर एखादा खाजगी संघ जिंकला असेल तर सरकारने ह्यात मध्ये पडायलाच नाही पाहिजे. राणजी ट्रॉफी जिंकला असता तर एक वेळेस ठीक आहे कारण खेळणारे खेळाडू तरी स्थानिक असतील.

स्वधर्म's picture

5 Jun 2025 - 5:13 pm | स्वधर्म

सरकारने कार्यक्रम आयोजित करणे चुकीचेच. पण सगळी सरकारे व राजकारणी गर्दी जिथे जमते त्याचा फायदा घेतातच. उदा. मा. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेला धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम.
चाहत्यांच्या वेडाचा मुख्य लाभार्थी जो असेल त्याने त्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी असे वाटले. इथे मुख्य लाभार्थी खेळाडू, संघ व आयोजक आहेत. सरकारने आधीच कारण नसताना करमाफी देऊन उत्पन्नावर पाणी सोडले आहे.

कर्नलतपस्वी's picture

5 Jun 2025 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

आता ११ घरांमध्ये रडारड चालु असेल आणि विराट-अनुष्का लंडनला निघुनही गेले.

घरी बसून चहा भजी,पाॅपकाॅर्न खात जवळून बघण्याची सोय असताना अगदी सुट्टी काढून गर्दीत चेंगराचेंगरीत कशाला जायचे हे जेव्हां पब्लिक ला कळेल तेव्हां कदाचित गर्दीत कमी होण्याची शक्यता निर्माण होईल.

कपिलमुनी's picture

5 Jun 2025 - 9:20 pm | कपिलमुनी

स्वाध्याय वाल्यांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण अशीच गर्दी होऊन लोक मेले होते.

भारतात कॉमन सेन्स कमी आहे आणि गर्दीला सेन्स अजिबात नाही ( मुंबई त्यातल्या त्यात अपवाद )

इतर वेळी यात्रा मध्ये, उत्सवात , रथ असताना अनेक घटना घडल्या आहेत.

रात्रीचे चांदणे's picture

5 Jun 2025 - 10:57 pm | रात्रीचे चांदणे

नॉर्थ ईस्ट चे लोकं सोडली तर इतर ठिकाणच्या लोकांना कॉमन सेन्स नाही हेच खरं आहे. मुंबई पण काही अपवाद वाटत नाही.
बेंगलोर च्या घटनेत पोलीस, संघ मालक यांचा दोष असेल नसेल माहिती नाही पण जमलेली लोकं नक्कीच धुतल्या तांदळाची नाहीत. गेट ला धडका मारतानाचे व्हिडिओ आहेत. हाच कार्यक्रम उद्याच ठेवला तर परत झालं गेलं विसरून तेवढेच लोकं जमतील.

सौन्दर्य's picture

5 Jun 2025 - 11:20 pm | सौन्दर्य

स्टेडियमवर असे काय घडणार होते की लोकांना टीव्हीपेक्षा स्वतः जावे असे वाटले असेल ? कोणत्याही खेळाडूच्या एक हजार फुटाच्या अंतरात देखील पोहोचणे अशक्य असताना ही सर्व मंडळी तेथे गेलीच का ?

स्वखुशीने, स्वमर्जीने गेल्यावर तेथे जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच त्यामुळे भरपाई मागणे हे चुकीचेच. सरकारने देखील देऊ नये कारण तो करदात्यांचा पैसा आहे.

>> स्वतः जावे असे वाटले असेल ?
लोकसत्ताचा आजचा अग्रलेख याच कारणाचा उहापोह करणारा आहे. अत्यंत वाचनीय.
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/royal-challengers-bengalur...

पूर्वी जसे राजे रजवाडे बकर्‍यांच्या, कोंबड्यांच्या झुंजी लावायचे आणि भुकेकंगाल अज्ञानी जनता चार घटका आपले दु:ख विसरायला ते पहायला जायची, तसेच हे आहे. आपला देश प्रगत होण्यापासून खूप लांब आहे याची जळजळीत जाणीव करून देणारी घटना.

आपल्याकडे लोकसंख्याच कितीतरी जास्त झालेली आहे.

कुठेही जा गर्दी असतेच.

लोणावळ्याला भुशी धरणाला शनिवारी जा गाड्या अडकलेल्या तर असतातच माणसांना चालतासुद्धा येत नाही.

सिंहगडाची स्थिती अशीच आहे.

त्यातून व्यक्तिपूजा हा आपला स्थायीभाव.

दक्षिण भारतात गेल्यास आवडता नट येतो आहे म्हणून तासनतास रस्त्यावर येऊन पूर्ण वाहतुकीचा बोजवारा सर्रास उडताना दिसतो.

श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी मुंगी शिरायला जागा नसते.

लालबागच्या राजाला २४ तास रांगेत उभं राहायला लागतं.

गर्दीचे मानसशास्त्र हा एक वेगळा विषय आहे.

आणि जिथे गर्दी जास्त तिथे राजकारणी तर असणारच ना?

कपिलमुनी's picture

6 Jun 2025 - 12:49 pm | कपिलमुनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने (CM Devendra Fadnavis Maharashtra) राज्यातील 903 विकास प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केले आहेत.
ज्या राज्यात अशा योजना आहेत तिथे हेच होणार . विकास होणार नाही . टॅक्स वाले हालात जगणार .

भारतात प्रामाणिकपणे पैसा कमवून टॅक्स देउन कोणतीही सिक्युरीटी नाही. सामाजिक , पोलीस, मेडिकल , शैक्षणिक , रस्ते काहीही मिळत नाही..

उलट याच टॅक्स वर माजलेले राजकारणी , गुंड आणि झोपडपट्टी वाले मिडल क्लासची मारतात

उलट याच टॅक्स वर माजलेले राजकारणी , गुंड आणि झोपडपट्टी वाले मिडल क्लासची मारतात +१०००

माहितगार's picture

7 Jun 2025 - 6:50 am | माहितगार

जे चालू आहे ते आदर्श म्हणता येत नाही. वरील प्रतिसादातून भावना व्यक्त केल्या आहेत त्या व्यक्त ही केल्या पाहीजेत. त्याच वेळी याचे पर्यावसान नकारात्मकतेत होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आपण या सर्व गोष्टींकडे सहसा खूपच सिंप्लिस्टीक व्ह्यूने बघत असतो. राजकारणाचा प्रवाह कुणाही एकाचे नियंत्रण कायम नसलेला काँप्लिकेटेड असतो. आपण आहे त्या परिस्थितीत काय सकारात्मक जोडू शकतो या कडे फोकस केले तर ते अधिक प्रॅग्मॅटीक आणि जिवन सुसह्य करण्यात आपण काही हातभार लावल्याचे समाधान देणारे ठरू शकते.

राजकारण्यांनी लावलेल्या फासाला "लाड्क्या बहीणीचा फास" असे अभिधान पुर्नविचार योग्य ठरते किंवा कसे.

श्री.दाजी पणशीकर यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या सारख्या श्रेष्ठ व्यक्तीचा मला थोडा का होईना पण सहवास आणि त्यांचे प्रेम व मार्गदर्शन मिळाले या बाबत मी स्वतःस फार भाग्यवान समजतो.

त्यांच्या बद्धल संक्षिप्त माहिती खाली देत आहे. [ यासाठी एआयची मदत घेतली आहे. ]
-
दाजी पणशीकर हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि व्याख्याते होते. त्यांचे खरे नाव नरहरी पणशीकर असे होते. त्यांचा जन्म कुटुंबातील सनातन परंपरा आणि धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या वातावरणात झाला.
दाजी पणशीकर यांनी आपल्या आयुष्यातील ५०हून अधिक वर्षे रामायण, महाभारत आणि संतवाङ्मयाच्या अभ्यासात वाहिली. त्यांनी या ग्रंथांचे स्पष्ट, सोप्या भाषेत विवेचन करून समाजप्रबोधनाचे काम केले. त्यांच्या लेखणीची व वक्तृत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे विषयाचा व्यासंग, स्पष्टवक्तेपणा आणि परखड विवेचन होते.
त्यांनी ‘अपरिचित रामायण’, ‘श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ’, ‘श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड)’, ‘कथामृत (भाग १ ते ६)’, ‘कपटनीती’ यासह अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘महाभारत एक सुडाचा प्रवास’ हे पुस्तक विशेष गाजले होते. त्यांनी ३०हून अधिक ग्रंथांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या.
दाजी पणशीकर यांनी देश-विदेशात सुमारे २,५००हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांचा प्रभाव आणि ख्याती प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारतातील बौद्धिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये होती.त्यांचे कार्य आणि प्रभाव हा त्यांच्या विचारसरणी आणि समाजप्रबोधनावर केंद्रित होता. त्यांनी स्वतःचा वाचक व श्रोतृवर्ग तयार केला होता. मराठी रंगभूमी, साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट या विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला होता. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाच्या निर्मितीच्या नाट्यसंपदा या संस्थेचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले.
त्यांनी १९९२ साली वासुदेवशास्त्री पणशीकर वाचनालय स्थापन केले व अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम घडवून आणले. टिटवाळा आणि नंतर ठाणे येथे त्यांचे निवासस्थान आहे.
दाजी पणशीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक श्रेष्ठ विचारवंत, समाजप्रबोधनासाठी जीवन वाहिलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा व सून असा परिवार आहे.
=========================================================================================

मदनबाण.....

कृपया कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख कळू शकेल का?

क्षमस्व. माझ्याकडे ही माहिती नाही. साल १९३४ इतकेच ठावूक आहे.

कर्णाची खरी ओळख सांगणारे Daji Panshikar कोण होते ?

मदनबाण.....

रामचंद्र's picture

12 Jun 2025 - 11:21 am | रामचंद्र

मला मिळालेल्या माहितीनुसार १ मे १९३४.