सरकारी कार्यालयातील वातानुकूलन यंत्रणा

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
8 May 2025 - 10:28 am
गाभा: 

काल एका समाजसेवकाचे एक रिल फेसबुकवर बघितले. त्या रिलमध्ये सदर गृहस्थ एका सरकारी अधिकार्‍यास समजवजा निवेदन देत असल्याचे दिसले. विशिष्ट सरकारी नोकरांना आपल्या कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा बसविण्यास सरकारची परवानगी आहे. त्यासाठी जो निकष आहे तो पगाराचा आहे (असे त्या रिलमुळे समजले).

माझे म्हणणे असे की -

अगोदरच बहुसंख्य सरकारी कार्यक्षमता शून्याच्या जवळपास किंवा ’उणे’ असते.
वातावरणाचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे आता सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.
वातानूकुलन यंत्रणेच्या वापरासाठी निकष पगाराशी न जोडता उत्पादकतेशी निगडीत असावेत. कमी पगाराचा पण लोकाभिमुख अधिकारी वातानुकूलन यंत्रणेसाठी पात्र असायला हरकत नाही.

अशा परिस्थितीत कार्यालयात लावलेल्या वातानुकूलन यंत्रणेला आक्षेप घेण्यापेक्षा सरकारी अधिकार्‍याच्या उत्पादकतेचे मोजमाप झोमॅटो आपल्या डीलीव्हरी बॉईजच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करते तसे सरकारी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करावे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

8 May 2025 - 6:18 pm | कपिलमुनी

त्या येड्या भो ** ला कामे नाहीत !
सुपारीबाज आहे