गाभा:
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय.
ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया
7 May 2025 - 8:03 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:08 am | श्रीगुरुजी
कालच वाटले होते की आज देवभर मॉक ड्रील आयोजित करणे, देशद्रोह्यांनी त्याची टिंगलटवाळी करीत मोदींना शिव्या देणे या गोष्टी सर्वांना अंधारात ठेवण्यासाठी आहेत, भारत इतक्यात हल्ला करणार नाही अश्या समजुतीत पाकिस्तान आणि भारतातील पाकिस्तानप्रेमी रहावे व आज रात्रीच काहीतरी सुरू होईल.
7 May 2025 - 8:10 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:11 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:14 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:15 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:16 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:25 am | श्रीगुरुजी
काहीतरी गडबड आहे. ट्विट दाखविता येत नाही.
ट्विट वरील चित्रासह खालीलप्रमाणे आहे.
ताली थाली बजाओ के बाद पेश है #सायरन बजाओ !
मोदी जगाला अंधारात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळे करतात आणि जग टिंगल करीत असताना शांतपणे गुपचूप आपल्याला हवे ते करतात. यालाच कात्रजचा घाट दाखविणे म्हणतात. मिपावर व अनेक समाजमाध्यमांवर अशी टिंगल करणारे जन्मजात मूर्ख अतोनात आहेत. मॉक ड्रील घोषणेची यथेच्छ टिंगलटवाळी समाजमाध्यमांवर सुरू असताना हा हल्ला झाला.
२६/११/२००८ नंतर भारताने युद्ध करायला हवे होते. परंतु परकीयांच्या हातात सर्व निर्णयाधिकार व अत्यंत दुर्बल नेतृत्व यामुळे भारताने शेपूट घातली होती. परंतु आता परिस्थिती पूर्ण उलट आहे.
7 May 2025 - 8:17 am | श्रीगुरुजी
7 May 2025 - 8:22 am | रात्रीचे चांदणे
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल वाटतंय. पण आपली सेनाही नक्कीच तयारीत असणार.
7 May 2025 - 8:59 am | मारवा
पुराव्याची मागणी स्वाभाविकपणे येणार
यासाठी माझ्यामते योग्य असे होईल की
पाकिस्तानी अधिकृत लष्करी पुरावे दिल्यास हल्ला झाला
हे सिद्ध करता येईल.
भारतीय पुरावे टाळले पाहिजेत.
उदा. हा व्हिडिओ पाकिस्तानिंलासकर अधिकाऱ्याचा बघा.
https://www.youtube.com/live/XKi6ORjquNI?si=Me-g_wbAITUTq_Ke
यानंतर हल्ला झालाच नाही हा मुद्दा किमान येणार नाही.
त्यापुढे जात चर्चा करता येईल
7 May 2025 - 9:23 am | श्रीगुरुजी
सीएनएन, बीबीसी या संकेतस्थळावर हल्ल्याच्या चित्रफिती आहेत.
बीबीसीची बातमी
सीएनएनची चित्रफीत -
https://edition.cnn.com/2025/05/06/world/video/india-military-operation-...
7 May 2025 - 9:26 am | मारवा
श्रीगुरुजी मी नेमके हेच पुरावे द्यावेत असे म्हणतोय.
भारतीय बाजूने आलेले पुरावे नकोच.
म्हणजे हल्ला झाला की नाही हे निर्णायकरित्या ठरविता येईल.
मग किमान चर्चा तिथे रेंगाळणार नाही पुढे सरकेल.
7 May 2025 - 9:39 am | श्रीगुरुजी
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय, परदेशी माध्यमांनी चित्रफिती दिल्यात, चीन व अमेरिका अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिलीये . . . हल्ला केल्याचे अजून कोणते वेगळे पुरावे अपेक्षित आहेत?
काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत.
7 May 2025 - 9:43 am | अमरेंद्र बाहुबली
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय,
आमचा विश्वास भारतीय सैन्यावर आहे पाकिस्तानवर नाही!
7 May 2025 - 10:03 am | चंद्रसूर्यकुमार
मागच्या वेळेस भारतीय सैन्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परीषद घेऊन हल्ले केल्याचे जाहीर केले होते तेव्हा तुमच्यासारखे लोक पाकडे कुठे मान्य करत आहेत- तिकडे नुसती झाडंच पडली असे म्हणत होते. याला डबल ढोलकी म्हणायचे की आणखी काही?
7 May 2025 - 9:00 am | अमरेंद्र बाहुबली
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका! खऱ्या बातम्या येऊद्या! गोदी मीडियाच्या बातम्यांवर मला तितकाच विश्वास आहे जितका पॉलिटिकल सायन्सच्या डिग्रीवर! आणी अतिरेकी होते की नव्हते त्या हल्ला
केलेल्या ठिकाणांवर? २६ च्या बदल्यात ५२ तरी मारले का? की एस छोटे हल्ले
करून दिखावा करायचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे? ( प्रत्यक्ष हल्ला टाळायचा?)
7 May 2025 - 9:23 am | मारवा
माझा अंदाज तुम्ही अचूक ठरवलात.
म्हणून मी एकही लिंक भारतीय नेते ,भारतीय माध्यमे, भारतीय लष्कर सुद्धा दिलेली नाही व तशी देऊं सुद्धा नये हेच तर म्हणतोय.
एक शरीफ यांचे अधिकृत ट्विट आहे
एक त्यांच्या सूचना मंत्र्याचा व्हिडिओ आहे.
एक त्यांच्या लष्करी अधिकाऱ्याचा आहे.
7 May 2025 - 9:09 am | अमरेंद्र बाहुबली
हल्ला छोटा दिखावा मोठा! असा प्रकार दिसतोय!
अरे सैन्य घुसवा पाकिस्तानात!
7 May 2025 - 10:22 am | सुक्या
हायला .. अबा .. तुम्हाला कसे कळले हो? माझ्या सुत्रांकडुन पक्की बातमी आहे. ईद चे उरलेले फटाके फोडले पाकीस्थानात. उगा भारताला चिथावणी द्यायला.
नाहीतरी मोदी मधे ईतकी हिम्मत कुठे आक्रमण करण्याची. काय म्हणतात ते .. ५६ इंच फुकटचे आहेत.
(जाता जाता: खरं तर अनुल्लेखाने मारणार होतो पण काय आहे आज आनंद ईतका झाला आहे ना ... म्हणुन हा प्रतिसाद.)
7 May 2025 - 9:16 am | रात्रीचे चांदणे
ह्या वेळेस तर ओवेसी सारखे लोकं ही समर्थन करत आहेत. तरी बरं पाकिस्तान ने accept केलंय.
7 May 2025 - 9:19 am | अमरेंद्र बाहुबली
ओवेसी भाजपचीच बी टीम आहे!
7 May 2025 - 9:57 am | चंद्रसूर्यकुमार
मला वाटते की तुम्ही पण भाजपचीच बी-टीम आहात. वारंवार इतके मूर्खासारखे बरळत आहात की त्याची किळस येऊन अनेकांच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्या बरोबर उलटा परीणाम होत असेल. ज्याप्रमाणे कन्हैय्या कुमार, मुग्धा कर्णिक, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक, निखिल वागळे, विश्वंभार चौधरी वगैरे लोक मोठ्या पातळीवर आहेत त्याप्रमाणे मिपाच्या पातळीवर तुम्हीच.
अमरेंद्र बाहुबली आगे बढो हम तुम्हारे साथ है
:) :)
7 May 2025 - 10:17 am | सुक्या
चंसुकु,
जाउ द्या हो. काही पिपाण्या वाजतातच .. सोडुन द्या. ह्यांच्याकडे जास्त लक्ष देउन आपला आनंद कमी करु नका.
7 May 2025 - 9:16 am | मारवा
https://x.com/CMShehbaz
या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला
हे सिद्ध होत आहे. माझ्यामते हा tweet आणि वरील व्हिडिओ
सारखे अजून काही "पाकिस्तानी" पुरावे आवश्यक आहेत.
त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील.
कृपया भारतीय मीडिया, भारतीय नेते ,भारतीय लष्कर यांनी दिलेले पुरावे निःसंदिग्धतेच्या दृष्टिकोनातून देण्यात येऊ नयेत.
https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=6nbzWwo-f_PsEUXh
हा एक व्हिडिओ पाकिस्तानच्या सूचना मंत्र्याचा आहे. यात ते हल्ला झालेला आहे हे मान्य करताना दिसत आहेत.
तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे.
काही काळ अजून वाट बघावयास हवी.
कारण हल्ला खरोखर झाला की नाही हा पहिला मुद्दा सोडवल्याशिवाय
यापुढे जाण्यात अर्थ नाही.
7 May 2025 - 9:23 am | अमरेंद्र बाहुबली
कर्नल साहेब प्रणम स्वीकारावा! अगदी मनातले लिहिलेत!
या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला
सहमत! भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य किंवा प्रेसनोट यावी!हे सिद्ध होत आहे.
तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे.
बरोबर! गोदी मीडियाच्या बातम्या नी भाजप नेत्यांची वकतव्ये विश्वासरह्या नाहीत!
त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील
+१ आंतरराष्ट्रीय बातम्या खर्या, कारण त्यांच्यावर भाजप वगैरेंचा दबाव नसतो!
7 May 2025 - 9:40 am | मारवा
तुम्ही चुकत आहात
भारतीय पुरावे नकोतच.
भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य पण कशाला ग्राह्य धरताय तुम्ही ?
भारतीय सैन्याकडून हल्ला झालाच आहे हे मान्य करण्याची इतकी.घाई तुम्ही केली हे योग्य नाही.
थोडे शांततेने घ्या अजून पुरावे येऊ द्या
संध्याकाळ पर्यंत हल्ला झाला की झालाच नाही हे निर्णायकरित्या सिद्ध होईलच.
ही एक CNN या चॅनेल.ची बातमी ज्यात भारतीय हल्ल्याचा उल्लेख आलेला आहे.
https://youtu.be/PFsronvNw5I?si=PpejXq8DS_U0oALb
7 May 2025 - 9:52 am | रात्रीचे चांदणे
बरं मग पाकिस्तानच्या dawn चे संकेतस्थळ तपासा. भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य ग्राह्य धरायचे नसेल तर dawn मध्ये पाकिस्थान च्या मिलिटरी अधिकाऱ्याचे स्टेटमेंस्ट आहेत. पण त्यात ते दहधातवादी मेले म्हणतं नाहीत तर सामान्य लोकं मेली म्हणून ओरडत आहेत.
7 May 2025 - 9:23 am | रात्रीचे चांदणे
पाकिस्तान च्या DG ISPR ने स्वतः ८ ठिकाणी हल्ला झाल्याचं केलंय.
१० वाजता सेनेची प्रेस कॉन्फरेन्स आहेच.
7 May 2025 - 9:16 am | वामन देशमुख
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तराला यशस्वी सुरुवात केल्याबद्धल केल्याबद्धल भारताचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील लढाईसाठी शुभेच्छा.
हिंदू स्त्रियांचे कुंकू पुसणाऱ्या ओला-ओ-उबरांना ढगात पाठवणाऱ्या मोहिमेचे "ऑपरेशन सिंदूर" हे नाव अगदी सार्थ आहे!
---
अपेक्षेप्रमाणे, पाकी घाणपट्ट्यात वळवळणारी ओला-ओ-उबर-वादी कीड याही धाग्यावर आली आहे. तिच्यावर जंतुनाशक फवारण्यासाठी मिपाखरं समर्थ आहेतच.
7 May 2025 - 9:54 am | श्रीगुरुजी
याला आणि याच्या चाहत्यांना बसली थोबाडीत.
7 May 2025 - 9:57 am | सोत्रि
फुल ब्लोन युद्ध करण्यासाठी पकिस्तान शेपूट घालेल कारण युद्ध चालवण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक कुवत नाहीयेय.
- (देशप्रेमी) सोकाजी
7 May 2025 - 10:07 am | श्रीगुरुजी
न्यूयॉर्क टाईम्सने प्रथमच militants शब्दाऐवजी terrorists हा शब्द वापरला.
भारतीय सैन्याचा व खंबीर नेतृत्वाचा अभिमान वाटतो!
7 May 2025 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी, हा भारत देश कटीबद्ध आहे, पक्षीय राजकारण आणि मतभेद सोडून देश एकजुट-मजबूत होतो, हे अतिरेकी तळ उद्ध्वस्त करीत भारताने दाखवून दिले.
अभिमानास्पद.
-दिलीप बिरुटे
7 May 2025 - 10:08 am | चंद्रसूर्यकुमार
आता जर परिस्थिती अनुकूल असेल तर आणखी मोठा हल्ला करून पाकड्यांना पूर्ण नेस्तनाबूत करायला हवे. पाकिस्तानातील धरणे, विमानतळे, उर्जा प्रकल्प, कारखाने वगैरे सगळे काही पूर्ण उध्वस्त करायला हवे. ती जमातच अशी आहे की कोणत्याही प्रकारचा चांगुलपणा दाखवायची त्यांची लायकी नाही. उठता लाथ बसता बुक्की असे सतत करत राहिले आणि थोडीशीही- अगदी एक मिनिटाचीही सूट दिली नाही तरच ते गप्प बसतील. नाहीतर कधीनाकधी ते इतर सगळ्यांवर उलटणारच. जर तसे केले नाही तर १९७१ मध्ये युध्द जिंकले पण सिमला करारात सगळे गमावले त्याची पुनरावृत्ती होईल.
7 May 2025 - 10:15 am | श्रीगुरुजी
असेच व्हावे. पाकिस्तान किती प्रमाणात प्रतिकार करेल त्यावर अधिकची कारवाई होईल असं वाटतंय. पाकिस्तानने विमाने पाठवून किंवा सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम.
7 May 2025 - 10:14 am | श्रीगुरुजी
उठा उठा,
हल्याचे पुरावे मागण्याची वेळ आली,
मोदींना शिव्या हासडण्याची वेळ आली,
पाकिस्तानला मदत करण्याची वेळ आली,
मुर्खासारखे बरळण्याची वेळ आली!
8 May 2025 - 10:47 am | प्रसाद गोडबोले
होय होय ,
ते चालतं मिसळ्पाव वर . तुम्ही जरा काही बोललात तर तुमचा आयडी उडवण्यात येईल हो , तुम्ही म्हणजे काही मराठी विषयातील विद्या वाचस्पती प्राध्यापक नव्हे . जरा जपुन.
7 May 2025 - 10:17 am | वामन देशमुख
आता, साडेदहाला भारतीय सेनेची पत्र परिषद आहे.
7 May 2025 - 10:46 am | अमरेंद्र बाहुबली
अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत आहे की भारतीय सैन्याने हल्ला केला आहे, भारतीय सैन्याचे खूप खूप अभिनंदन! चांगले नेतृत्व देशाला असते तर भारतीय सैन्याने २३ एप्रिल रोजी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते ह्याबाबतीत काहीही शंका नाही! जय हिंद जय भारत! भारत माता की जय!
7 May 2025 - 10:50 am | सुबोध खरे
हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते
उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात
7 May 2025 - 10:52 am | अमरेंद्र बाहुबली
उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात
मंत्रालयात खुर्च्या उबवत बसलेत! :) सौगंध मुझे….
:)
7 May 2025 - 11:16 am | माईसाहेब कुरसूंदीकर
समयोचित हल्ला. अभिनंदन.
General Lt Gen Ahmed Sharif Chaudhry said the number of lives had risen to 26 civilians across six localities that India hit, with 46 injured.
पण त्याचवेळी-
Pakistan downs 5 Indian jets as retaliation for late-night strikes at 6 sites: officials
https://www.dawn.com/news/1908824/pakistan-downs-5-indian-jets-as-retali...
बाकी सरकारमध्ये हिंम्मत नाही म्हणाणार्या काही नेत्यांचे काय करायचे कळत नाही. सैन्यातील सर्वोच्च अधिकार्यांबरोबर सल्ला मसलत केल्यावरच हे निर्णय घेण्यात येतात. अन्यथा नाही.
7 May 2025 - 11:34 am | रात्रीचे चांदणे
आत्ता ह्या पुढची पायरी म्हणजे, पाकिस्तान म्हणणार निरापराध नागरिक आणि लहान मुले मेली. आणि आपलेच काही लोकं ह्याचा निषेध करणार.
7 May 2025 - 11:38 am | Bhakti
आतापर्यंत काली आणि दुर्गा पाहिल्या नव्हत्या,आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा!
#ColSofiaQureshi
#WingCommanderVyomikaSingh
#OperationSindoor
भारतीय स्त्रीचे सिंदूर उजाड करणाऱ्या भ्याड हल्ल्याचे प्रत्त्युत्तर भारतीय स्त्री शक्ती देतांना...
7 May 2025 - 11:59 am | चंद्रसूर्यकुमार
छे हो. कुठचे काय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे हिंदू पॅट्रिआर्कीचे प्रतीक असलेले नाव दिले ही बोंबाबोंब सुरूही झाली आहे.
7 May 2025 - 12:53 pm | Bhakti
अशा टंकनशूर कागदी घोडे नाचवणाऱ्याना लोकांना स्वतः बंदूक घेऊन सीमेवर पाठवावे .मग ती खरी समानता होईल.
9 May 2025 - 4:52 pm | Bhakti
काल मी याबद्दल स्त्रीवादी काही मराठी लेख वाचले.त्यानुसार असं म्हणणं आहे की,सिंदूर टिकली अशा नावांनी भावनिकदृष्ट्या मुद्दा कॅच करण्याचा हा डाव आहे.अनेकांना भावनिक करून स्वतःचं महत्व वाढवायचं आहे.
मला विचाराल तर '"स्त्रीवादाच्या बाबतीत पहाट झाली असल्यास सिंदूर नाव ठेवा नाहीतर बांगड्या...काही फरक पडणार नाही इतकी तटस्थता येते"
थोडं विस्कळीत लिहलंय पण भावना समजून घ्या.
9 May 2025 - 4:54 pm | Bhakti
आणि इतकं व्यवहारी शहाणंपण काहींमध्ये असतं की.."ऑपरेशन सिंदूर"चे कॉपीराइट ही २४ तासांच्या आत मागतात.यांना हुशार म्हणावे की डम्ब???
9 May 2025 - 9:07 pm | स्वरुपसुमित
मि त्या नावाचे डोमेन नेम ,इन्स्टा आयडी, युटुब च्यानेल पण घ्यायचा प्रयत्न केला
7 May 2025 - 11:45 am | मारवा
यावेळेस भारतीय सैन्याने हल्ला केलेला आहे
ही बाब फार म्हणजे फारच उतावळेपणाने मान्य केली जात आहे.
किमान संध्याकाळ पर्यंत तरी थांबण्यास हवे होते
खातरजमा केली असती
कारण एकदा हे मान्य केले की भारतीय सैन्याने खरच हल्ला केलेला आहे ते सुद्धा सीमेपेक्षा इतक्या आत पर्यंत जाऊन तर मग नाईलाजाने
मग पुढील मुद्दे सुद्धा चर्चेत घ्यावे लागतील.
कारण मग ते अधिकच अडचणीचे आणि क्लिष्ट असे मुद्दे आहेत.
ही घाई चुकते असे माझे मत आहे.
हे फार भावनिक होत आहे याला
कुठेतरी आळा घातला पाहिजे.
पण ज्यांच्याकडून अपेक्षा आहे तेच इतके भावनिक होत आहेत
आणि अभिनंदन करत आहेत की
याला आता काय म्हणावे ?
किमान संध्याकाळ पर्यंत तरी...
7 May 2025 - 11:48 am | श्रीगुरुजी
संध्याकाळपर्यंत थांबणे खूपच घाईचे ठरेल. अजून १० वर्षे थांबावे.
7 May 2025 - 12:12 pm | मारवा
तुम्ही इतकी दीर्घ अपेक्षा करत आहात ?
7 May 2025 - 11:56 am | रात्रीचे चांदणे
पाकिस्तान ने पण मान्य केलंय. अजून दहा वीस वर्ष तरी वाट बघायला हवी होती.
7 May 2025 - 11:47 am | श्रीगुरुजी
१९९९ - भारतीय सैन्याने सीमा न ओलांडता सैन्य, तोफा व विमानातून बॉम्बिंग करून घुसखोरांना हाकलून लावले.
२०१६ - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली.
२०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले.
२०२५ - भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये व पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले.
प्रत्येक वेळी भारत एक पाऊल पुढे जातोय.
7 May 2025 - 11:57 am | चंद्रसूर्यकुमार
ही चूक चुकून झाली की जाणूनबुजून केली? :) :)
२०१९ मध्ये बालाकोट येथे खैबर पख्तुनवामध्ये (वायव्य सरहद्द प्रांतात) म्हणजे पाकिस्तानातच जाऊन बॉम्बिंग केले होते. पीओकेमध्ये नाही. महाराजा रणजितसिंगाने खैबरखिंडीच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकला आणि खैबरखिंडही ओलांडून अफगाणिस्तान त्याच्या साम्राज्यात जोडून घेतले होते. त्यानंतर जवळपास २०० वर्षांनंतर खैबरखिंडीच्या प्रदेशात आपल्या बाजूने प्रथमच हल्ला झाला होता.
7 May 2025 - 11:55 am | मारवा
चला ठीक आहे आता सर्वांनीच मान्य केलेले आहे की भारताने खरोखर हल्ला केलेला आहे तर पुढचा मुद्दा घ्या
आपल्या मते पुढील कोणते प्रश्न आता उपस्थिती झालेले आहेत ?
उदा. या हल्ल्याचे श्रेय कोणाचे आहे ?
7 May 2025 - 5:44 pm | कॉमी
यशस्वीपणे (म्हणजे, आपल्या सैनिकांची जीवितहानी न होऊ देता) ऑपरेशन झाले. सरकारी व्यवस्था, सैन्यदल अधिकारी, इंटेंलीजन्स जाळे ह्यांच्यात समन्वय असल्यामुळे झाले.
सर्वांचेच अभिनंदन.
7 May 2025 - 12:03 pm | मारवा
या हल्ल्याचे श्रेय आता कुणाला द्यावे ?
मोदी यांच्या political will ला आणि नेतृत्वाला ?
डोभाल यांच्या strategy ला ?
जयशंकर यांच्या परराष्ट्र नीतीला ?
की शरद पवार यांनी दिलेल्या अनुभवी मार्गदर्शनाला ?
की विरोधकांनी केलेल्या सहकार्याला ?
आपणं याचे श्रेय देऊ शकतो का ?
कारण मी अगोदरच म्हणालो की हल्ला केला हे जर मान्य केले
तर पुढील प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत.
7 May 2025 - 3:25 pm | सौंदाळा
सोप्पे आहे.
हल्ला होत नाही तोपर्यंत मोदींना शिव्या द्यायच्या आणि हल्ला झाला की लष्कराचे अभिनंदन करायचे.
7 May 2025 - 12:24 pm | वामन देशमुख
पंप्र मोदींचे आभार.
7 May 2025 - 12:41 pm | अमरेंद्र बाहुबली
आरती गाऊया……
7 May 2025 - 8:31 pm | स्वधर्म
कालच स्काय न्यूजच्या याल्दा हकीम यांनी पाकिस्तानचे संपर्क मंत्री तरार यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी वारंवार पाकिस्तान दहशतवादाला थारा देत नसल्याचा दावा केला. परंतु हकीम यांनी तरार यांचा दावा फेटाळून लावला. तसेच आठ दिवसांपूर्वी पाकच्या संरक्षण मंत्र्याने दहशतवादाला थारा दिला होता असे मान्य केला असल्याचेही सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वार्तांकनात, भारताची बाजू मजबूत असल्याचे दिसत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=Ubn2b-UAPKaR93u_
7 May 2025 - 8:35 pm | स्वधर्म
पाक संरक्षण मंत्री दहशतवादाला पाठींबा दिल्याची कबुली देताना:
https://www.youtube.com/shorts/lkO8fR4vlgA
7 May 2025 - 10:47 pm | सुक्या
स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन भारतातील तमाम न्युज चॅनल च्या आक्रस्ताळ्या अॅंकर ना खुप काही शिकण्यासारखे आहे. गळ्यात माईक चे बोंडुक असताना उच्च आवाजात बोलण्यात तसेच कुत्रा मागे लागल्याप्रमाणे बातम्या देण्यात काय हशील आहे? एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलुन समोरच्याला डोकेदुखी होते. तसेच प्रत्येक न्युज ही ब्रेकिंग न्युज असते. शांतपणे बोलुन आपल्याला हवा तो मुद्दा कसा मांडावा हे भारतातल्या अॅंकर ला शिकवायची नितांत गरज आहे.
7 May 2025 - 11:18 pm | सौन्दर्य
ह्या त्यांच्या आक्रस्ताळी ओरडण्यामुळेच मी अश्या बातम्या बघायचे बंद केले .
8 May 2025 - 10:55 am | Bhakti
काल मी जवळपास ५ वर्षांनी हिंदी न्यूज चॅनल दिवसभर पाहिला.अस्स डोकं दुखायला लागलं संध्याकाळी,की डोकेदुखीची गोळी घेऊन आठ वाजताच निद्रिस्त झाले.कसं काय लोकं दिवसभर न्यूज चॅनेल पाहतात??मी पाच वर्षांपासून टीव्ही पाहणेच सोडून दिलं आहे.खरोखर टीव्ही म्हणजे इडियट बॉक्सच आहे...
8 May 2025 - 2:59 pm | स्वधर्म
स्काय न्यूजच्या बातम्या व चर्चा ऐकल्या की आपल्या चनेलवरील चर्चांचा दर्जा किती कमी आहे याची जाणीव होते.
मला तर या निवेदकांच्या ओरडण्यामुळे दूरदर्शनच्या बातम्या पहायला आवडायचे. पण त्या अगदीच सरकारी जी आर वाचून दाखवल्याप्रमाणे असतात.
8 May 2025 - 3:30 pm | रात्रीचे चांदणे
फक्त निवेदकच ओरडत नाहीत तर आपल्या चॅनेल्स चे गेस्ट पण असेच ओरडणारे असतात. किंवा ओरडणाऱ्या लोकांनाच ते बोलवत असावेत.
8 May 2025 - 10:59 pm | सौन्दर्य
सरकारी बातम्या - ९०% प्रोपोगंडा, १०% बातम्या
8 May 2025 - 4:19 pm | Bhakti
भारतीय सेनेला विनंती पाकिस्तानवर हल्ला करताना इथल्या न्यूज चॅनलच्या कार्यालयावरही बॉम्ब टाकून देश वाचवावा
8 May 2025 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीयांची माथी भडकावण्याचं आणि वास्तवतेपासून दूर वार्तांकनाचे त्यांना पैसे मिळतात म्हणून इतका कै च्या कै बातम्या ठोकत असतात त्या पेक्षा वृत्तपत्र वाचलेले बरे आणि युट्यूबवरील सामान्य लोकांनी टाकलेले व्हीडीयो बरे असे वाटायला लागते. मिडिया बदनाम झालं आहे. काही विलाज नाही.
-दिलीप बिरुटे
7 May 2025 - 9:34 pm | प्रमोद देर्देकर
मोदी होते म्हणून प्रतिहल्ला तरी झाला. इतर पक्षाचा दुसरा कोणी नेता असता तर "हमे देखना है, हमे हटाना है! म्हणण्यात ७५ वर्ष तरी नक्कीच गेली असती.
असो.
7 May 2025 - 10:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीगुरूजी गेले वाटतं चारिधाम यात्रेला. हे राम...! =))
-दिलीप बिरुटे
8 May 2025 - 10:43 am | प्रसाद गोडबोले
वाह वाह ,
ही अशी स्पष्टपणे ध्याग्याच्या लेखनाच्या विषयाशी असंबध्द आणि वैयक्तिक टिप्पण्णी मिसळ्पव संपादक मंडळ खपवुन घेते अन इतरांचे लेखन प्रतिसाद आयडी संपादित करते ह्यावरुनच त्यांचा पक्षपाती पणा सिध्द होतो .
8 May 2025 - 12:19 pm | रात्रीचे चांदणे
श्रीगुरूजीचा ID उडवायाच काही कारण वाटत होत असं वाटत नाही.
8 May 2025 - 1:19 pm | चंद्रसूर्यकुमार
सहमत. अमरेंद्र बाहुबली एकामागोमाग एक अज्ञानमूलक विधाने करत होते आणि ही गोष्ट आजची नाही तर अनेक महिन्यांपासून चालू होती. कितीही दुर्लक्ष करायचे ठरविले तरी तेच तेच शेकडो वेळा व्हायला लागले की मग संयम सुटला असेल हे समजता येते- माझेही तसे झाले होते, कदाचित आयडी उडायच्या थ्रेशोल्ड्पेक्षा कमी म्हणून माझा आयडी वाचला पण श्रीगुरूजींचा आयडी गेला. अनेक जण अमरेंद्र बाहुबलींच्या एकामागोमाग एक अज्ञानमूलक प्रतिसादांवर तक्रार करत असताना आयडी उडविला नाही तरी जर त्यांना निदान समज दिली गेली असती तर आज ही वेळ आली नसती.
आता हे लिहून काहीच उपयोग नाही. आता त्यांचा आयडी परत आणला तरी श्रीगुरूजी परत मिपावर एक शब्दही लिहितील असे वाटत नाही.
8 May 2025 - 3:32 pm | स्वरुपसुमित
ह्या वेळी अज्ञान ची पराकाष्ठा केली ,वर प्रति उतर पण तसेच
8 May 2025 - 11:12 pm | सुक्या
संयमाला पण सीमा असते. श्रीगुरुजी हे मिपा वर मुद्देसुद व माहीतीपुर्ण प्रतिसाद देणार्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. कोरड्यासोबत ओले जळते हे मात्र खरे!
8 May 2025 - 11:21 pm | रात्रीचे चांदणे
असे आभासू ID बाराळणाऱ्या ID मुळे उडाणार असतील तर अवघड आहे. बाहुबली वर योग्य वेळी कारवाई केली असती तर गुरुजींचा ID उडाला नसता.
8 May 2025 - 8:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर
शरद पवारांनी 'मार्गदर्शन' केले म्हणजे नक्की काय केले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.जून १९९१ ते मार्च १९९३ ह्या काळात पवार संऱक्षणमंत्री होते. म्हणजे त्यालाही आता तीन दशके होउन गेली.ऊस, कापूस्,भुईमुग, साखर कारखाने,शि़क्षणसंस्था, जमीनींचे व्यवहार.. हे समजू शकतो पण युद्धनीती,शस्त्रास्त्रे, राफेल्,मीग हे पण?
8 May 2025 - 4:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"Indian Military Destroys Pakistan's Air Defence System At Lahore: Govt
अभिनंदन.
ऑपरेशन सिंदूर सुरु होउन ३६ तास उलटले आहेत. एरवी दिवसाला दोन-दोन व्हिडियो यु-ट्युबवर टाकणारे कुठे गायब झाले आहेत? उ.दा. ध्रुव राठी, निरंजन टकले.. हे गेले दोन दिवस गायब आहेत. लोकसत्ता संपादक आले आणि अभिनंदन करण्यापेक्षा पाकिस्तानच्या मूर्खपणांमुळे हे कसे झाले , ह्यावर चर्चा करत बसले. कुमार केतकरही गायबले आहेत.
https://www.msn.com/en-in/news/india/indian-military-destroys-pakistan-s...
8 May 2025 - 4:36 pm | चंद्रसूर्यकुमार
ध्रुव राठी हे वेगळेच पाणी आहे. काय समजलात माई?
8 May 2025 - 5:38 pm | मारवा
1
मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ?
मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ?
तसेच
श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ?
माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे
आपण खुलासा करावा ही नम्र विनंती
8 May 2025 - 5:38 pm | मारवा
मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ?
मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ?
तसेच
श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ?
माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे
आपण खुलासा करावा ही नम्र विनंती
8 May 2025 - 5:46 pm | मारवा
मी अशी नेमकी कोणती शिवीगाळ किंवा पक्षीय अजेंडा अशी नेमकी कोणती चूक माझ्या प्रतिसादांमध्ये किंवा लेखा मध्ये आहे ?
म्हणजे गुन्हा कळणे महत्वाचे आहे
नाही तर हे kafka च्या trial सारखं होईल.
कारवाई जरूर करा पण नेमकं चुकीचं काय केलं?
म्हणजे चुकलेला प्रतिसाद किंवा चुकीचा लेख किंवा चुकलेली ओळ तरी किमान दाखवा
तर सुधारणा तरी करता येईल
8 May 2025 - 6:00 pm | चंद्रसूर्यकुमार
ती नोटीस मुख्य पेजवर आहे म्हणजे सगळ्यांनाच दिसत असावी. निदान मला तरी दिसत आहे. तेव्हा ती नोटीस फक्त तुम्हालाच पाठवली आहे असे वाटत नाही. व्यक्तिगत निरोपात अशी नोटीस किंवा इशारा आला असेल तर गोष्ट वेगळी.
9 May 2025 - 3:58 pm | स्वधर्म
मलाही अशी नोटीस दिसते आहे प्रत्येक पानावर. जर कुठे असे लेखन झाले असेल, तर जरुर दाखवून द्यावे, म्हणजे काय टाळावे ते तरी कळेल असे मला वाटते.
9 May 2025 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर वावरणा-या प्रत्येकास अशी सुचना दिसते. व्यक्तिगत अशी कोणासही ती सूचना नाही.
-दिलीप बिरुटे
8 May 2025 - 6:58 pm | मारवा
धन्यवाद माहितीसाठी
तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली हे दोन आय डी संपादकांनी
कारवाई करून बंद केले आहेत का ?
याचा कुठे खुलासा केलेला आहे का ?
कृपया माहिती असल्यास द्यावी
8 May 2025 - 7:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नविन आय.डी. घेउन ते अवतरतील.
श्रीबाहुबली आणि अमरेंद्र गुरुजी.
9 May 2025 - 6:13 am | स्वरुपसुमित
नवीन आयडी बंद केल आहे मिपावर
8 May 2025 - 11:15 pm | रात्रीचे चांदणे
भारताच्या तीन्ही सेनेचा एकाच वेळी पाकिस्तान वर हल्ला चालू आहे.
8 May 2025 - 11:35 pm | सौंदाळा
कराची बंदरावर भारतीय नौसेनेचा हल्ला
https://youtube.com/shorts/y_gg_oY3PVk?si=pF0Qqdedl4Q_FrUM
9 May 2025 - 10:46 am | चंद्रसूर्यकुमार
आपल्या मिडियाने किंवा युट्यूबवाल्यांनी टीआरपी आणि/किंवा क्लिक्स आणि त्यातून मिळणारे पैसे यासाठी असल्या बातम्या प्रसारीत केल्या आहेत असे दिसते. जोपर्यंत आपल्या सरकार आणि सैन्याकडून अधिकृत काही येत नाही तोपर्यंत असल्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नये. काल काय काय दाखवत होते- कराची बंदर उध्वस्त, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान, सरगोधा आणि कुठे कुठे हल्ले वगैरे वगैरे. काल रात्री १ च्या सुमारास असे वाटत होते की आज सकाळी उठल्यावर पाकिस्तान असेल की नाही. तसे काही झालेले वाटत नाही. एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.
9 May 2025 - 6:05 pm | सौंदाळा
हो, ही खोटी बातमी होती हे आज सकाळी समजले.
काल रात्री इतक्या विविध आश्चर्यकारक बातम्या येत होत्या.
कराची बंदर उडवले, शहाबाझ शरीफच्या घराजवळ स्फोट आणि तो बंकरमधे लपलाय, मुनीरला अटक केली आहे.
२ जेएफ १७ आणि १ एफ १६ विमान पाडले, जैसलमेरमधे एक पायलट जिवंत पकडला आहे.
अतीतीव्र सहमत
त्यातल्या त्यात खर्या बातम्या कोठे मिळतील? न्युज चॅनल, एक्स हँडल, ब्लोग काही पण चालेल.
9 May 2025 - 9:18 am | मारवा
श्रीगुरुजी या आय डी वर जर कारवाई झाली असेल तर ते चुकीचे आहे असे माझे मत आहे.
आता कारवाई झाली की ते स्वतः हून लिहायचे थांबले हे मला अजून स्पष्टपणे कळलेले नाही.
पण मी गेले काही दिवसापासून सक्रीय आहे त्यात तरी
मला श्रीगुरुजी यांच्या प्रतिसादात कुठेही पातळी सोडून काही लिहिलेले आढळून आले नाही.
आणि त्यांच्या लेखनात जितका आक्षेपार्ह विधानाचा भाग असेल तर त्याहून जास्त आक्षेपार्ह विधान असलेले आय डी अजून सक्रीय आहेत.
शेवटी संपादक मंडळाचा कारवाई करण्याचा अधिकार मान्य आहेच मात्र नेमक्या कुठल्या विधानावर कारवाई झाली हे कळले तर
इतराना एक आपली वर्तणूक कशी असावी,कशी विधाने वापरू नयेत, कुठल्या गोष्टी संपादकांना मान्य नाहीत हेबुदहरणासहित कळते.
हे चूक दाखवून देणे उदाहरणासहीत आवश्यक आहे
कोणत्या कारणास्तव नेमकी कारवाई झाली हे कळायला हवे.
बाकी
असो
9 May 2025 - 11:02 am | महिरावण
असं काही होणार असं आम्हाला वाटलंच होतं म्हणून आम्ही आधीच दूरदर्शीपणाने त्यांचे प्रतिसाद नोंदवून करून ठेवले होते.
बाहुबलीचे प्रतिसाद कितीही मूर्खपणाचे, बालिशपणाचे, अक्कलशून्य, तद्दन फालतू, उचकवणारे, उगाच विरोधाला विरोध करून टीका करणारे, प्रत्येक प्रतिसादावर पचकणारे जरी असले तरी ते कधीही वैयक्तिक नव्हते. श्रीगुरुजींनी मात्र तीव्र वैयक्तिक पातळीवरचे प्रतिसाद देऊनही बाहुबली वैयक्तिक प्रत्युत्तर न देता त्यांचा मोदीविरोधी अजेंडा फक्त राबवत राहिले. दुसऱ्याला मनुवादी म्हणून हिणवत राहिले, त्यामुळे दोघांच्याही समिधा यज्ञकुंडात पडलेल्या दिसत आहेत.
नमुन्यादाखल आम्ही नोंदवून ठेवलेले श्रीगुरुजींचे काही वैयक्तिक प्रतिसाद बघा.
7 May 2025 | श्रीगुरुजी
या गाढवाच्या मूर्खपणाची किळस येत आहे.
प्रतिसाद द्या
अमरेंद्र बाहुबली's picture
खरं बोलणाऱ्याची किळस येणारच!
7 May 2025 - 9:25 am | अमरेंद्र बाहुबली
खरं बोलणाऱ्याची किळस येणारच!
आम्हाला गाढव म्हणा, मूर्ख म्हणा, आमची किळस येऊद्या! एक देशभक्त ह्या नात्याने मी सरकारला जाब विचारणारच, मी देशभक्त आहे अंधभक्त नाही!
काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी
7 May 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी
काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत.
विषय कोणताही असो, ही गाढवे तेथे जाऊन पो टाकून त्यात थयाथया नाचतातच.
श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:37
उर्वरीत गाढवे कोठे आहेत?
छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी
7 May 2025 - 11:50 am | श्रीगुरुजी
छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी उंदीर वेगाने बिळातून बाहेर आलेत आणि भारताला शिव्या घालताहेत.
श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:09
मिपावरील महामुर्खांना पुन्हा एकदा सणसणीत थोबाडीत बसली. कोणतीही अक्कल नाही, शून्य माहिती . . . परंतु गाढवासारखे रेकणे सुरू होते. आता शेपटीला लवंगीचा सर बांधून पेटवलाय
9 May 2025 - 1:43 pm | मारवा
तुमचे म्हणणे बरोबर आहे मान्य आहे.
श्रीगुरुजी यांच्या वरील प्रतिसादातील भाषा निश्चितच मर्यादेबाहेर गेलेली आहे.
त्याच बरोबर त्यांना तसे नेमके दाखवून देऊन warning सारखे केले असते.तर बरे आले असते. त्यांना सुधारणा करता आली असती
तसेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील warning दिली असती तर त्यांना देखील सुधारणा करता आली असती
आता हे सर्व अगोदरच वरील दोघं बाबत करून झालेलं आहे का याची मला माहिती नाही. कारण दीर्घ कालावधीनंतर मी मिपावर सक्रीय झालो असल्याने अर्ध्या सिनेमात येऊन बसलेल्या सारखा मी तितका अपडेटेड नाहीय.
आणि मी जिथे थांबलो होतो तेव्हा इतकी विद्वेषजन्य परिस्थिती नवती.एकदम सत्ययुग होते आणि सात्विकांची भरती होती असेही
नाही. पण आजच्या एवढी कठीण परीस्थिती नक्कीच नवती.
मी स्वतः मध्ये सुद्धा बदल अनुभवत आहे
बाकी एकूण असो.
9 May 2025 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल सायंकाळी सुरू झालेल भारताच्या पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याने भानावर नसलेल्या मीडियाने तर युद्ध जिंकले. सायरन ते आवाज, ती आरडा-ओरड....भारतापेक्षा भारतीय मिडियाने केलेले हल्ले वार्तांकन भयंकर होते. माध्यमाद्वारे, पाकिस्तानला गर्भगळीत करायचं असेल आणि तसा तो होत असेल तर चांगलं आहे, पण मीडियाने तर हे युद्ध सकाळी सकाळी जिंकू असे चित्र उभे केले.
वास्तवात ड्रोन हल्ले, मिसाईल मारा यामुळे पाकिस्तानचं अधिकाधिक नुकसान करणे, त्याची खोड जिरवणे हाच हेतू भारतीय सैन्याचा दिसतो आहे आणि भारतीय सैन्याने तिन्ही दलाच्या एकत्रीत हल्ल्याने तो दबदबा निर्माण केला आहे. एक जागतिक संदेश भारतीय सैन्याने दिला आहे, देत आहे असे दिसते.
आजच्या काळात कोणत्याही देशातील एकमेकांचे युद्ध असं एका दिवसात एका रात्रीत संपत नसतं. युद्धात कमी अधिक प्रत्येकाचे नुकसान होत असते, अपरिमित हानी होत असते. पाकिस्तानची तशी आर्थिक आणि इतरही हानी करायची आहे, खोड मोडायची आहे, युद्धामुळे जरब निर्माण होते. भारत सरंक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील सर्व तंत्रात अग्रेसर आणि तेही जगाच्या पुढे आहे, हेही दाखवून द्यायचं आहे.
भारतीय सैन्याचा आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे.
-दिलीप बिरुटे
9 May 2025 - 10:37 am | मारवा
भारतीय माध्यमांचा धाडसी वार्ताहरांचा जे जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत. सर्व पत्रकारांचा जे भारतविरोधी misinformation चा uttam रित्या प्रतिकार करत आहेत. पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची चिरफाड करून त्यातील सत्य बाहेर आणत आहेत.
भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत. यावेळेस जेव्हा नागरिकांना आपल्या सैनिकांच्या शौर्याची तसेच आपल्याकडे असलेल्या क्षमतांची जाणीव करून त्यांना आश्वस्त करत आहेत अशा सर्व माध्यम वीरांचे कौतुक आहे.
सीमेवरील सैनिक तर लढत आहेच पण त्यांना सहाय्यक अशा त्यांच्या मागे.ठामपणे उभे असलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच घटकांचे योगदान महत्वाचे आहे.
मग ते सैन्यासाठी सहाय्यक भूमिका घेणारे डॉक्टर असोत, आचारी असोत की माध्यमातून काम करणारे आपल्या लोकशाहीच्या मूलभूत चार खांबापैकी एक असोत.
सोनियांच्या कणखर नेतृत्वाला माझा सलाम !
आज त्यांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळेच हे युद्ध आपण जिंकण्याच्या मार्गावर आहोत.
9 May 2025 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत.
आता काय बोलू ? भारतीय सैन्यदलाच्या क्षमतेवर आणि शौर्यावर तुम्हा आम्हा सर्वांचा विश्वास आहे. पण पाकिस्तान की राजधानी इस्लामाबादपर कबजा. क्वेटा शहराची वाताहात, पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख शाहबाझ शरीफ बंकरमध्ये लपून बसले. वगैरे
अशा खोट्या बातम्यांनी भाबड्या माणसाला आंनद वाटतो पण सत्य काय ते माहिती होत नाही, असंख्य भारतीय वास्तव बातम्या लिंक्स कुठे मिळतील याचा शोध घेताना दिसत होते.
-दिलीप बिरुटे
9 May 2025 - 10:56 am | गवि
या अभिमानाला काळिमा फासणारे तमाशे रात्रभर अनेक चॅनल्सवर चालू आहेत. अफवांनाच तिखटमीठ लावून, मागे साऊंड इफेक्ट देत आरडत ओरडत बातमी म्हणून पेश करणे हा पत्रकारितेत नवीन ट्रेंड दिसतो.
9 May 2025 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरयुगात अशा बातम्या मनोबल वाढण्यासाठी आवश्यक असतात.
-दिलीप बिरुटे
(अवकाळी पावसामुळे गार पडलेला गारवा)
9 May 2025 - 11:16 am | महिरावण
मोदींच्या काळात पाकिस्तानवर यशस्वी हल्ला झाल्यामुळे तुम्हाला काही सुचेनासं झालंय असे दिसते. धड मोदींचे कौतुकही करता येत नाही आणि टीकाही करता येत नाहीये म्हणून तुम्ही खर्गेंप्रमाणेच फक्त सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.
9 May 2025 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय छुपे संपादक स.न.वि.वि.
सैन्याचं कौतुक नको का करायला ? भक्त आणि परंपरावादी म्हणून तुम्ही प.प्र.मोदीच कौतुक करा आम्ही देशभक्त नागरिक देशाचं रक्षण करणा-या आमच्या बहादूर सैन्यदलाचं कौतुक करू. ;)
-दिलीप बिरुटे
( मिपाच्या धोरणात राहणारा ) :)
9 May 2025 - 11:40 am | महिरावण
तुमच्या म्हणण्याप्रमाणे लीडरला काही स्थानच नाही म्हणजे. उगाचच झाले ते नेपोलियन बोनापार्ट, विन्स्टन चर्चिल, आयसेनहोवर, इंदिरा गांधी.
सैन्यांचं श्रेय निर्विवाद असतंच पण त्याला योग्य दिशा, मुक्त हस्त देणाऱ्या जबाबदार नेत्यांचीही तितकीच गरज असते.
9 May 2025 - 8:15 pm | सुबोध खरे
सैन्याचं कौतुक नको का करायला.
In a shocking disclosure, Air Chief Marshal (Retd) Fali Homi Major has revealed that the Indian Air Force was ready to take revenge for the devastating 2008 Mumbai terror attacks but the then United Progressive Alliance (UPA) government 'blocked' any further action on the surgical strike option that was meant to teach terror-sponsor Pakistan a lesson.
I think it was the third or fourth day after the attack that we were called into the Prime Minister's office, the three chiefs, and of course, many others who were involved in this. We were asked as to what kind of options we have to launch a retaliatory strike, a precision strike. And, we gave out our options that we will be ready to undertake the strike, if asked, in the next 18 to 24 hours. That's it."
He added that there was no response from the then UPA government though.
"Once this was done, when we went back, we kept those plans active. Actually, we did it very quietly on a totally need-to-know basis, and only the people and forces which were involved would get involved in this operation were informed. But we maintained this readiness for quite a long period, for almost about 10-15 days," he said.
9 May 2025 - 11:34 am | गवि
@ महिरावण
तुम्ही माझी चांगलीच पंचाईत केली आहेत. माझे परममित्र प्रा डॉ बिरुटे सर आणि तुमच्या प्रतिसादातील परखड सत्य यांपैकी कोणतीही एक बाजू घेणे हे धर्मसंकट.
9 May 2025 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाय नाय तुम्ही व्यवस्थेच्या बाजूने राहा. व्यवस्थेच्या बाजूने राहिले की सगळे लाभ घेता येतात..
बाय द वे, 2014 नंतर नुसते पक्षा पक्षात फूट नै पडली, मित्र मित्र राहिलेले नाहीत, हा माझा अनुभव आहे
-दिलीप बिरुटे
( आभासी मित्रांवर विश्वास नसलेला )
9 May 2025 - 1:07 pm | मारवा
गवि तुमचे तिहेरी कौतुक
महिरावण यांच्या वरील प्रतिसादात नेतृत्वाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले ते तुमच्या मते परखड असे सत्य आहे हे तुम्ही मान्य केले यासाठी
पहिले कौतुक
त्याच बरोबर आपल्या परम मित्राला ते सत्य मान्य नाही दिसत नाही किंवा पचत नाही हे कळते तरीही कसा का असेना शेवटी आपला मित्र आहे त्याची मैत्री सोडवत नाही या मैत्री भावने साठी दुसरे कौतुक
आणि मी असा कात्रीत सापडलेलो आहे हे प्रांजळपणे मान्य करणे यासाठी तुमचे तिसरे कौतुक
गेल्या काहीं दिवसात मी फार व्यक्तिगत होत चाललेलो आहे
फार उथळ आणि इन्स्टंट अशी प्रतिक्रिया माझ्याकडून येणे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे.
उपहासाचे प्रमाण जास्त होत आहे हे मी सुद्धा तुमच्या सोबत मान्य करून घेतो
तुम्हीही माझ्या प्रांजळपणा चे एकदा कौतुक करून टाका
मग मी थोडा वरती बिरुटे यांना व्यक्तिगत मारला तसा टोला मारणे बंद करतो आणि थोडा सरळ मुद्दे मांडतो
9 May 2025 - 1:14 pm | गवि
तुमचे कौतुक आहेच.
मुद्दा मांडा आता.
9 May 2025 - 12:54 pm | सोत्रि
अजिबात परिपक्वता नसलेली पत्रकारिता चालू आहे!
- (हताश) सोकाजी
9 May 2025 - 11:08 am | रात्रीचे चांदणे
खोट्या बातम्या देऊन फार फार तर क्षणिक आनंद मिळेल. भारतीय माधमे बघायच्या लायकीची नाहीत. सेनेच्या प्रेस ब्रिफींग ची वाट बघावी लागेल.
9 May 2025 - 2:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आता युद्ध चालु झाले आहे म्हणून पाकिस्तानी चॅनेल्स बंद झाली आहेत. अन्यथा भारतिय चॅनेल्सच्या तुलनेत पाकिस्तानी चॅनेल्सवर बरीच चांगली चर्चा चालु असते(भारत-पाक मुद्दा वगळता) दुसरा बोलत असताना अडवणे, उथळ शब्द वापरणे, आकांडतांडव करणे. हे प्रकार तिकडे खूप कमी.
9 May 2025 - 7:57 pm | स्वधर्म
युध्दात पहिला बळी सत्याचा पडतो असे म्हटले जाते. ते किती खरे आहे ते आपल्या आणि पाकिस्तानी चनेलच्या बातम्या पाहून समजते. या सर्व गडबडीत दोन संयमित चर्चा देत आहे.
पाकिस्तानी मंत्री व भारताचे निवृत्त सैन्य अधिकारी समोरासमोरः
https://youtu.be/anthGq572rE?si=g6kui-zxMnsNw4Vb
भारताचे युकेमधील राजदूत विक्रम दोराईस्वामी यांच्याशी झालेली चर्चा: यात पाकिस्तानी सैन्याधिकार्याशी पण चर्चा आहे.
https://www.youtube.com/live/BW4k8dB0oL0?si=vhrBNOTVNF0hchgU
दोन्ही चर्चा अत्यंत संयमित व सत्य काय आहे याकडे नेणार्या वाटल्या.
9 May 2025 - 8:02 pm | सुबोध खरे
PM Modi meets former service chiefs, veterans amid tension with Pakistan
PM Narendra Modi met a group of armed forces veterans today. PM had an extensive interaction with veterans on various issues on the current situation
This included former Air Force Chiefs, Army Chiefs, Navy Chiefs and other veterans who have extensively served the country.
10 May 2025 - 6:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
दोन्ही देशांकडुन शस्त्रसंधीची घोषणा.! पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. दोन्ही बाजुनी होणारे हल्ले तात्काळ बंद.
India Pakistan Tensions Live Updates: Pakistan initiated call; both nations agreed to stop military action after direct talks, says India
https://timesofindia.indiatimes.com/india/india-pakistan-tensions-live-u...
12 May 2025 - 12:31 pm | वामन देशमुख
युद्धबंदी करण्याची घोषणा परवा झाल्यानंतर आज आता दोन्ही देशांचे DGMO भेटत आहेत. यावर तज्ञ मिपाखरांनी लिहावे ही अपेक्षा.
13 May 2025 - 9:58 am | सुबोध खरे
सगळी माहिती सार्वजनिक न्यासावर उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त माहिती लिहिण्यात/ त्या माहितीचे सोप्या शब्दात विश्लेषण करण्यात आपले कष्ट कशाला कोण वाया घालवेल?
असे लिहिल्यावर येथे मूर्ख लोक अशा तर्हेचे प्रतिसाद टाकतात कि आपण लिहिले नसते तर बरे बहुतांश अभ्यासू लोकांना वाटते.
एखाद्या उत्तम गायकाने "किरवाणी रागातील एखादी उत्तम चीज" सादर केल्यावर एखादा मूर्ख यापेक्षा "भीमण्णांनी आसावरी जास्त सुंदर सादर केला होता" अशी टिप्पणी करतो.
पुढच्या वेळेस अशा मुर्खाला मैफिलीत येण्यास मनाई करावी असे व्यवस्थापनाला वाटत नसेल तर अशा स्थितीत त्या मॆफिलीत त्या गायकाला परत गावेसे वाटेल का?