संपादक

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in काथ्याकूट
15 Apr 2025 - 1:06 am
गाभा: 

नवे प्रतिसाद हे नाव बदलून कृपया ताज्या घडामोडी हे करावे , म्हणजे काय होईल की नवे प्रतिसाद कोणी क्लिक करणार नाही. किंवा ताज्या घडामोडी वगैरे व्यर्थ धागे संपादीत करावेत आणि जिथल्या तिथे काढून टाकावेत.

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

15 Apr 2025 - 11:27 am | विवेकपटाईत

प्रतिसाद विशिष्ट लेखावर असतात. त्यामुळे ते पाहिजे. ताज्या घडामोडी ही माहिती असते.

अथांग आकाश's picture

15 Apr 2025 - 12:04 pm | अथांग आकाश

ताज्या घडामोडी ही बिनकामाची माहिती असते! रिकामटेकड्यांचा पास टाईम!!
.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Apr 2025 - 7:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. तसेही आंतरजालावर फार कमी माहिती उपयोगाची असते.

चित्रगुप्त's picture

15 Apr 2025 - 2:07 pm | चित्रगुप्त

तसे कशाला ? खुद्द मिसळपाव.com चेच नाव बदलून 'ताज्या घडामोडी' करावे. हाय काय अन नाय काय.

सौंदाळा's picture

15 Apr 2025 - 5:20 pm | सौंदाळा

काकांशी बाडीस

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 7:38 pm | आग्या१९९०

ताज्या घडामोडी ही मिपाने सदस्यांना मोक्षप्राप्तीकरता दिलेली सुविधा आहे. मीपण बऱ्याच जणांना ह्या मार्गाने मोक्ष दिला आहे. मोक्ष दिलेल्यांची यादी बरीच मोठी असेल. जुन्या सदस्यांकडे ह्याची माहिती असेल तर त्यांनी जाहीर करावी.

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 9:09 pm | आग्या१९९०

मीपण* मिपाने असे वाचावे

कोण कोण हो?

सुक्या's picture

15 Apr 2025 - 10:15 pm | सुक्या

असहमत

ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात.

बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.

मुक्त विहारि's picture

15 Apr 2025 - 10:42 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 10:21 pm | अमरेंद्र बाहुबली

असहमत

ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात त्या सोबत माई, आज्ञा, आंद्रे, बिरुटे सर सुद्धा.

बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.

"ताज्या घडामोडींवर माझे विचार" असा अर्थ घ्यायचा असतो. संस्थळ हे वाचकांना व्यक्त होण्यासाठी असते. दोन चार ओळींत मतं कळतात.

बाकी घडामोडींसाठी Hindustan Times, Free press Journal हे पेपर्स पाहतो. India Today मध्ये सात दिवसांत पूर्ण माहिती येते. राजकीय,सामाजिक आणि मनोरंजन तिन्ही मुख्य विषयांचा उहापोह.
मराठी माध्यमाची 'वर्तमानपत्रे ' यांत का नाहीत? कारण मराठी चानेलवाल्यांनी अगोदरच कंटाळा येईपर्यंत भूगा केलेला असतो. एबिपीमाझा चानेलचा 'माझा कट्टा' मात्र पाहतो. चालू घडामोडींतील व्यक्तींच्या मुलाखती असतात.

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2025 - 12:40 pm | चौथा कोनाडा

मला वाटलं हा धागा मध्यंतरी विश्व-संपादक या नावाने जगप्रसिद्ध झालेल्या व्यक्ति संबधित आहे की काय !