ताज्या घडामोडी एप्रील ते जून २०२५.

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
1 Apr 2025 - 8:55 pm
गाभा: 

सर्व मिसळपावकर उर्फ़ मिपाकरास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो हीच विज्ञानेश्वरास प्रार्थना.

१. दिल्लीत 2020 साली झालेल्या दंगलीत सहभागी असल्याचं निदर्शनास आल्यामुळे गुन्हा दाखल करावा असे आदेश आज खुद्द दिल्लीच्या न्यायालयानंच दिले आहेत. यांच्यासोबतच भाजपाचे आमदार मोहनसिंग बिश्त आणि भाजपाचेच माजी आमदार जगदीश प्रधान यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

२. आयपीएल महेंद्रसिंग धोनी धावांचा दुष्काळ. 'महेंद्रसिंह धोनी गुडघ्याच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे तो पूर्ण क्षमतेने दहा षटके फलंदाजी करू शकत नाही. त्याच्या फलंदाजीचा क्रम हा परिस्थितीनुसार ठरविला जातो,' अशी माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली.

३. मी धर्मनिरपेक्ष आहे. सध्या नवरात्र सुरू आहे; सर्वांना
शुभेच्छा देते; पण दंगली घडू नयेत, अशी आमची इच्छा आहे. धर्मनिरपेक्षतेसाठी मी बलिदान देण्यासाही तयार आहे, : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.

४.आपल्याला सार्वजनिक जीवनात काम करताना आत्मविश्वास जरूर असावा, मात्र अहंकार बाळगू नये. : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी.

५. कामरानच्या कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांना पोलिसांची नोटीस. कायद्याची तत्पर कार्यवाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेची पायमल्ली. टीव्हीवर चर्चा जोरात.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2025 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वक्फ ने किया...

-दिलीप बिरुटे