ही माणसं झोपेतुन जागी कधी होणार ???

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
22 Jan 2025 - 9:41 pm
गाभा: 

नुकतेच श्री.डोनाल्ड ट्रंप ह्यांनी दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली.

मिस्टर प्रेसिडेंट ह्यांनी पहिल्या दिवशीच जबरदस्त निर्णयांचा धडाका लावला. तुम्हाला आवडो अथवा न आवडो पण पहिल्याच दिवशी आपल्या इलेक्शन मॅनिफेस्टो मधील महत्वाकांक्षी निर्णयांचे एक्झिक्युटिव्ह ओर्डर्स अर्थात अध्यादेश काढणारे असे राजकारणी विरळाच !

असो.

ह्या विषयावर - ए.बी.पी. माझा चॅनेल वर श्री गिरिश कुबेर ह्यांची छोटेखानी मुलाखत दिसली.

Girish Kuber on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
https://www.youtube.com/watch?v=QAcKKfaK1z4

आता कितीही मतभेद असतील तरीही एक ज्येष्ठ पत्रकार म्हणुन श्री. गिरिश कुबेर ह्यांच्या विषयी आम्हाला आदरच आहे. त्यांनी लिहिलेला "आयसिस चे अर्थशात्र" हा लेख पत्रकारितेच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे !

पण ह्या ही विडिओ मध्ये त्यांनी सरळ सरळ निराशा केलेली आहे.

त्यांच्या शब्दांचा निवडी वरुन त्यांचे राजकीय पुर्वग्रह स्पष्टपणे दिसुन येत आहेत जे की कोणत्याही ज्येष्ठ पत्रकाराला अशोभनीय आहे.
उदाहरणार्थ : "ट्रंप ह्यांच्याकडुन शहाणपणा विवेक हा मुद्दा नव्हताच कधी."
कुबेर पुण्याचे आहेत का ? इथल्या म्युन्सिपाल्टीत उंदीर मारायच्या विभागात असलेल्या माणसासारखे आहे हे विधान ! तो माणुस जगातल्या सर्वात श्रीमंत महासत्तेत स्पष्ट बहुमत मिळवुन लोकशाही मार्गाने निवडुन आलेला आहे , त्याविषयी तुम्ही हे असे बोलताना स्वतःचीच समज दाखवुन देत आहात.

पण ते असो.

श्री.कुबेर ह्यांचे एकुणच राजकीय आकलन आणि त्याही पुढे जाऊन सर्वसामान्य तर्कशात्र किती बाळबोध आहे हे ह्या व्हिडिओ मधुन दिसुन येते .
साध्या साध्या मुद्यात इतकी माती खाल्ली आहे कुबेरांनी कि हसावे की रडावे हेच कळत नाही ही मुलाखत पाहताना =))))
उदा.
इस्त्रायल आणि गाझा संघर्ष =))))
परलैंगिकता =))))
रेड इंडियन्स नी कॅपिटल हिल वर हल्ला केला =))))
अमेरिका उदारमतवादी जगासाठी दीपस्तंभ होता , काल संध्याकाळ पर्यंत होता =))))
स्थलांतरामुळे प्रगती होते =))))
क्लोरोफ्लोरोकार्बन मुळे ओझोन थर पातळ झाला आणि सुर्यकिरणे थेट जमीनीवर यायला लागली आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झाले . =)))) ( हे ऐकुन खरेच हसुन हसुन खुर्चीवरुन पडायला झाले मला.)
कोळश्यावर वीज तयार करुन ए.व्ही वापरली की पेट्रओल चा वापर कमी होतो ( ज्यामुळे प्रदुषण कमी होते असे काहीसे ) =))))

असो. विनोद म्हणुन आपण हे हसण्यावारी नेऊ शकतो , पण मुद्दा असा आहे की इतकी ज्येष्ठ सुशिक्षीत लोकं असं बोलत असतील तर सर्वसामान्यांकडुन काय अपेक्षा ठेवायच्या ?

ही माणसं झोपेतुन जागी कधी होणार ???

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2025 - 9:53 pm | श्रीगुरुजी

मोदींनी २०१४ लोकसभा निवडणूक प्रचारात प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लक्ष रूपये देण्याचे आश्वासन दिले होते, ही भाकडकथा गिरीश कुबेर नामक पत्रकार अजूनही लोकसत्ता अग्रलेखात लिहितात. या माणसाचे ज्ञान, पाचपोच, आकलन अत्यंत बाळबोध आहे हे फार पूर्वीच अनेकदा सिद्ध झाले आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2025 - 11:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गिरीशकडुन अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. ह्यांचे गुरु गोविंद तळवलकर, जे महाराष्ट्र टाईम्सचे अनेक वर्षे संपादक होते. गोर्बाचोव्ह्,मार्गारेट थॅचर,रेगन ह्यांना अग्रलेखांतून अनेकवेळा सल्ले/ईशारे दिले पण मुंबई महानगरपालिकेत उघडपणे चालणार्या भ्रष्टाचारावर कधी ब्र काढला नाही. असो.
ट्रम्प ह्यांची विचारसरणी कशीही असो पण त्यांनी निवडलेले मंत्री निश्चित त्यांच्या देशात बदल घडवतील असा विश्वास वाटतो.
कश्यप पटेल (एफ बी आय प्रमुख)
हॉवर्ड लुथनिक(व्यापार)
लिंडा मॅक्महॉन(शि़क्षण).
अशा अनेकांचे वीकीपिडीया पाहिलेत तर सगळेच 'अ' दर्जाच्या विद्यापीठातून पदवी आणी आपल्या क्षेत्रात उत्तम अनुभव. कुबेर हे सगळे समजुन घ्यायच्या फंदात पड्णार नाहीत कारण ट्रम्प मूर्ख आहेत असे त्यांनी आधीच ठरवुन टाकले आहे. एलॉन मस्क ह्यांनाही कुबेर वेडे समजतात.
कोणत्याही लोकशाही देशाचा प्रमुख, कुठ्ल्याही विचारसरणीचा असला तरी सरकारी निर्णय हे चर्चा करून पूर्ण विचारांतीच घेतलेले असतात हे कुबेर व अनेक बुद्धिमंतांना मान्यच नसते.

विजुभाऊ's picture

23 Jan 2025 - 10:48 am | विजुभाऊ

कुबेर आणि वागळे हे बहुतेक विष्वप्रवक्त्यांचा आदर्श ठेवून वागत आहेत असे कधी कधी वाटते

एखाद्या विषयावर, माहितीचे संकलन करून, उत्तम पुस्तक मात्र नक्कीच लिहू शकतात.

वामन देशमुख's picture

23 Jan 2025 - 1:14 pm | वामन देशमुख

ही माणसं झोपेतुन जागी कधी होणार?

ही माणसं टक्क जागी आहेत. ती झोपलेली नाहीतच. ते काय बोलत आहेत ते त्यांना पूर्ण समजते आहे. त्यांना जेवढे बोलायला सांगितले जाते तेवढे ती बोलतात. अर्थातच, त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्ये हे एका व्यापक जागतिक कटाचा भाग आहेतच!

वर्तमानपत्रातील / मीडियातील वैचारिके वाचून प्रभावित होणारी पिढी हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे. अग्रलेख ते रील आणि त्यादरम्यानचे सर्वकाही हे light घेण्याची वृत्ती जवळजवळ प्रस्थापित झाली आहे. परंतु, या तथाकथित झोपलेल्या लोकांच्या करिअरला सध्या तरी मरण दिसत नाही.

सुबोध खरे's picture

23 Jan 2025 - 7:30 pm | सुबोध खरे

वागळे कुबेर केतकर हे सर्व मिंधे पत्रकार (?) आहेत. विरोधी पक्षाच्या दावणीस बांधलेले आहेत त्यामुळे ते काय लिहितात.

ते फार गंभीरपणे घ्यायचीय आवश्यकता नाही.

"लोकशाही धोक्यात आहे" पासून "श्री मोदी २०१९ ची निवडणूक घेणारच नाहीत" सारखे तारे तोडणारे हे परोपजीवी पत्रकार यांनी पत्रकारितेची पातळी इतकी खाली आणलेली आहे कि सामान्य माणसाने कोणत्याही वृत्तपत्रावर विश्वास ठेवणेच सोडून दिलेले आहे.

त्यातून सार्वजनिक व्यासावर यांचे पितळ वारंवार उघडे पडत आले आहे.

यांच्या अशा वर्तनामुळे लोकसत्तेसारखे वृत्तपत्र आताशा सकाळी मुलांना "बसवायला" वापरले जाते.

मुक्त विहारि's picture

23 Jan 2025 - 8:08 pm | मुक्त विहारि

त्यांची विचारसरणी वेगळी आहे...

या लिस्ट मधे राउत कुठे बसतात?

प्रसाद गोडबोले's picture

2 Feb 2025 - 10:08 am | प्रसाद गोडबोले

How delusional one can be !!

https://youtu.be/OC98DSIjQqU?si=LPGTpErLQj08eCzc

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक लेफ्टिस्ट लोकांची अवस्था आपल्या देशातील काँग्रेस जनांच्या पेक्षा फार दारुण आहे असे दिसून येत आहे !