तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in राजकारण
21 Nov 2024 - 12:37 am

माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Nov 2024 - 5:43 am | कर्नलतपस्वी

मार्जिनल विजय,एकोबा कासरा सांभाळणार.
दादांची दाणादाण पण १२मतीत बुडता बुडता वाचणार. (बुडाले तर काका ४८ वर्षाचे नाहीतर ८४).

उबाठा ची नौका साधुवाण्याची होण्याची शक्यता.
ठाकरे राजकुमार तळ्यात मळ्यात.....

बघूयात.

यावेळेस मतदार राजा सुद्धा बुचकळ्यात आणी निराश वाटतोय. भक्त आपापल्या देवांनाच पावणार.

सगळ्यात शेवटी माझे मत वाया जाणार.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Nov 2024 - 8:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर

कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल.

धर्मराजमुटके's picture

21 Nov 2024 - 10:36 am | धर्मराजमुटके

कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल.
शक्यतो पहिले दोन पर्याय परवडतील. तिसरा पर्याय वापरावा लागला तर परत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविल्याची चर्चा होईल. जो काही सौदा होईल तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे. इथला पैसा इथेच वापरला गेला पाहिजे.

श्वेता२४'s picture

21 Nov 2024 - 10:45 am | श्वेता२४

हल्ली तुमच्या 'ह्या॑चे' मत काय? ते सा॑गत नाही तुम्ही ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2024 - 10:58 am | अमरेंद्र बाहुबली

:) खिक्क.

महायुती 180-190 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवेल

श्रीगणेशा's picture

21 Nov 2024 - 9:54 am | श्रीगणेशा

काठावरचं बहुमत कोणालाही मिळू शकतं, महायुती किंवा मविआ. पण ते पाच वर्ष टिकवणं अवघड आहे. सत्तेसाठीची सर्कस सुरूच राहणार यात शंका नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2024 - 10:21 am | अमरेंद्र बाहुबली

लोकसभा रिपीट होईल. लोकसभेलाही असेच मविआला हलक्यात घेण्यात आले होते पण मविआच्या शिलेदारानी मोदी सल्तनतीतील महाराष्ट्र जिंकायला आलेल्याना आसमान दाखवले. ह्यावेळीही मोदी सल्तनत जिंकेल असे खुश्मस्करे (आजच्या भाषेत गोदी मीडिया) सांगताहेत. खुश्मसकर्याना पाकिटे वेळच्या वेळी मिळण्याशी मतलब.
पण दोन दिवसाने निकाल दिसेल. मोदी सल्तनीतीतील अन्यायकारक कोतवालानी जरंगे पाटलांच्या गावावर केलेला हल्ला मराठे विसरले असतील असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. मराठे आपला हिसका मतपेटीतून दाखवतील व मोदी सल्तानतीला आणखी जोरात दणका देतील.

धर्मराजमुटके's picture

21 Nov 2024 - 10:34 am | धर्मराजमुटके

अंदाज सांगणं अवघड आहे.
मी भाजपा चा समर्थक आहे तरी पण एकवेळ उमेदवार कोण आहे हे पण पाहतो. आतापर्यंत ज्या कोणाला मतदान केलं त्या त्या वेळेस तो उमेदवार पराभूत झाला आहे पण तो पक्ष देशात / राज्यात सत्तेत आला आहे.
मागील लोकसभेच्या वेळेस माझ्या मतदारसंघात वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि श्री. उज्जल निकम (भाजपा) हे उमेदवार होते. वर्षा गायकवाड आणि त्यांच्या वडीलांनी अनेक वर्षे मतदारसंघाची सेवा केली त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने त्यांना मत दिले नाही. पण जनता क्रुर आहे. जो काम करतो त्यालाच पुन्हा कामाला जुंपते त्यामुळे वर्षा गायकवाड निवडून आल्या आणि त्यांनी आरामात बसून खावे हे माझे स्वप्न भंग पावले.

ह्यावेळेस माझ्या मतदारसंघात महायुतीचे चे श्री. दिलीप भाऊसाहेब लांडे (धनुष्यबाण) हे उमेदवार होते. मात्र मी लहानचा मोठा झालो तेव्हापासून हाच उमेदवार वेगवेगळ्या पक्षातर्फे वेगवेगळ्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभा राहत आला आहे.
त्यांनी प्रत्येक पक्षाची आणि जनतेची वर्षानुवर्षे सेवा केली आहे त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने मत दिले नाही. त्यांचे विरुद्ध काँग्रेसचे नसीम खान उभे आहेत. यांनी देखील वर्षानुवर्षे मतदारसंघाची सेवा केली आहे त्यामुळे त्यांनादेखील तोच नियम लावला. मात्र नसीम खान यांना विविध पक्षातर्फे सेवा करण्याचा अनुभव नाही. त्याबाबतीत दिलीप भाऊसाहेब लांडे उजवे ठरतात.
चांदिवलीत भाषण करताना या मतदारसंघात दोन लांडे उभे आहेत असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. (संदर्भ). मात्र काल मतदानास गेले असता तेथे अजून एक दिलीप लांडे निवडणूकीस उभे होते. मात्र त्यांचा वडीलांचे नाव भाऊसाहेब नव्हते.

मनसेचे श्री. महेंद्र भानुशाली हे मराठी बोलणारे व अनेक वर्षापासून मनसेचे सामान्य कार्यकर्ते देखील निवडणूकीस उभे होते. त्यामुळे सर्वात कमी वाईट पर्याय (किंवा कदचित योग्य पर्याय) म्हणून त्यांना मतदान केले.
श्री. महेंद्र भानुशाली यांचा उमेदवार यादीतील क्रमांक ३ होता. शिवाय कालची तारीख २०/११/२०२४ यातील अंकांची बेरीज पण ३ येते या अंदाजपंचे दाहोदरशे या सट्टा नियमाप्रमाणे मतदान केले.

संततीनियमनाची साधने वापरुन केलेल्या समागमासोबत कालच्या मतदानाची तुलना करता येईल. कर्त्यव्य केले पण त्यातून फलप्राप्ती होईल याची अपेक्षा नाही. चूकून साधने निष्प्रभ झाली आणि काही बरावाईट फळ मिळाले तर गोष्ट वेगळी.
असेही कर्म करत जा, फलाची चिंता करु नको असे आपल्याला शिकविले आहे मात्र फल मिळणारच नाहीतर तरीपण कर्म कर ही शिकवण आपल्याला निवडणूकांद्वारे मिळत असते.

आता अंदाजांकडे वळूया. (माझ्या अंदाजापेक्षा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोतिष्याच्या पोपटाचे अंदाज जास्त बरोबर असू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन वाचावेत).

मतदान बुधवारी झाले. बुधवार किंवा बुधग्रह हा वारंवातीतेचा कारक आहे. यादिवशी केलेली कामे तडीस जात नाही असा माझा वैयक्तीक निष्कर्ष आहे. म्हणजे या दिवशी एखादे काम केले की ते पुन्हा एकदा करावे लागते. त्यामुळे राज्यात कोणालाही स्पष्ट बहूमत मिळेल असे वाटत नाही. प्रचंड मोडतोड होऊन एखादे सरकार बनेल किंवा बनलेले सरकार कोसळून परत एकदा निवडणूका लागू शकतात असा माझा अंदाज आहे. २३ तारखेला बघूया काय होते ते.

वरील प्रतिसाद वाचून इसापनितितील कथेप्रमाणे वाचकांचे मनोरंजन आणि प्रबोधन झाले असेल असे समजून प्रतिसाद पुर्ण करतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Nov 2024 - 10:44 am | चंद्रसूर्यकुमार

मी एक्झिट पोल घेतले नाहीत त्यामुळे मी अंदाज सांगणार नाही. (मी शेंगा खाल्ल्या नाहीत.... च्या धर्तीवर वाचावे).

इथल्या म्हणजे मिपावरील कोणीही एक्झिट पोल घेतले असतील असे वाटत नाही. मग नक्की कसले आकडे इथे सांगितले जात आहेत? धाग्याचे शीर्षकच आहे- "तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा" :)

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2024 - 11:07 am | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. काल मतदान संपल्यावरही चाणक्यचा मला कॉल आला होता, कोण निवडून येईल ह्या कुणाल मत दिले असे थेट त्यानी विचारले. मी सांगितले. आणी लगेच फोन कट केला. धन्यवाद म्हणायचंही सौजन्य दाखवले नाही. पुढच्या वेळी करा फोन. सरळ वंचितला मत दिले म्हणून कळवेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2024 - 11:08 am | अमरेंद्र बाहुबली

आयुष्यभर कमळाला मत दिलेल्या वडिलाना तुतारी दाबा म्हणून कण्वेंस केलं, आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे पवारांना मत देतोय बोलले. आणी टीव्हीवर युती जिंकेल म्हणून पोल वाले बोंबलू लागले, तुझ्यामुळे माझं मत वाया गेलं म्हणून माझ्यावर आगपाखड करण्यात आली. मत वाया जाणे हा काय प्रकार आहे?? :(