महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (२)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
11 Nov 2024 - 3:00 pm

साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो.

साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी इंडिया टुडेने मतदार सर्वेक्षणासाठी विरोधक एकतेचा निर्देशांक (Opposition Unity Index) अशी एक नवी कल्पना आणून त्यानुसार भाकित करण्यास प्रारंभ केला होता. या कल्पनेनुसार सत्ताधारी पक्षाविरूद्ध असलेले विरोधक जितके एकत्र येऊन निवडणूक लढवितील तितका त्यांना लाभ होतो (जरी मिळणार्‍या मतांच्या टक्केवारीत जास्त अंतर नसले तरीही) व सत्ताधारी पक्षाला तोटा होतो. या सिद्धांतानुसार महाराष्ट्रात विरोधक एकतेचा निर्देशांक यावेळी बराच जास्त आहे. मविआमध्ये फक्त उबाठा, काँग्रेस व राशप नसून त्यात शेकाप, सप, डावे असे २-३ जागा मिळविणारे लहानसहान पक्ष सुद्धा आहेत. हे प्रकर्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले होत. दोन्ही आघाड्यांच्या मतांच्या टक्केवारीत नगण्य अंतर होते, परंतु जिंकलेल्या जागांमध्ये खूप अंतर होते. विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे.

दोन्ही आघाड्यांचा जाहीरनामा आणि आश्वासनांचा वर्षाव पाहिला तर हे नक्की आहे की यापैकी कोणीही सत्तेवर आले आणि आपापली आश्वासने पाळली तर एक-दोन वर्षात महाराष्ट्र दिवाळखोर होणार. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसने अशीच अनेक अव्यहार्य आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या अवधीतच दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याची भरपाई अर्थातच वीजशुल्क वाढविणे, इंधनावर करवृद्धी, मुद्रांकशुल्कवृद्धी, दारू व सिगरेटवर करवृद्धी, पथकरवृद्धी अश्या मार्गाने केली जाईल.

__________________________________________________________________________________________

लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत हरयानात ६४.८०% मतदारांनी मत दिले होते. त्यात भाजपने लढविलेल्या १० पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने आआपशी युती करून स्वतः ९ व आपने १ जागा लढविली होती. त्यात काँग्रेसने ५ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने प्रत्येकी ४४ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. ऑक्टोबर २०२४ मधील हरयानातील विधानसभा निवडणुकीत ६७.९०% मतदारांनी मत दिले होते (३.१०% वाढ). त्यात भाजपने ४८ तर कॉंग्रेसने ३७ जागा जिंकल्या. काही विश्लेषकांनी भाजप्पच्या यशाचे श्रेय वाढीव ३.१०% मतदारांना दिले. लोकसभा निवडणुकीत मोदींना बहुमतापासून दूर ठेवल्याचा मतदारांना पश्चाताप झाला, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे हिंदू मतदार पुन्हा एकवटायला सुरूवात झाली आहे असेही विश्लेषण मांडले गेले. परंतु माझ्या मते या कोणत्याही विश्लेषणात तथ्य नव्हते.

हरयानात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आआपशी युती केली नाही. स्वपक्षातील दलित नेत्या कुमारी सेलजांना पूर्ण दुर्लक्षित केले. संपूर्ण निवडणूक जाट नेते हुडांच्या हातात दिली व त्यांनी उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत फक्त जाटकेंद्रीत धोरण ठेवले. त्यामुळे अजाट जातींचे ध्रुवीकरण झाले. परिणामी भाजप लाभार्थी ठरला. वाढीव मते, हिंदू एकीकरण इ. मुद्दे हरयाना विधानसभा निवडणुकीत नव्हते.

महाराष्ट्रात २०२४ लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. काही जणांना वाटते की रा. स्व. संघ जास्तीत जास्त मतदारांनी नत द्यावे यासाठी प्रयत्न करतोय. हिंदूंनी उमेदवार न बघता हिंदू पक्षाला (म्हणजे भाजपला) मत त्यावे असा प्रचार समाजमाध्यमातून सुरू झालाय. याचा लाभ विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळणार या आशेवर भाजप समर्थक आहेत. परंतु हिंदुत्व या मुद्द्याचा प्रभाव महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अजिबात पडला नव्हता कारण महाराष्ट्रातील भाजप नेते हिंदुत्वापासून केव्हाच दूर गेलेत. येनकेनप्रकारेण सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हिंदुत्व, तत्वे, विचारसरणी, नैतिकता केव्हाच बासनात गुंडाळून ठेवलीये. याउलट मदरशांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याचे दुष्कर्म महायुती सरकारने केले. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष कायमच मुस्लिमधार्जिणे व हिंदूविरोधी होते. शिवसेना व मनसे ना कधी महाराष्ट्रवादी होती ना कधी हिंदुत्ववादी होती. त्यांचे भावंड शिंदे गट हा सुद्धा हिंदुत्ववादी नाही. भाजप हा एकमेव हिंदुववादी पक्ष होता. राष्ट्रीय पातळीवर भाजप अजूनही हिंदू पक्ष आहे. परंतु २०१४ नंतर महाराष्ट्र भाजपने हिंदुत्व बासनात गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवले व स्वतःचे रूपांतर काँग्रेस-राष्ट्रवादीत करून घेतले. आपल्या पारंपारिक समर्थकांना गृहित धरून त्यांच्यावर अन्याय करणारे निर्णय घेतले. अत्यंत भ्रष्ट, गुन्हेगार, गुंड, खुनी, कट्टर हिंदूद्वेषी, कट्टर जातीयवादी, कट्टर ब्राहमणद्वेषी अश्या विरोधी नेत्यांना कायदेशीर संरक्षण देऊन पदराखाली आणले. भाजपचा पारंपारिक समर्थक यामुळे भाजपपासून दूर जातोय व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मतांची मतांची टक्केवारी फारशी न वाढता उलट कमी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व, बांगलादेश, बटेंगे, कटेंगे, लव जिहाद हे मुद्दे अजिबात चालणार नाहीत. हे मुद्दे लोकसभा निवडणुकीतही चालले नव्हते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जोरदार दणका बसूनही भाजपने ना नेतृत्वबदल केला ना कार्यपद्धती बदलली ना प्रचारातील मुद्दे बदलले. याचा फटका बसणारच.

उठा मुख्यमंत्री असताना पालघर येथे हिंदू साधूंची जमावाने हत्या केली तेव्हा राज्य सरकार निष्क्रीय होते, टिपूचे एका उद्यानाला नाव दिले, जनाब बाळ ठाकरे असे लिहायला सुरूवात केली, शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे भाजप अजूनही हिणवत आहे. परंतु भाजपने काय वेगळे केले? सत्ता मिळवून व फडणवीस गृहमंत्री होऊन २८ महिन्यांहून अधिक काळ लोटला. या कालावधीत हिंदू साधूंना ठार मारणार्‍यांवर यांनी काय कारवाई केली? अनंत कुरमुसे या संभाजीराव भिडेंच्या अनुयायाला घरात उचलून आणून बेदम मारहाण करणार्‍या आव्हाडवर कोणती कारवाई केली? कारवाई तर लांबच राहिली, उलट या प्रकरणात सीबीआय चौकशीला फडणवीसांच्या गृहमंत्रालयाने न्यायालयात विरोध करून सीबीआय चौकशी होऊन दिली नाही. हेच आव्हाड परमार या बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात प्रमुख संशयित आहेत. परंतु आजतगायत कुरमुसे व परमार या प्रकरणात आव्हाडांची साधी प्राथमिक चौकशी झाली नाही. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार याचा पूर्ण विश्वास होता परंतु आता ती आशा पूर्ण मावळाली आहे, अश्या अर्थाचे हताश ट्विट कुरमुसेंनी काही काळापूर्वी केले होते.

एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, अजित पवारांनी सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटीचा घोटाळा केला, अशी मोदींनी महाराष्ट्रात येऊन टीका केल्यानंतर केवळ ४ दिवसातच अजित पवारांना मंत्रीमंडळात घेऊन उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले व त्यांच्याबरोबर भुजबळ, मुश्रीफ वगैरे अनेकांना मंत्रीपद दिले ज्यांच्या भ्रष्ट्राचाराविरूद्ध भाजपने रान उठविले होते. राणे, अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराविरूद्धही भाजपने रान उठविले होते, परंतु त्यांनाही मंत्रीपदाचे बक्षीस दिले गेले. पूजा चव्हाण या गर्भवतीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघांनी खूप आक्रमक भूमिका घेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. परंतु त्यांनाही क्लीन चिट देऊन मंत्रीमंडळात घेतले.

हे सर्व प्रकार पाहिले तर वाटतं की भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा यांच्यात काही अंतर शिल्लक आहे का? किंबहुना भाजप नीचपणात या सर्व पक्षांपेक्षाही खूप पुढे गेला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोपांची राळ उठवायची, त्यांना शरण आणून आपल्याकडे आणायचे, क्लीन चिट द्यायची आणि पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून नवीन आलेल्यांना लाभपदे द्यायची हेच मागील १० वर्षे सुरू आह.

_____________________________________________________________________________________________

यापुढील अंतिम लेखात माझ्या एका गणिती प्रारूपानुसार प्रत्येक पक्षाला मिळू शकणार्‍या मतांची टक्केवारी व जिंकणार्‍या संभाव्य जागा याचे भाकीत सांगेन.

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

11 Nov 2024 - 5:20 pm | विवेकपटाईत

यंदाच्या निवडणूकीत शांतिप्रिय समुदाय 90 टक्के पेक्षा जास्त मतदान कारणार आहे. सर्व शांतिप्रिय मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदान केंद्रात जाऊन मत देणाचे एक प्रकारचे आदेशच आहे. मतदान 65 टक्के पेक्षा जास्त झाले तरच महायुती जिंकू शकते. 60 टक्के पेक्षा कमी झाले तर महाविकास आघाडी सत्तेवर येणार. महाआघाडी जिंकली तर अधिकान्श रेल्वे रस्त्यांची मेट्रो प्रोजेक्टस जवळपास बंद होणार. ईस्टर्न डीएफसी केंव्हाच पूर्ण झाले. उत्तर प्रदेश बिहार सारखे राज्य असूनही. पण वेस्टर्न डीएफसी चे 90 किमी चे काम महाराष्ट्रातच रखडले होते. डीएफसी रूट वर मालगाड्या तिप्पट वेगाने धावतात. लागत आणि वेळ दोन्हींची बचत होते. वाढवन बंदराचे काम ही थांबेल. या घटकेला पंजाब आणि केरळ या राज्यात रस्त्याची कामे जवळपास बंद पडलेली आहेत. दिल्ली-मेरठ आरआरटीएस उत्तर प्रदेशात सुरू झालेली आहे. पण केजरीवाल सरकारने या प्रोजेक्टसला जेवढे डिले करता आले केले. आता दिल्ली भागात पुढच्या वर्षी जून पर्यन्त सुरू होईल.
बाकी ज्यांना महाराष्ट्रात रोजगार पाहिजे असेल ते महा युतीला मत देतील. ज्यांना शरिया कायदा पाहिजे असेल ते महा आघाडीला मत देतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Nov 2024 - 5:42 pm | अमरेंद्र बाहुबली

अतिशय उत्तम नी अभ्यासपूर्ण लेख. महाराष्ट्र भाजप स्वतःच्याच मतदारांना कसे फसवत आहे हे लेखात व्यवस्थितरीत्या मांडले आहे. भाजप समर्थक आणी अंधभक्तात हाच फरक असतो. अनेक अंधभक्त मिपाकरानी श्रीगुरुजींचा आदर्श घेण्याची गरज आहे.
आम्ही तर भाजपला २०१९ लाच ओळखले होते. त्यामुळेच भाजपला मत द्यायचेच नाही असा आमचा ठराव पास झालाय. २०१९ प्रमाणे ह्यावेळीही मत महाविकास आघाडीलाच.
भाजप नीचपणात या सर्व पक्षांपेक्षाही खूप पुढे गेला आहे. शतश: सहमत. भाजपसाठी गेल्या चाळीस वर्षापासून काम करणाऱ्याना अतिशय निचपणे राजकारणातून संपवले जातेय. आणी काँग्रेस राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवाराना तिकीट दिल्या जातंय. भाजप हा सुशिक्षितांचा पक्ष न राहता गुंड, भ्रष्टाचारी, टक्केवारी खानाऱ्या कंट्रॅक्टर्स लोकांचा पक्ष झालाय.

परंतु त्यांनाही क्लीन चिट देऊन मंत्रीमंडळात घेतले. सेटलमेंट/मराठीत तोडीपाणी झाली असावी अशी शंका येते. अशा भाजप पक्षाला मत देणाऱ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध , रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध बोलताना ह्यापुढे आरशात स्वतःचे तोंड पाहायला हवे.

राघव's picture

11 Nov 2024 - 9:01 pm | राघव

मतदारांची नाराजी ही मतपेटीत दिसणारच.

विवेकजी, तुम्ही जी कामं रखडणार म्हणताहात किंवा बाकीही.. ते कितीही खरं असलं तरिही,
भाजप आपल्या तत्त्वांवर राहतच नसेल महाराष्ट्रात तर कधी ना कधी दणका बसणारंच ना?
यांना मतं द्यायची ती विकासासाठी आणि हे त्याचा उपयोग फक्त राजकारण खेळण्यासाठी करणार.
जवळपास सर्व योजना या केंद्रसरकारच्या आहेत. यांचं स्वतःचं काय?
न यांच्याजवळ कोणता आराखडा आहे न पुढच्या १०/२० वर्षांची विकासाची दूरदृष्टी.
मोदी तिकडे पुढच्या ३० वर्षांच्या दृष्टीनं योजना बनवताहेत, अंमलबजावणीसाठी झटताहेत..आणि हे? मतं घेण्यासाठी अजूनही सत्तरी पार केलेल्या नेत्यावर यांना अवलंबून रहावं लागतंय याची तरी किमान लाज वाटली पाहिजे यांना.
आपल्या मतदारांना गृहित धरण्याची चूक नेत्यांना केवळ अन् केवळ मतपेटीतूनच समजते. हे त्यांनीच स्वतःवर ओढवून घेतलंय.

अर्थात् निवडणुकी नंतर जनतेला देखील हे समजून येईल की आत्ता जे विरोधात बसले आहेत ते जास्त वाईट आहेत. आणि तेही जनतेनं स्वतःच ओढवून घेतलेलं राहील.
थोडक्यात नेते आणि जनता दोघांनाही दणका बसेल.. जो गाडी परत रुळावर आणण्यासाठी गरजेचा आहे. त्यातून धडा घेवून पुढची निवडणूक तरी भाजप नीट लढेल अशी आशा.

तसंही अमित शहांनी नुकतंच एकदा स्टेटमेंट दिलेलं आहे की, पुढची निवडणूक भाजप एकटा लढेल म्हणून. तेच योग्य आहे.

कंजूस's picture

11 Nov 2024 - 9:32 pm | कंजूस

राजकारण हा खेळ आहे. ..

पण एक फरक आहे. जिंकेल त्याच्या बाजूने नियम आहेत म्हणायचे. न जिंकलेले खरे असूनही खोटे पडतात. दुबळे होतात. वाटावाटीचा मुद्दा नसला तर जिंकणे कठीणच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Nov 2024 - 10:23 pm | अमरेंद्र बाहुबली

मुंबईत फडणवीस हिंदीत भाषण करताहेत. मुंबई महाराष्ट्रात आहे की युपीत?

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Nov 2024 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

शरद पवारांच्या घरी फडणवीस, अदानी, अजित पवार, अमितशाह अशी बैठक झाली होती २०१९ ला सरकार बनवण्यासाठी अस अजितदादांनी सांगितलं. कुणी कुणाल फसवले हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने भाजपला फसवले असे तोंडावर आपटले आहेत.

शाम भागवत's picture

14 Nov 2024 - 5:29 pm | शाम भागवत

हरियानामधे ३ टक्के मतदान वाढले तर भाजपाची लाट आल्यासारखे झाले होते.
झारखंडमधे किती मतदान वाढले आहे ते बघा आणि ठरवा. हा फरक अजून वाढणार आहे.
सँपल म्हणून 20 मतदार संघ तपासले.
Chatra 3.42
Simaria 4.42
Baharagora 2.22
Ghatsila 5.82
Jamshedpur East 0.07
Jamshedpur West 2.64
Jugsalai 2.98
Potka 4.19
Bhawanathpur 0.74
Garhwa 3.05
Bishunpur 1.06
Gumla 2.08
Sisai 3.26
Barhi 3.03
Barkatha 1.44
Hazaribagh 3.43
Khunti 7.05
Torpa 2.70
Kodarma 3.34
Latehar 2.26
Manika 3.62
मतदान टक्केवारीवरून अंदाज बांधायचं शिकलं पाहिजे असं वाटण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तसं केलं तरच नेतेमंडळी आपल्याला कसे खेळवत असतात हे हळू हळू आपल्या लक्षात यायला लागेल.
चांगली माणसे डोळसपणे निवडणुकांकडे पहायला लागली व त्यात सातत्याने वाढ होत राहीली तर ते भारतासाठी चांगले असेल असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2024 - 5:17 pm | श्रीगुरुजी

मतांची टक्केवारी वाढल्यामुळे किंवा कमी झाल्याने निकालावर नक्की काय परीणाम होतो ते सांगता येणे अवघड आहे. टक्केवारी वाढल्याचा सत्ताधारी पक्षाला लाभ होतो की विरोधी पक्षांना लाभ होतो हे निर्णायकरित्या ठरविता येत नाही.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर

- १९९९ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी होती ६०.९४%.
- २००४ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी होती ६३.४४% (टक्केवारी वाढून सत्ताधारी पक्ष १३३ वरून १४० वर घेला)
- २००९ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी होती ५९.६८% (टक्केवारी घटनूही सत्ताधारी पक्ष १४० वरून १४४ वर घेला)
- २०१४ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी होती ६४.००%. (टक्केवारी वाढूनही सत्ताधारी पक्ष हरला)
- २०१९ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी होती ६१.४% (टक्केवारी घटूनही सत्ताधारी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले)

म्हणजे टक्केवारी वाढली म्हणून सत्ताधारी पक्ष परत सत्तेत येईलच असे नाही आणि टक्केवारी घटली म्हणजे सत्ताधारी पक्ष हरेलच असे नाही.

हरयाणात टक्केवारी वाढली व सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत आला याची कारणमीमांसा मी लेखात केली आहे.

झारखंडमध्ये भाजप तसाही सत्तेत येण्याची तुलनेने जास्त शक्यता आहे. वाढलेल्य्य टक्केवारीचा त्याच्याशी तस्स प्रत्यक्ष संबंध दिसत नाही.

शाम भागवत's picture

14 Nov 2024 - 5:32 pm | शाम भागवत

Lohardaga 2.33
Bishrampur 2.31
Chattarpur -0.78
Daltonganj 2.36
Hussainabad 0.54
Panki -1.06
Barkagaon 2.46
Hatia 2.31
Kanke 1.39
Mandar 4.58
Ranchi 3.21
Tamar 5.57
Ichagarh 2.65
Kharasawan 6.24
Saraikella 4.25
Kolebira 3.94
Simdega 4.17
Chaibasa 3.47
Chakradharpur 3.03
Jagannathpur 4.72
Majhganon 2.72
Manoharpur 2.79
फक्त दोन ठिकाणी मतदान कमी झालेले दिसतंय. पण फरक भरून निघू शकेल एवढंच अंतर आहे.

श्रीगुरुजी, आपला पुढील लेख कधी टाकता

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2024 - 5:00 pm | श्रीगुरुजी

१-२ दिवसात अंतिम अंदाज लिहितो.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Nov 2024 - 6:47 pm | अमरेंद्र बाहुबली

ही निवडणूक सुरुवातीला भाजपच्या बाजूने वाटत होती . पण गेल्या दोन दिवसात पूर्णतः मविआच्या बाजुने सरकलीय. संविधानाचा मुद्दा काढून त्याला लाल कव्हर वरुण कम्युनिस्ट वगैरे बोलल्यामुळे दलित मते निर्णायकरित्या मविआ कडे वळले आहेत.
मोदींच्या सभा निष्प्रभ ठरत आहेत, भाजपने काय विकास केला ह्याऐवजी ते एक है तो सेफ है सारख्या घोषणा देत आहे ज्या महाराष्ट्रात चालणार नाहीयेत. विशेषत ग्रामीण भागात. मी मोदींचे भाषणं कधी ऐकत नाही कारण त्यांचा आवाज फारच ईरीटेटिंग आहे. आणी महाराष्ट्राच्या प्रश्नावर मोदी कधीही बोलत नाहीत. पण बातम्यातून कळतय की ते शरद पवार नी उद्धव ठाकरेंवर थेट किंवा अप्रत्यक्ष टीका करत नाहियेत. ह्यामागे परत मातोश्रीवर जाऊन माफी मागायचा प्लान असावा असे वाटतेय. मोदींच्या सभांना गर्दी आटत चाललीय, ह्याउलट उद्धव ठाकरे नी शरद पवारांच्या सभाना प्रचंड गर्दी होतेय. राज्य पातळीवर ह्या दोघांना टक्कर देईल अश्या फक्त एकनाथ शिंदेंच्या सभा होताहेत अन ते ह्या दोहोंपुढे फिके पडताहेत. ह्या निवडणुकीत मविआ च्या महापुरात भाजप नावाचं झाड उन्मळून पडेल नी शिंदेसेना नावाचं लव्हाळ वाचेल. भविष्यात एकनाथ शिंदे नी शिंदेसेना महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभारेल अस वाटतय. मविआ २०० क्रॉस करुन राक्षसी बहुमत मिळवेल की काय अशीही शंका येतेय.

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2024 - 2:46 pm | श्रीगुरुजी

एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, अजित पवारांनी सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटीचा घोटाळा केला, अशी मोदींनी महाराष्ट्रात येऊन टीका केल्यानंतर केवळ ४ दिवसातच अजित पवारांना मंत्रीमंडळात घेऊन उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले व त्यांच्याबरोबर भुजबळ, मुश्रीफ वगैरे अनेकांना मंत्रीपद दिले ज्यांच्या भ्रष्ट्राचाराविरूद्ध भाजपने रान उठविले होते. राणे, अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराविरूद्धही भाजपने रान उठविले होते, परंतु त्यांनाही मंत्रीपदाचे बक्षीस दिले गेले. पूजा चव्हाण या गर्भवतीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघांनी खूप आक्रमक भूमिका घेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. परंतु त्यांनाही क्लीन चिट देऊन मंत्रीमंडळात घेतले.

या धोरणाचा आज पुनःप्रत्यय आला. धुलाईयंत्रातून अजून एक जण स्वच्छ होऊन बाहेर आला.सदरा, विजार कितीही चिखलाने माखलेली असू दे, या धुलाईयंत्रातून पांढरीशुभ्र होऊनच बाहेर येणार.

हे अजून किती खाली घसरणार आहेत देव जाणे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Nov 2024 - 4:20 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
ह्यावेळेस खरोखर भाजपला दणका देणे गरजेचे आहे.

खटपट्या's picture

6 Dec 2024 - 1:36 am | खटपट्या

सहमत

विवेकपटाईत's picture

8 Dec 2024 - 8:10 pm | विवेकपटाईत

निवडणूक पूर्वीचा माझा प्रतिसाद मतदान 65 टक्के पेक्षा जास्त झाले तरच महायुती जिंकू शकते. 60 टक्के पेक्षा कमी झाले तर महाविकास आघाडी सत्तेवर येणार
माझी भविष्यवाणी सत्यात उतरली.