रविवारी सकाळी वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १ वर झालेल्या चेंगराचेंगरीला रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप रेल यात्री परिषदेने केला आहे.
दिवाळी आणि छटपूजेनिमित्त उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढत आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडल्या असल्या तरी गोरखपूरला जाणारी एक ट्रेन रद्द झाल्यानंतर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून उपाययोजना न केल्याने व वाढलेल्या गर्दीला नियंत्रित न करता आल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिषदेने केला आहे.
वांद्रे टर्मिनसवरून रविवारी सकाळी ५.१५ मिनिटांनी साप्ताहिक अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती. गोरखपूरला
जाणारी ट्रेन पकडण्यासाठी रात्रीपासूनच वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे अंत्योदय एक्स्पेसच्या आधी सणासुदीच्या निमित्ताने सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त ट्रेनपैकी एक ट्रेन सुटणार होती. मात्र, त्या ट्रेनला १६ तास विलंब झाल्याने ती ट्रेन रद्द करण्यात आली.
आता जी घटना घडली ती गंभीर आहे. गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. ठाण्यात तलावपाड्याला छटपुजेला जी गर्दी होते ती आता वाढत चालली आहे. एवढी वर्षे झाली पण अजूनही मुंबईला येणारी भैय्यांची गर्दी कमी झाली नाही, उलट ती वाढतेच आहे दिवसेंदिवस. मग कुठेतरी डोंगराच्या पायथ्याला, दगडांच्या खाणीमध्ये, खाडीच्या पाणथळ जमिनीवर हे लोक अतिक्रमण करून पत्र्याच्या खोल्या बांधतात. सण उत्सवाला तुडुंब गर्दी होते. करोना काळात अशीच गर्दी झाली. हजारो जगतात हजारो जायबंदी होतात. उपाययोजना जशाच तशा. छटपुजा-दीपावली शुभेच्छा.
प्रतिक्रिया
28 Oct 2024 - 2:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
परिस्थिती गंभीर आहे. ज्या रेल्वेमार्गांवर दररोज ५ ते ६ लोक मरण पावतात तेथे चेंगराचेंगरीला प्रशासन महत्व देईल असे वाटत नाही.
४०/५० वर्षापुर्वीही हेच बोलले जायचे.मात्र महाराष्ट्र प्रशासनात आणि मुंबई महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड जोवर जात नाही तोवर हे चालुच राहील. राज्याचे कथित पुढारलेले औद्योगिक धोरण ह्याला मुख्य जबाबदार आहे.
28 Oct 2024 - 4:14 pm | कंजूस
Local गर्दी असतेच. ...
पण परवाची गर्दी ही स्पेशल ट्रेनसाठी होती. में महिन्यात प्रवाशांच्या खूप तक्रारी आल्या की आरक्षित स्लिपर तसेच एसी डब्यांतही waiting list ( non confirmed tickets) वाल्यांनी खूप गर्दी केली. तेव्हा रेल्वेने निर्णय घेतला की आरक्षित तर डब्यांत फक्त आरक्षण असलेल्यांनाच प्रवास करता येईल. एरवी उत्तर भारतातील गाड्यांत प्रवासी असेच जात होते आणि आरक्षणवाले त्यांना सामावून घेत होते. तसे आता करता येत नाही. मग अंत्योदय पद्धतीच्या पूर्ण अनारक्षित गाड्यांत प्रवास करण्यासाठी खूप गर्दी झाली.
बांद्रा - गोरखपूर अशा दोन गाड्या जाणार होत्या . त्यातली एक पंधरा तास झाले तरी आलीच नाही. मग दुसऱ्या गाडीला फार गर्दी झाली.
दंगल होऊ नये म्हणून जेवढे डबे तेवढ्या रांगा लावाव्या लागतील. आज (२८-१०-२०२४) अडीच वाजता अशी एक गाडी मुंबईहून सुटायची आहे पण ती रक्सोल जाणारी आहे. तिकडे काय झालं ते कळेलच.
1 Nov 2024 - 10:47 pm | नठ्यारा
मुंबईतली व अन्य महानगरांतली गर्दी बेसुमार वाढण्याचं कारण शहरे लोकांना आकर्षित करतात हे नसून गावाकडील हलाखीची परिस्थिती त्यांना बाहेर लोटते हे आहे. गावाकडची परिस्थिती सुधरली पाहिजे. अवनि ( अन्नवस्त्रनिवारा) गावाकडे मिळवता यावं अशी धोरणं आखायला हवीत.
ज्यू फायनान्शियर लोकांनी अर्थव्यवस्था ताब्यांत घेतल्यावर युरोपात नागरीकारण झपाट्याने वाढू लागलं. हाच प्रकार भारतात आज होतोय. भारताचा कारभार इंग्रजी ( म्हणजे ज्यू फायनान्शियर ) पद्धतीने हाकलणे बंद करून भारतीय मानके रचून त्यानुसार केला पाहिजे.
-नाठाळ नठ्या
2 Nov 2024 - 11:43 am | चौकस२१२
गावाकडील हलाखीची परिस्थिती
प्रथम मुंबईत नोकरी मीळाल्यावर हा विचार मनात आला होता,,, केवळ आणि केवळ कामापासून १० मिंनीट अंतरावर आणि ते सुधा मराठी भागात राहायला मिळाले म्हणून नोकरी घेतली नाहीतर माझ्य क्षेत्रात त्यावेळी आणि आज पुण्याला बक्कळ नोकऱ्या होत्या
नाहीच तर मग नाशिक / संभाजी नगर / सातारा. कोल्हापूर असे उतरत्या क्रमाने उत्पादन क्षेत्रात नोकर्या होत्या , त्यामुळे मुंबईतच राहिले पाहिजे असे काही दडपण तेव्हा तरी नव्हते ...
1 Nov 2024 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली
यूपी बिहारी सरकारे लोकसंख्या नियंत्रणात अपयशी ठरलेत, त्यात दक्षिणेतील राज्यानी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे. यूपी बिहारीना तिथे जायला आवडत नाही कारण तिथे “त्यांची” भाषा शिकावी नी बोलावी लागते अन्यथा ती लोक पाठीत लाकडे फोडतात. महाराष्ट्रात मराठी माणूस भाषेविषयी स्वाभिमानशून्य आहे. “हिंदी मे बोलो” म्हणून बाहेरचे येऊन दमदाटी करतात नी मराठी माणूस लगेच आपली भाषा सोडून त्याच्या भाषेत बोलायला लागतो. दामदाटी नाही केली तरी महाराष्ट्रातच यूपी बिहारींसमोर अनेक मराठी लोक लाळघोटेपणा करुन हिंदीत बोलू लागतात. भ्रष्ट मराठी प्रशासन मराठी येत नसतानाही पैसे खाऊन भैयांना टैक्सी, रिक्षा वगैरेचे लायसन्स देते. इथे दुधात भेसळ, मिठाईत खव्याची भेसळ, चोऱ्या मार्या, खून दरोडे सहज करता येत असल्याने परप्रांतीयांची भीड चेपलीय. त्यांचे नेते इथे येऊन “हिंदुत्व” वगैरेचे डोस मराठी माणसांना देतात. (योगी येतोय येत्या १० दिवसात, सोबत बेटेंगे तो कटेंगे चे पोस्टर्स घेऊन) पण स्वतःच्या जंगलराज मध्ये उद्योग धंद्यांना सुरक्षा देऊ शकत नाही. परिणामी लोंढे येऊन आदळताहेत, मराठी भाषा, संस्कृती संपवू पाहताहेत. आणी काही लाळघोटे, स्वाभिमान शून्य मराठी माणसे ह्याला हातभार लावताहेत.
2 Nov 2024 - 5:56 am | कंजूस
उत्तर भारतीय लोंढे यावर एक लेख होईल.
केरळ(कोची), तमिळनाडूत (पेरांबूर)ते जात नाहीत हे विसरा. तिकडे मी स्वतः पाहिले आहेत. बांधकाम मजूर म्हणून जातात. स्थानिक कंत्राटदाराकडे काम करतात. भाषेचा प्रश्न येत नाही. स्थानिकांना चांगले पगार, चांगले काम हवे आहे. सर्व ठिकाणी हेच आहे.
2 Nov 2024 - 11:44 am | चौकस२१२
जिथे काम तिथे माणूस जातो... चेन्नई कापड बाजारात गुजरताही भाषिक किती तरी पाहिल्याचे आठवतंय
2 Nov 2024 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकास तर तिकडेच होतोय ना ? तरी ते लोंढे इकडे येतातच कसे काही कळत नाही.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2024 - 10:51 am | अमरेंद्र बाहुबली
विकास तर तिकडेच होतोय ना विकास तर मोदीजींच्या काळातच होतोय असे संकेतस्थळांवर ओरडुन सांगणारे महात्मे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्येच राहतात, भारतात परत येत नाही अगदी तसेच. :)
2 Nov 2024 - 7:42 am | चौकस२१२
यूपी बिहारींसमोर अनेक मराठी लोक लाळघोटेपणा करुन हिंदीत बोलू लागतात. भ्रष्ट मराठी प्रशासन मराठी येत नसतानाही पैसे खाऊन भैयांना टैक्सी, रिक्षा वगैरेचे लायसन्स देते. इथे दुधात भेसळ, मिठाईत खव्याची भेसळ, चोऱ्या मार्या, खून दरोडे सहज करता येत असल्याने परप्रांतीयांची भीड चेपलीय.
हे सर्व प्रश्न अनेक वर्षे चालू आहेत म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राज्यात पण
ते दाखवूं दिलेत ते बरोबर , (आणि म्हणूनच मूळ बाळासाहेबान्चाय शिवसेनेला पाठिंबा होता पण आटा मिया ठाकरे झाल्याने तो हि गेला )
पण "त्यांचे नेते इथे येऊन “हिंदुत्व” वगैरेचे डोस मराठी माणसांना देतात" आणि योगी यांचा उल्लेख करून काहीही करून भाजपाला कसे गोवावयाचे हा पो टाकलातच
“हिंदुत्व” चा मूळ "डो स" मराठी माणसाने देशाला दिलाय तो मूलतः छत्रपतींचच्या स्वराज करीतून आणि मग संघाचच्या कार्यातून ( आवडो ना आवडो पण दुर्लक्ष करता येत नाही )
पण अर्थात तुम्ची जळजळ होणारच
काय तो आव मराठी बाण्याचा कधी उत्तर भारतीय कीव गुजराथी नि हायजॅक केलं म्हणून बॉम्ब मारणे
2 Nov 2024 - 10:53 am | अमरेंद्र बाहुबली
आटा मिया ठाकरे झाल्याने तो हि गेला भाजपला लठडली म्हणजे हिंदुत्व सोडले???
संघाचच्या कार्यातून खो खो. मनुवादी विचारसरणी म्हणजे हिंदुत्व नव्हे. :)
खरे हिंदुत्व हे हिंदूंना समान मानणारे आहे. चातुवर्ण , मनुवादी हिंदुत्व हे विशिष्ट लोकांसाठी आहे .
असो. धाग्याचा मूळ विषय हा लोंढ्यांचा आहे. संघाची लाल करण्यासाठी हा धागा नाही.
2 Nov 2024 - 11:26 am | चौकस२१२
धाग्याचा मूळ विषय हा लोंढ्यांचा आहे
दुसऱ्यांना मनुवादी हि लेबले कशावरून लावता?
आम्ही संघाची लाल करणारे तर तुम्ही कोण
हुकलेले दावे लिबरडूं नेहरू चाटूगिरी करणारे जातीयवादी
जिथे तिथे हिंदू द्वेष ,
धाग्याचा मूळ विषय हा लोंढ्यांचा आहे
हो ना मग तिथे योगिनि ढोस दिला वगैरे काय संबंध ?
जिथे तिथे भाजप कशाला पाहिजे
मुबईतील बेसुमा र लोकसंख्या हा काही नवीन प्रश्न नाही पण तुम्हाला जिथे तिथे भाजप वर गरळ ओकायाची सवय.. उत्तरप्रदेशी लोक मुंबईत काय २०१४ पासून आले काय?
आणि ढोस चा पाजायचे उदाहरण तर ते महाराष्ट्राने देशाला दिलाय याची दोन उदाहरणे दिली मी त्यात संघ हे केवळ उदाहरण आहे
आणि जरी उदय इतर राज्यातून नसती आली तरी महाराष्ट्राचच्या इतर भागातूनआ ली असती तर मग काय बॉम्ब मारली असतात
आणि सरतेशेवटी काहीच मूद्दा सुचलला नाही कि सुरु " तिकडे कसे आहे आणि इकडे कसे आहे"
2 Nov 2024 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'चेंगराचेंगरी' ही आता नित्यनेमाची गोष्ट झाली आहे, फारसं गंभीर कोणी घेत नाही. सार्वजनिक ठीकाणी आणि बाबा बुवा मंदिरं, प्रवचनं ही गर्दी कुठेही होऊ शकतात. लोक जन्माला येतात तशी मरतही असतातच ना ? मग त्यात काय नवल ? थोडा वेळ हळहळ करायची. त्रागा व्यक्त करायचा. चकचक करायचं आणि विषय संपवायचा किंवा सद्य प.मोदी सरकार आणि फदनवीस यांची सरकारं आहेत, आणि ते विघ्नसंतोषी आणि देशद्रोही लोकांना बघवत नाही म्हणूण असे धागे-विषय काही लोक चघळत असतात किंवा अशी चेंगरा चेंगरी प. नेहरुंच्या काळातही होतच होती ना ? मग आताच का बोंबा मारताय. संपला विषय.
वाढती लोकसंख्या आणि प्रमुख शहरात कामासाठी येणारे लोंढे ही देशाची समस्या आहेच. सणासुदीला एसटी, रे-ल्वे, यांच्यावर ताण येतो. अपूरी वाहतूक व्यवस्था आणि तिचं नियोजन नसतं, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी असलेल्या परिस्थितीत नियोजन करतात आणि काही ऐनवेळी बदल झाले की अशी गर्दी चेंगराचेंगरी होते. आपण त्यात नसतो म्हणून बरं असतं. पण, त्या गर्दीचा भाग झाला की व्यवस्थेच्या 'आय मायची' आठवण येतेच. वाढती ट्राफीक, रस्त्यावर किड्या मुंग्यासारखी चालणारी माणसं, वाहनारी वाहने. ट्राफिकला कंटाळने हेही आता नित्यनियमाची गोष्ट झाली आहे.
वाढत्या गर्दीचं नियोजन प्रशासन अगदी वेळेवर करतं. पावसाळा आला की नाल्यांची साफसफाई होतंं तसंच रेल्वे आणि एसटीचं नियोजन सुरु होतं आणि त्याचं नियोजन कोलमडतं. शहराकडे येणा-या लोंढ्यांमुळे आरोग्य, परिवहन, पायाभूत सुविंधांचे नियोजन होत नाही, करायची कोणालाही गरज वाटत नाही. मुंबैत किती लोंढे येतात किती जातात त्याची कुठेही आकडेवारी मिळणार नाही. तात्पुरत्या निवा-यात राहणा-या लोकांना सामावून घेणारी सर्व प्रकारची सार्वजनिक व्यवस्था इथे शहरात नसते. लोक लोढ्यांनी येतात लोक लोढ्यांनी जातात. बाकी, सर्व व्यवस्था ठप्प.
'कल रात आठ बजह से सब बंद रहेगा' च्या निर्णयाने पायाची सालं निघून घराच्या ओढीने चाललेली माणसं आपण पाहिली. गरोदर स्त्रीया, लहान मुले, किती तरी युवक वयस्करांचे लोंढे आपण गावाकडे जातांना पाहिले. आपण त्यांना मरतांनाही पाहिले. पण अशा आकस्मिकपणे घडलेल्या कोणत्याही घटनांच्या वेळी करायचे नियोजन त्याची व्यवस्था कुठेच नसते. सरकारं बदलून पाहिली पण प्रशासकीय-सार्वजनिक व्यवस्था आहे त्यात किती बदल झालेत ? ती आहे तशीच आहेत त्यामुळे गर्दी- चेंगरा चेंगरी होते. सार्वजनिक वाहतूक आणि त्यांची प्रशासकीय बदल यात अमुलाग्र बदल आवश्यकच झाले आहेत.
मराठी माणूस मुंबैत किती उरला. मराठी अस्मिता, भाषा, आणि शहरात येणारे नवे लोंढे हा तर, मोठाच विषय फक्त सोयीचं राजकारण करायचं आणि विसरुन जायचं. व्यवस्थेवर चिडायचं नाही. सहन करायचं. बघून व्यक्तही व्हायचं नाही. हल्लीच्या काळात. 'मौनीसंप्रदायी' माणसं फार सुखी असतात म्हणे. काहीच प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत आणि कोणी विषय काढलाच तर 'कटेंगे तो बटेंगेंने' हाच प्रश्न जीवन मरणाचा आहे म्हणायचं याच प्रश्नांनी ती बिचारी व्यथीत झालेली असतात....संध्याकाळची बारं वैचारिक अस्वस्थेनी आजकाल भरलेली असतात.
दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2024 - 11:34 am | चौकस२१२
सरकारं बदलून पाहिली ?
येवढयात थकलात ... मतदार राजा आणि त्यांचे लीडर प्रोफेश्वर आना ना मग बारामतीचं काकांना नोव्हेंबर मध्ये घसघशीत मतांनी कि बाळासाहेबानं आणता ( वंचित वाले दुसरे बाप्पा घरी गेले कधीच) कि जरंगे फॅक्टर ... होऊन जाऊद्या राडा
हो प्रोफेसर २०१४ पसुन भारत इतका रसातळाला गेलाय कि अफगाणिस्तान किंवा सिरीय सारखी परस्थिती कधी होती याची जग वाट बघताय... युनाइटेड नेशन्स नि लोकांना बाहेर काढण्यसाठी जहाजे आणि विमाने तयार ठेवली आहेत , पाहिजे का "जनता क्लास " चे तिकीट
आणि तुम्ही विचारण्याआधी इकडे बाकी ठीक आहे .... तुमच्या आवडीचे 'कटेंगे ..." परवाच दिवाळीला पेरियरवादि कि काय त्या तामिळांकडून दिसलेच
2 Nov 2024 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या देशात कशी झाली काल दीपावली साजरी ? तिकडे महानगर पालिकेच्या नळाला रेग्युलर पाणी येतं का ?
-दिलीप बिरुटे
2 Nov 2024 - 11:58 am | अमरेंद्र बाहुबली
ख्रिस्तानांच्या देशात सर्व सोयीसुविधा वेळच्या वेळी मिळतात. तूमच्या मोदींच्या देशात नसतील मिळत पण ह्याचे काहीएक वाईट वाटून घेऊ नका. धर्मासाठी लढत रहा.
- चौकशी कक्ष ( विदेशातील हस्तिदंती मनोऱ्यातून)
2 Nov 2024 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा देश, आमचे पक्ष, आमची मतं मतांतरे आम्ही पाहुन घेऊ. च्यायला, पूर्वीच्या सरकारांची फायदे सवलती घेऊन हे परदेशात सेटल झाले. चांगलं झालं. मनापासून खूप आनंद आहे. नाती-पनती चांगल्या शाळा कॉलेजात शिक्षण घेतात त्याचाही खरंच सांगतो खूप आनंद आहे.
पण तिकडे बसून इकडे सर्व धर्म जाती गुण्या गोविंदाने नांदणा-या भारतात देशात द्वेषाचे खडे भरू नये... एक भारतीय म्हणून ते डोक्यात जातं.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2024 - 1:08 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत. इथे धर्मासाठी एकमेकांचे डोके फोडा म्हणून पो टाकायचे. नी तिकडे ख्रिश्चनांच्या गळ्यात गळे घालून फिरायचे.
3 Nov 2024 - 9:50 am | चौकस२१२
इथे धर्मासाठी एकमेकांचे डोके फोडा म्हणून पो टाकायचे.?
दाखव कुठे ?
3 Nov 2024 - 2:39 pm | चौकस२१२
पूर्वीच्या सरकारांची फायदे सवलती घेऊन हे परदेशात सेटल झाले.
आणि त्याचीपूर्ण भरपाई केली आहे तुमचच्या घरचे खात नाहीये,,,
11 Nov 2024 - 5:35 pm | विवेकपटाईत
गेल्या दहा वर्षांत अर्थात डिसेंबर 23 पर्यन्त रेल्वे ने 40000 कोच खरेदी केले ते 47 ते 14 कालखंडात खरेदी केलेल्या कोचेस पेक्षा जास्त आहेत. आज ईस्टर्न आणि वेस्टर्न डीएफसी वर 350 मालगाड्या धावतात. 31000 किमी नवीन रेल्वे लाईन्स टाकल्या गेल्या. 42 टक्के एवजी 95 टक्के विद्युतीकरण झाले. त्यामुळे सर्व यात्री गाड्यांची गती 20 ते 25 टक्के वाढली आणि 1000 हून जास्त यात्री गाड्या आज चालत आहे. या शिवाय सर्व आज टायलेटची खाली पडत नाही.
बाकी सणवार असेल तर गर्दी राहणारच. सर्वांना एकदम गावी जायचे असते. बाकी एनसीआर दिल्लीचे मूळ निवासी जाट गुजरांनी कधीच उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांच्या नावे रडगाणे गायले नाही.
11 Nov 2024 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली
काही विदा??
11 Nov 2024 - 8:30 pm | आग्या१९९०
जी रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकत नाही तिच्याकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेची अपेक्षा कशी करणार?
https://www.indiatoday.in/india/story/bihar-railway-official-gets-trappe...
बजेटमध्ये सुरक्षा कवचची दरवर्षी घोषणा होते; संबंधित कंपन्यांचे शेअर थोडे दिवस वाढतात. तेवढेच खिशात चार पैसे येतात. पुन्हा येरे माझ्या मागल्या... एकाच ट्रॅकवर दोन गाड्यांची टक्कर होते, अनेक जीव जातात. रेल्वेमंत्री सुरक्षा कवचात असल्याने तो सुरक्षित राहतो.