तन्त्र्न्यान

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
21 Sep 2024 - 9:13 am
गाभा: 

भारत बोईंग , एरबस , दासो ( राफाएल ) बेल ( हेलिकॉप्टर ) साठी सुटे भाग आणि गुंतागुंतीचे उप भाग बनवते हे आपल्याला माहित आहे का ?
नसेल तर येथे बघा
https://www.youtube.com/watch?v=LignDhcOlvw
https://www.youtube.com/watch?v=NByAVRF4wB0
आणि भारतीय म्हणून अभिमान बाळगा... हेवा वाटतो भारताचा,, आम्ही इकडे नुसती खनिज उपसतो आणि विकतो .. भारतासारखी अर्थवयस्था असती तर काय बहर अली असती..... असो नशीब प्रत्येकाचे ....

प्रतिक्रिया

त्याची निर्मिती करतो हे बरोबर.....पण

त्यांचे तंत्रज्ञान आपण शोधले नाही, कॉपीराइट नाही.
आमची एक वर्ग मैत्रीण मोठ्या कार कंपनीत नोकरीला होती. अपंग. गाडी दिली. गिअर, ब्रेक वगैरे सुधारणा करून द्या म्हटलं तर नाही केलं. बाहेरच्या एका माणसाने ते करून दिलं.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2024 - 5:17 pm | चौथा कोनाडा

म्हंजे थोडक्यात स्क्रु ड्रायव्हर तंत्रज्ञान !

असो ... असे ही उद्योग आहेत ही आनंदाची बाब आहे !

त्यांचे तंत्रज्ञान आपण शोधले नाही, कॉपीराइट नाही.

बरोबर काहीसे पण बोईंग आणि एरबस आणि ते सुद्धा बोईंग डिफेन्स ला पुरवठा करु शकणे हे किती अवघड आहे याची कल्पना आहे का तुम्हाला ..
त्यामुळे या कडे नकारात्मक दृष्ट्या ना बघत सकारत्मक दृष्ट्या पाहावे
म्हंजे थोडक्यात स्क्रु ड्रायव्हर तंत्रज्ञान !

जरी भारतात मूळ शोध त्यामानाने कमी होत असला तरी अश्या उत्पादनात घुसणे ते सुध्हा जागतिक पातळीवर हे खायचे काम नाही त्यामुळे "स्क्रू ड्राइवर तंत्रन्यान" हे म्हणणे योगया वाटत नाही मला तरि//

मी बरेच प्रकल्प "डिझाईन इन वेस्ट आणि मेड इन आशिया" केले आहेत त्या अनुभवतून बोलतोय
प्रत्येक वेळी फक्त स्वस्त मिळते हा मुद्दा नसतो ,
योग्य दरात उत्तम प्रकारचे तांत्रिक कामगार ( इंजिनेर ते संशोधक ते मशीन चालक ) हि भारताची जमेची बाजू आहे
मग त्यात मूळ डिझाईन असो कि फिनाईट इलेमेन्ट अनालिसिस सारखे काम
काही वेळा २४ तास काम चालू ठेवणे हे कारण असते (लाखो रुपयांचे ३डी डिजाईन चे सॉफवेअर फक्त ८ तास वापरणे म्हणजे त्याचा पुरेस उपयोग ना करून घेणे )

तेवहा या "मेक इन इंडिया" चा उपहास ना करता सकारत्मक दृष्टितने बघा , हळू हळू कॉपीराइट असलेले उत्पादन हि येतील ...

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Sep 2024 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

भारत बोईंग , एरबस , दासो ( राफाएल ) बेल ( हेलिकॉप्टर ) साठी सुटे भाग आणि गुंतागुंतीचे उप भाग बनवते
अरे वा हे माहित नव्हते.

आम्ही इकडे नुसती खनिज उपसतो आणि विकतो .. भारतासारखी अर्थवयस्था असती तर काय बहर अली असती..... असो नशीब प्रत्येकाचे .... तरीही तिकडे पगार, सुविधा, इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का?

कंजूस's picture

22 Sep 2024 - 2:00 pm | कंजूस

No venture, no profit.

तरीही तिकडे पगार, सुविधा, इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का?
याला वेग वेगळी कारणे आहेत

पण ती बघताना आधी हे नमूद करू इच्छितो कि भारताची तुलना चीन किंवा इंडोनेशिया किंवा मेक्सिको सारखया देशांशी एकवेळ करता येईल जसे कॅनडा ची तुलना ऑस्ट्रेलिया बरोबर करता येईल तसेच .

प्रथम "तिकडे" म्हणजे कुठे ते आधी बघू यात ,
इंग्लड, जर्मनी किंवा फ्रान्स सारखे खूप जुने परंपरा असलेले देश न घेता ऑस्ट्रेल्या किंवा कानडा सारखेच गेली ३०० वर्षात स्थापित झालेले देश घेऊ
वरवरची का रणे मला वाटतात ती हि - ( इतर पाश्चिमात्य देशातील मिपाकरांनी सहभाग हिऊन आपले मत मांडावे अशी विनंती )
१) लोकसंखेचा मानाने खूप प्रमाणात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधने ( असे असले तरी त्यातुन निर्माण झालेलया संपत्ती चा वापर देशासाठी करण्याची वृत्ती ( दावे असो कि उजवे ) अर्थात हे सर्व "माणूस खाऊन पिऊन सुखी असला कि त्याला इतर चांगल्या गोष्टी सुचतात " या ततव्वर आहे
२) २५० वर्षपूर्वी खडतर आयुष्य झेलून नवी वसाहत निर्माण केली आणि त्यासाठी केलेलं कष्ट ( याला इंग्लड फ्रांस चे पाठबळ हा एक मुद्दा हि आहे म्हणा )
३) शक्यतो सर्वांना समान वागणूक देण्याची इच्छा ( येथील कामगार कम्युनिस्ट देशातील कामगारापेक्षा जास्त सधन आहे आणि त्याला जास्त हक्क आहेत)
४) एकीकडे समाजवाद राबवित असताना ( हो येथे समाजवाद आहे ) भानडवलशाहीतून होणाऱ्या फायद्या साठी पण प्रोत्सहन
५) शोध घेण्याची जिन्यासु वृत्ती आणि नवीन उद्योग निर्माण करणे - येथून चंदन आणि छोले भारताला निर्यात करणे , शिक्षण निर्यात ( हजारो विद्यार्थी इकडे शिकायला येतात हा "उद्योग " पूर्वी नवहता , तो वाढवण्यास सरकारने प्रोत्सहन दिले )

अर्थात सर्व काही आलबेल आहे असे नाही ,
- नवीन शोध लावण्यात अग्रगण्य समजणारी पण फक्त २.५ कोटी लोकसंख्या असेलेलय देशात बरेचदा बाजारपेठ नाही म्हणून शोध करणाऱ्या उद्योगाला उत्तर अमेरिकेत जावे लागते .
- उत्पादन क्षेत्रातील माहिती लोप पावत आहे पूर्वी येथून बनलेली टोयोटा दुबई ला निर्यात व्हाययाची आता सगळ्या गाडी बनवणारे उद्योग बंद झाले
- लोखंड खंनीं ज भरपूर पण उच्च दर्जाचे स्टील येतेच बनत नाही
-पगार जास्त हे जरी खरे असले तरी खर्च हि भरपूर आहे आणि आयकर हि भरपूर आहे .
यावर लिहिण्यासारखे खूप आहे

इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का?

खाबुगिरी कमी
यावर सिंगापुर चे पहिले पंतप्रधान "ली क्वान यु" यांना एकदा विचारले होते कि तुमचं मंत्रीनां एवढे पगार का? त्यांनी जे उत्तर दिले ते काहीसे असे होते" का नको/ हे मंत्री एखादी खाजगी नफा कमावणारी कंपनी चालवतात तसे पाहिजे असेल तर त्याना गोग्य मोबदला दीला पाहिजे आणि चांगला पगार दिल्याने लाच खाण्याची आवश्यकता भासणार नाही "