टणटणीची फुले..

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
11 Sep 2024 - 12:19 pm

... लहानपणी या फुलांचा आम्ही बराच वापर करत असू. त्याच्या हिरव्या टणक बियांचा वापर वर्गात मित्रांना मारण्यासाठी होत असे, तर त्याची टोके चोखून त्यातील साखर खाण्याची मजा वेगळीच असे. तसेच त्या बिया काळ्या झाल्यावर गोड लागत ते वेगळेच. अर्थात आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असेल..

टणटणीची फुले !

बरेच दिवस त्या फुलांची छायाचित्रे काढायचे मनात होते. काल गाडीने परत येताना रेसकोर्सच्या मागे ही फुले दिसली. त्यांचे रंग पाहताना मला राजस्थानी रंगीबेरंगी कपड्यांची आठवण झाली. लहानपणी शाळेत शिकलेल्या विवीध रंगसंगती आठवल्या. काही फुले घरी आणली आणि त्याचे फोटो काढले. ते खाली टाकत आहे...

- जयंत कुलकर्णी.

image host

image host

image host

image host

image host

image host

प्रतिक्रिया

माझा गणेशा झाला. ओ माय फ्रेंड गणेशा..

बाय द वे.. टणाटणीच्या वर्णनावरून ही बिट्टीची पिवळी फुले तर नव्हेत असे वाटून गेले. विशेषतः त्या मध चाखण्याच्या उल्लेखावरून.

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 2:08 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी खुप खाल्ली. गरिबांची काळी द्राक्षं.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2024 - 2:45 pm | चौथा कोनाडा

झकास ,,, भारी प्रचिज !

विजुभाऊ's picture

13 Sep 2024 - 3:24 pm | विजुभाऊ

टणटणी म्हणजे घाणेरी का?

Bhakti's picture

13 Sep 2024 - 6:04 pm | Bhakti

हो.

सविता००१'s picture

14 Sep 2024 - 1:19 pm | सविता००१

नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर आहेत फोटो . खूप आवडले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2024 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फारच सुंदर.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

18 Sep 2024 - 12:24 pm | सौंदाळा

घाणेरीच्या फुलांचा गुच्छ उपटून देठाकडून त्याचा मध चो़खण्याची मज्जाच वेगळी होती. बागांच्या कुंपणासाठी ही झाडे असायची.
फोटो झक्कास आले आहेत.
दुसरा आणि शेवटचा फोटो विशेष आवडले.