डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

वेडा बेडूक's picture
वेडा बेडूक in काथ्याकूट
15 Jul 2024 - 11:36 am
गाभा: 

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते बालंबाल वाचले. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने महासत्ता अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी ठार केले. या गदारोळात दोन जण गंभीर जखमी झाले.

https://x.com/ANI/status/1812271060408230250

डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हेनिया शहरात शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. ही प्रचारसभा सुरू असतानाच एका माथेफिरूने ट्रम्प यांच्यावर एका छतावरून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. गोळीबाराचा आवाज येताच सभेत गोंधळ निर्माण झाला. सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना गराडा घालत त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. तिथून त्यांना पीट्सबर्ग येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर ट्रम्प यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला सुरक्षारक्षकांनी ठार केले. थॉमस क्रूक्स असे त्याचे नाव असून त्याने रायफलने ४५० फुटांवरून ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. सभेच्या ठिकाणापासून जवळच उंच स्थानावरून क्रूक्सने व्यासपीठावर अनेक गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोर व्यासपीठानजीक कसा पोहोचू शकला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकी सुरक्षायंत्रणांतील त्रुटी यातून अधोरेखित झाल्या आहेत.

गंमत म्हणजे, या हल्ल्यानंतर लगेचच चिनी विक्रेत्यांनी ट्रम्प यांच्या नावाचे टी-शर्ट विशेष संदेशासह छापले आणि त्यांची ऑनलाइन विक्री सुरू केली. अवघ्या काही मिनिटांत, चीन आणि अमेरिकेत 2000 हून अधिक टी-शर्ट विकले गेले. हल्ला झाल्यानंतर तीन तासांपेक्षा कमी कालावधीत टी-शर्टची पहिली तुकडी ताओबाओवर विक्रीसाठी गेली. असोसिएटेड प्रेसने संध्याकाळी 6:31 वाजता ट्रम्प यांची मूठ हलवतानाचा आयकॉनिक फोटो प्रसिद्ध केला. या फोटोसह बनवलेल्या टी-शर्टची पहिली बॅच प्रसिद्ध चीनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओवर रात्री 8.40 वाजता विक्रीसाठी गेली. "शूटिंगची बातमी पाहिल्याबरोबर आम्ही ताओबाओवर टी-शर्ट टाकले, तेव्हा आमच्याकडे ते छापलेले देखील नव्हते! आणि केवळ तीन तासांत आम्हाला चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून 2,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्या," टी-शर्ट विक्रेता म्हणाला.

या टी-शर्टवर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे छायाचित्र आहे, आणि "शूटिंग मेक्स मी स्ट्राँग" असे लिहिले आहे.

https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/just-hours-aft...

या सर्व घडामोडींवर मिपाकरांची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक!

प्रतिक्रिया

ट्रंप यांच्या बाबतीतली ही घटना खूपच धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. जे व्हिडिओ दिसत आहेत त्यानुसार ते एखादा इंच जरी इकडे तिकडे असते तरी कानावर निभावले नसते. डोके नेमके त्या क्षणी झुकले म्हणून वाचले असे भासते आहे.

बाकी चीनच्या व्यापाऱ्यांची व्यावसायिक वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती कमीत कमी वेळात एनकॅश करण्याची चपळता भारतीय व्यापाऱ्यांनी घेण्यासारखी आहे. ही घटना वाईट होती हा वेगळा विषय. पण कोणतीही गोष्ट व्हायरल होता होता अर्ध्या मिनिटात शर्टवर प्रिंट करून एक शर्ट नमुना वेब साईटवर लिस्ट करणे आणि ऑर्डर घ्यायला सुरुवात करणे हा व्यापाराचा एक विलक्षण प्रकार आहे. यात चीन कडे काही खास प्रिंटर असेल असे वाटत नाही. वेळ साधणे इतकाच फरक

मानलं बुवा चायनाला!!

पॅट्रीक जेड's picture

15 Jul 2024 - 4:40 pm | पॅट्रीक जेड

तात्यांवरील हल्ल्याचा जाहीर निषेध.

गोळी घालणारा रजिस्टर्ड रिपब्लिकन होता.

आणि त्याने democratic पक्षाला देणगी दिली.

कॉमी's picture

16 Jul 2024 - 10:42 am | कॉमी

१५$. ते पूर्वी केलेले. त्यानंतर तो रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता.

अनन्त अवधुत's picture

20 Jul 2024 - 2:22 am | अनन्त अवधुत

विरोधी पक्षाच्या प्रायमरीज मधे गोन्धळ घालायला (म्हणजे विरोधी पक्षाचा जो उमेदवार अध्यक्ष्य पदाच्या निवडणुकीत पराभूत होईल, त्याला विरोधी पक्षाच्या प्राथमिक फेरीत जिंकुन देण्यासाठी बरेचदा डेमोक्रॅट, आणि रिपब्लिकन प्राथमिक फेरीपूर्वी विरोधी पक्षाचे सदस्यत्व घेतात)

पॅट्रीक जेड's picture

15 Jul 2024 - 9:08 pm | पॅट्रीक जेड

गोळी घालणाऱ्या थॉमस म्याथ्यू कृक्स ह्याला जागेवर गोळी घालून ठार करण्यात आले.
तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं
तात्याशी नीट त्याला सोन्याची वीट.