...अजून सहाच महिने राहिलेत; शरीर-समृद्धी-संकल्प पूर्ण करा

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
1 Jul 2024 - 12:58 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.

खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे.

आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे -

-: पोटाचा घेर किमान तीन इंचांनी कमी करणे :-

अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे.

मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे. श्रीकृपेने अजूनतरी तरी रक्तदाब, मधुमेह आदी विकारांचे निदान झालेले नाहीय. पण समवयीन इतर अनेकांसारखंच मलाही (विशेषतः लॉकडाउननंतर) पोट सुटलंय.

आणि मग वर संगीतल्याप्रमाणे नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून मी पोट कमी करणे, चेहऱ्यावर तकाकी आणणे, जिम मारून बाइसेप्स्, ट्राइसेप्स्, फोरआर्म्स्, शोल्डर्स्, काव्ज्, ऍब्स्, थाइज् वगैरे बनविणे, पातळ टीशर्ट् घालून बुलेटवर बाहेर निघालो तर इतरांनी वळून पाहायला हवं असं दिसणे वगैरे बाबी ठरविल्या. अर्थात त्या आधीही अनेकदा ठरविल्या होत्या!

सुरुवातीला खूप उत्साह होता पण हळूहळू तो उत्साह थंड पडत गेला. अर्थात अधून मधून थोडी थोडी धुगधुगी येत राहते. पण त्यात काही सातत्य नाहीय; इच्छा अजूनही मेली नाहीय हे नक्की.

सुदैवाने "अरे, चाळीशी उलटली की अनेक पुरुष उतारवयाचे नियोजन करायला लागतात. तू शेहेचाळीशी येऊनही अजून बॉडी बनवून इतरांना(!) दाखविण्याचे किमान टार्गेट तरी ठेवतो आहेस हे काही कमी आहे का? तू प्रयत्न करत राहा." अशी प्रेरणा मला अर्धांगिनीकडून वेळोवेळी मिळते. पण म्हणतात ना, प्रेरणा ही आंघोळ करण्यासारखी असते, रोजची रोज लागते. ती कुठेतरी कमी पडतेय.

आता २०२४ वर्षाचे पहिले सहा महिने उलटलेत; अजून सहा महिने राहिलेत. "शरीर समृद्धी" हा माझा एक संकल्प खूप काही मार्गी लागलेला नाहीय.

कदाचित माझ्यासारखे तुम्हीही एक शरीर-समृद्धीप्रेमी मिपाकर असाल. काही ना काही कारणांमुळे तुमचेही शरीर समृद्धीचे उद्दिष्ट अपेक्षित रीतीने पूर्ण होत असेल-नसेल. काहीजण आपले फिजिक् मस्त मेंटेन् करत असतील, काही जण त्यांचा हेवा करत असतील तर अजून इतर काहीजण त्यांच्याकडे "हे शोभते का या वयात" असे म्हणून दुर्लक्षही करत असतील. कुणाला "आपण चांगले दिसावे" ही प्रेरणा असेल तर अजून कुणाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल. पण प्रत्येकाकडे इथे लिहिण्यासारखे (आणि ते इतरांना उपयोगी पडण्यासारखे) नक्कीच काहीतरी असेल!

चला तर मग, आपले शारीरिक समृद्धीचे प्रयत्न, नियोजन, अनुभव, यश-अपयश, सल्लामसलत, व्यायाम, कसरत, जिम, योग, प्राणायाम, ध्यान वगैरे इथे लिहुयात. सर्वांनाच फायदा होईल. मीही प्रतिसादांतून लिहीन.

विषयानुरूप चर्चा व्हावी, थोडेफार अवांतर-सवांतर वगैरे चालेल पण अगदी पातळी सोडून नको ही अपेक्षा.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2024 - 1:36 pm | प्रसाद गोडबोले

वाह. उत्तम.

मिड इयर चेक पॉईंट केलात हे उत्तम.

चांगले संकल्प करत राहावे माणसाने, परमेश्वर काय , तथास्तु म्हणायला उतावीळ आहेच ! काशीसी जावे , नित्य वदावे !

रक्तदाब मधुमेह वगैरे तत्सम लाइफ स्टाईल विकार नसतील तर ३ ईंच पोटाचा घेर कमी करणे हे काही खुप अवघड लक्ष्य नाही. नक्कीच जमु शकेल. शुभेच्छा ! मी ध्यान शिबिराच्या १० दिवसात ३.५ किलो वजन कमी केलेले, पोटाचा घेर १-१.५ इंच कमी झालेला . फक्त १० दिवसात आणि तेही फक्त योगासने करुन !
आयुर्वेदाच्या आचार्य म्हणाल्या होत्या - आयुर्वेदानुसार सर्वात भयंकर रोग आहे -

प्रज्ञापराध !

म्हणजे तुम्हाला कळतंय की एखादी गोष्ट तुमच्या शरीराला , आरोग्याला हानिकारक आहे तरीही तुम्ही करता , करत राहता . आरबट चरबट खाणे , चिप्स , फॅक्टरी प्रोड्युस्ड मीट, मैदा , पाव , चहा, कॉफी , खंडीभर साखर घातलेले कोल्डिंक्रस, सोडा , अल्कोहोल , स्मोकिंग , तंबाखु , व्यायामाचा आळस, रात्री उशीरापर्यंत जागरणं , सकाळी उशीरा उठणे , नित्यनेम न पाळणे. वगैरे वगैरे. आपल्याला माहीती आहे हे आरोग्याला चांगले नाही पण तरीही आपण करत राहतो , हा आहे प्रज्ञापराध . प्रज्ञा अर्थात बुध्दीचा अपमान !

बस हा एक रोग टाळला तर बाकी कोणतेच रोग होण्याची शक्यता कमी होऊन जाते ! बस्स येवढं करा , बाकी आपोआप जुळुन येईल ! शुभेच्छा !

शुभास्ते सन्तु पंथानः ||

चरैवति चरैवति ||

भागो's picture

1 Jul 2024 - 3:03 pm | भागो

वाह. उत्तम.
आपण दिलेल्या वरच्या यादीत अजून एक.
Do not breath. Air is polluted!
तुम्ही "तुझे आहे तुजपाशी" नाटक पाहिले आहे का?
नसेल तर अवश्य पहा.
https://youtu.be/sTZGYKAWc_4

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 3:41 pm | कांदा लिंबू

Do not breathe. Air is polluted!

संदर्भ कळला नाही. "दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, भस्त्रिका भ्रामरी, कपालभाती इ. प्राणायाम करा" असं काही आहे का?

प्रसाद गोडबोले's picture

2 Jul 2024 - 11:37 am | प्रसाद गोडबोले

Do not breath.

अहो , हे तर मी तुम्हाला अन मिपावरच्या अजुन कित्येक डुप्लिकेट आयडींना कधी पासुन सांगतोय. =))))

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 3:52 pm | कांदा लिंबू

१० दिवसात ३.५ किलो वजन कमी केलेले, पोटाचा घेर १-१.५ इंच कमी झालेला .

अभिनंदन!

आहार विहार काय होता अन् योगासने कोणती केली होती? विस्तारानं सांगितलं तर उपयोगी पडेल.
(तुमच्या लेखमालिकेत थोडाफार उल्लेख आहे.)

---
१. माझे पुण्यातील एक स्नेही व त्यांची पत्नी या दोघांनी दिवसभरात केवळ दोनदा जेवणे असं करून बरेचसे बारीक झाले होते.

२. माझा एक हैदराबादी मित्र, वर्षभरापूर्वी १२० किलो, सध्या ९५ किलो आहे.‌ त्याने आहार तज्ञाकडून घेतलेला कार्यक्रम वर्षभरापासून नित्यनेमाने करत आहे. रोज सकाळ संध्याकाळ चार-पाच चार-पाच किलोमीटर चालतो.

पण हे तिघेही लोक त्यांचं वजन कमी झाल्यानंतर सुरकुतलेले दिसत आहेत. म्हणजे हा हैदराबाद मित्र त्याची एकूणच शरीर-चण कमी झाली आहे असा दिसतो.

मतभिन्नतेच्या आदरासहित मला असं वाटतं की पोटावरची व इतर ठिकाणची अतिरिक्त चरबी निघून जावी पण एकूणच बांधा लहान होऊ नये किंवा खांदे पाडून चालत आहे असे दिसू नये.

- शंकेखोर कांदा लिंबू

प्रसाद गोडबोले's picture

2 Jul 2024 - 12:30 pm | प्रसाद गोडबोले

आहार >>

शुध्द शाकाहारी. एकदम सात्विक कांदा लसुण बंद. गव्हाच्या पोळ्या देखील बंद. त्या ऐवजी बाजरी , आणि अन्य मिलेट्स मिक्स करुन बनवल्या भाकर्‍या. जेवण बहुतांश उकडुन बनवलेले. तेल अत्यल्प . मात्र भाकरीवर तुप मनसोक्त . सकाळी नाष्त्याला फळे आणि काहीतरी भारतीय पदार्थ - पोहे , गुळाचा शिरा, तत्सम काही. पाव वर्ज्य , मिसळ सुध्दा नाही , मुळात वातड असे काही नाही. जेवणाच्या ठरलेल्या वेळा - नाष्टा ८:३०-९, जेवण १२:३०-१, दुपारी चहा नसायच्या (त्या ऐवजी कसला तरी काढा द्यायचे पण त्याने पोटात फार गरम व्हायचे म्हणुन मी तो एकदाच घेताला नंतर बंद.) रात्रीचे जेवण ७:३०-८:०० . जेवणानंतर देशी गायीचे दुध , एकदम गरमागरम आणि नो साखर. (आयुर्वेदानुसार रात्री दुध पिणे हे एक विशिष्ठ कार्य करते, सो ह्याप्रकारावर मी खुष होतो ;) )

विहार >>

विहार म्हणजे माझी रुम आणि ध्यान सभागृह ह्यात तब्बल १६०+ पायर्‍या होत्या, ते दिवसातुन ४-५ वेळा च्ढणे उतरणे व्हायचे ! रात्री बेड वर पडल्या पडल्या झोप लागायची , माझ्या स्मार्ट वॉच मधील स्लीप टाईम इंडिकेटर जे एरव्ही ७०-८० च्या रेंज मध्ये स्लीप क्वालिटी दाखवतो तो कंसिस्टंटली ९१ दाखवत होता, एके दिवशी तर तब्बल ९७ दाखवली. ( अर्थात हे नक्की कसे मोजतात हे मला ठाऊक नसल्याने मी ह्यावर जास्त अवलंबुन रहात नाही. शिवाय स्वामीजींनी स्मार्ट वॉच वापरण्यास मनाई केली. तेव्हा बंद केले.)

योगासने >> ह्यांची स्वामीजींनी दिलेली लिस्ट मी आधीच्या लेखनात दिलेली आहेच , त्यामुळे पुनरावृत्ती टाळतो . हां , फक्त फक्त काय करु नये ह्याची लिस्ट देतो - "माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार " पुढील योगासने गुरु मार्गदर्शनाशिवाय करु नयेत - सर्वांगासान, हलासन , शीर्षासन , चक्रासन .
शिवाय प्राणायामच्या बाबतीत अनुलोम विलिम , आणि भ्रस्त्रिका प्राणायम वगळाता कोणताच प्रकार स्वतःहुन करु नये. ही गुरुगम्य विद्या आहे. कुंभक, त्यातही अंतर्कुंभक गुरुच्या मार्गदर्शानाशिवाय केल्यास भयंकर परिणाम होऊ शकतात. आणि हठयोगातील क्रिया ते तर सोडुनच द्या. मी त्यांचा मी उल्लेखही टाळत आहे इथे.

दिवसभरात केवळ दोनदा जेवणे

डॉक्टर दिक्षित म्हणाले तसे. ह्याला जौन धर्मात ब्यासना असं म्हणतात. पण ह्याचे दोन दुष्परिणाम माझ्या निदर्शनास आले आहेत - हे करत असताना व्यायाम न केल्यास ह्याने फॅट लॉस न होता मसल लॉस होतो. आणि दुसरे म्हणजे - ह्या डायेटचा युरिक अ‍ॅसिड रिटेन्शन सोबत काहीतरी संबंध असावा असा माझा एक कयास आहे , तस्मात सांधेदुखीवाल्यांनी असले काही करु नये. डायबेटीस वाल्यांना तर हायपो ग्लायसेमिया चा धोका असल्याने त्यांन्नी तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीच करु नये .

बाकी तुमचा बांधा हा जेनेटीक आहे, तुम्हाला तुमच्या आईवडीलांकडुन मिळालेला आहे त्यात तुम्ही बदल करु शकत नाही. पण जे मिळाले ते व्यवस्थित कसे टिकवता येईल ह्याचे उपाय आपण नक्की करु शकतो. बाकी फॅट बर्निंग ही अतयंत सायंटिफिक प्रक्रिया आहे त्यावर इथे सविस्तर माहीती आहे - https://www.youtube.com/watch?v=vuIlsN32WaE&t=225s

त्यामुळे वजनाचा जास्त विचार न करता आयुर्वेदाचा दृष्टीने हा विचार करावा -

समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थः इत्यभिधीयते ॥

किंवा अजुन थोडे डिटेल मध्ये -

अन्नाभिलाषो भुक्तस्य परिपाकः सुखेन च ।
सृष्टविण्मूत्रवातत्वं शरीरस्य च लाघवम् ॥
सुप्रसन्नेन्द्रियत्वं च सुखस्वप्न प्रबोधनम् ।
बलवर्णायुषां लाभः सौमनस्यं समाग्निता ॥
विद्यात् आरोग्यलिंङ्गानि विपरीते विपर्ययम् । – ( काश्यपसंहिता, खिलस्थान, पञ्चमोध्यायः )

- इत्यलम

प्रसाद गोडबोले's picture

2 Jul 2024 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

चुकीची दुरुस्ती

भ्रस्त्रिका प्राणायम

मला कपालभातीं प्राणायाम लिहायचे होते, विचारांच्या ओघात चुकीने भ्रस्त्रिका लिहिले गेले. भस्त्रिका प्राणायाम देखील प्राणायामाचा एक अवघड प्रकार असल्याने गुरुगम्यच आहे, प्रत्यक्ष गुरुंचा मार्गदर्शनाशिवाय करु नयेच.

केवळ अनुलोम विलोम आणि कपालभांती इंतरनेट / युट्युबवर पाहुन करण्यास हरकत नाही.

अमर विश्वास's picture

1 Jul 2024 - 6:11 pm | अमर विश्वास

>> १० दिवसात ३.५ किलो वजन कमी केलेले, पोटाचा घेर १-१.५ इंच कमी झालेला . फक्त १० दिवसात आणि तेही फक्त योगासने करुन !<<

महिन्याला शेअर्स मधून १०% परतावा मिळावा .. यासारखे आहे ...

पुढच्या दहा दिवसात किती किलो वाढले ते ही सांगा

प्रसाद गोडबोले's picture

2 Jul 2024 - 11:54 am | प्रसाद गोडबोले

पुढच्या दहा दिवसात किती किलो वाढले ते ही सांगा

मी मेडीटिव्ह ह्या अ‍ॅप वर व्हायटाल स्टॅट सतत ट्रॅक करत असल्याने तुम्हाला अचुक उत्तर देउ शकतो. १० दिवसात १.१ किलो वजन वाढले. त्यानंतर नित्यनेम पुढे कायम केल्यावर परत ३००-५०० ग्रॅ कमी झाले. त्या नंतर आता जवळापास एक महिना उलटुन गेला तरी तिथेच स्टेबल आहे. सो नेट नेट ८०० ग्र. वजन वाढले.

बाकी -
तुमच्या प्रश्नाचा रोख तिरकस वाटला म्हनुन अजुन काही लिहितो - मला कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाही, मी काही वजन कमी करवण्याचे क्लास घेत नाही. ध्यान किंव्वा योगाचे तर नाहीच नाही , मला कसलेही मार्केटिंग करण्यात मुळीच रस नाही. कांदा लिंबु आमच्या गट.क्र. १ मधील वाटले म्हणुन मी मनस्वीपणे सहज प्रतिसाद दिला. बस इतकेच.

मी आधीही वारंवार म्हणलो आहे की- ज्ञान हे मर्यादित लोकांकरिताच असले पाहिजे.

तुम्ही असं समजा की हे आयुर्वेद , आयुर्वेदिक आहार , जीवनपध्दती , योगासने, सुर्यनमस्कार , ध्यान वगैरे सर्व थोतांड आहे, सुडोसायन्स आहे, बामणाचे कसब आहे. ते त्यांच्याकरिता सोडुन द्या.

अन्य लोकांकरिता - लिपोसक्शन हा पोटाचा घेर कमी करण्याचा खात्रीलायक उपाय आहे तो करणे उत्तम !

अमर विश्वास's picture

2 Jul 2024 - 2:19 pm | अमर विश्वास

>>>तुमच्या प्रश्नाचा रोख तिरकस वाटला म्हनुन अजुन काही लिहितो <<<

कुठल्याही क्रॅश डाएट नंतर वजन परत वाढते कारण सुरवातीला water & Muscle loss झालेला असतो आणि तो पटकन भरून येतो ...
यात तिरकस वाटण्यासारखे काय आहे ते कळले नाही ...

याआधीच्या आरोग्य विषयक धाग्यांवर मी मत / माहिती दिली आहेच ...

बाकी ते मर्यादित लोकांकरताचे ज्ञान / आयुर्वेद / बामणाचे कसब वगैरे वाचून तुमची विचार करायची पद्धत समजली ... आणि करमणूकही झाली .. त्यामुळे चालुद्या

टर्मीनेटर's picture

2 Jul 2024 - 2:34 pm | टर्मीनेटर

"तुम्ही असं समजा की हे आयुर्वेद , आयुर्वेदिक आहार , जीवनपध्दती , योगासने, सुर्यनमस्कार , ध्यान वगैरे सर्व थोतांड आहे, सुडोसायन्स आहे,"

मी आयुर्वेदाचा विरोधक नाही आणि दैनंदिन वापरातली दंतकांती टूथपेस्ट, चव आवडत असल्याने अधून-मधून हवाबाण हरडे आणि पुदीनहराच्या कॅप्सूल टाईप गोल गोळ्या मिळतात त्यांचा एका विशिष्ट कारणासाठी 'मुखशुद्धी' करण्यासाठी क्वचित प्रसंगी चावून खाण्यासाठी अशा २-३ गोष्टी सोडल्यास कुठल्या आयुर्वेदिक औषधांचा किंवा अन्य उत्पादनांचा उपभोक्ताही नाही त्यामुळे त्या उपचार पद्धती, आहार ह्यावर काही टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही.

पण एकाच शहरात राहत असल्याने दोन तीन खाजगी कट्ट्यांच्या निमित्ताने झालेली भेट आणि फोन-व्हॉट्सऍप वर असलेल्या संपर्कापुरते मर्यादित असलेले एक मिपाकर अरुण पाटील, मिपा आयडी रंगीला रतन ह्यांचे १२ जून रोजी हृदयविकाराने निधन झाल्याचे काल समजले. सहा सात महिन्यांपूर्वी ब्लॉकेजेसचे निदान झाल्यावर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम असलेल्या ह्या बांधकाम व्यावसायिकाने आधुनिक उपचार घेण्याचे सोडून (कुठे त्याचे नाव घेत नाही पण) आयुर्वेदिक उपचार घेण्यातून वयाच्या ४३-४४ व्या वर्षी आपला जीव गमावला ह्याचे आश्चर्य वाटले. तसे ते, हृदयविकारच काय कॅन्सर वरील उपचारांसाठीही अनेक लोक 'सर्वस्वी' आयुर्वेदिक उपचारांवर कसे काय अवलंबून राहतात ह्याविषयी नेहमीच वाटते म्हणा!

"लिपोसक्शन हा पोटाचा घेर कमी करण्याचा खात्रीलायक उपाय आहे तो करणे उत्तम !"

ह्याचाही दीर्घकाळासाठी उपयोग होतो कि नाही ह्याविशयी साशंक आहे. एका परिचिताने हे केले होते पण दोनेक वर्षांनी पुन्हा त्याचे आकारमान जवळपास पूर्वीप्रमाणेच झाले. अर्थात जिभेवर बिलकुल ताबा नसणे हे त्यामागचे त्याच्याबाबतीतले कारण असू शकते हे देखील मान्यच!

आणि एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.

Bhakti's picture

2 Jul 2024 - 3:55 pm | Bhakti

रंगीला रतन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
इतक्या कमी वयात धक्कादायक आहे.

आणि एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.

यात मात्र तथ्य आहे हे हळूहळू समोर येत आहे.माझ्या वडिलांना कोवीड नंतर काही काळातच सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता.तेव्हा डॉक्टरांनी लसीमुळे हे घडलं असंच सांगितलं होतं.

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2024 - 6:17 pm | कर्नलतपस्वी

यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हृदय रोगावर तज्ज्ञांकडून उपचार केले असते तर नक्कीच ते आज आपल्यात असते.

कांदा लिंबू's picture

2 Jul 2024 - 6:31 pm | कांदा लिंबू

रंगीला रतन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांना मोक्षप्राप्ती होवो ही श्रीचरणी प्रार्थना. ॐ शांती.

त्यांच्याशी वैयक्तिक परिचय नसला तरी त्यांचे चाळीशीत जाणे हे धक्कादायक आहे.

---

एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.

हेही धक्कादायक आहे. "कोविडच्या लशींचे अल्पकालीन व दीर्घकालीन दुष्परिणाम" असं काही संशोधन झालेलं आहे का?

स्वधर्म's picture

2 Jul 2024 - 6:54 pm | स्वधर्म

रंगीला रतन यांना भावपूर्ण श्रध्दांजली. अत्यंत दुर्दैवी.

वामन देशमुख's picture

2 Jul 2024 - 7:17 pm | वामन देशमुख

रंगीला रतन यांना श्रद्धांजली. ॐ शांती.

रंगीला रतन ऍक्सेस डिनाइड् येत आहे.

डॉ.जोत्स्ना पाटील अत्यंत सोप्या भाषेत ह्रदयविकाराचे आधुनिक उपाय/मेडिकल पद्धती कशा आहेत सांगतात.आरोग्य काळजी घेण्याबाबत जागरुकता पसरवतात.कधीही यांची व्याख्याने ऐका खुप चांगली माहिती मिळते.विशेषत: व्यायाम ,योगा,आहार यावर त्या अधिक भर देतात.
https://youtu.be/wS52l-yr0NY?si=LX4hzIlhuJOztGTA

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2024 - 3:13 pm | प्रसाद गोडबोले

रंगीला रतन ह्यांना श्रध्दांजली.

सुदैवाने मला आजवर भेटलेले आयुर्वेदिक डॉक्टर हे एकांगी एककल्ली मत बाळगत नाहीत.

हृदयात ब्लोकेज होई पर्यंत आरोग्याकडे दुर्लक्ष केले, आयुर्वेदाला फाट्यावर मारले, अन् ऐनवेळी निदान झाल्यावर आयुर्वेद आठवला अन् आता तोच मला वाचवेल हा आशावाद फोल आहे.

हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, ब्रोंकायतिस , डोळ्याचे विकार , कॅन्सर , वगैरे वगैरे हे विकार निदर्शनास आल्यावर त्वरित मॉडर्न सायन्स अनुसार औषध उपचार घ्यावेत अन् बरे व्हाव्हे .

पण ह्यातील बहुतांश हे आपल्या आधुनिक जीवन शैली चे परिणाम आहेत हे आता सर्व मान्य झालेले आहे, म्हणून हे विकार होऊच नयेत म्हणून जीवनशैली आयुर्वेदानुसार सात्विक करावी. हे उत्तम.

फक्त आयुर्वेद किंवा फक्त अलोपथी , ह्यातील कोणताही टोकाचा आग्रह बरा नव्हे. समत्व हवे , सारासार विवेक्क हवा.

समत्वं योगमुच्यते ।।

फक्त आयुर्वेद किंवा फक्त अलोपथी , ह्यातील कोणताही टोकाचा आग्रह बरा नव्हे. समत्व हवे , सारासार विवेक्क हवा.

१००% सहमत! आणि त्यासाठीच वरच्या प्रतिसादातील,
"हृदयविकारच काय कॅन्सर वरील उपचारांसाठीही अनेक लोक 'सर्वस्वी' आयुर्वेदिक उपचारांवर कसे काय अवलंबून राहतात ह्याविषयी नेहमीच वाटते म्हणा!"
ह्या वाक्यात 'सर्वस्वी' ह्या शब्दाचा वापर केला आहे!

Bhakti's picture

1 Jul 2024 - 2:18 pm | Bhakti

*मीपण आहार बदल -साखर खुप कमी केलीये, मिठाई,बेकरी प्रोडक्ट बंद केली आहे.
दोनदाच जेवते- सकाळी ९ आणि संध्याकाळी ६.
रात्री ७ नंतर काहीच खात नाही.
(कधीतरी गावाला जायचं असल्यास बदल होतो.)
*आहारात दही,बदाम, शेंगदाणे,सैलड वाढवा.
*सकाळी लवकर उठा रात्री दहा-साडे दहाला झोपा.
*पोटासाठी HIIT
Burpees २० करा ,mountain climbers - ४०-६०,squat - ३०-५०,jumping jacks-१०० ने सुरूवात करा.
*४० मिनिटे चालणे- मसल्स, मसल्स रिसेप्टर अक्टिवेट राहण्यासाठी .
*योगामध्ये रोज प्राणायाम करा-अनुलोम विलोम दिवसातून ३-४ वेळा ५-१० मिनिटे!
उर्वरित सहा महिन्यांसाठी सर्वांना शुभेच्छा!

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 3:56 pm | कांदा लिंबू

Burpees २० करा ,mountain climbers - ४०-६०,squat - ३०-५०,jumping jacks-१०० ने सुरूवात करा.

अहो सुरुवात एवढ्यानं करायची तर मग शेवट कितीनं करायचा?
;-)

Well, on a serious note, हे मी लिहून ठेवलंय ऍटलिस्ट जेवढे जमेल तेवढे आज संध्याकाळपासून सुरू करत आहे.

धन्स्!

योगामध्ये रोज प्राणायाम करा-अनुलोम विलोम दिवसातून ३-४ वेळा ५-१० मिनिटे!

योग दिवसातून अनेक वेळा करतात हे माहीत नव्हतं. करून पाहीन.‌

योग दिवसातून अनेक वेळा करतात हे माहीत नव्हतं. करून पाहीन

.‌
अगदी सूर्यनमस्कारही कधीही करू शकता,फक्त सकाळीच असं काही नाही.

चाळीशीनंतर आहाराने पोट कमी करणे जरा अवघडच असते. व्यायामाने नाहीच हे माझे मत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2024 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व शरीरात बदल होतील पण पोट अहं... पोट घेर सर्वात शेवटी कमी होतं, पण त्याच्यावर परिणाम होईल इतकी मेहनत आणि तोवर तग धरायचे महाकठीण काम.

-दिलीप बिरुटे

कांदा लिंबू's picture

2 Jul 2024 - 12:29 pm | कांदा लिंबू

चाळीशीनंतर आहाराने पोट कमी करणे जरा अवघडच असते. व्यायामाने नाहीच हे माझे मत.

पोट घेर सर्वात शेवटी कमी होतं,

कंकाका, प्रा डॉ, असं बोलू नका हो, पामराला जरा धीर द्या!
;-)

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2024 - 6:23 pm | कर्नलतपस्वी

दररोज पोहण्याचा व्यायाम करा नक्कीच कमी होईल. HIIT व्यायाम सुरू करण्यात पुर्वी वैद्यकीय सल्ला अती अवश्यक आहे.

पुनः एकदा सांगतो शिस्त आणी सातत्य हे जरूरी पंरतू वयोमानानुसार व्यायाम,आहार यावर पुनर्विचार जरूर करणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2024 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आरोग्याच्या व्याधी उपचार हे वयपरत्वे येणारे पाहुणे काही मुक्कामी राहतात तर, काही कायमचे सोबती. वाढत्या वयाबरोबर शरीर फिटनेस ठेवण्यातला उत्साह कमी होत जातो. आहारावर नियंत्रण राहात नाही वगैरे, मुळे वाढते वजन ही एक समस्या होऊन जाते. वजन कमी झाले नाही तरी चालेल, पण आहे त्यात भर पडू नये. आरोग्य विषयावर आवश्यक असते.

अधुन मधून पाच सहा किमी चालणे. पूर्वी नियमित बॅडमिंटन खेळायचो यामुळे वजन कमी होणे असे काही झाले नाही पण दिवसभर उत्साहाची फूल ब्याट्री असायची. एक दिवस पाय मुरगळला तो बरा झाला त्या नंतर, एक दिवस लांबलेल्या रॅलीत हाताचा कोपरा दुखावला महिनाभर नॉर्मल मोड मधे यायला लागले. आता अधुन-मधून चालणे इतकेच.

कांदा-लिंबू सॉरी कोमट लिंबू-पाणी जर घेतले तर, स्थुलपणा कमी होतो म्हणे, हाही प्रयोग करून पाहिला पण त्यातही सातत्याचा अभाव.
डॉक्टर मंडळींनी वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी करणे, यावर सोपे-सोपे उपाय (सोपे उपाय नसतात) सांगितला पाहिजे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 4:13 pm | कांदा लिंबू

पूर्वी नियमित बॅडमिंटन खेळायचो यामुळे वजन कमी होणे असे काही झाले नाही पण दिवसभर उत्साहाची फूल ब्याट्री असायची.

हं. आमच्या अपार्टमेंटातही जाड, बारीक, मध्यम लोक रोज बॅडमिंटन खेळतात पण त्यांचीही शरीरयष्टी बदलली असं काही दिसत नाही.‌ उत्साह मात्र दिसतो हे खरं.

---
तुम बॅडमिंटनां खेलने तो हैदराबाद आ जाओ बड़े भाई, गच्चीबौली में जाके तुमारकू को पुलेला गोपीचंद अकादमी में खिलातुं। भोत लोगां एंजॉय करते व्हांपे, मालूम?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2024 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम बॅडमिंटनां खेलने तो हैदराबाद आ जाओ बड़े भाई, गच्चीबौली में जाके तुमारकू को पुलेला गोपीचंद अकादमी में खिलातुं। भोत लोगां एंजॉय करते व्हांपे, मालूम?

क्या बात है मस्त. हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत 'नको' सारखे काही मराठी शब्द येतात, तेही मला आवडतं, एक चांगली आठवण. लिहिते राहा या विषयावर.

''कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
अगर तुझको शक है मुझपर नहीं निकलूंगी बाहर
मैं पानी को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो''

सध्या वजन कितीय तुमचं ? आणि वय. गोष्टी खासगी आहेत, सांगितलं पाहिजे असे काही नाही. पण कुठून कुठे जायचं आहे म्हणून ही उत्सुकता.

-दिलीप बिरुटे
( वजनदार) :)

कांदा लिंबू's picture

2 Jul 2024 - 12:30 pm | कांदा लिंबू

सध्या वजन कितीय तुमचं ? आणि वय. गोष्टी खासगी आहेत, सांगितलं पाहिजे असे काही नाही. पण कुठून कुठे जायचं आहे म्हणून ही उत्सुकता.

उंची पाच फूट साडेसात इंच आहे. सध्याचे वजन ८३ किलो आहे. कोविड पूर्वी ७० ते ७२ किलो मध्ये असायचे.

वय (धाग्यातून) -

मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे.

---

माझे उद्दिष्ट वजन कमी करणे हे नाही. म्हणजे, वजन कमी झाले तर त्याला काही हरकत नाही, पण खांदे पाडून चालतोय, खूपच रोड झालोय असे दिसणे आवडणार नाही. बांधेसूद दिसावे हा हेतू आहे.

पस्तीशीपर्यंत पयशे आणि शक्ती उधळल्यानंतर शरीर आणि मन साठवणीच्या मागे लागते. त्यामुळे त्यात लगेच उतार पडणे अशक्य असते. बँक बॅलन्स वाढला का पाहण्याची घाई असते पण पायांकडे बघताना पोट आड येते.

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 4:04 pm | कांदा लिंबू

थोडसं माझं सांगतो,

कंटाळा हा माझा बेस्ट फ्रेंड असला तरीही -

मागच्या वर्ष-सहा महिन्यांपासून अनेक वेळा अपार्टमेंट मधल्या सोबत त्यांना घेऊन काही अपवाद वगळता, शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे.

अनेक वेळा विशेषता गुरुवारी, अपार्टमेंटच्या आठ मजले पायऱ्यांनी चढणे आणि लिफ्टने उतरणे असे दहा वेळा करणे असंही करतो.‌ त्यावेळी सोबत कोणी नसतं.

हे सांगितल्यावर माझे एक यशस्वी आयुर्वेदिक डॉक्टर स्नेही म्हणाले, "कांद्या, हे अतिचंद्रमन आहे, थांबव".

---

यावर कुणी मिपाकर प्रकाश टाकू शकेल का?

कांदा लिंबू's picture

1 Jul 2024 - 4:23 pm | कांदा लिंबू

अतिचंद्रमन

अतिचंक्रमन असे वाचावे.

शाम भागवत's picture

4 Jul 2024 - 4:23 am | शाम भागवत

आठवडाभराचे एकदाच जेऊन घेतो व पाणी पितो.मग आठवडाभर काहीही खात पीत नाही.
असं कोणी म्हटल्यास त्याला कोणता शब्द वापरणार?
;)

मुक्त विहारि's picture

1 Jul 2024 - 6:25 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...

हे वाळवंटातील उंटा सारखे झाले. सर्व कष्ट वाया जात आहेत.

जीवनातील कुठल्याही क्षेत्रात शिस्त आणी सातत्य हाच मुलमंत्र.

सर्वच लिहीत बसलो तर नाका पेक्षा मोती जड, म्हणजे लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा होण्याची भिती वाटते. पुन्हा म्हातारा काहीही शिकवतो असाही ठप्पा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करोना मुळे थोडा यांत्रिक बिघाड झाला आहे पण वरील मुलमंत्रा मुळे सर्व काही ठीक आहे.

पिंडे पिंडे मते भिन्न प्रमाणेच शरीर प्रकृती व इतर गोष्टी तेव्हां प्रत्येक व्यक्तीने मुलमंत्र समोर ठेवून दिनक्रम ठरवावा.

स्वतः बद्दल सांगताना एवढेच सांगेन की सत्तरी उलटणार आहे पण आज भी खडी चम्मच चाय आणी पटियाला ऑन द राॅक्स चलता है. अपने मुहं मियाॅ मिठ्ठू क्यों,खालील कवीता वाचा,माझीच रचना आहे.

किसी ने पुछा कैसे हो।
मुस्कुरा के बोला।
बढीया है दोस्त।

दोस्तों की मेहर है।
रब दी है खैर।
मस्त चल रही है।
जिदंगी की सैर ।

तडके उठता हूँ।
दाढी दुढी बनाता हूँ।
बचेखुचे बालों को ढुढंके
सवारता हूँ।

सैरसपाटा तो बहाना है।
घुटनो की वर्जीश कम आँखो की ज्यादा होती है।
कुछ खुंसट दोस्त और
जाते हुये चांद से
आँखे चार होती है।

घर आते ही गोली चलती है।
आज फिर देर हुयी
बोला हाँ आज वर्जीश
कुछ ज्यादाही हुयी।

शाम होते ही
दो पटियाले लगते है।
कभी कभार काजू कबाब सजते है।
कुछ भी ना मिले तो
जले हुये पापड भी चलते है।

रूखी सुखी खाता हूँ।
मुंछाँँ मे घी लगाके
चादर के साथ
लंबी तानके सोता हूँ।

मेहरारू की नजरे इनायत।
यहाँ सब खैरीयत है।
तबियत के साथ साथ
तरबियत भी अच्छी
चल रही है ।

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2024 - 8:20 pm | चौथा कोनाडा

+१ मस्त ! छान रचना !

शाम होते ही
दो पटियाले लगते है।
कभी कभार काजू कबाब सजते है।
कुछ भी ना मिले तो
जले हुये पापड भी चलते है।

या ओळी भावल्या .

यात पटियाले च्या ऐअवजी पुणेरी करता येणार नाहीत का ?

टर्मीनेटर's picture

2 Jul 2024 - 3:04 am | टर्मीनेटर

वाह... बहोत खुब कर्नल साहब! मजा आ गया.
हिंदीत कविता लिहिलीत ते चांगले केलेत, मराठी काव्य माझ्या पार डोक्यावरुन जाते बघा! का कोणास ठाउक, पण काव्य. पद्य, शेरोशायरी समजण्याच्या बाबतीत मला 'माय' मराठी पेक्षा हिंदी 'मावशीच' जवळची वाटते. (माझ्या तीनही मावशांना हिंदीत साधे एक वाक्यही धड बोलता येत नाही ही गोष्ट अलाहिदा 😀)

आपकी इजाजत हो तो इस रचना का मेरावाला व्हर्जन पेश करना चाहुंगा!
चलो आप 'इरशाद' बोलनेसे पेहलेही पेश कर देता हू....😀

चेहरे पे मुस्कुराहट देख।
कोई पुछताही नही।
के दोस्त कैसे हो।

दुनिया तो कहर हैं |
दोस्ती ही सहर हैं।
एक रब दी ही खैर हैं।
जो चल रही हैं जिंदगी।

कभी कवार जल्दी उठता हूँ।
घरपर ही दाढी बनाने की सोचता हूँ।
माँ हो या बीवी जो भी देखें।
बोलती मत बना अच्छा लग रहा हैं।

नैनमटक्का कोई कहावा नही।
आँखो आँखो में बातें ज्यादा होती है।
पर्दा-नशीं हो या बेपर्दा।
आते जाते हुये हसीनाओं से।
आँखे चार छे हो ही जाती है।

घर आते ही बोली सुनता हूं।
आज जल्दी कैसें आयें।
बोलता हूं आज बंदिश।
दोस्तोंकी कुछ कम थी।

सुरज ढलतेही।
देढ या दो पौवे लगाते हैं।
काजू किशमिश ककडी गाजर सजते हैं।
गोश्त का खास शौक तो रखतें नहीं।
पर तलें से ज्यादा पसंदीदा भुने से काम चलातें हैं।

रुखी सुखी खाता नहीं।
मुंछे तो रखता नहीं।
एसी लगाके चादर के अंदर।
मेहरारू से लिपटके सोता हूँ।

उपरवाले की मेहेरबानीसे।
पुरा कुनबा खैरीयत से है।
दिल दिमाग गुरदे के साथ साथ।
शरारतें भी अच्छी चल रही है।

- टर्मीनेटर शरारताबादी 😀

कांदा लिंबू's picture

2 Jul 2024 - 12:29 pm | कांदा लिंबू

जीवनातील कुठल्याही क्षेत्रात शिस्त आणी सातत्य हाच मूलमंत्र.

शतशः सहमत. दुर्दैवाने हे माझ्याबाबतीत फारसे होत नाहीय.

अर्थात, काही बाबतीत मी अगदी शिस्त पाळतो. काही काळासाठी मांसाहार सोडला आहे आणि आता त्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

सत्तरी उलटणार आहे पण आज भी खडी चम्मच चाय आणी पटियाला ऑन द राॅक्स चलता है.

अभिनंदन. चहा वगळता बाकी तुमचा आदर्श ठेवावा म्हणतो!

कर्नलतपस्वी व टर्मी भौ, कविता आवडल्या.

मी माझे वजन, साखर इ कधी मोजत नाही. माझे नित्यजीवन व्यवस्थित आहे तोपर्यन्त मी वैद्यकीय जगाकडे ढुंकुनही पाहत नाही.
चालणे, खेळणे इ केवळ उत्साह असेल तर आणि आवड्त्या लोकांसोबत आनंद देणार असेल तर करतो.
मी आता ५० वर्षांचा आहे, आणि असे मी १५ वर्षांपासून करत आहे.

कांदा लिंबू's picture

2 Jul 2024 - 12:30 pm | कांदा लिंबू

वा! चक्क अजोंचे पाय लागले आमच्या झोपडीच्या अंगणाला!
;-)

धन्स्!
---

प्रतिसादाच्या साधारण आशयाशी सहमत.

आयुर्वेदात हिरडा, बेहडा आणि आवळा अमुल्य आहेत.

किंमतीने आणि उपयुक्ततेने.

जीवनातील कुठल्याही क्षेत्रात शिस्त आणी सातत्य हाच मूलमंत्र.

-- अगदी नेमके सांगितलेत.
बाकी आता वजन कमी कसे करावे वगैरे विषयांवरील चर्विताचर्वण कंटाळवाणे वाटू लागले आहे. हल्ली सगळ्यांना सगळेच ठाऊक असते, (खरेतर गरजेपेक्षाही जास्तच) कायप्पा, तूनळीवर अशा माहितीचा भडिमार सुरु असतो. पण आपण स्वतः ते प्रत्यक्षात व्यवस्थितपणे करत रहाणे - (शिस्तशीर जीवन आणि प्रयत्नातले सातत्य) हे महत्वाचे.

कोणे एकेकाळी मीही नवीन वर्षांचे संकल्प करायचो आणि त्यात नववर्षात 'काय करायचे' ह्या खात्यात शून्य नोंदी असायच्या पण 'काय करायचे नाही' ह्या खात्यात संकल्पांची जंत्री असायची. काहीवर्षे हा पोरखेळ खेळून झाल्यावर "कुत्र्याचे शेपूट बारा काय बाराशे वर्षे जरी पाईपमध्ये घालून ठेवले तर तो पाईप वाकडा होईल पण शेपूट काही सरळ होणार नाही" म्हणतात त्याप्रमाणे 'आपण केलेले नववर्षाचे संकल्प ह्याजन्मी तरी कधीच सिद्धीस जाणार नाहीत' हा साक्षात्कार झाल्यावर 'नववर्षाचा कुठलाच संकल्प करायचा नाही' हा एकमेव संकल्प दर नववर्षी करतो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पूर्णही होतो 😀

अमर विश्वास's picture

2 Jul 2024 - 5:05 pm | अमर विश्वास

HIIT बद्दल खरडफळ्यावर चर्चा चालू होती ..

मी HIIT नियमित करायचो आता कमी वेळा करतो कारण टार्गेट्स / व्यायाम बदललं आहे
लिहायला सोपे जावे म्हणून इंग्रजीतून लिहितोय .. माफी असावी

HIIT (My Version)
Prerequisites : This is Running version of HIIT. So have good practice of jogging / running at least 2 weeks before starting HIIT
Make sure no sourness / niggles / injuries.
If you feel any pain at any point during HIIT, stop immediately

Warm up :
Do light warm .. like half a km Jogging followed by dynamic stretching.. (Don't get exhausted here)

HIIT :
start with simple 25 Meter interval
Mark start & finish line 25 meters apart ... (on jogging track preferably .. avoid running on footpath / hard surfaces)
Run 25 mtrs as fast as you can
immediately jog back to start line
Run again ... repeat for 4 time (4 fast running + 4 jog back) ...

this is one cycle..
take 1 min rest (depends on your heart rate recovery. Heart rate should drop down to 110)
Make Shure your peak hear rate during entire cycle is at 80% at max ((220 - Age) * 80%)

Try to do at least 2 cycles on day one

Progression
First 4 weeks :
increase to 4 cycles
Reduce your cycle time to 60% of the day one time

Week 4 -8 :
Do exactly same with 50 meter

future progression :
Try same for 75 meters & eventually 100 meters

Important : Do HIIT maximum 3 times in week only
Watch your heart rate : Max & recovery time

For those over 40.. check with doctor if needed before starting (depending on health history)

नठ्यारा's picture

2 Jul 2024 - 7:07 pm | नठ्यारा

अवांतर :

Bhakti,

तेव्हा डॉक्टरांनी लसीमुळे हे घडलं असंच सांगितलं होतं.

लशीच्या दुष्परिणामाबद्दल कोणीतरी सुरुवातीपासून बोंबलंत होते. पण लक्षांत कोण घेतो. जणू लस हाच विषाणू आहे : https://misalpav.com/comment/1140773#comment-1140773

-नाठाळ नठ्या

माझ्या मित्राने नाही म्हणजे नाहीच घेतली ही लस!स्वतः पीएचडी आहे,मला म्हणाला "आपल्याला तर माहितीच आहे ना इम्युनिटी कशी वर्क करते ,मग या घाईघाईत बनवलेल्या लसीचे गिनीपिग कशाला व्हायचे?"
पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती,"प्रिवेंशन बेटर दॅन क्युअर"

"आपल्याला तर माहितीच आहे ना इम्युनिटी कशी वर्क करते ,मग या घाईघाईत बनवलेल्या लसीचे गिनीपिग कशाला व्हायचे?"

अगदी अगदी...
ह्याच विचारांतुन मी पण 'नाही म्हणजे नाहीच घेतली' ही लस!
दोन डोस घेऊन झालेले कुटुंबातील अन्य तीन 'लसवंत' सदस्य आणि पुढे काहीच दिवसांच्या फरकाने 'लस न घेतलेला' मी बाधीत झाल्यावरच्या अनुभवाविषयी ‘ओमायक्रॅान’ हा धागाही मिपावर काढला होता. त्या आजारातुन बरे होण्यास मला बाकिच्या 'लसवंत' कुटुंबियांपेक्षा थोडा अधिक वेळ लागला होता आणि त्रासही त्यांच्यापेक्षा थोडा अधिक झाला होता एवढाच काय तो त्यांनी घेतलेल्या लसीचा फायदा मला तरी जाणवला!

आणि हो, तुमच्या 'समविचारी' मित्राला माझा नमस्कार सांगा...

स्वधर्म's picture

2 Jul 2024 - 7:18 pm | स्वधर्म

प्रत्येकाच्या शाररिक घडणीवर, तो ज्या परिस्थितीत आहे त्यावर त्याचे सध्याचे आरोग्य अवलंबून असते. आपण अनेक चल घटकांनी बनलेल्या जगात रहात असतो, जे हरघडी बदलत असतात व परस्परांवर परिणाम करत असतात. यातल्या कुठल्या घटकाचा परिणाम आपल्या शरिरावर काय होईल, हे सांगणं अत्यंत अवघड आहे. तरी पण आपले आरोग्य बव्हंशी मनाच्या सवयीवर अवलंबून असते, असे मानायला जागा आहे. माझेही वजन गेल्या तीन महिन्यात तीन किलोने वाढले आहे. याचे बाह्य कारण योगासने व व्यायामात नियमितपणा कमी झालाय, हे मलाही समजते. तो का झाला? तर काही बाह्य घटकांत बदल होत असल्याने अनिश्चितता होती व त्यामुळे मन स्थिर नव्हते व त्यामुळे रिलॅक्सेशनची गरज वाढली. परिणामी जागरणे, आळस वाढत गेला. व्यायाम चुकला. त्यामुळे मला वाटते की सगळ्या गोष्टीपेक्षा मनाचे संतुलन व स्थिरता जपणे सर्वात महत्वाचे आहे. त्यातून व्यायामाचे सात्यत्य व त्यामागून शारिरीक आरोग्य येईल.
माझे एक मित्र अत्यंत नियमीत ध्यान करत असत. त्यांना विचारले की त्यापेक्षा व्यायामाला का वेळ देत नाही? तर म्हणत की काय व्यायाम करायचा, किती करायचा हे शरीर सांगत असतं. ध्यान केलं मन शांत होतं व शरीर काय सांगतं ते ऐकू येतं. मग जशी जाणीव होईल, त्याप्रमाणे व्यायाम करायचा. अशाने तो यांत्रिक होत नाही. दहा बार वर्षात ते कधी डॉ कडे गेले नव्हते. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. आणि त्यांनी पण उपचारांना उशीर केल्याने ते गेले की काय असं वाटतं. दोन तीन महिने होमिओपॅथी उपचार घेऊन नंतर आधुनिक वैद्यकाच्या डॉक्टरांकडे गेल्यावर समजलं की कर्करोग बराच पसरलाय. काही करता आलं नाही.

आरोग्य-समृद्धी बद्धल माझे विचार -

एखादी स्त्री वा पुरुष निरोगी आहे की नाही हे ठरविण्याचे बहुमान्य निकष काय आहेत किंवा असावेत?

  1. रक्तदाब - ७०-१२० च्या मध्ये असणे
  2. रक्तसाखर - १००-१५० च्या मध्ये असणे
  3. स्पष्ट आवाज व उच्चार असणे
  4. स्पष्ट नजर असणे
  5. स्पष्ट ऐकू येणे
  6. दोन-पाच मजले चढले तर फारसा दम न लागणे
  7. तीस किलोचे तांदुळाचे पोते सहज उचलून नेता येणे
  8. स्त्रीची मासिक पाळी व्यवस्थित होणे
  9. भरपूर कामेच्छा व शक्ती असणे
  10. लघवी / शौचास साफ होणे
  11. पुरेशी भूक लागणे व जेवल्यावर तृप्त वाटणे
  12. शांत झोप लागणे, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणे
  13. गरज पडल्यास दोनेक किलोमीटर न थांबता धावता येणे
  14. असे काही श्रम केल्यावर अल्प वेळात श्वास व हृदयगती सामान्य पातळीवर येणे
  15. एकूणच सुदृढ, सक्षम, उत्साही वाटणे
  16. इत्यादी
  17. हे निकष दर वर्षी / दर सहा महिने / दर तीन महिने / दर महिना वगैरे अंतराने पूर्ण करता येणे

ही यादी केवळ मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आहे. तज्ज्ञांनी दुरुस्त करावी.

---

रच्याक, एखादी व्यक्ती हे निकष सातत्याने पूर्ण करत असेल तर ती मद्यपान, मांसाशन, तंबाखूसेवन करत असेल तर काय हरकत आहे?

इशारा: मद्यपानाने मृत्यू येतो. तंबाखूसेवनाने वेदनादायक मृत्यू येतो.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:41 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

शाम भागवत's picture

4 Jul 2024 - 4:37 am | शाम भागवत

आळस हा एक मोठा शत्रू आहे. आपण संकल्प करतो व आपल्या हातून हे होईल ना? असा विकल्प हा आळस आपल्याच मनांत जन्माला घालतो,
ह्या आळसाला हळूहळूच मारायला लागतं. आपल्याला नक्की जमेल अशी कोणतीही छोटीशी गोष्ट करण्याचा संकल्प करायचा व तो प्राणपणाने जपायचा.
सहा महिने जमलं तर मग आणखीन एका संकल्पाची जोड द्यायची व ती प्राणपणने जपायची.
काही वर्षांनी आपण जी गोष्ट ठरवतो ती करतोच असा विश्वास आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही वाटायला लागतो.

हे सगळं मी आईकडून शिकलो._/\_
पण अजूनही माझ्यात सुधारणेला वाव आहेच. :)