तुम्ही कोणती औषधे रोज खाताय ?

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
15 May 2024 - 4:03 pm
गाभा: 

सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते.

४-५ वर्ष ऍक्रोफोबिया मुळे सायकॅट्रीस्टची औषधे मला रोज खायला लागायची. काही अंशी नशाच यायची त्याने. पण नंतर एके दिवशी सगळी फेकून दिली, ती औषधे न खाल्ल्याने काही विशेष फरक पडला नाही, पण भीती मात्र आपोआप हळूहळू कमी झाली.

नियमित धूम्रपान करीत असल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे 40MG प्रमाण असलेले औषध रोज सकाळी खावे लागते.

बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?

प्रतिक्रिया

"दुसरा पर्यायच उरला नाही"
!

रुग्णाने परत परत यावे अशीच औषधे असतात!

कांदा लिंबू's picture

15 May 2024 - 4:09 pm | कांदा लिंबू

सध्यातरी कोणतीही औषधे रोज खात नाही.

चौथा कोनाडा's picture

15 May 2024 - 5:12 pm | चौथा कोनाडा

आरोग्याचा विषय, गुंतागुंतीचे रोग, न सुटणारर्‍या सवयी, औषध घेण्याची अपरिहार्यता ... सगळंच अवघड !
अन जीवन-शैली विकार म्हंजे डेंजर ... कशी बदलणार जीवन-शैली ? सगळ्यांनाच जमतं ?

चंद्रसूर्यकुमार's picture

15 May 2024 - 5:45 pm | चंद्रसूर्यकुमार

बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?

हा बराच व्यक्तिगत प्रश्न झाला नाही का? तुम्ही रोज कोणती औषधे खाताय याचा अर्थ तुम्हाला मधुमेह आहे का, उच्च रक्तदाब आहे का, हाय कोलेस्टेरॉल आहे का अशा प्रकारचा झाला. कारण इतर रोगांमध्ये औषधे तेवढ्यापुरती घ्यावी लागतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल यावरील औषधे मात्र कायमची घ्यावी लागतात. इतरही काही रोग असे असतीलच. आपल्याला असे रोग आहेत का याचे उत्तर सगळे जण मोकळेपणाने देतीलच असे नाही. आणि ते उत्तर दिले तरी इतर लोक त्याविषयी काय करू शकणार?

कर्नलतपस्वी's picture

15 May 2024 - 6:03 pm | कर्नलतपस्वी

चंद्रसुर्य कुमार भौ बरोबर सहमत.

कुणी औषधे घेतात कुणी नाही हे जाणून घेऊन लेखकाला काय साध्य होईल.

जब होगी उमर पुरी
तब आयेगा हुकूम हुजूरी
यम के दूत बडे मजबूत
यमके पडा झमेला
उड जायेगा हंस अकेला.....

तरी सुद्धा ," शेवट चा दिसं गोड व्हावा ", म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. त्यात काहीच कमीपणा नाही.

चौथा कोनाडा's picture

16 May 2024 - 12:05 pm | चौथा कोनाडा
जब होगी उमर पुरी
तब आयेगा हुकूम हुजूरी
यम के दूत बडे मजबूत
यमके पडा झमेला
उड जायेगा हंस अकेला.....

+१

" शेवट चा दिसं गोड व्हावा ", म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. त्यात काहीच कमीपणा नाही.

" शेवट चा दिसं नव्हे तर रोजचा दिस गोड व्हावा ", या साठी औषधे घ्यावी लागतात. " कमीपणा " वै कै नै, ती अपरिहार्यता असते.
कोण माणूस (अर्थात अपवाद वगळता) कशाला उगाच रोज औषधे घेईल ? पैसे वर आलेत का ? त्या पेक्षा दोन प्याक चं औषध घेऊण एन्जॉय णाय का कर्‍णार ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठणठणीत सर्व वयातील माणसं सोडली तर, आता अपवादात्मक लहान मुलांनाही मोठ्या माणसांना असतात तशा व्याधी लागल्याला बघायला मिळतात. बाकी, पन्नासी ओलांडली (अपवाद मान्य) प्लस असणा-यांना बीपी आणि शुगरची व्याधी तर शंभर घरात सत्तर सापडतील अशी बदलत्या जीवनशैलीची फळं दिसतात आणि त्यावरील औषधेही घरोघरी दिसतात.

डॉक्टर मंडळी वेगवेगळ्या नावांच्या गोळ्या औषधी देत असले तरी कंटेट मात्र कमी जास्त असले तरी सारखीच असतील असे वाटते. डॉक्टर मंडळी यावर मतं मांडतील. पन्नाशी प्लस आलो म्हणजे मेंटनन्स वर आलो असे समजायचे आणि वाढत्या वयाबरोबर काही पथ्य पाळली पाहिजेत. पथ्य पाळणे होत नाही, हेही तितकं खरं आहे. एवढं तेवढं काय होतं, त्याचा फटका हळुहळु बसायला लागतो तोवर बराच वेळ झालेला असतो.

बाकी, धडधाकट माणसंही अचानक चालता-बोलता निघून जातात. सकाळी बोललो, दवाख्यान्यात चांगला बोलत होता, उत्तम होता. वाटलं नव्हतं इतकं अचानक कसं काय वगैरे, असे अनेक प्रश्न असले तरी त्याची उत्तरं नेमकेपणाने सांगता येत नाहीत. तेव्हा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेत राहावी काळजी न करता.

एवढे बोलून दोन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

एवढे बोलून दोन शब्द संपवतो.

दोन ??

बाकी मुद्दे छान आहेत.

कोण कोणती औषधे घेतो हा अर्थातच खूपच खाजगी मुद्दा आणि डेटा आहे. तो मिळवण्यासाठी किंवा तयार मिळाल्यास खूप खर्च करायला अनेक कंपन्या तयार असतील. अनेक ॲप्स, केमिस्ट किंवा हॉस्पिटल सिस्टीम डेटा आणि अन्य मार्गांनी तो गोळा केलाही जातो.

ही माहिती उघड सांगावी की नाही हे अर्थातच प्रत्येकाचे स्वातंत्र्य. शहरी निमशहरी भारतीय मध्यमवयीन कार्यालयीन जनता दरमहा केमिस्टचे अर्धे दुकान खाऊन जगते असे वरवर पाहता तरी वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> दोन ??
दोन पेक्षा अधिक शब्द झाले असतील तर दिलगिरी आहेच. ;)

बाय द वे, कोण कोणती औषधे घेतो यावरुन मला तर, असे वाटले की, व्यक्तीपरत्वे प्रत्येक औषधांची नावे यावीत. पण उगाच त्या आयडीला यंव आहे आणि त्याला त्यंव आहे. शुगरला यंव आणि बीपीला त्यंव औषधं. दोनचार लुजमोशनला यंव आणि त्यापेक्षा अधिकला त्यंव, ताप आला तर यंव आणि थंडी वाजली तर त्यंव औषधे. हँग ओव्हर झाल्यास यंव आणि वकार युनूस झाल्यावर त्यंव, अशी एक यादी आणि त्याला लागणारे पैसे अशी यादी झाली पाहिजे. पण, फायदे तोट्यांची भानगड आहेच. कायदेशीर भानगडी, म्हणजे डेटावर कोणी केमीष्टकडे जावून औषधं घेतली त्याचे काही भले परिणाम त्याची जवाबदारी.

असो.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

15 May 2024 - 7:36 pm | अहिरावण

रोज औषध खात नाही, "पितो".

चहा, गोल्ड फ्लेक, आणि ओल्ड मंक ... ठणठणीत आयुष्याचे रहस्य*

* आपापल्या कुटूंबीयांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. फटके खायला लागू शकतात.

सस्नेह's picture

15 May 2024 - 7:44 pm | सस्नेह

नियमितपणे काहीच औषध घेत नाही. कधी काही सर्दी खोकला अपचन इन्फेक्शन वगैरे झाल्यास तेवढ्यापुरते औषध.
माझे वडील वयाची ८६ वर्षे पूर्ण होईपर्यंत कसलेच औषध घेत नव्हते. आजारी पडले तरी झाडपाला किंवा आले, एरंडेल तेल, त्रिफळा चूर्ण इ. वर बरे होत. रोज चालणे आणि योगासने मात्र चुकवीत नाहीत.

सुबोध खरे's picture

15 May 2024 - 7:57 pm | सुबोध खरे

१९४७ साली आपली आयुर्मयादा ३२ वर्षे होती ती आता साधारण ७१ वर्षे झाली आहे.

तेंव्हा पूर्वी हे आजार नव्हते हि वस्तुस्थिती नाही तर पूर्वी माणसे इतकी जगतच नसत.

सिटी स्कॅन केल्यावर इजिप्त च्या ४००० वर्षे पुराण्या ममीज मध्ये हाडांचा स्तनाचा प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि ल्युकेमिया आढळलेला आहे
Using CT scans, the researchers, including members from the University of Granada’s anthropology group in Spain, determined that the mummies were a woman with breast cancer who died around 2000 B.C., and a man with multiple myeloma who died around 1800 B.C. According to the researchers, both individuals belonged to the ruling classes, or at the very east to the wealthy classes, of the governing Egyptian families of Elephantine.

याचा अर्थ हे आजार तेंव्हाही होतेच. आणि या ममीज श्रीमंत माणसांच्या होत्या म्हणजे त्यांना त्या काळचे वैद्यकीय उपचार सुद्धा उपलब्ध होते.

फक्त फरक एवढाच आहे कि तेंव्हा याला भुताने घोळसले त्यामुळे तो खंगून मेला किंवा वैर्याने मूठ मारली त्यामुळे रक्त ओकून मेला ( कर्करोग) असे समजत असत/ ऐकू येत असे.

किंवा अमावास्येच्या रात्री जात असताना अचानक खवीसाने करणी केली आणि जागचा माणूस आडवा झाला ( हृदय विकार).

देवी, पटकी, प्लेग याने तर तरणी ताठी माणसं सर्रास मरत असत.

एकाच साधी गोष्ट लक्षात घ्या. तुमची गाडी जुनी होते तेंव्हा त्यावर मेंटेनन्स चा खर्च चक्रवाढ व्याजाने वाढत जातो तशीच हि स्थिती आहे.

जगभर उच्च रक्तदाब हृदयविकार आणि कर्क रोग यांची रुग्ण संख्या वाढत आहे याचे कारण जगभरात जास्त जगणाऱ्या माणसांची / वृद्धांची संख्या वाढत चालली आहे.

हि माणसं पूर्वीसारखी ४५-५० वयालाच गचकली असती तर आज या रोगांचे वाढणारे प्रमाण दिसले नसते.

Even if you do not have hypertension by age 55 to 65, your lifetime risk for developing it is a whopping 90 percent.

तेंव्हा आपण औषधे घेतो आहोत म्हणजे काहीतरी भयंकर करत आहोत हा गैरसमज कृपया काढून टाकावा.

रोजच्या एक किंवा दोन गोळ्या घेऊन जर आपले आयुष्य १० वर्षांनी वाढणार असेल तर त्या घ्यायच्या कि नाही?

वाढते वय सुसह्य करायचे असेल आणि सुखाने जगायचे असेल तर उपचार करणे आवश्यक आहे.

आपले गुढघे झिजले (९९ % लोकांमध्ये लठ्ठपणा हेच कारण आहे) तर त्यावर शल्यक्रिया करायची का प्रत्येक पावलागणिक दुःख सहन करत चिडचिडे होऊ जगायचं?

काही वर्षपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण (वय वर्षे ७५) दवाखान्यात येऊन म्हणाली डॉक्टर आजकाल माझे गुढघे आणि कंबर फार दुखतात.

मी त्यांना हसत हसत म्हणालो अहो काकू घरभर फिरून पहा घरात ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू अजून चालू आहे.

त्या एक मिनिट विचार करून त्या म्हणाल्या "तू म्हणतोस ते खरं आहे ७५ कशाला ३०-३५ वर्षे जुनी सुद्धा अशी एकही गोष्ट नाही जी आज चालू आहे.

मी त्यांना म्हणालो कि आयुष्यभर कष्ट काढल्यामुळे आता तुमचा शरीर झिजलंय त्याला उपाय काय? रडत रडत जगायचं कि औषधे खाऊन आनंदात जगायचं.

श्री मंगेश पाडगावकर म्हणता तसं

जगायचं कसं कण्हत कण्हत

कि

गाणं म्हणत?

चंद्रसूर्यकुमार's picture

15 May 2024 - 8:03 pm | चंद्रसूर्यकुमार

तेंव्हा आपण औषधे घेतो आहोत म्हणजे काहीतरी भयंकर करत आहोत हा गैरसमज कृपया काढून टाकावा.

आपण औषधे घेत असू तर काहीतरी भयंकर करत आहोत असे वाटायला नको हे खरेच. पण त्याबरोबरच आपण कोणकोणती औषधे घेतो हे पब्लिक फोरमवर मुद्दामून टाकावे असेही नाही.

सुबोध खरे's picture

15 May 2024 - 8:08 pm | सुबोध खरे

@ चंद्रसूर्यकुमार

तो प्रतिसाद आपल्याला नव्हताच

सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे.

या लेखाच्या अगदी पहिल्या वाक्याबद्दल होता

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 8:24 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या घरात गोळ्या औषधांचा ढीग लागलाय, मागे कमीत कमी एखाद किलो गोळ्या फेकाव्या लागल्या तेव्हा डोक्यात आलं होतं की सर्व गोळ्याची मस्त एखादी डिसाइन बनवावी. आताही घरात अर्ध मेडिकल स्टोअर असाव. आईचे पाईल्स चे दोन ऑपरेशन झालेत. पण तीला त्या जागी खूप आग होत असते सतत., अनेक डॉक्टर, बाबा बुवा, आयुर्वेदिक डॉक्टर झाले पण त्रास काही बंद झाला नाही. कंटाळून आई नवा डॉक्टर युट्यूबवर शोधते नी त्याच्या गोळ्या चालू होतात. फरक काही पडत नाही. पाण्यासारखा पैसा गेला नी जातोच आहे पण गुण काही येत नाहीये.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली

त्रास पाईल्स चा नाहीये पण आग होत असते.

सर टोबी's picture

15 May 2024 - 10:43 pm | सर टोबी

ॲलोपॅथिक औषधं उष्ण पडू शकतात. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळवेल सत्व, गुलकंद, तुळस बी, गायीचं दूध आणि तूप असं काही देऊन फरक पडतो का ते पहावे. वरील सर्व पदार्थ एकत्रित देता येऊ शकतील. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हे प्रयोग करावेत.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2024 - 3:24 pm | हणमंतअण्णा शंकर...

सिट्स बाथ. (जिप्सम सॉल्ट टाकून)

सिट्स बाथ साठी कमोडवर ठेवायला एक भांडे मिळते. पत्नी गर्भवती असताना मी आणले होते आणि मलाही कधी मधी प्रासंगिक आग झाली तर मी घेतो.

माझ्याही आईला हा त्रास झाला तेव्हा हे मलम घेतले होते. आईला मुख्यत्वे शहरात आणल्यावर हा त्रास होतो कारण तिचे काम करणे प्रचंड कमी होते. पाण्यात फरक पडतो. (क्लोरिनेटेड पाणी पिऊ नये, गट बॅक्टेरियाची ची वाट लागते पूर्ण), भाकरी ऐवजी चपाती वगैरे गोष्टी होतात.

खाण्यात बदल केला तरी पाईल्स कमी होतीलच असे नाही. सिबो म्हणून एक प्रकार असतो जो गट बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे किंवा वेगळे झाल्यामुळे होतो. आपल्याकडे त्याचे एक्सपर्ट कमी आहेत. पण पोट नेहमी जड होत असेल तर अवश्य याच्यावर शोध घेऊन बघा.

सॉरी सिबो मध्ये लहान आतड्यात जास्त होतात. यामुळे कॉन्स्टिपेशन होते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2024 - 3:34 pm | हणमंतअण्णा शंकर...

सिट्स बाथ. (ईप्सम सॉल्ट टाकून) असे दुरुस्त करून घ्यावे.

हे नसेल थोडे डेटॉल टाकले तरी चालेल. पाणी खूप गरम कराय्ची गरज नाही. कोमट ते थोडेसे उष्ण.

दहा मिनिटे बसायचे शांत. कमोडवर.

मुक्त विहारि's picture

15 May 2024 - 8:51 pm | मुक्त विहारि

बटाट्याचे पथ्य नसेल तर,

आठवड्यातून , दोन ते तीन वेळा, सुरणाची भाजी वाटीभर खा.

बटाट्याचे पथ्य असेल तर, आधी सुरण आठवड्यात एकदाच द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

झालं हे पण करुन. पण काही गुण नाही. :(

मुक्त विहारि's picture

15 May 2024 - 9:58 pm | मुक्त विहारि

Ok

आहारात दोष‌ वाटतं आहे.अति तिखट,मिरची,चहा, कॉफी बंद करा.ताक,दुध वाढवावं.रात्री जेवण बंद करा.रोज कंपलसरी हिरवे/पिवळी शिजवलेली मुगडाळ/मसुरडाळ घ्या.एक फळ.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 May 2024 - 3:23 pm | अमरेंद्र बाहुबली

हे सर्व करुन झालय.

भागो's picture

15 May 2024 - 10:04 pm | भागो

"औषध" खूप महाग झाले आहे.
मनःस्वास्थ्यासाठी रोज एक क्वार्टर घेतो. डॉक्टर म्हणतात डोस वाढवावा लागेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमाण कमी करा हो.... =))
ड्रिंक्सचं प्रमाण किती असावं ;)

-दिलीप बिरुटे

हे तुमचे म्हणणे मी माझ्या डॉक्टरला तुमच्या नावा(पदवीसह) सह सांगितले.
ते एव्हढच म्हणाले, "भागो, तुम्ही आयुर्वेदिक, नीम हकीम, युनानी, होमिओपाथी, झाडपूस, बारा क्षार, सालंमिश्री सफेद मिश्री घोरापडीचे तेल, शिलाजित, आजीबाईचा बटवा,मुळव्याध- भगेंद्र- मिरगी धातू जाणे अक्सीर इलाज ह्या फोनवर अन्पर्क करा. एव्हढेच नाही तर बाबा रामदेव देखील. हे सगळे चालेल पण कृपा करून वाङ्मयाच्या डॉक्टरकडे जाऊ नका. आम्ही आता सुप्रीम कोर्टात केस घालणार आहोतच..."

अहिरावण's picture

17 May 2024 - 1:05 pm | अहिरावण

अरे देवा ! पण सुप्रिम कोर्टाने वांगमयाच्या डागतरांना पक्षी विद्यावाचस्पतींना प्रॅक्टीस (पक्षी : लेखन, समीक्षा इत्यादी) करायास बंदी घातली तर डोकेदुखीच्या गोळ्या बनवणा-या फार्मा कंपन्या दिवाळ्यात निघतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2024 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> आम्ही आता सुप्रीम कोर्टात केस घालणार आहोतच..."

आता झाड़पाल्यावाल्यांनी सर्वोच्च न्यायालयात फक्त माफ़ी नाम्यासाठी मा.न्यायमूर्तीच्या पायावर नाक घासायचंच बाकी राहिलं होतं, त्यामुळे झाड़पालाच्या नादी लागू नका.

बाकी, वाङ्मयाच्या डॉक्टरकडे जाऊ नका असा सल्ला दिला असेल तर नक्की पाळा.

''इतने बुरे नहीं थे हम जितने इल्ज़ाम लगाए लोगों ने
कुछ किस्मत खराब थी कुछ आग लगाई लोगों ने''

-दिलीप बिरुटे

सर तुम्ही हलकेच घेतल्या मुळे जॉन मे जॉन आई.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2024 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर तुम्ही हलकेच घेतल्या मुळे जॉन मे जॉन आई.

हा हा आंतजालावर हलकेच घ्यावेच लागते नाय तर, जालावर वावरणे कठीण होऊन जाईल. :)

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

17 May 2024 - 1:47 pm | अहिरावण

>>>आता झाड़पाल्यावाल्यांनी सर्वोच्च न्यायालयात फक्त माफ़ी नाम्यासाठी मा.न्यायमूर्तीच्या पायावर नाक घासायचंच बाकी राहिलं होतं, त्यामुळे झाड़पालाच्या नादी लागू
नका.

हे म्हणजे एखाद्या एमबीबीएस/ एमडी ने चुकीची औषधे दिली तर अलोपेथीच्या नादीच लागू नका
हे म्हणजे एखाद्या शिक्षकाने/प्राध्यापकाने बलात्कार केला तर शाळा/कॉलेजात पोरांना पाठवूच नका
हे म्हणजे एखाद्या ... जाऊ द्या कळाले असेल

तर प्राडॉ भारतीय संस्कृतीमधील एका जीवन्/औषधपद्धतीचा एवढा घाऊक द्वेष बरा नाही... अर्थात तुम्ही खुपच हुशार आहात.

डॉक्टर बदला नाहीतर ब्रँड बदला.

चौथा कोनाडा's picture

16 May 2024 - 12:09 pm | चौथा कोनाडा

भागो,

रोज एक क्वार्टर घेतो

रोज एक क्वार्टर घ्यायला कैच हरकत नाही पण एखाद्या मिपाकरा बरोबर (उदा. मी) शेअरींग ला बोलवत जा.. तुमचं प्रमाण ही आटोक्यात राहिल.. मिपाकराला अनायसे ट्रीट मिळेल आणि द्विपक्षीय मिपाज्ञान कट्टा होईल ते वेगळंच !

सतिश पाटील's picture

16 May 2024 - 11:54 am | सतिश पाटील

बरेच दिवस काही लिखाण झाले न्हवते, चला कुठून तरी सुरुवात करावी म्हणून म्हणून सहज सुचलेला विषय होता.
बाकी कोण कुठलं औषध घेतो म्हणून खाजगी डेटा गोळा करणे आणि काही साध्य करणे असा माझा हेतू नाही.

गैरसमज नसावा.

गवि's picture

16 May 2024 - 12:14 pm | गवि

चांगला विषय आहे.

तुम्ही डेटा गोळा करत असावेत असे कोणालाच म्हणायचे नसावे. याचे मुख्य कारण म्हणजे डेटा असा गोळा केलाच जात नाही. निनावी, टोपणनावी लोकांनी एखाद्या लेखावर दिलेले प्रतिसाद या स्वरूपात असा डेटा जमा होऊ शकत नाही.

नाव गाव संपर्क वय इ इ आणि त्यासहित औषधांची नावे, इतर बरेच काही गोळा होते ते फार्मसी डिलिव्हरी ॲप्स, अमेझोन (सप्लीमेंट्स, आयुर्वेदिक इ.), सर्व्हेज, हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपन्यांचे फॉर्म्स, खाजगी केस पेपर्स, केमिस्टच्या दुकानातील रजिस्टर, त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिम, डाएट वगैरे कन्सल्टेशन सर्व्हिस पुरवणाऱ्या वेबसाईटचे कस्टमर डिटेल्स अशा स्त्रोतांतून..

या लेखाच्या निमित्ताने ही रोचक वाटू शकेल अशी माहिती इथे लिहिली. इतरही कोणी अशी माहिती खाजगी आहे असा उल्लेख केला. खाजगी माहिती देखील लोक स्वखुशीने देऊ शकतातच.

पण असे कोणी काही जनरल अनुषंगिक लिहिल्यावर तुमच्या उद्देशावर त्यातून प्रश्नचिन्ह उभे राहून खुलासा द्यावासा वाटत असेल तर वाचनमात्र असलेले बरे या धाग्यावर.

कंजूस's picture

16 May 2024 - 4:33 pm | कंजूस

पंधरा दिवसांच्या वर औषध घ्यावं लागणे हे काही जंतूसंसर्ग संबंधित ठीक आहे. पण आयुष्यभर घ्यावी लागणारी औषधे ही औषधे का म्हणायची?

एक जण आहेत,६० च्या पुढे वय आहे ,मेंदू, स्मृतीविषयक आजार आहे.पण २० वर्षे झाली औषधांवरच जगत आहेत.

अमर विश्वास's picture

16 May 2024 - 5:14 pm | अमर विश्वास

कुठलाही औषध नाही ..

रोज चावनप्राश खातो ... (घरी बनवलेल) .. त्याला औषध म्हणायचे का ?

अहिरावण's picture

16 May 2024 - 7:18 pm | अहिरावण

छे छे तो जादू टोणा...

संदर्भ - पतंजलीवर झालेला दावा आणि माफीनामा

मागे एकदा व्हाट्सअप विद्यापीठातून
व्यायाम हे औषध आहे
उपवास हे औषध आहे
गाढ झोप हे औषध आहे ...
इत्यादी, इत्यादी
असे फॉरवर्ड आले होते ते आठवले.

कोणाकडे असेल तर इथे पेस्टवा.

बरखा's picture

24 May 2024 - 9:39 pm | बरखा

विटामीन ड, सी , कैल्शिअम ह्या खातो

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2024 - 4:21 am | हणमंतअण्णा शंकर...

मी जीवनसत्वे :

दैनिक :

विटामिन डी : २००० आय यु.
ओमेगा ३,
ई,
के२,
एनम आणि एनआर ,
बी १२,
Ubiquinol CoQ10,
मल्टिविटामिन : यात ए, सी पासुन सेलेनियम, झिंक पर्यन्त बरेच असतात.

अश्वगंधा नियमित परंतु सवय न लागु देता ( याने झोप येते परंतु सवय लागते). तसेही ताण कमी झाला आहे, स्क्रीन टाईम कमी झाला आहे त्यामुळे झोप येते. अश्वगंधा बंद करणार आहे.

आठवड्याला :

दोन वेळा हळद + दूध,
Magnesium L-Threonate + Theanine + Apigenin हा कॉंबो

महिन्यातून :
बी १२ कमी पडत असेल

प्रासंगिक :

स्ट्रेसमुळे टेस्टेस्टेरॉन कमी झाले होते त्यामुळे : Tongkat Ali आणि Fadogia Agrestis बराच काळ घेतले.
स्ट्रेस जस जसा कमी झाला तसा खूप फरक पडला.

---

सध्या तरी मधुमेह नाही. खाण्यावरून नियंत्रण सुटते अधून मधून. परंतु आळस प्रबळ असल्याने बाहेर जाणे आणि खाणे होत नाही आणि स्वयंपाक सुद्धा करवत नाही त्यामुळे फळे वगैरेच जास्त खाणे होते. मासे नियमित खात आहे.

---
८१ वर्षे ७ महिने जगेन. त्या आधी तिसरे महायुद्ध होऊ नये अशी इच्छा. झाली तर चीन विरुद्ध लढून प्राण देईन स्वतःहून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2024 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्ट्रेसमुळे टेस्टेस्टेरॉन कमी झाले होते त्यामुळे : Tongkat Ali आणि Fadogia Agrestis बराच काळ घेतले.
स्ट्रेस जस जसा कमी झाला तसा खूप फरक पडला.

फरक कशात पडला ?
आणि

८१ वर्षे ७ महिने जगेन.

याचं तपशीलवार कॅल्क्युलेशन प्लीज ?

दोन्हीही प्रश्न खासगी स्वरुपाचे आहेत, उत्तरं दिलीच पाहिजेत असा आग्रह नाही.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2024 - 3:11 pm | हणमंतअण्णा शंकर...

फरक कशात पडला ?

सकाळी मोजलेल्या टेस्टेस्टेरॉन लेव्हल्स वर. पुन्हा नॉर्मल वर आले.

८१ वर्षे ७ महिने जगेन. : याचं तपशीलवार कॅल्क्युलेशन प्लीज ?

एक कॅल्कुलेटर आहे इथे. https://media.nmfn.com/tnetwork/lifespan/index.html#13

परंतु माझ्या एका इन्शुरन्स कंपनीने माझे सगळे रिपोर्ट वगैरे तपासून हा आकडा दिला होता. अर्थात तेव्हा मी दिवसाला दोन सिगरेट ओढत असे. शिवाय बियर/ वाईन वगैरे बर्‍यापैकी रेग्युलर असे.

आता कदाचित ८७ वर्षे वगैरे होईल असे वाटत आहे.

मी पण हिशेब लावला. तर तुम्ही १०१ वर्षे जगणार असे उत्तर आले. १०१ व्या वाढदिवशी मला खरड पाठवायला विसरू नका प्लीज. म्हणजे मी माझी डाटा बॅंक अद्ययावत करेन.

रत्नाकर मतकरींच्या निळ्या डोळ्यांच्या मुलासारखं नाही ना काही ??? लहानपणी वाचून जाम टरकलो होतो. बेसावध, फक्त शेवटची ओळ वाचून उडालोच जागच्या जागी.

भागो's picture

25 May 2024 - 8:00 pm | भागो

गवि सर
रत्नाकर मतकरींच्या निळ्या डोळ्यांच्या मुलासारखं नाही ना काही>>
हा काय प्रकार आहे? जालावर कुठे उपलब्ध आहे का?

जुन्या कथासंग्रह आहे. नाव नेमके आठवत नाही. त्यात कथा आहे. गूढ भयकथेने लहानपणी एकट्यानेच बसून वाचताना "क्येसं हुबी र्हात्यात" चा पहिला अनुभव होता. शोधून वाचा.

कर्नलतपस्वी's picture

25 May 2024 - 4:08 pm | कर्नलतपस्वी

अण्णा कॅल्क्युलेटर लईच भारी आहे.

जास्तीत जास्त १६०वर्ष आणी कमीत कमी कधीही मरू शकतो.

चौथा कोनाडा's picture

25 May 2024 - 5:16 pm | चौथा कोनाडा

म्या नव्वद वर्षं जगणार असं ही साईट म्हणते !
लैच आयुष्य झालं राव !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2024 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

त्रिफळा( हिरडा, बेहडा, आवळा) वेगळे तीन आणून घेतो कधीमधी.
त्रिकटू चूर्ण खूप खाणं झालं तर घेतो. हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही.
कधीकधी खा खा सुटते. तेव्हा दणकून खातो. हेच औषध.

धर्मराजमुटके's picture

26 May 2024 - 12:03 pm | धर्मराजमुटके

हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही आणि सकाळी उठल्यानंतर झोप येत नाही.

कंजूस सर नि धर्मराज मुटके.
हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही
सकाळी उठल्यानंतर झोप येत नाही.>>>
ह्या वाक्यावर पुलनी पण दंडवत घातले असते.
जीभ घशाच्या आत गेली.

हे विनोद किंवा विडंबन नसून सत्य आहे.

तरुणपणी ऑफिसच्या कँटिनचे खूप चांगले पदार्थ मिळत. साडेपाचला पाच सात प्लेट्स वडे, सँडविचेस, समोसे ,इडल्या,कचोऱ्या खाल्ल्या , पाच सहा कप चहा ढोसला तरी सात वाजता पूर्ण जेवण हादडत असे. परंतू पोट हलकेच राही. मला आणि सहकाऱ्यांनाही आश्चर्य वाटे. आता मात्र तेवढी भूक लागत नाही. असो. आलिया भोगासी.

कंजूस's picture

26 May 2024 - 6:06 pm | कंजूस

एक राहिलं

यूट्यूबवर फूड ब्लॉग असतात त्यात काही नामांकित खादाड लोक आहेत. उदाहरणार्थ "खाने में क्या है" चानेल. आणखीही दोन चार आहेत.

भागो's picture

26 May 2024 - 8:01 pm | भागो

सॉरी सर.

तुमचा हलका फुलका विनोद उताणा पडला. म्हंजे कंकाकांनी पाडला. त्या विनोदाचे निर्वाण झाले.

कंजूस's picture

27 May 2024 - 5:30 am | कंजूस

माफ करा धागा लेखक, थोडं अवांतर वाटलं असेल. मी कधीकधी सत्य सांगायला जातो आणि तो विनोद वाटतो. खा खा सुटते यासाठी भरपूर खाणे हेच औषध आहे. ते घेतो. बरं एवढं खाऊन देखील अंगावर काहीच दिसत नाही.

सुबोध खरे's picture

27 May 2024 - 12:05 pm | सुबोध खरे

माझ्या मित्राचे वडील वय वर्षे ८५ माझ्याकडे आले होते, सांगत होते अरे लोक सांगतायत "काका तुमचं वजन कमी झालंय".
मी विचारलं तुम्हाला त्रास काय होतो?
ते म्हणाले, त्रास काहीच नाही.
मी -भूक लागते का ?
काका- हो व्यवस्थित
मी- झोप लागते का?
काका-हो सात तास झोपतो. रात्री दहाला झोपतो आणि पहाटे पाच ला जाग येते.
मी -मग तुमची तक्रार काय आहे?
काका- माझी काहीच तक्रार नाही पण सगळे म्हणतात वजन कमी झालय ते वाढवायला काय करायला पाहिजे
मी - काका तुम्ही तळवलकर जिमच्या बाहेर उभे राहा. सकाळी सकाळी अतिविशाल महिला व्यायाम करून बाहेर येतात त्यांना विचारा तुम्हाला काय काय खाऊ नका ते सांगितलंय. ते सर्व तुम्ही खा. उदा मिठाई भजी समोसे पनीर चिज. जेजे पचेल ते सर्व.
काकानी हसत हसत मला टाळी दिली आणि गेले.

सकाळी सकाळी अतिविशाल महिला व्यायाम करून बाहेर येतात त्यांना विचारा तुम्हाला काय काय खाऊ नका ते सांगितलंय. ते सर्व तुम्ही खा. उदा मिठाई भजी समोसे पनीर चिज. जेजे पचेल ते सर्व.
काकानी हसत हसत मला टाळी दिली आणि गेले.

फुकटातच काम होईल की काकांचं,असे परोपकार पाहिजेत.

सुबोध खरे's picture

27 May 2024 - 11:57 am | सुबोध खरे

हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही आणि सकाळी उठल्यानंतर झोप येत नाही.

यावर रामबाण उपाय आहे.

कुंभकर्ण निद्रावर्धक वटी रात्री झोप लागल्यानंतर घ्या, रात्रभर उन्हात बसा आणि जठराग्नीप्रदोष नाशक वटी पहाटे झोपेतून उठण्याच्या अगोदर घ्या.

शेकडा दोनशे टक्के गुण येईल

औषधे आणि काढे माणुस जन्माला आला की सुरु होतात.
जातांना ती औषधांची आठवणी ठेवून जातात.